फोडणीचे खमंग डोसे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 November, 2014 - 02:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदळाचे पिठ
अर्धी वाटी रवा
पाऊणवाटी दही
मिठ

फोडणीसाठी
१ चमचा राई/मोहरी
१ चमचा जीरं
२ मिरच्यांचे तुकडे
थोड कढीपत्ता
फोडणीच्या गरजेनुसार तेल

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
२) डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून घ्यावे.
३) वरील फोडणी करून ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.

४) आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.

हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २
अधिक टिपा: 

फोडणीमुळे ह्या डोश्यांना एक खमंगपणा येतो. लहानमुलांना असे खमंग डोसे खुप आवडतात.
दही थोडे आंबट असेल तर अजुन चांगले.
तेल वाटत तेवढ जास्त होत नाही. फ्रायपॅनला नाही लावले तरी चालेल तेल.

माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच फोटो .तुम्ही दिलेली फोडणी मी खो चटणीत वरुन नेहमी घालते. पिठात घालायची आयडिया पण मस्त आहे. तश्या चटनीचा फोटो आहे.उताप्पा कडे दुर्लक्ष करा. Happy जाळी खरच सुपर पडली आहे.
uttapaa1.jpg

बी ,पातळ (पेपर)डोसे मला येतात पण त्याची रिसिपी पण सोपी आहे.तुमच्या डोश्याच्या धाग्यावर लिहेन. मग जमेल तुम्हालापण . Happy

वॉव

मस्त! छान जमलेत Happy

हे आमच्याकडेही करतात. पण क्वचितच, अन्यथा प्लेनमध्येच जास्त.
डोसे, घावणे, आंबोळ्या हा तर आमचा खुराकच आहे. नुसते चटणीच नाही तर मस्त चहात बुडवूनही खातो, चिकन-मटणाबरोबरही खातो. बारीक कोलंबी, करंदीच्या चटणीबरोबरही खातो. खोबर्‍याचे वाटप अश्यावेळी जास्त असते त्यात. मी स्वता स्वयंपाकघरात उतरत नसल्याने काही हक्काने बोलू शकत नाही पण आवडीचा प्रकार. डब्यातही नेतो तेव्हा सारे तुटून पडतात. त्यावरची जाळी आणि मऊ लुसलुशीतपणा नेहमीच कसा परफेक्ट जमतो याचेच कौतुक चालू असते.

लै भारी दिसताहेत गं. लाउकरच करणार!

एक सांगा या आणि अशा प्रकारात रवा, रवा म्हणतात तो कच्चाच घालतात का? भाजलेला रवा घातलेला चालतो का?

जागू,
धन्यवाद ग! आज करून पाहिले.छान झाले होते.मला घावन हा प्रकारच येत नसल्याने साशंक होते.पण आज हे डोसे करायला आले.फोडणीची कल्पना मस्त आहे.

साती, मी भाजलेला रवा घातला.पण डोसे जमले.

yummy...atta asa pan lunch time javal yeto ahe...thanks Jagu...ya saturday la try karen

जागूताई, मी त्या पीठाचे आप्पे केले होते. दही घातल्यावर 2 तास झाकून ठेवलं पीठ. खमंग चव येते अगदी. झटपट करता येईन अशी छान पाककृती. Happy

धाग्याचं नाव वाचून मला फोडणीच्या पोळीसारखा फोडणीचे डोसे असा पदार्थ असेल असं वाटलं होतं Wink

सिनी फोटो मस्त. आम्ही पण इडलीच्या चटणीला फोडणी देतो.

नताशा, नरेश, आदिती, ऋन्मेश्,शोभा, सुरेश, किश, साती,देवकी, प्राज, प्रिती, अतृप्त आत्मा, मंजुडी, सुनिधी धन्यवाद.

मामी चालेल भाजलेला रवा पण.

स्नू खुप छान आयडीया. मी पण करुन बघेन.

व्वा मस्तच !

वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी २>> १ एक्स्ट्रा हवा

Pages