हाऽऽ खब्बऽऽऽऽऽ र...!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

खबरची बटणे. रंगीबेरंगी बटणे.
काल पुपुवर असाच बटणावरून टैमपास चालला असताना लहानपणी आम्ही खबरच्या बटणांनी खेळत असू ते आठवले. पुपुवरून वाहून जाण्यापूर्वी या प्रकाराची कुठेतरी नोंद राहील अश्या ठिकाणी हलव असे नंदिनीने सुचवले म्हणून ते इथे आणले. या रंगीबेरंगी बटणांना तुमच्याकडे दुसरे नावही असेल. लहानपणी फार आकर्षण असायचे यांचे. याला 'खबरची बटणे' हे नाव कुठून आले, देवच जाणे!

मोठी बाजू (बूड म्हणू) सपाट असते. लहान बाजू (डोके) बहिर्वक्र असते. एकूण उंची पाऊण सेमी असेल. त्यावेळी चाराण्याला पाच वगैरे मिळायची. साधारण कुर्त्याच्या बटणांसारखा आकार. कदाचित अशा तुटलेल्या बटणांमधूनच हा खेळ सुरू झाला असावा. पण मग खेळासाठी म्हणून अशा बटणांची निर्मिती करण्याची कल्पना ज्या कोणा व्यावसायिकाच्या डोक्यातून आली असेल त्याला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. कारण ही बटणे आमच्यावेळी तुफान लोकप्रिय होती.

या बटणांनी खेळले जाणारे खेळ आठवताहेत ते असे.
(प्रतिस्पर्धी कितीही असू शकतात.)
यांचा एक खेळ असा:
आपली आणि प्रतिस्पर्ध्याची समान बटणे (क्ष+क्ष=२क्ष) घ्यायची आणि आधी सुरुवात कोण करणार हे (कोणत्याही प्रचलीत पद्धतींनी) ठरवायचे.
मग त्याने ती २क्ष एवढी बटणे हातात घ्यायची आणी ठोकळ्याप्रमाणे पोकळ मुठीत बटणांचा खुळखुळ आवाज करत हाऽऽ खब्बऽऽऽऽऽ र...! असे म्हणत हकलेच हवेत फेकायची.
जेवढी बटणे जमिनीवर बुडावर व्यवस्थित बसतील तेवढी त्याची (ज्याने फेकली त्याची). तेवढी बटणे तो २क्ष मधून काढून आपल्या खिशात घालतो.
मग प्रतिस्पर्ध्याने असेच करायचे. शेवटचे बटण संपेपर्यंत.
जे बटण शीर्षासनात स्थिरावले त्याच्यासाठी: बोटाला थुंकी लावायची (:फिदी:) आणि त्या बटणाच्या वरच्या बाजूवर बोट ठेवायचे. ओल्या बोटाला बटण चिकटते आणि पुन्हा खाली पडते. ते बुडावर बसले तर आपले. नाहीतर पुन्हा खेळ सुरू.

दुसरा खेळ नेमबाजीचा. एका रिंगणात ठराविक अंतरावरून हाऽऽ खब्बऽऽऽऽऽ र...! असे ओरडत [क्ष+क्ष] बटणे फेकायची (रिंगणाच्या बाहेर एकही बटण गेले की आपला डाव आऊट! गुपचूप प्रतिस्पर्ध्याकडे डाव सोपवायचा.) आणि प्रतिस्पर्ध्याने बोटाने दाखवलेले बटण ठराविक अंतरावरून दगडी चिपेने असे टिपायचे की ते रिंगणाबाहेर आले पाहिजे आणि चिपही रिंगणाबाहेर आली पाहिजे. दुसर्या बटणाला धक्का बसला तर खिश्यातून दंड म्हणून नियमाप्रमाणे य बटणे खेळात भरायची. त्या दंडासहीत एकूण बटणांवर खेळ पुढे सुरू. टिपताना जेवढी बटणे फुटतील तर तेवढी बदली बटणे भरायची आणि आऊट! सांगितलेले बटण टिपले तर सगळी बटणे आपलीच! योग्य ते बटण टिपले पण टिपताना ते फुटले तर त्याचा एकही अंश रिंगणाच्या आत राहिला तरी आऊट! बदली बटण भरायचे आणि गुपचूप डाव प्रतिस्पर्ध्याकडे सोपवायचा.

khabar.jpg

.
.
प्रकार: 

पुपुवरचे प्रतिसाद.

