कुटप्रश्न क्र. २

Submitted by शाबुत on 5 December, 2014 - 23:00

एक शेतकरी असतो... तो दररोज आपल्या गावाच्या बाजुची नदी ओलांडुन पलीकडच्या डोंगरात आपली बकरी चारायला घेऊन जात असतो...तसेच त्याची शेतीही त्याच बाजुला असते... नदीला खोलवर पाणी असते म्हणुन त्याने एका होडीची व्यवस्था केलेली असते... पण त्या होडीत एका वेळी फक्त दोनच गोष्टी जावु शकतात... कारण तिची क्षमता दोन पेक्षा जास्त ओझे पेलू शकत नव्हती... लक्षात घ्या तिसरी गोष्ट जर तिच्यात ठेवली तर ती बुडणार.

>> दररोज सकाळी तो शेतकरी बकरी आणि तो असे दोघे त्या होडीत बसुन नदी पार करत असत... नंतर तो होडी त्याच काठाला बांधुन ठेवत असे... संध्याकाळी गावाकडे परत येतांना बकरी रात्री खायाला गवताचा भारा डोक्यावर आणत असे... तेव्हा तो दोन चक्कर मारत असे....@ एकदा तो आणि बकरी... बकरी गावाकडच्या काठावर बांधुन तो भार्‍यासाठी दुसरी चक्कर मारत असे... असा त्या दररोजचा कार्यक्रम होता.

>> एक दिवस मात्र त्याच्या कार्यक्रमात बदल झाला... कारण त्याला शेतात वाघ दिसला...तो शेतकर्‍याची बकरी खायाला आला होता... त्याने तो पकडला... संध्याकाळी गावात घेऊन जायाचे ठरविले.

>>> तो एका हातात त्याची बकरी... दुसर्‍या हातात पकडलेला वाघ... डोक्यावर गवताचा भारा... असे घेउन तो गावाकडे निघाला... पण जेव्हा तो नदीच्या काठावर आला... तेव्हा त्याच्या डोक्याला मोठा ताप झाला... आता पर्यत त्याने बकरीला गवत खावू दिले नव्हते... वाघाला बकरी खावु दिली नव्हती... @ पण आता नदी ओलांडतांना...

>>> दोनच गोष्टी त्या होडीत जाणार होत्या... त्यातली एक शेतकरी होता... त्यालाच होडी चालवायची होती... आता काठावर जर का बकरी आणि वाघ ठेवला... वाघ बकरी खाणार... चारा आणि बकरी ठेवली तर बकरी चारा खाणार... @ हेही लक्षात घ्या की हा ऐकमेकांना खाण्याचा नियम पलिकडच्या काठावरही लागु आहे....

@ तो शेतकरी आपले डोके वापरुन हा प्रश्न सोडवतो... कसा सोडवतो... ते सांगा.

..... शेवटी मी उत्तर देणारच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) बकरी घेऊन जायची.
२) परत यायचे चारा न्यायचा
३) परत येताना बकरी आणायची, ठेवायची, वाघ न्यायचा.
४) परत यायचे बकरी न्यायची.

काहीतरी वरिजिनल कोडी द्या की राव. ही किती जुनी आहेत.

बाकी कोड्यातला वाघ माणसाला कसा खात नाही? शेतकर्‍याकडे दोरी तेवढी का नसते असे प्रश्न पाडून घ्यायचे नसतात. Wink

साती, कोडी-डोकी Happy

बाकी कोड्यातला वाघ माणसाला कसा खात नाही? >> अहो, सामान्य माणूस आहे का तो.. वाघ पकडलाय त्याने.. तो पण जिवंत आणि नंगे हाथ.. Proud

असो, माझी औट औफ द बौक्स थिंकिंग असे बोलते की वाघ आणि बकरीला जर एकाच कपात वाघ-बकरी चहा पाजली तर ते धर्मबंधूभगिनी होतील आणि मग वाघ बकरीला खाणार नाही.

जर कोणाचा मानलेल्या नात्यावर विश्वास नसेल तर सरळ वाघ आणि बकरीचे लग्न लाऊन द्यावे, जेणेकरून वाघाची शेळी होईल आणि मग त्यांच्यात रक्ताचे नाते होईल.

तरी पण मग चाऱ्याचा प्रश्ण उरतोच..उलट मग शेळी-बकरी मिळून दुप्पट वेगाने चारा खातील. त्यापेक्षा शेळीला पट्टे मारून वाघिण बनवता नाही का येणार

आशु, त्याला काही चारा नाही. कारण चारा हल्ल्ली माणसे पन खातात.. Wink

तरी वरील उपाय अमलात आनत चारा आधी घेउन जायचा, तोपर्यन्त वाघ बकरीला खानार नाही..
त्यानंतर वाघाला घेउन जायच, एकदा का तो बायको पासून दूर गेला की त्याचा पुन्हा वाघ होणार .. Wink
वाघ-बकरी चहा फॉर्म्युला वापराचा असल्यास पाजण्याऐवजी टी बॅग तावीज सारखी बांधायची जेणेकरून काढला की इफेक्ट संपला.. Happy

वाघ - नर
बकरी - मादी
लग्न झाल्यवर बकरीच नाव बदलणार ना मग ती वाघिणच होणार. मग पट्टे मारा नाहीतर नका मारु....
पण मग लग्नानंतर वाघाचा उंदीर होणार.
म्हण्जे शेवटी रहाणार शेतकरी , चारा , वाघिण आणि उंदीर