१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?
माझ्यामते आधुनिक असणं म्हणजे कुठल्याही सरसकट जुन्या गोष्टींचा विरोध नाही तर ,जुन्या नवीन सगळ्याच गोष्टींकडे वैज्ञानिक दॄष्टीकोनातुन आणि सद्सद्विवेकबुद्धी ने पाहणे हा होय.म्हणजेच स्वतःच्या डोळ्यांवर आणि विचारांवर विश्वास ठेवणे. याचा धार्मिकतेशी संबंध तुम्ही जोडलाय .श्रद्धेचं म्हणाल तर श्रद्धा ही त्या श्रद्धा ठेवणारया व्यक्तीपुरती मर्यादित असावी.कोणी सांगितल्यामुळे ,भडकवल्यामुळे ती कमी जास्त होत नाही .आधुनिक असणारया व्यक्ती ह्या श्रद्धाळु नसतात हा पण एक गैरसमज आहे. फक्त अंधश्रद्धेच्या बाबतीत डोळसपणे विचार करण्याची गरज आहे नाहीतर लोकांना गंडवण्याचे आणि हानी पोचवण्याचे प्रकार जास्त होतील आणि ते बंद झाले पाहीजेत .आपल्या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे .चांगल्या हेतुने मत मांडणारया प्रत्येक व्यक्तीला धर्म या विषयावर मत मांड्ता येते. मी पण तर मांडतेच आहे की स्मित (यातही मी काही चुकीचे लिहित असेन तर विरोध करु शकता )
संतांचा आदर करावा पण भोंदुबाबांना कड्क शिक्षा व्हायला हवी.श्रद्धेला आधुनिकतेचा काही धोका नसावा आणि तुम्ही म्हणताय तसं काळाच्या उदरात चांगल्या गोष्टी गडप होणार नाहीत ,कारण वैज्ञानिक दॄष्टीकोन आणि आधुनिकता माणसाला प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघण्याची दॄष्टी जरी देत असली तरी जोपर्यंत चांगली मुल्य आणि संस्कार अबाधित आहेत तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही.त्यामुळे आधुनिकता उथळ(चुकीची) नाही .>>>
सिनी च्या या पोष्ट मधे प्रश्नाचे उत्तर आहे.
छान
छान
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ?>>
>>>>>>>>
देवाचा कौल घ्यावे
ऋन्मेऽऽष, मुळ विषयावर चर्चा
ऋन्मेऽऽष, मुळ विषयावर चर्चा चाललिय चालु दे ना...
पंच्याण्णो
पंच्याण्णो
१००० वी कॉमेंट ज्याची त्याला
१००० वी कॉमेंट ज्याची त्याला एक विशेष पुरस्कार जाहीर केला पाहिजे ... खूप लोक आहेत competition मध्ये ...
शांत पडलेल्या माबो ला एक नवीन उर्जा मिळाली आहे.. नवे चैतन्य ... एखाद्या झाडाला नवी पालवी फुटावी तसा हा धागा एका मागून एक इतर धाग्यांना ओवेरटेक करत सुसाट निघाला आहे ... असेल हिम्मत तर अडवा ... जणू चंगेझ खा .. किंवा सिकंदर .. किंवा नेपोलिअन ... किंवा आपले राघोबा .... भरारी सुरु आहे ...
संतांचा आदर करावा पण
संतांचा आदर करावा पण भोंदुबाबांना कड्क शिक्षा व्हायला हवी. >> हे वाक्य आवडले आणि पटलेही
९९८
९९८
९९९
९९९
१०००
१०००
श्या मिस झाला
श्या मिस झाला
१०००
१०००
बेफि बरोबर वेळेवर आलात!
बेफि बरोबर वेळेवर आलात!
आवो जावो धागा
आवो जावो धागा तुम्हारा..
सदाबहार धागा!