-------------------------
प्रतिसाद मेधा | 11 December, 2014 - 18:21
गजाभाऊ, प्रतीक्षा काळात बराच मोकळा वेळ दिसतो आहे

अशी बटणे अन खेळ मी कधी ऐकला / पाहिला नाही .
पुपु गजबजलेला पाहून गलबलून आले सकाळी सकाळी
-------------------------
प्रतिसाद गजानन | 11 December, 2014 - 18:57
मेधा,
यात एक मुख्य राहिलंच. ही बटणे जेंव्हा हातात खुळुखुळु वाजवून फेकली जातात तेंव्हा - खब्बऽऽऽऽ र असे म्हणायचे.

संपादन
-------------------------
प्रतिसाद श्री | 11 December, 2014 - 20:31
एवढी बटणं लांबवल्यावर पाठीत दणका नक्कीच मिळत असेल.
-------------------------
प्रतिसाद गजानन | 11 December, 2014 - 20:44
श्री, नाही. ही बटणं दुकानात मिळायची. चार आण्याला पाच वगैरे.
जिंकून मिळवलेल्या बटणांनी भरलेला चड्डीचा खिसा घेऊन मिरवताना छाती कोण फुगायची.
संपादन
-------------------------
प्रतिसाद पराग | 11 December, 2014 - 20:47
जिंकून मिळवलेल्या बटणांनी भरलेला चड्डीचा खिसा घेऊन मिरवताना छाती कोण फुगायची. .>>>>> इतक्या मोठ्या मापाची चड्डी घालावीच कशाला की खिसा छातीपर्यंत येईल? Proud

पुपुला जेव्हा जाग येते !!
-------------------------
प्रतिसाद गजानन | 11 December, 2014 - 20:49
मोठ्या मापाची चड्डी घालावीच कशाला की खिसा छातीपर्यंत येईल? <<< इमॅजिन करायचा प्रयत्न करतोय. Lol
संपादन
-------------------------
प्रतिसाद श्री | 11 December, 2014 - 20:49
गजानन , समझ्या.
बटणं दगडी चिपेने टिपली तर फुटत नाहीत का ?
-------------------------
प्रतिसाद गजानन | 11 December, 2014 - 20:54
रिंगण मातीत आखलेले असते. तरीही फुटतात कधी कधी. मग भरपाईचे बदली बटण द्यावे लागायचे. Happy
संपादन
-------------------------
प्रतिसाद वरदा | 11 December, 2014 - 20:58
मला लंपनच्या गोष्टींमधला लिंगवट्टल का काजूवट्टल चा खेळ आठवला.
आज पुपुवर एकदम चहलपहल पाहून मस्त वाटतंय
-------------------------
प्रतिसाद कांदापोहे | 12 December, 2014 - 09:10
सुप्रभात लोक्स.

एकुणात काय गजा गोट्या घेऊन खेळायचे रिंगणपाणी व कवड्या घेऊन खेळायचे खेळ तुम्ही बटणे घेऊन खेळायचात. ते चित्र बघुन झब्ब्याच्या बटणे असावीत असे वाटते आहे.
-------------------------
प्रतिसाद नंदिनी | 12 December, 2014 - 09:13
ते कोय फेकून खेळायचा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. हे खबर पहिल्यांदाच ऐकलंय. गजाभाऊ, न वाहत्या एखाद्या धाग्यावर पोस्ट लिहून ठेवा. तेवढीच नोंद राहील.

