आणि पुन्हा पाहिले त्याने...

Submitted by अवल on 19 December, 2014 - 12:07

अचानक दोन दिवस मोकळे मिळाले आणि शोधाशोध सुरू केली. अर्थातच प्रथम मायबोलीवरच शोधाशोध केली. अन अपेक्षित लगेच मिळाले. जिप्सीच्या एका धाग्यावर सागर सावली, दापोली ( लाडघर) ची माहिती मिळाली. अन बेत ठरला. मधले अधले दिवस असल्याने राहण्याचीही सोय चटकन झाली.
या वेळेस लेकाच्या कार ड्रायव्हिंगचे कौशल्य पहायचे होते. अर्थातच माझी रवानगी मागील सीट वर होती. प्रवास सुरू झाला . मी थोडी काळजीपूर्वक पुढचा रस्ता बघत होते. लेकाचे मात्र पुढच्या रस्त्याबरोबरच आजूबाजूच्या आणि रेअर मिरर मध्येही नीट लक्ष होते. त्यानेच मला मागे सूर्योद्य बघायला सांगितला.

अन मी वळून बघताच माझ्या लक्षात आले, ह्याही वेळेस निसर्ग काही छान, आगळे वेगळे दाखवणार.
आणि झालेही तसेच. क्षणाक्षणाला सूर्याचे रूप पालटू लागले. लेकाच्या ड्रायव्हिंग वरती अन नव-याच्या क्लिनर गिरीवर पूर्ण विश्वास टाकून मी गाडीत पाठ करूनच बसले. अन मग मला काही सुंदर स्नॅप्स मिळाले. (चालत्या गाडीतून फोटो काढले असल्याने खूप स्पष्ट नाहीत फोटो )

मागे केरळ्च्या प्रवासात असाच एक सूर्यास्त मला मिळालेला. त्याचा कटाक्ष हणून मी इथे तो टाकला होता. आज तसेच दोन कटाक्ष आमच्या नशीबात लिहिले होते. अन सोबत एक रंगीत संध्याकाळही Happy

IMG_6952.jpg

थोड्या वेळाने सूर्याची लाली कमी झाली पण झाडांच्या काळ्या सावली मागेही तो सुंदरच दिसत होता.

IMG_6958.jpg

अन मग झाडाच्या डोक्यावर तर तो फारच शोभून दिसला

IMG_6961.jpg

आणि मग आम्ही दापोली पुढच्या लाडघर इथल्या सागर सावली मध्ये पोहोचलो. तिथला शांत समुद्र मन मोहून टाकत होता. तशात तिथे वस्तीला आलेल्या हजारो, अक्षरश : हजारो सी ईगल्सनी मनाला अशी काही भूरळ घातली की विचारू नका. मला पक्षांचे फोटो अजूनही फार चांगले नाही काढता येत. पण तरीही काही टाकते.

जरा लांबून त्यांचा पहिला फोटो काढला.

IMG_7013.jpg

अजून जवळ जायचा मोह झाला पण त्यांना तो नाही आवडला.

IMG_7016.jpgIMG_7023.jpg

मग मी आपले लांब राहून त्यांच्याकडे बघणेच पसंत केले.

अन मग संध्याकाळ हळुवार उतरत गेली. आकाशात नवीन खेळ सुरू झाले.
काही हलक्या ढगांनी आपली पखरण सुरू केली. सूर्याला थोडे धूसर केले.

IMG_7107.jpg

अन एकदम माझ्या नजरेला पुन्हा तो केरळला पाहिलेला आकार ढगांमध्ये दिसू लागला.

IMG_7135.jpg

आता प्रश्न होता तो फक्त ढग तिथेच राहण्याचा अन सूर्य खाली उतरण्याचा. माझा माझ्यावरच विश्वास बसेना. एखादा निसर्गाचा आविष्कार एकाच आयुष्यात इतकेच नव्हे तर, एकाच दिवसात पुन्हा अनुभवायला मिळणे, केवळ अशक्य घटना. पण ती घडत होती. सकाळचा कटाक्ष पुन्हा एकवार मला मिळत होता.