----- समोरच्या प्रत्येक
----- समोरच्या प्रत्येक व्यक्तीला मान द्यावा... मान देण्यासाठी स्री, वरिष्ठ नागरिक असा काही क्रायटेरिया नको.>> हे आहेच की ,धाग्यात फक्त स्त्रीयांविष्यी लिहिलं आहे म्हणुन.. नाहीतर सगळ्यांचा मान देणं यात दुमत नाही. उलट स्त्री,पुरुष ,लहान ,वरीष्ठ असा आदराच्या बाबतीत भेदभाव करु नये . हेच माझेही म्हनणं आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पण प्रश्न हा आहे कि खरा कोण आणि ढोंगी कोण हे तुम्ही कसा शोधणार ? >> वैज्ञानिक दॄष्टीकोनातुन आणि सद्सद्विवेकबुद्धी हे उत्तर आहे.
पण वापरते ढोंगी ओळखायला .त्यात मी सहसा चुकत नाही :स्मित:.
मी वैज्ञानिक दॄष्टीकोनातुन आणि सद्सद्विवेकबुद्धी आणि थोडा कॉमन सेन्स
तुम्ही कसे ओळखता ढोंगी ते पण सांगा म्हणजे माझ्या जनरल नॉलेज मधे वाढ होईल.
अभिनंदन वीणा तै.
अभिनंदन वीणा तै.
मबोरत्न च्या दावेदार फक्त एकच
मबोरत्न च्या दावेदार फक्त एकच ... विना तै ... अरेय आवाज konachaaaaa
देवाचा कौल घ्यावे>> तुम्ही या
देवाचा कौल घ्यावे>> तुम्ही या गोष्टी मानता तर ....
देवाचा कौल लावणे हे मला छापा काटा करण्यसारखे वाटते . यात कुणाच्या धार्मिक भावना मला दुखवायच्या नाहीत, पण त्यापेक्षा बुद्धीने केलेला डोळस विचार कधीही चांगला.
सुरेख@ धन्यवाद तुम्ही आधीच
सुरेख@ धन्यवाद तुम्ही आधीच उत्तर दिले होते त्याबद्दल.
देवाचा कौल घ्यावे>> तुम्ही या
देवाचा कौल घ्यावे>> तुम्ही या गोष्टी मानता तर .
>>>>>>>
अर्थात नाहीच, तो उपरोध कि उपहास काय सर्किरस्टाकली की काय म्हणतात तसे विधान होते.
जो पैसे घेउन लक्ष्मी,धन दौलत
जो पैसे घेउन लक्ष्मी,धन दौलत वाढवायचे उपाय सांगतो तो स्वता: पैसे का घेतो?विचार करु शकतो की..
योगा ने सगळे आजार ठीक करनारा रामदेव बाबा स्वता:चा डोळा का ठीक करत नाही...
हातातुन सोन्याची साखळी काढनारा बाबा देशाला कर्जमुक्त का करत नाही?
अजुन खुप आहे टायपायचा कंटाळा आलाय.
तुमचा नवीन धागा आला नाही आज
तुमचा नवीन धागा आला नाही आज .. त्वरा करा ... कन्सिस्तेन्सि महत्वाची ...
आज नाही, उद्याच्या पार्टीची
आज नाही, उद्याच्या पार्टीची तयारी करायचीय...
अर्थात उद्या तर ऑनलाईनही नसेल तर उद्याही नाहीच..
परवा शुद्धीत नसल्याने धागा नाही काढू शकणार..
तेरवा मात्र विचार करतोय शुद्धीवर आल्यावर आठवले तर पार्टीचा वृत्तांतच लिहेन..
ऋन्मेऽऽषजी ,कळलं हो ते फिदी
ऋन्मेऽऽषजी ,कळलं हो ते फिदी नाही का दिसली ,इतरांसाठी होतं ते नाहीतर उपरोध न समजता अनुकरण करायचे म्हणुन ... वरचेही उपरोधानेच आहे ना!! कारण तुम्ही व्यसनमुक्ती ला पाठिंबा देणारे आहात. मीच क्लियर केले.
नाही हो, उलट मी मद्यपान हेच
नाही हो, उलट मी मद्यपान हेच सर्वश्रेष्ठ दान या मताचा आहे
रुल नं१ -- मद्यपान करु
रुल नं१ -- मद्यपान करु नका.