आमच्याअकडे दोन दिवस पाऊस. त्यात कामंच कामं. त्यात फोन मेलाय. उद्या चेन्नई दौरा मस्ट!!
-------------------------
प्रतिसाद limbutimbu | 12 December, 2014 - 09:16
तर काय कान्द्या, आपल्या काळी स्वस्तात असलेल्या गोट्या अन जवळपास फुकटात मिळणार्‍या कवड्या यांच्या काळापर्यंत भारी महाग झाल्यात, अरे काचेची गोटी दोन रुपयाला एक, अन कवडी चक्क पाच रुपयाला १.
तरी बर बिटक्या वापरायचो, पण त्याही हल्लि मिळत नाहीत.
हल्लीच्या पोरान्ना तर खेळ माहितच होत नाहीत, बिच्चारे. त्यामानाने आपले बालपण अतिशय समृद्ध म्हणावे असे होते, नै?
-------------------------
प्रतिसाद अमा | 12 December, 2014 - 09:50
तरी बर बिटक्या वापरायचो, पण त्याही हल्लि मिळत नाहीत.>> त्रिकोणी ठकी बाहुली, रंगीत सागरगोटे,
बांगड्यांच्या काचा, काही प्लास्टिकचे मणी व खडे, वहीच्या पुठ्ठ्यावर चिकटवलेले क्रिकेटर्स चे फोटो.
अभ्रकाचे शीट, कॅलिडोस्कोप, रंगीत पेन्सिली. गुंजा.

आता ह्या सगळ्यासाठी अ‍ॅप असेल.
-------------------------
प्रतिसाद आशूडी | 12 December, 2014 - 10:42
गजाभाऊंचे काम म्हणजे एकदम शहाणे करून सोडावे सकळांसी असते! मस्त मस्त.
फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करून आम्ही काचापाणी असा धोकादायक खेळ खेळायचो. मूठभर काचेचे अर्धचंद्र जमिनीवर टाकायचे आणि मग दुसर्या तुकड्याला धक्का न लावता एकेक तुकडा उचलायचा. शेजारचा तुकडा हलला की आऊट. प्रचंड कॉन्सन्ट्रेशनचं काम. श्वासबिस रोखून. पंखाही लावायला बंदी.
-------------------------
प्रतिसाद भरत मयेकर | 12 December, 2014 - 10:49 नवीन
या काचापाणीवर शान्ताबाईंची एक सुरेख कविता आहे.
शेवट काचाही मीच, वेचणारीही मीच असा काहीसा आहे.
-------------------------
प्रतिसाद मंजूडी | 12 December, 2014 - 10:53 नवीन
काचापाणी.. सेम पिंच!
आम्ही नव्या मामीला खूप छळलं होतं. तिची बांगडी कधी वाढवतेय आणि आम्हाला ते तुकडे मिळताहेत याची चढाओढ असायची. तिच्या मागेमागेमागेमागे फिरत होतो लग्न झाल्या झाल्या

आता त्यात सुरक्षित प्रकार आला आहे. बाऽरीक लाकडी किंवा प्लास्टीकच्या काड्या मिळतात. पंखा लावायला अजूनही बंदीच. नीरजाच्या लाकडी काड्यांचा मी बार्बेक्यू स्टीक्स म्हणून उपयोग केला होता Proud
-------------------------
प्रतिसाद कांदापोहे | 12 December, 2014 - 10:54 नवीन
अमा लिंबा अगदी अगदी.

विट्टी दांडु, ड्बा ऐसपैस, लगोरी, जोडसाखळी, शोभायंत्र बनवणे सारखे खास कार्यक्रम. आय अ‍ॅम मिस्सींग माय चिलहुड

("एकलम खाजा
दुब्बी राजा
तिराणी भोजा
चारी चौकटी
पंचल पांडव"......................
.........हे गोट्या खेळतानाचे म्हटलेले मंत्र.)
गजानन हा खबरीचा खेळ आमच्या पिढीत तरी असल्याचे आठवत नाही. पण इन्टरेस्टिन्ग!
असो....वरचा मंत्र संपूर्ण येतो का? आम्ही गोट्या खेळताना म्हणायचो.

वरचा मंत्र संपूर्ण येतो का? आम्ही गोट्या खेळताना म्हणायचो. <<<
मानुषी, माझ्या आईला येतो. याच्यावर आमच्या गप्पा झाल्याचे मला आठवतेय.:)
तिला अजूनही आठवले तर लिहितो इथे. पण गोट्या खेळताना की विटीदांडू खेळताना?

