कॉर्न-मटार सामोसे

Submitted by मुग्धटली on 19 December, 2014 - 01:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कॉर्न - १ वाटी
मटार - १ वाटी
कणीक/रवा-मैदा भिजवुन - पार्‍यांसाठी
लसुण - ३-४ पाकळ्या
आल
कोथिंबीर
मिरची - २
तेल - फोडणी आणि तळण्यासाठी
जिर
मोहरी
हिंग
मीठ चवीनुसार

Ingredients_0.jpg

क्रमवार पाककृती: 

प्रथम मटार व कॉर्नचे दाणे कुकरमध्ये शिजवुन घ्या.. हे शिजुन होईपर्यंत आल, लसुण हिरवी मिरची, आवडत असल्यास कढीपत्ता मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.. नंतर शिजवलेले मटार व कॉर्नचे दाणे मिक्सरमधुन जाडसर वाटुन घ्या.. कढईमध्ये तेल तापवुन त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करुन त्यात आल, लसुण हिरवी मिरची, आवडत असल्यास कढीपत्ता मिक्सरमध्ये पेस्ट आणि जाडसर वाटलेले मटार व कॉर्नचे घालुन सर्व एकत्र करुन घ्या.. त्यात चवीपुरते मीठ घाला.. मिश्रणातील पाणी निघुन जाउन मिश्रण कोरड झाल्यावर गॅस बंद करुन मिश्रण थंड होण्यास ठेउन द्या.. कढईत तळण्यासाठी तेल घेउन ते तापत ठेवा.. भिजवलेल्या कणकेला समोश्याचा आकार देउन त्यात वरील सारण भरुन सामोसे मंद आचेवर तळुन घ्या.. सॉस किंवा नारळाच्या चटणीबरोबर खायला द्या.

Samose_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
आज पहीला प्रयोग असल्याने सर्व अंदाजे घेतल होत.. त्यामध्ये ७-८ सामोसे झाले..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासू दिसातायेत समोसे. मुग्धा तुझा फोटोवाला प्रतिसाद जसाच्या तसा कॉपी करुन मुख्य कृतीत पेस्ट कर. तिथेही दिसेल मग.

सारणात मीठ, साखर, मसाला इत्यादी नाही का घालायचं? >>> अय्यो, मंजुडी मैने सांग्या हय ना कृतीमे.. सारण मे मीठ टाको करके.. आल, लसुण इ की पेस्ट घालनेके बाद मसाला काय को घालनेका?

सकाळच्या घाईत बरे प्रयोग करयला जमतात तुला मुग्धे?>>>> अग नवरा म्हणाला आज डबा नकोय त्यामुळे तो वेळ वाचलेला होता थोडासा.. आणि ब्रेफाला काय करायच हा भुंगा मेंदु पोखरत होताच..

बरं बाई ओव्हन नाही वापरलास, मटारकरंजीतला ओव्हनचा टायमर पाहून माझ्या घरच्या मटारानी भाजीत जीव दिलाय

विनिता.. माझ्याकडे ओव्हन, मावे नाहीये...

मटारकरंजीतला ओव्हनचा टायमर पाहून माझ्या घरच्या मटारानी भाजीत जीव दिलाय >>>> का? काय झाल?

समोसे छान झाले आहेत पण आकार .... फुस - पारी लंबगोलाकार लाटून मधून कापावी. कापलेली बाजू एकावरेक ठेवली की कोन तयार होईल. त्यात सारण भरावे. गोलाकार बाजूला एक चिमटा घेऊन , पाणी लावून दोन्ही बाजू जोडाव्या..

खर तर मी पाकृ पहाणारच नव्हते.:राग: कारण मला अजीबात जमत नाही.:अरेरे: एकतर मऊ पडतात, नाहीतर जाम तेलकट होतात.:अरेरे:

पण पाकृ आणी फोटो छान आहेत.:स्मित: