होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या अश्या चर्चेने भाग पहावा काय?

परवा कधी तरी ती(जानु) लाजत होती... आणि तो शीरंग कानामागे येवून काहितरी सांगत होता(प्रोमो मध्ये)

अरे देवा! अदिती आणी स्वस्ती सॉरी ग उशीर झाला.:अरेरे: मला नेटवर आधी कोणत्या नावाने सर्च करावी हेच कळेना. पण स्वस्ति धन्यवाद साडीचा फोटो दाखवल्याबद्दल.:स्मित:

गोखले ड्रायव्हिंग स्कूल Proud

कालपासून फक्त जान्हवीने गाडी शिकावी, कि शिकू नये.. इ वर चर्चा सुरू आहे.
श्री ने आज तिची टेस्ट घेतली. नवशिक्यअ ड्रायव्हरला इतकं ओरडून बोलू नये हे श्री ला कळू नये? Uhoh

आणि तिची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला तेव्हा दाढी आणि केस दोन्ही वाढलेले होते, घरी पोचला तेव्हा दोन्ही छान ट्रिम Proud येता येता जानुची शाब्दिक आणि स्वतची वस्तरिक हजामत करून आला श्री Lol Proud

येता येता जानुची शाब्दिक आणि स्वतची वस्तरिक हजामत करून आला श्री >>> ओरडून ओरडून दाढीचे केस गळले असावे बहुतेक...

हे पेपर मधे आलेले पत्र वाचा , हेडिंग वाचले ,आतला मजकुर वाचा आणि आता शेवट्च पत्र लिहिणारयाचं नाव वाचा.हा निव्वळ योगायोग की खरया श्री च्या भावना.सांगा पाहु.

shreeee.jpg

मला वाटतं आता जानु गाडी चालवताना तिचा परत अपघात होउन तेचं डोकं स्टियरिंग वर आदळेल अन तिची मेमरी परत येइल..

ती नाटकी जानू गाडीसकट बेपत्ता झाली तरी हरकत नाही. श्री बाळाला नवी हिरविण आणू आपण. कहानी पण अजून ५ वर्षे चालेल. सध्याच्या शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा ते बरे... तिचे ते हेहेहेहे करत जबडा वासून हसणे बघवत नाही.

आणि तिची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला तेव्हा दाढी आणि केस दोन्ही वाढलेले होते, घरी पोचला तेव्हा दोन्ही छान ट्रिम फिदीफिदी येता येता जानुची शाब्दिक आणि स्वतची वस्तरिक हजामत करून आला श्री >>>हाहा कसलं निरिक्षण आहे दक्षिणा! जबरी! माझ्या कधीही लक्षात आले नसते!

>>>>यॅस चिमुरी, माझा पण तोचं अंदाज की पुन्हा अपघात होऊन स्मृती वापस <<<<#

येस. मलाही हेच वाटतेय. पण त्याचबरोबर श्रीचे पण डोके आदळेल आणि आता त्याची मेमरी जाईल.

लावतं का कोणी बेट?

रश्मी , मलाही जाम उत्सुक्ता होती की साडी खरच कशी आहे .
मग तुनळीवर शोधला एपिसोड आणि मारला स्नॅपशॉट आणि डकवला इथे .
पण साडी खरच छान आहे .

श्री ने आज तिची टेस्ट घेतली. नवशिक्यअ ड्रायव्हरला इतकं ओरडून बोलू नये हे श्री ला कळू नये?>>>> है शाब्बास ! हाडाचा नवरा आहे तो , पूराव्यासकट शाबित केलं की त्याने Wink

स्वस्ति मला खरे तर साडीपेक्षाही ब्लाऊज तुफान आवडला. कारण माझा आवडता कलर जाम्भळा आहे. पदराच्या काठाला पण जाम्भळी शेड असल्याने साडी फार आवडली. अगदी गोल्डन्+जाम्भळी शेड भारीये!

लिंक नाही सापडत कारण मी तो फोटो मोबाईल ने पेपर मधुन घेतला आहे. फार काही नाही त्यात.विपु बघ तुझी लगेच.

स्पार्टा गाणं छान आहे.

स्वप्नीलला दुसरी कोणी सापडली नाही का? इथेही ती खोटं खोटं हसतेय.

किती वाईट चालली आहे हे बघण्यासाठी एखादा एपिसोड बघावा का??
गाण आवडलं

अन्जू मला तरी तिच हसणं नेहमीच खोट वाटल. अगदी सुरुवातीला ही सिरीयल आवडायची तेव्हा पासुनच.

अशोक मामांनी ह्या धाग्या वरुन संन्यास घेतला वाटत :))

>>>जान्हवीचे लग्नाआधीचे उद्योग :-

तेव्हाही खोटी हसते पण त्या ड्रेस् मधे बरी दिसते ..
बादवे मराठमोळ्या रोमँतीझमच्या कल्पना अजून ६० च्या दशकामधल्या आहेत हे गाणे पाहून जाणवते

शाहिर >> Lol

काल ती जानी कोणालाच न सांगता गायब झाली. नक्की ड्रायव्हिंग शिकायला गेली असणार गपचुप.
पण मग घरी फोन करुन खोटे तरी सांगायचे कि मी माहेरी जाते आहे किंवा तत्सम काहीतरी पचेल अशी थाप.
काहीच न सांगितल्याने घरात सगळे रडत होते.

Pages