IMG_7143.jpg

त्या निसर्गाच्या कृपेने माझी नजर झुकली. अन खाली एक वेगळाच खेळ रंगलेला दिसला. समुद्राच्या पाण्यात एक सोनेरी महामार्ग तयार झाला होता.... कोणासाठी होता तो महामार्ग ?

IMG_7144.jpg

त्यावरून वर नजर उचलली गेली अन चकीत झाले. ढगांनी आपले रिंगण सैल केले होते, डोळ्याचा तो आकार गायब झाला होता. आता होता तो एक साधा नेहमीचाच पण नितांत सुंदर सूर्यास्त!

IMG_7164.jpg

अजून काही वेळ गेला , हळूहळू अंधारू लागले, सूर्यास्ताची मोहिनी अधिकच वाढू लागली. जणुकाही सूर्य पुढे अन झाड मागे आहे असा भास व्हावा असा हा क्षण. मी फक्त टिपला. थोडाही फोटोशॉप इफेक्ट नाहीये या फोटोत. अगदी जसा टिपला तसा इथे टाकलाय.

IMG_7174.jpg

ढगांनी पुन्हा त्याला आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली.

IMG_7181.jpg

अन एका क्षणी एका सी इगलने भरारी घेतली... उंच... आणखीन उंच...त्याचा एक पंख सूर्याने झळाळून टाकला अन दुसरा पंख सूर्याला महिरप करून वाकला होता. मला आवडलेला हा एक फोटो.

IMG_7184.jpg

हळूहळू सूर्याला क्षितिजाने लपवायचे ठरवले. पण त्या आधी या झाडांच्या फांद्यांनी त्याला जणूकाही आपल्या पंजात सामावून घेतले अन त्या दिवशीचा करंडकच मला मिळाला.

IMG_7219.jpg

हल्ली अनेक जण वॉटरमार्क टाका म्हणून आग्रह धरतात. एका अर्थी योग्यही आहे ते. पण हल्ली निसर्ग टिपताना हा हट्ट मी सोडून दिलाय. निसर्गाची ही किमया, त्यावर मी माझा हक्क कसा सांगू ?

पण निसर्गालाही माझी गंमत करावी वाटली असावी. त्या संध्याकाळी सूर्यास्ता नंतर त्याने आकाशात माझाच तर वॉटरमार्क उधळला होता आकाशात Wink

IMG_7224.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल....

मन प्रसन्न आणि प्रफ़ुल्लित करून टाकले सार्‍या प्रकाशचित्रांनी.....सी गल्सचे शांत रूप तसेच भरारी रूप दोन्हीही भावले. वॉटरमार्कबद्दलचे तुमचे मत फार पसंद पडले. आहे निसर्ग सर्वांसाठी सदैव हजेरी देत असतोच तर त्याच्या सुंदरतेला आपल्या कॅमेर्‍याने पाहिले काय किंवा अन्यांच्या...मनाला सुखद समाधान लाभते, ते महत्त्वाचे.

चालत्या गाडीतून फोटो काढले असल्याने खूप स्पष्ट नाहीत फोटो >>>> अजुन किती स्पष्ट हवेत फोटो अवलतै? Uhoh मस्तच आलेत..

अय्याइ ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग
अवल,
फोटो तर बेस्टच आलेत पण तू मनोगत कसल लिहिलयस ग......................
<<<.त्याचा एक पंख सूर्याने झळाळून टाकला अन दुसरा पंख सूर्याला महिरप करून वाकला होता. >>>>>>>>मस्त, मस्त, मस्त

अप्रतिम फोटोग्राफ़ी ....बरोबरीने तितकेच नेटके लेखन...
अवल तुम्हि अव्वल आहात....