पात-टोमॅटो

Submitted by हर्ट on 15 December, 2014 - 23:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

छोटे टोमॅटो
कांद्याची पात,
गहू, ज्वारी आणि चण्याच्या डाळीचे पिठ
जिरे पावडर, मोहरी, मीठ, तेल, हळद, लिंबू, साखर, तिखटजाळ मिरच्या मस्ट आहेत.

क्रमवार पाककृती: 

१) पोळ्या करुन झाल्यात की तोच तवा वापरायचा. तव्यावर २ ते ३ चमचे तेल ओतायचे. तवा गरम असतो म्हणून लगेच पंचपुरण टाकायचे. मोहरी उडायला लागली की मग मिरच्या आणि मग टोमॅटो तव्यावर नीट पसरवायचे. आच एकदम मंद करावी किंवा बंद करुन टाकवी. आच जास्त लागली की टोमॅटो फुटु शकतील. म्हणून टोमॅटो च्या सर्व भागाला तेल लागायला हवे. काही टोमॅटो लगेच आकसतील. वरचा पापुद्रा/साल बाहेर निघेल. पण टोमॅटो फुटणार नाही. कालथा वापरायचा. पळी नाही.

पोळ्या करुन झाले की उरलेले पिठ घ्यायचे. त्यातच बेसन, ज्वारीचे पिठ घालायचे.

पात तव्याभर पसरवायची.

२) पात थोडी आकसली की मग त्यात मीठ, जिरे पावडर, लिंबू, साखर हे सर्व घालून हळुवार एकजीव करत रहायचे.. मग तिन्ही पिठे घालायची.

खूप चवदार होते ही भाजी. टोमॅटो आतून इतके गरम होतात की थंडीच्या दिवसात असा गरम घास फार हवाहवासा वाटातो.

अधिक टिपा: 

खूप सोपी आहे ही कृती. मी सिंक मधले भांडी घासताना हा प्रकार बाजूला सुरु असतो. अगदी ह्याच पद्धतीन कुठलाही इतरही भाज्या सवतळता येईल. उदा हा अजून एकः

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालथा म्हणजे सराटा. तो स्टीलचा तव्यावर दिसत आहे ना.. मी मुद्दाम कालथा घेतला आहे फोटोत Happy

अरे बी तुझ्या दोन्ही पाक कृती मस्त आहेत, पण फोटु लय मोठ्ठाले हाय न बाप्पा. एकदम सारा स्क्रिन व्यापुन टाकतात.:अओ:

कालथा म्हणजे सराटा>> मस्त एक्दम विदर्भातले वाटतयं
फोटु लय मोठ्ठाले हाय न बाप्पा. एकदम सारा स्क्रिन व्यापुन टाकतात.> +१ तो पासुं

मी सिंक मधले भांडी घासताना हा प्रकार बाजूला सुरु असतो. >> मी पण असाच स्वयंपाक करते. बारीक गॅस वर काही भाजी गरम नाहीतर डोसा धिरडे करत ठेवते व भांडी घासोन घेते. मजेशीर भाजी दिसते आहे. चेरी टोमॅटो मी सलाद मध्येच खाल्ले आहेत.

कालथाला आमच्याकडे काविलता म्हणतात... आमच्याकडे म्हणजे कुठे तेवढे विचारू नका Wink

बाकी भाजी बद्दल नो कॉमेंटस, शाकाहार हा माझा प्रांत नाही, पण फोटो मस्तय,

जागू, पिठे भाजून घेतली तर उत्तमच. मी तशीच घातली. काल सैपाकाला ११ वाजले होते.

सर्वांचे खूप आभार.

अरे मस्त आहे ही भाजी. आधी पहायला हवी होती. आजच केली पातीची पीठ पेरून भाजी.
यात पिठे भाजून घालण्यापेक्षा मग थालिपिठाची भाजणीच लावायची.
मी बर्‍याच पीठ पेरलेल्या भाज्यांना बेसन+भाजणी असं लावते.
आणि हो काय तो टम्म फुगलेला फुलका ...व्वा!

पीठ न लावलेली पण छान होईल चायनीज स्टाईल!
ही पण मस्त आहे...
कणिक जास्त दिवस ठेवलेली आहे का फ्रिजमध्ये? २-३ दिवसंवर ठेवू नका...काळी वाटतेय वरची साईड म्हणून विचारलं

व्वा.. ही भाजीही कलरफुल दिस्तीये, छानै रे रेसिपी , तूच इन्वेंट केलीस की काय?? ग्रेट जॉब

Masta prakar ahe Bee! photos too good Happy
nakki karun baghanar. phulaka masta tamma phuglay, shabbas! Happy

आणि हो काय तो टम्म फुगलेला फुलका .>>>> +१ आणि तव्यावर फुलवलेला!सुगरण आहात.

१२ टोमेटो एकावेळी खायचे? Sad

१२ आकडा मोठा आहे......पण टोमॅटो छोटुसे आहेत....चालतील खाल्ले तर Proud

भाजी मस्त दिसते आहे!

Pages