करायला गेलो...

Submitted by दिनेश. on 17 November, 2014 - 04:56

आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतलेही कसावा हे एक महत्वाचे पिक आहे. पूर्व आफिकेत तो प्रकार एक स्नॅक म्हणून खातात तर पश्चिम आफ्रिकेत ते मुख्य अन्न आहे.

या पिकाची शेती अगदी सोपी, फारसे काही करावे लागत नाही. उत्पन्नही भरपूर. पण या मूळांवर काही प्रक्रिया केल्याशिवाय ती खाता येत नाहीत. त्यात, खास करून सालीत काही विषारी घटक असतात.

आपल्याकडे याचे प्रचलित रुप म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खिचडी म्हणजे आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय !
माझ्या भारतातून आणायच्या सामानात साबुदाणा ( जास्त नाही, दोन वेळा खिचडी होईल इतकाच ) असतो. तशी ती
दोनवेळा करूनही झाली.

गेल्या आठवड्यात इथल्या सुपरमार्केटमधे हा प्रकार सापडला..

तसा हा प्रकार साबुदाण्यासारखाच असावा असा अंदाज मी केला.
आपल्याकडची साबुदाण्याची प्रक्रिया वेगळी आहे ( खरे तर सॅगो पर्ल्स असतात ते सॅगो पाम नावाच्या झाडाच्या गाभ्यापासून करतात.. तो आणखी वेगळा प्रकार. ) तसा साबुदाणा दक्षिण आशियाई देशात करतात. मस्कत ओमान मधेही वापरतात.

नायजेरियात, कसावा किसून आंबवून एक गारी नावाचा प्रकार करतात. तो प्रकार शिजवावा लागत नाही.
नुसते गरम पाणी त्यात टाकले कि झाले. तो प्रकार त्यांचे मुख्य अन्न आहे. आपण ( निदान मी तरी ) त्याचा वास सहन करू शकत नाही.
कसाव्याचे पिठ करून, त्याची अशीच उकड करून इथे अंगोलात खातात. त्याला फुंगी म्हणतात. त्या लगद्याचा गोळा तोडून घेणे, हिच एक कसरत असते. मी एकदा चव घेऊन बघितली तर मला तो गोळा गिळवेनाच Sad

तर हा प्रकार आणला, आणि विचार केला याची खिचडी करता येते का बघू.
अगदी बारिक साबुदाणा भिजवताना आपण जसे अगदी कमी पाणी घालतो तसे करून मी हा प्रकार भिजत घातला.
अर्ध्या तासाने बघितले तर याचा एकसंध गोळा तयार झाला होता.
त्याचे काहीच करता येणे शक्य नव्हते. म्हणून त्यात भरपूर पाणी घालून त्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या.
मग विचार केला जरा धुवून स्टार्च निघतो का बघू, तर प्रत्येक पाणी दूधासारखे पांढरे निघायला लागले. म्हणजे हा
प्रकार चक्क पाण्यात विरघळायला लागला.

मग तसेच सगळे गाळण्यावर गाळून घेतले. परत गोळा व्हायच्या आत, त्यात झटपट दाण्याचे कूट नव्हे तर पिठ
करून मिसळले. पाणी पूर्ण निथळले असते तर परत त्याचा गोळा झाला असता. म्हणून ते प्रकरण ओलसर असतानाच तूप जिर्‍याच्या फोडणीत टाकले.

तर परत तसेच. अगदी वडी करण्यासारखा वोकमधे गोळा होईल असे वाटू लागले. मग हाताशी असलेला नारळाच्या
दूधाचा कॅन त्यात ओतला. आता प्रकरण मॅनेजेबल झाले.
त्यात चवीसाठी आमसुले टाकली. बशीत काढून घेतला. वरून बटाट्याच्या सळ्या, दाणे आणि हिरवी मिरचीपूड टाकली.

मस्त चटकदार फराळी मिसळ तयार झाली कि राव !

पण मी या प्रकरणाला एवढ्यावर सोडणार नव्हतोच. त्याच्या खोड्या माझ्या लक्षात आल्या होत्याच. मग त्याच्या
जोडीला तांदळाचे पिठ ( उपवास वाल्यांनी वरईच्या तांदळाचे पिठ घ्यावे Happy ) आणि पोटॅटो फ्लेक्स वापरल्या.

आता हे मिश्रण सहज हाताळता येत होते. मग त्याचे थालिपिठ करून बघितले. मस्त पातळ, कुरकुरीत थालिपिठ झाले.

आणि उरलेल्याचे साबुदाणा वडेही झाले.

आणखी काय करता येईल, त्याचा विचार करतोय Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत आभार..

वर्षू.. बाकी सर्व देशात अगदी नायजेरियातही भारतीय घटक सहज मिळायचे. इथे ते मिळत नाहीत, त्यामूळे असे प्रयोग करावे लागतात.

आशु, चवीला छानच लागले. उलट साबुदाण्यापेक्षा छान लागले.

बी, लाल तिखट भारतातून आणलेय. इथे नाही मिळत.

सई.. नक्की !

दिनेश
माझ्य्बाब्तीत हि असाच किस्सा झाला होता
मीही थालीपीठ च लावले .शिवय तू दह्यातला साबुदाणा हि करून बघ

हा असला बारीक साबुदाणा भिजवायचा जिर्याच्या फोडणीत मिरची त्यावर हा साबुदाणा शेंगदाण्याचा कूट कोथिम्बिर मीठ हे सगळा mix करून परतायचं
लाल तिखट घातला तरी मस्त लागतो आणि थोडा शिजत आला कि ताक किंवा दही घालायचं आणि सारखा हलवायचा

Pages