Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25
एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.
सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)
तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)
या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असाच माझ्या एका मित्राने
असाच माझ्या एका मित्राने सांगितलेला किस्सा
तो त्याच्या कुणा भावाच्या लग्नात उपस्थीत होता. लग्न-समारंभ आटोपल्यावर नवरीच्या पाठवणीचा कार्यक्रम चालू होता नवरीची आई , वडिल , बहीण, मावशी इत्यादी रडून नवरीला निरोप देत होत्या नवरीलाही रडू येत होत. ते पाहून हळव्या स्वभावाच्या नवरदेवाला अश्र्रू अनावर झाले आणि तो नवरीला म्हणाला तुला अगदीच रहावत नसेल आणि बर वाटत नसेल तर तू वाटल्यास आणखी ३-४ दिवस तुझ्या आई-बाबांबरोबर रहा. मग बरे वाटल्यावर ये परत. माझी काही हरकत नाही.
हे ऐकून नवरी आणिक तिच्या परिवाराने लगेच अश्र्रूंना आवर घातला आणिक पाठवणीचा कार्यक्रम आटोपला
>>मावस बहीण व भावाचे
>>मावस बहीण व भावाचे लग्न?<<
हे हिंदू मध्ये होते? मी एकलेले फक्त लिंगायत व मुस्लिम धर्मात होतं.
तू वाटल्यास आणखी ३-४ दिवस
तू वाटल्यास आणखी ३-४ दिवस तुझ्या आई-बाबांबरोबर रहा >>
>> तू वाटल्यास आणखी ३-४ दिवस
>> तू वाटल्यास आणखी ३-४ दिवस तुझ्या आई-बाबांबरोबर रहा. मग बरे वाटल्यावर ये परत. माझी काही हरकत नाही. >>
आमच्या लग्नात मी सप्तपदीच्या
आमच्या लग्नात मी सप्तपदीच्या सुपार्या टणाटण उडवून पुढे जाऊन उभीपण राहीले. गुरुजी काहीतरी संदर्भ शोधत होते बुकात मग त्यांनी डोकं वर केलं तेव्हा समजलं की काय करायचं होत नी मी काय केलंय. हिहिहि
हा किस्सा म्हटल तर अस्थळी
हा किस्सा म्हटल तर अस्थळी म्हटल तर योग्यस्थळी असावा (धाग्याच्या नावास अनूसरून सुस्थळी म्हणणार होतो
)
तसेच 'लग्नानंतरच्या गमती-जमती' असा कुठलाही धागा अस्तित्वात नसल्याने ह्याच धाग्यावर लिहीत आहे (खरे तर असा धागा नाहीये तेच बरेय कारण लग्नानंतरच्या गमती जमती म्हटल्यावर अनेक अर्थ उद्भवले असते आणि मग धागा वाहत गेला असता
)
असो. माझ्या भावाचे लग्न होते. लग्न गोव्यात होते. लग्नाचा मेनू पूर्ण शाकाहारी होता. आता गोव्यात येऊन मत्स्याहार न करता परत जाणे म्हणजे केवढी नामुष्की. म्हणून लग्नानंतरच्या दिवशी पाचपरतावन म्हणून सामीष भोजनाचा कार्यक्रम होता आणि अनेकांनी तो ताव मारून साजरा केला. माझ्या काकांनी सुद्धा अगदी आडवा हात मारला. त्यांना दुसर्या दिवशी बँकेच्या कामानिमीत्त कुठल्याश्या ठीकाणी कोंकणात जायचे होते. त्या साठी त्यांनी बसचे तिकीट काढले. त्यांचा प्रवास सुरू झाला. पण हाय रे दैवा आदल्या दिवशीच्या आडव्या हात मारलेल्या जेवणाने असर दाखवण्यास सुरूवात झाली आणिक त्यांच्या पोटात कळा येऊ लागल्या. ते लूज मोशन्स का काय म्हणतात ना ते सुरू झाले. आता बस प्रवासात कुठे आलीये तसली सोय. म्हणून त्यांनी मालवणला बस सोडली. आणि अगदी दबकत दबकत कुठलेसे जवळचे हॉटेल शोधले. पोटातल्या कळा अनावर होत होत्या. रीसेप्शन्ला हॉटेल मॅनेजर नाव, पत्ता, फोन नंबर, मालवण येथे काय काम आहे? तेथून नंतर कुठे जाणार ? ओळ्खपत्र काय देणार असले प्रश्न विचारून भांडावून सोडत होता . हॉटेलचे नियम समाजावून सांगत होता. काकांना अगदीच रहावत नव्हत. पण त्यांनी अगदी एखाद्या लढवय्या सारखी त्या प्रश्नांची उत्तरे दिली .