ईंटरेस्टींग, आणि नवीन माहिती माझ्यासाठी..
कोणत्या काळात आणि कोणत्या शहरात खेळला जातो समजेल का?
मुंबईत तरी नाही कुठेच पाहिले..
अर्थात हे आमच्या गोट्यांसारखेच प्रकरण दिसतेय, ज्या अगदी लहानपणी रुपयाला वीस मिळायच्या..

वत्सला ............मेधा कोण गं? :स्मितः
मोठ्या मापाची चड्डी घालावीच कशाला की खिसा छातीपर्यंत येईल? <<< इमॅजिन करायचा प्रयत्न करतोय. हाहा
संपादन>>>>>>>>>>
यावरून चिंटूचा एक जोक आठवला. अर्थातच हा जोक चित्रातच वाचण्यात मजा आहे. तरी लिहायचा प्रयत्न करते.
बाबा कधी नव्हे ते चिंटूसाठी चड्डी आणतात. आणि विचारतात " बरी बसली का रे?"
तर पुढील चित्रात चिंटूने एक मोठ्ठ्या मापाची चड्डी अगदी छातीपर्यंत ओढली आहे आणि म्हणतो , " बाबा काखेत जरा सैलच आहे."

मलाही ही बटण आठवत नाहीत.
>>
मला ही बटणं माहीतीच नाहीयेत Uhoh

ती बटणं बघुन मला ऑफिसातल्या पिना आठवल्या . नोट्स टांगायच्या Uhoh Proud

बाप रे! एकालाही ठाऊक नाहीत ही बटणे? Sad

अश्विनी, थांब आधी आता ही बटणे मिळतात का तरी मला बघू दे.

ती बटणं बघुन मला ऑफिसातल्या पिना आठवल्या . नोट्स टांगायच्या <<< रिया Lol

मलापण माहीत नाही खबर Uhoh मी काहीतरी न्युज आहे म्हणुन आले तर..इथे धमाल चालु आहे. कोणी क्रिकेट खेळता खेळता दिवाळीच्या नंतर सार्वजनिक मोठ्या कंदिलाला छिद्रे पाडुन सुशोभित करण्याचा खेळ खेळलाय का?मी आणि माझ्या मित्रमैत्रीणींनी दरवर्षी हा खेळ आनंदाने आणि अनेक लोकांचे प्रेमळ सुवीचार ऐकुन खेळलाय. :स्मित:. बाकीचे नंतर.

ओह्ह... गजानन भाऊ लहानपणाची आठवण करुन दिलीत. मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी हा खेळ भरपूर खेळायचे.. मजा यायची राव...............

स्नेहनिल, Happy

पुपु पोस्टी कंटिन्यूडः

------------------------------
अमा | 12 December, 2014 - 11:35
ते आयताकृती वासाचं खोडरबर मिळतं का अजून? एक बाजूला हिरवी सेमी पारदर्शक पट्टी आणि बाकीची पांढरी बाजू चित्र असलेली. काल मी त्याचा वास आठवत बसले होते. ते रब्बर उत्कर्ष मधून आणून त्याचे प्लास्टिक काढून वास घेणे आणि स्टीलचे टोकयंत्र ओन करणे ह्या सुखाच्या कल्पना होत्या. तसेच गावातून( म्हणजे आप्पा ब. चौक - आसपासचा भाग) काही हिरव्या पानांच्या जाड पुठ्ठ्याच्या वह्या आणलेल्या होत्या. त्याला सरस लावलेले असे. त्याचा वास घेणे हे ही एक.

