फोडणीचे खमंग डोसे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 November, 2014 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
मिठ

फोडणीसाठी
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
२) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे.
३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.

४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.

हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २
अधिक टिपा: 

फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.

माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूताई, अगदी तोंपासु! आस संध्याकाळी बायकोच्या मागे लागून करवून घेणार! Happy
आ.न.,
-गा.पै.

संजीव, शांकली, गामा पैलवान, चिन्नू, योकु, हर्षा, मनीमोहोर, वर्षूताई, सई, मंजू, दिनेशदा, अकु धन्यवाद.
दिनेशदा विकत आणले पिठ .

मला दोसे कधीच जमत नाही. शेवटी मी धिरडे करुन मोकळा होतो.

तुझे दोसे मस्त आलेत. इतके पातळ दोसे माझ्याच्यानी येणे शक्यच नाही. मी आता प्रयत्नही करत नाही.

बी हे डोसे खरच कुरकुरीतही होतात. एकदा करून पहा. डोसा पातळ जाड होणे हे आपण पिठ किती पातळ करतो त्यावर असतो. कमी पाणी टाकून घट्ट ठेवले तर जाड होतात.
रावी धन्स.

बय्या ग बय्या. जागु तुझे खरच अच्चु कुच्चु करुन गालगुच्चे घेतले पाहीजेत.:फिदी:

आम्ही ( म्हणजे मी, साबा, जाऊ वगैरे ) घरी रव्याचे डोसे करतो, त्यात मिर्ची कोथिम्बीर घालतो. पण हे फोडणीचे डोक्यात आले नव्हते कधी. खूप छान दिसतायत.:स्मित: करुन पहाणार.

फोटो रिपिट झालाय. बहुतेक पहिला पिठ आणि दह्याचा असावा त्याजागी फोडणीचाच फोटो आलाय.

आज संध्याकाळी करते हे डोसे. दुसरे काही करायचा कंटाळाअ आलाय.

Pages