शेवटी मॅनेजरने विचारले " खोली किती दिवसांसाठी हवी " ?
आता मात्र काकांचा धीर सुटला (फक्त धीरच सुटला हा आणिक काय सुटुक नाय इती काका)
काका म्हणाले " मेल्या कितल्या दिवसांखातीर काय विचारतस? अगदी १५ मिंटांखातीर ही तुझी खोली पुरात? आता आणिक जर वेळ काढशीत तर माका तुझ्या खोलीची गरज उरूची नाय हा सांगान ठेवतय"
पूढे काकांना व्यवस्थीत खोली मिळाली आणि पुढचे सगळे विधी यथासांग पार पडले
(अच्छे लोगोके साथ हमेशा अच्छाही होता है इती शहारुख खान)
(आणि हे सगळ आम्हाला कस कळल तर आमच्या काकांनीच हा किस्सा आम्हाला अस्सल मालवणीत रंगवून रंगवून अनेकदा सांगितल )
केदार,
केदार,:हाहा:
भन्नाट किस्से आहेत
भन्नाट किस्से आहेत
झंपे, हे हिंदू मध्ये होते? मी
झंपे,
हे हिंदू मध्ये होते? मी एकलेले फक्त लिंगायत व मुस्लिम धर्मात होतं.>>>>>>>>> लिंगायत लोक्स पण हिंदुच असल्याने असे काही त्यांच्यात देखिल नसते.
पण मुसलमान लोकांमधे मात्र असु शकते. ( असे एक लग्न अटेंड केले आहे).
हुश्श, वाचून सम्पले सगळे
हुश्श, वाचून सम्पले सगळे किस्से. मी इतकी हसलेय ना सगळं वाचून की ऑफिसातले माझ्या आजूबाजूचे माझ्याकडे पहात असणार, तोंड दाबून हसायला लागत होतं तरी हसण्याचा आवाज येत होता.
मूळलेकख आणि सर्व प्रतिसाद
मूळलेकख आणि सर्व प्रतिसाद वाचून मजा आली.
अशक्य हसले.
अशक्य हसले.
लग्न समारंभात " उखाणे "
लग्न समारंभात " उखाणे " घेण्याची छान प्रथा आहे. वर-वधुंना टारगेटकरून त्या निमित्त नात्यातल्या इतर सर्व जोड्यांनाही घ्यावे लागतात - त्यात्या प्रसंगी. कुणि पेच्हात पडले तर मदतीला धावणारेही मिळतात. नववधु आईच्या सल्ल्यानुसार पूर्व तयारी करून असल्याचे ही आढळून येते बर्याचदा.
आमच्या गोतावळ्यातील काही लग्नांत नव दंपत्याच्या मदतीला धावण्याचे प्रंसंग माझ्यावर आले.
खर तर मोठा भाऊ-वहिनी मुळे. दोन नमुने देऊन या विषयाला चालना द्यावी असे वाटले -
पंक्तित विराजमान पुतण्या - पिनाकिन आणि त्यानी नांव बदलून झालेली बायको - गौरी.
उखाणा घे चा आग्रह झाला तसा पुतण्या गोंधळून गेला, काहीच सुचेना !