खेळांमध्ये चोर पोलीस, खांब खांब खांबोळी, जमीन का पाणी हे काही.
------------------------------
आशूडी | 12 December, 2014 - 11:42
त्या हिरव्या पट्टीने कधी नीट खोडलं जायचं नाही. हिरवा रंग काळा व्हायला लागला की वैताग यायचा. करवती कड असलेली प्लास्टिकची पट्टी? आणली रे आणली की वहीतले सगळे समास डिझायनर! टर्रर्र.. कर्रर.. मजा यायची. आणि ती विविध आकारांची रंगीत खोडरबरं, रबर शार्पनर व ब्रश असं कॉम्बो असलेली वस्तू म्हणजे श्रीमंत कंपास.
------------------------------
अमा | 12 December, 2014 - 11:48
एका मैत्रीणीच्या मावशीचे मिस्टर काही यूनो मध्ये वगैरे होते त्यामुळे ती मावशी व तिच्या शाळकरी वयाच्या दोन मुली ह्यांचे वर्णन मी फार आसुसून ऐकत असे. त्या मुलींची शाळा कपडे वगैरे. तर ती मावशी हिला कंपासपेटी गिफ्ट दिली. ती कशी तर मॅग्नेट चे लॉक असलेली. गुलाबी रंग मध्ये स्पंज असल्याने मौ गुबगुबीत लागणारी, बाहुलीचे चित्र असलेली. चप्प बंद होणारी. ती अद्भूतच वाटलेली मला. पुढे मुलांना त्या रिटर्न गिफ्ट म्हणून आल्या.आता सर्रास मिळतात व मुले त्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत.

हिंगाच्या डब्बीला रबरबँड लावून त्याचे तुणतुणे बनवले आहे का?
तुणतुणे बनवले आहे का?
------------------------------
गजानन | 12 December, 2014 - 11:52
केपी, आम्ही गोट्या, कोया, बशीचे फुटके तुकडे, इत्यादींनीही खेळायचो. त्यात या बटणांची आणखी भर. दरवर्षी प्रत्येक प्रकारच्या खेळाची एक ठराविक हंगाम असायचा. सायकलच्या टायरला दंडुक्याने फटके देत पळवत न्यायचे. लोखंडी सळी वाकवून बनवलेली गाडी, बोस या नावाचे एक बोटाच्या जाडीचे गवत असते. त्याच्या वाळळेल्या काड्यांच्या चोया काढायच्या. त्याच्या आत थर्माकॉलसारखा पदार्थ असतो. तर त्या चोया आणि हा पदार्थ यांपासून निरनिराली वाहने (बैलगाडी, घोडागाडी, जीपगाडी, सायलक) इ. बनवायचे. इत्यादी.

संपादन
------------------------------
कांदापोहे | 12 December, 2014 - 12:06
दुधाच्या बाटल्यांची बुच! >>>
हे हातावर आडवे धरुन बोटाने हवेत सोड्ले की सुर्र्कन उडत असेल. फिस्बी उडते तसेच. नारळाच्या झावळीचे एक एक पान पण आकाशात उडवायल मजा येत असे. मला आजही जमते ते. स्मित
------------------------------
हिम्सकूल | 12 December, 2014 - 12:14
अजून एक फंडू आयडीया म्हणजे.. कोल्डड्रींकच्या बाटल्यांची जी बूचं येतात ती वापरुन भिंगरी करायची.. बूच एकदम सपाट करुन घ्यायचं.. आणि त्याला मध्याच्या शेजारी दोन भोकं पाडायची.. आणि त्यात दोरा ओवायचा.. आणि मग दोन्ही हातात धरून गोल गोल फिरवायचे.. त्यातून एक जबरी आवाज यायचा...
------------------------------
गजानन | 12 December, 2014 - 12:17
हिम्स येस!!!

आम्ही अशी भिंगरी पूर्वी ज्या पत्र्याच्या पणत्या येत त्यापासून बनवायचो.

संपादन
------------------------------
इब्लिस | 12 December, 2014 - 12:18
सायकलच्या टायरला दंडुक्याने फटके देत पळवत न्यायचे
<<
अशी लोखंडाची रिंग अन त्यालाच ओवलेली एक हँडलसारखी कडी. मांडोळी म्हणत त्याला.

ब्रेडमधून येणार्‍या स्टिकर्ससारखे बिनाका टूथपेस्टमधून छोटे प्लॅस्टिकचे प्राणी येत. त्याचं भारी अप्रूप असे.

