वाल दाण्याची भाजी.(फोटोसहित)

Submitted by प्राजक्ता on 11 July, 2011 - 10:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ १/२ कप फ्रोजन किंवा मिळत असल्यास ताजे वाल-पापडिचे दाणे.
अर्धी जुडी ताजी मेथिची गड्डि (निवडुन धुवुन चिरलेली साधारण २ कप)
१ मोठा कांदा बारिक चिरुन
१ टोमॅटो बारिक चिरुन
१ चमचा आल-लसुन पेस्ट
अर्धा चमचा धणा-जिरा पावडर
कढीपत्त्याची पान-२-३
फोडणिचे साहित्य
तेल्,मिठ

क्रमवार पाककृती: 

एका भांड्यात तेलाची हिंग्,जिरे,मोहरी ,कढिपत्ता घालुन फोडणी करावी त्यावर आल्-लसुण पेस्ट घालुन लगेच कांदा घालुन परतुन घ्यावा,कांदा गुलाबी झाला की धणा-जिरा पावडर घालुन परतावे त्यावर टोमॅटो घालुन तेल सुटेस्तोवर परतावे मग, हळद्,तिखट्,गरम मसाला घालुन परतावे.
मेथिची पाने घालुन परतावे, मेथिचा रंग जरा बदलला की वालाचे दाणे आणि मिठ घालुन परतावे आणी पाण्याचे झाकण देवुन कमि आचेवर वाल मऊ शिजेस्तोवर ठेवावे.
लागलच तर झाकणातलेच चमचा-दोन चमचे पाणि घालावे.
पोळी किंवा फुलक्याबरोबर खावे.
valbhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसे.
अधिक टिपा: 

१) भाजी नुसत्या तेलावर पाणि अजिबात न घालता केली तर जास्त चवदार लागते पण, खाली लागु शकते.
२)मेथीची पाने जास्त वापरली तरी चव छानच येते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. आजच ओले वाल आणले आणि माबोवर काय मिळते का ते पाहात असताना ही पाकृ सापडली. करुन पाहिन आता.

तिन वर्शापुर्वी लिहलेल्या रेसिपीला अचानक उर्जितावस्था आल्याने मलाही परत करायला पाहिजे आता..smiley4.gif

साधना! तु ताजे दाणे वापरत असल्याने भा़जी अजुन चवदार लागणार आणी पटकन ही शिजेल... इथले फ्रोजन दाणे शिजायला वेळ घेतात तेव्हा आधी कुकरात घालुन एक शिट्टि केली तरी चालेल

ताजी मेथि नसेल तर कसुरी वापरली तरी चालते, ताजीची चव अर्थात जास्त छान लागते.

हायला एवढी जुनी आहे का कृती. फोटो छान दिसतोय. वाल आणि मेथी दोन्ही आवडीचे असल्याने नक्की करेन ही भाजी.

रेसीपी वर आणुन ठेवते. मागे वाचून करायची ठरवलेली. फक्त वाल आणण्या ऐवजी मी ओली तुर आणली आहे. असो. करणार आज.