त्लाया सुचवला मीच - " नांवानीतर मी गणपतिचाच बाप,
मग काय गौरी आलीच आपोआप"
माझ्या मुलाच्या- पराग च्या लग्नात व्याहीच आग्रहानी म्हणले सुचवा तुम्हीच सुनेला.
टाळण कठिण. तिला म्हाटलं म्हण -- " फुलात फूल, पाखळ्या अनेक, खर सांगते पराग फक्त एक"
अस हे गमतिजमतिच हे दालन.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=DE4E77nF8Mg

निखळ करमणूक आहे हा धागा
निखळ करमणूक आहे हा धागा
फक्त वर काढण्यासाठी प्रतिसाद
वड्यात वडा बटाटेवडा, वड्यात
वड्यात वडा बटाटेवडा, वड्यात वडा बटाटेवडा
कार्यालयवाला म्हणतोय आता कार्यालय सोडा
लग्नानंतर बराचवेळ कार्यालय न सोडणाऱ्या वर पक्षाला वधूच्या एका काकाने दिलेल्या कानपिचक्या.
माझ्या मिञाच्या लग्नात तर
माझ्या मिञाच्या लग्नात तर वेगळीच गमंत झाली होती. एकतर भाऊ हट्टा कट्टा आणि नवरदेवाचा ड्रेस जोधपुरी, बरं त्याला सांगितलेलं धोती पँटर्न घे ऊठबस करावी लागते तर नाही दादाला बलुन पँटच हवी. लग्नासाठी वरात निघाली नी घोड्यावर बसताना बलुन असा फाटला की खाली उतरायची पंचायत लग्नात कसा उभा राहील. नवीन आणेपर्यंत वरात मंडपात पोहचेल. त्याच्या भावाची सलवार काढुन नवरदेवाला दिली नवीन येईपर्यंत तो बिचारा अंतर्वस्ञांवर नवरदेवाच्या गाडीत बसुन राहिला आणि नवरदेव गर्द लाल, सोनेरी एम्ब्रॉयडरी रंगाच्या जोधपुरी खाली पिवळसर सलवार घालुन उभा. हसुन मरा़यची वेळ होती. इतंक चिडवलं होतं की लग्नाला आठ वर्षे झाली अजुन फोटो एल्बम घरी नाही आणलाय..
pravintherider तुम्ही त्र
pravintherider तुम्ही त्र ऐवजी ञ टाइप केलंय
च छ ज झ ञ
त् + र् +अ = त्र
च छ ज झ मधलं शेवटचं अक्षर कसं
च छ ज झ मधलं शेवटचं अक्षर कसं टंकायचं ?
च छ ज झ मधलं शेवटचं अक्षर कसं
प्र का टा
Y
Y
गमभन वापरत असाल तर Y. गुगल
गमभन वापरत असाल तर Y. गुगल इंडिक कळपाट वापरत असाल तर त्याचा क ख ग घ लिहिलेला कळपाट घेऊन त्यात शोधा. Transliterate करणारा कळपाट ञ आणि आणखी काही अक्षरं (ङ वगैरे) देत नाही.
pravintherider, भारी आहे
pravintherider, भारी आहे किस्सा
माझ्या मावसभावाच्या लग्नात परण्या उरकून मांडवाकडे येत होतो तेव्हा त्याच्या डोळ्यात काय उडाले कायनु पण गड्याचे डोळे सगळे लाल-लाल झाले आणि त्यातून पाणी येउन तो रडत असल्याचा भास व्हायला लागला. मंडपाकडे जवळ आल्यावर लोकांना वाटले काय मॅटर झाला पण कोणीतरी डोके वापरून लगेच त्याला गॉगल दिला.
गूगल इंडिक म्हणजे त्रास आहे.
गूगल इंडिक म्हणजे त्रास आहे. भयानक डोकेदुखी. बदलायचं आहे किती दिवस.
Pages