३ कप स्विट कॉर्न दाणे - मी फ्रोजन वापरते.
३/४ -१ कप डाळीचे पीठ
१ टी स्पून जीर्याची पावडर
तिखट किंवा हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे
मीठ चवी प्रमाणे
तळण्यासाठी तेल
मक्याचे दाणे प्रोसेसर मधून भरड वाटून घ्यावे. मिरच्या वापरणार असाल तर त्याही या मिश्रणात घालून एकदा फिरवून घ्यावे. गरज वाटल्यास १-२ चमचे पाणी घालायला हरकत नाही. बोलमधे काढून घेवून त्यात जीरे पावडर आणि वापरणार असाल तर चवीप्रमाणे तिखट घालावे . आता त्यात एका वेळी साधारण १/४ कप अशा बेताने बेसन घालत मिक्स करावे. चमच्याने साधारण भज्यासारखे घालता येइल अशी कंसिस्टन्सी येइल इतपत बेसन घालून घ्यावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. कढईत तेल गरम करावे. चमच्याने तेलात पकोडे घालून मिडियम हाय आचेवर गोल्डन रंगावर तळावेत. हे पकोडे तेल पीत नाहित. तिखट चटणी, सॉस बरोबर किंवा नुसतेही छान लागतात.
सोप्पय !
सोप्पय !
मस्तय!
मस्तय!
२ पकोडे रेसिपी आल्यात माबोवर
२ पकोडे रेसिपी आल्यात माबोवर पण एकही फोटु नाय!
रेसिपी मस्तयं
मस्त आहे.
मस्त आहे.
फोटो हवेतच! माझ्याकडून
फोटो हवेतच!
माझ्याकडून मिक्सरमधे भरड कधीच वाटले जात नाही. लगेच बारीक होते डाळ. हळूहळू मिक्सर फिरवले तर डाळ जाड राहते आणि जोरात फिरवले तर डाळ पेस्ट होते.
.
.
चमच्याने तेलात पकोडे घालून
चमच्याने तेलात पकोडे घालून मिडियम हाय आचेवर गोल्डन रंगावर तळावेत<<<
हे वाचूनच मजा आली.
मी मैदा घालून करते हे पकोडे.
मी मैदा घालून करते हे पकोडे. बेसनापेक्षा याची चव जास्त छान वाटते मला.
बेसन किंवा मैदा नका वापरू. हे
बेसन किंवा मैदा नका वापरू. हे पकोडे गव्हाचं जाड पीठ वापरून करा, सुंदर होतात.
छान.. मी यात पोटॅटो फ्लेक्स
छान.. मी यात पोटॅटो फ्लेक्स टाकतो आणि शॅलो फ्राय करतो.
अर्धवत भरडलेले मिरीदाणे छान लागतात यात.
बेफी, मी नवखी होते तेव्हा
बेफी,
मी नवखी होते तेव्हा एक बॅच ब्राऊन रंगावर तळली - करपवली - होती. त्यामुळे गोल्डन रंगावर तळणे अशी वहीत नोंद झाली.
मिनू, गव्हाचे पीठ वापरुन ट्राय करीन. एका पिल्लाला डाळीच्या पिठाची अॅलर्जी आहे. त्याच्यासाठी छान पर्याय मिळाला. धन्यवाद.
यात मैदा वापरणे योग्य होईल.
यात मैदा वापरणे योग्य होईल. एक उकडलेला बटाटा ,थोडा बारीक चिरलेला कांदा,आलंलसुण पेस्ट टाकल्यास आणखी तिखट चव येईल.
धीरज, कॉर्नचा गोडवा आणि
धीरज, कॉर्नचा गोडवा आणि मिरचीचा तिखटपणा हा कॉन्ट्रास्ट ही या पकोड्याची खासीयत. एकसंघ चवी ऐवजी चवींचे दोन थर अपेक्षित आहेत.
बर्फ नि पावसाच्या हजेरीने आजच
बर्फ नि पावसाच्या हजेरीने आजच बनवलेत ..
मी या पकोड्यात मक्याचंच पीठ
मी या पकोड्यात मक्याचंच पीठ घालते.
मस्त लागतात हे पकोडे. मी
मस्त लागतात हे पकोडे. मी ह्यात तांदळाच पिठ आणि बेसन घालते.
आणि कोथिंबीर पण.
(No subject)
वॉव , चनस ! तोंपासु आहे फोटो
वॉव , चनस ! तोंपासु आहे फोटो
मी आजच बनवलेत...मस्त लागतात
मी आजच बनवलेत...मस्त लागतात हे पकोडे..... मी कणीक वापरून केले. कांदा, आलं, कढीपत्ता पण घातला. मुलाला डाळीच्या पिठाची अॅलर्जी आहे. त्याच्यासाठी छान पर्याय मिळाला. धन्यवाद स्वाती२.
छान आहे, पण तेलाच्या भीतीने
छान आहे, पण तेलाच्या भीतीने हातून व्हायचे नाहीत...
ह्याचे अप्पे करता येतील का?
ह्याचे अप्पे करता येतील का?