रुल नं२ -- मद्यपान केले तर गाडी चालवु नका.
रुल नं३ -- वेळ आलीच तर सार्वजनिक वाहनाचा वापर करा.
रुल नं ४-- निर्व्यसनी लोकांनी गाडी चालवा पण हेल्मेट घाला व चारचाकी वाल्यांनी सीट्बेल्ट लावा.
रुल नं ५ -- वाहतुकीचे नियम पाळा आणि पोलिसांना सहकार्य करा.
सुरक्षित प्रवासासाठी (जनहितार्थ जारी.)
रूल सोडा, फंडा ऐका.. पिण्याची
रूल सोडा, फंडा ऐका..
पिण्याची मजा अर्थातच दिवस मावळल्यावर. घरात प्याल तर उत्तमच. पण बाहेर जायचे असल्यास घराजवळचा बार न बघता, ३ ते ५ किलोमीटर अंतरावरचा बघा. पण जाताना चालत न जाता ड्रायव्हिंगचा आनंद घेत जा. लिमिटमध्ये प्या. हे सर्वात महत्वाचे. कारण आपले लिमिट आपल्यालाच ठरवायचे असते, ते मित्रांना ठरवू देऊ नका. पण येताना मात्र गाडी तिथेच पार्क करून चालत घरी या. किमान पाऊण-एक तासाचे चालणे होऊ द्या. घरी येऊन सरळ झोपी जालच. ती झोपही मस्त ढगात तरंगल्यासारखी असेल. सकाळी जागही वेळेवरच येईल. पुन्हा उतारा म्हणून थोडा घरचाच स्टॉक खाली करा, आणि पुनश्च मॉर्निंग वॉल्क करत गाडी आणायला जा. या तजेला देणार्या वॉल्कनंतर तुम्ही पुन्हा त्या बारमध्ये न शिरता गाडीच घेऊन परत याल याचीही ग्यारंटी असते.
१०० प्रतिसाद वाला धागा
१०० प्रतिसाद वाला धागा बनवण्याची प्रक्रिया ...
१. दैनंदिन जीवनातली कोणतीही गोष्ट घ्या.
२. पहिल्या दोन प्यारा मध्ये girlfrd आणि एमेन्सि टाका ...
३ .जमला तर शा खा किंवा सई येओ द्या ...
४. जर शा खा कथेत नाही आला तरी प्रतिसादांमध्ये येओ द्या ...
१००० धागा ची प्रक्रिया ...
????
इथे ख्रिस्ती नववर्षदिनाची
इथे ख्रिस्ती नववर्षदिनाची तयारी सुरू असल्याने जराशी व्यस्त आहे. त्यामुळे इकडे डोकावता आले नाही. एक हजार झाल्यामुळे आपल्या सर्वांचे अभिनंदन. कारण हे श्रेय कुणाचं आहे हे सांगण्याची गरज नाही. अवांतरचा कंटाळा आला की सगळे फॉर अ चेंज म्हणून मूळ विषयाकडे वळतील असा अंदाज होता तसं होताना इथं दिसलं.
सिनी यांची विषयाला धरून असलेली जी पोस्ट आहे तिच्याशी मी सहमत आहे. आधुनिक म्हणजे श्रद्धाळू नाही असं नाही याला जोरदार अनुमोदन. असं असायला पाहीजे. पण आधुनिकता म्हणजे काय याबद्दल जे गैरसमज पसरलेले आहेत त्याबद्दल मूळ स्टेटस मधे आक्षेप घेतला होता. आद्धुनिक म्हणजे पारंपारीक ते सर्व मोडीत काढणे नव्हे हे सिनी यांनी सांगितलं आणि सर्वांनी ते मान्य केलं. धन्यवाद सर्वांचे.
सर्वांना ख्रिस्ती नवववर्षदिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
नवीन वर्षात भेटूयात आमच्या कोल्हापुरात
नववर्षाला नुस्ते नववर्ष
नववर्षाला नुस्ते नववर्ष म्हणावे.
चड्डी घातली तर आज मी ख्रिस्ति चड्डी घातली असेच्म्हणता काय ?
Pages