क्लूलेस १०

Submitted by चैर on 7 November, 2014 - 00:53

मंडळी,

क्लूलेस १० अन्दाजे १० तासात सुरु होतंय!! मी रडत-रखडत फक्त गेल्या दोन एडिशन्स खेळलोय सो मला नेहमीसारखी यावेळीही मदत लागेलच!!

माबोवरचे मुरलेले खेळाडू नेहमीसारखा यंदा नवीन धागा सुरु करायची वाट बघत होतो...पण काही हालचाल दिसली नाही म्हणून सरतेशेवटी पुढाकार घेतला.

मला क्लूलेस प्रकाराबद्दल माबोवरच्याच एका जुन्या धाग्यामुळे पहिल्यांदा कळलं होतं. त्यामुळे क्लूलेसची वेगळी ओळख इथे करून देण्याच्या भानगडीत मी पडत नाहीये!! ही क्लूलेसची दहावी एडिशन आहे आणि त्या लोकांनी जरा जास्त हवा केलीये! यंदाची 'टिझर' राउन्ड तशी बरीच सोप्पी होती...नवीन लोकांना ट्राय करायचं असल्यास हा धागा---

http://klueless.in/klueless/9pt75/

मला खात्री आहे की सालाबादप्रमाणे आपण एकमेका सहाय्य करुन निदान काही लेव्हल्स तरी नक्की पार करु!!

http://klueless.in/klueless/

तर लोकहो...होउन जाऊ दे!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा मी पहिलं पानसुद्धा ओपन क्रणार नाही असं सध्या म्हणतेय. लई वेळ खातं हे प्रकरण!!

(पण कुणी टीम बनवून खेळणार असेल तर मी येईन) Proud

खेळाणार नाही वेळ नाही म्हणत प्रत्येक वर्षी चार सहा लेव्हल खेळातोच.
मग अवघड लेव्हल्स आल्या की परत " आपल्याला वेळ नाही नैतर आपण नसत असं सोडलं " असं मनाला समाजवत दुकान बंद. Proud

कुठे अडकलीयेस चिमुरे?

(क्लूलेस आणि हॅपॉ फारच कातिल कॉम्बो आहे. Sad Sad

इगल, आय, रॅव्हेन्क्लॉ.. क्रेस्ट, मॅड आय मुडी.. द इन्टेलिजन्ट.. नॉलेज इज पॉवर.. काय करायचं ते कळलय.. पण कोणताच शब्द बरोबर येइना

नाही म्हणता म्हणता टीझर मध्ये सगळे उतरलेच की.. Happy डायरेक्ट ट्वीट हँडल असल्यामुळे कोण कितव्या लेव्हला पोचले आहे ते दिसते आहे..

आलं श्र Happy इमेज सर्च केलेला.. पण दुसर्‍याच लेव्हलला क्रॉप करावं असं नै वाटलं.. कंटाळा दुसरं काय Sad

झालं का सुरू?

मला ती चित्रं सर्च करायचा भारी कंटाळा येतो. आणि मग डोकं उगाचच भंजाळतं. त्यामुळे मी यंदा खेळणार नाही.

खेळाडूंना शुभेच्छा!