ज्वारी बाजरीच्या धाटांतूनही तसाच थर्माकोल मिळतो. 'तोटा' म्हणतात आमच्याकडे. त्याच्या सोललेल्या सालीचं विणकाम अन ती बैलगाडी भलती सुंदर होत असे. तिला बांगड्यांची चाकं लावून पळती करता यायची. वहीचा कागद तिला शिडासारखा लावला की मस्त पळायची ती गाडी.
------------------------------
गजानन | 12 December, 2014 - 12:23
अशी लोखंडाची रिंग अन त्यालाच ओवलेली एक हँडलसारखी कडी. मांडोळी म्हणत त्याला. <<< हो हेही आठवले होते. पण नेमके वर्णन करण्यासाठी वेळ नव्हता. हाच प्रकार जुना, मधला खोलगट भाग गंजून मधे मोठे भोक पडलेल्या लोखंडी तव्याला ठोकून ठोकून चपटे करून ते चाक चालवायचाही खेळ खेळायचो आम्ही. स्मित

संपादन
------------------------------
आशूडी | 12 December, 2014 - 12:46
आमच्याकडे हलत्या कॉटची रेल्वे व्हायची. आधीच खिळखिळी असलेली कॉट आम्ही बसल्या बसल्या गदागद हलवायचो रेल्वे इफेक्ट. शिवाय कॉट खाली काही प्रवासी झोपले की बर्थही निर्माण व्हायचा. त्याच कॉटच्या लांबीला व रूंदीला साड्या बांधून दोन खोल्याही व्हायच्या. त्याच कॉटवर उभं राहून खाली झुकलं तर हॉलच्या फरशीवर मगरी असलेला मौत का कुआ तयार व्हायचा. मग कुणीतरी त्यात पडलं की त्याला वाचवायची धडपड. कॉटच्या साईडच्या दांड्यांना आजोबांचे मफलर बांधून त्यांच्या झोळीत भावल्या गुरगटून झोपायच्या. घरात कुठेच न सापडणारी वस्तू कॉटखाली व पुस्तक कॉटच्या सापटीत, गादीखाली जीर्णोद्धाराची वाट पाहत असलेली सापडायची. कठेही गच्ची, धड अंगण नसलेल्या वाड्यातल्या दहा माणसांच्या तीन खोल्यात खेळण्यासाठी कॉटने आम्हाला शब्दशः पोटाशी धरले होते. स्मित
------------------------------
अश्विनी के | 12 December, 2014 - 13:10
अशी लोखंडाची रिंग अन त्यालाच ओवलेली एक हँडलसारखी कडी. मांडोळी म्हणत त्याला. >>> आमच्या वाडीत हे सगळ्या पोरांमध्ये सामायिक खेळणं होतं आणि ते वाडितल्याच मोठ्या ताईदादा लोकांकडून वारसाहक्काने मिळालेलं होतं. प्रत्येकाला वेगळं परवडत नव्हतं आणि आई बाबांनीही असल्या मागणीला धूप घातली नसती.

त्याच कॉटच्या लांबीला व रूंदीला साड्या बांधून दोन खोल्याही व्हायच्या.>>> हे मी गिरगावातल्या दोन खोल्यांतही खेळायचे. छोटी साडी नेसून घर घर खेळायचे, खोट्या खोट्या लग्नालाही जाऊन यायचे हसून हसून गडबडा लोळण ते लग्न शेजारचीच्या बाहुलीचं असायचं. तिचं घर शेजारच्या घरात किंवा गॅलरीत मांडलेलं असायचं फिदीफिदी
------------------------------
नंदिनी | 12 December, 2014 - 13:58
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवस्भर घराबाहेर हुंदडायचो. इन्डोअर गेम्स कधी फारसे खेळलोच नाही. एक पाय कायम घराबाहेरच. इन्डोअर गेम्समध्ये कॅरम आणि पत्ते मेन. नंतर थोडे दिवस स्नूकर. दुपारचं जेवणाला कसंबसं ढकललं की गल्लीमध्येच आरोळ्या चालू. पार रात्र होइर्पर्यंत खेळायचं. पप्पा यायची वेळ झाली की मातोश्री आम्हाला शोधून घरी आणायच्या. मग रीतसर अंघोळ वगैरेच करावी लागाअय्ची इतके आम्ही धुळकटलेलो असायचो.
------------------------------