लग्नातल्या गमतीजमती

Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25

एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.

सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)

तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्‍या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)

या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या लग्नाच्या वेळी तिच्याशी बोलायलाच मिळत नव्हतं. मोबाईल केला तरी कुणी ना कुणी स्त्री पात्र उचलायचं आणि गप्पा मारू लागायचं. पण तिच्याशी बोलणं होऊ देत नव्हते. तीन दिवस तंगवल्यावर मग मी मेसेज टाकला

महत्वाच्या कामामुळे तुझ्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. संध्याकाळी शुभेच्छा द्यायला घरी येईन.

हा मेसेज पण दुस-याच कुणी वचला आणि तिकडे बाँबच पडला. मला इकडं कल्पनाही नाही. सासुरवाडीला वाटलं जावई रूसला मग फोन वर फोन .. आणि स्पष्टीकरण देता देता मला नको नको झालं. पण इतकं करूनही ती काही बोललीच नाही..

आमचा प्रेमविवाह आणि लग्नाला माझ्या घ्ररातले कोनीच नव्ह्ते.सगळ्या विधी झाल्यावर सदीपचे भाऊ स्टेजवर आले त्यांच्या गळ्यात पडून रडयला लागले....त्यांनासुध्दा रडू आलं. मला थोड वेगळ्च वाटत होत. नंतर त्यांच्या आई आल्या त्यापण तशाच रडायला लागल्या व मला म्हणाल्या माझ्या पिंट्याला (संदिपला)सांभाळ ......... हे सगळ केमरामेन पाहत होता.तो म्हणाला सगळ उल्टच आहे तुमच्या लग्नात....... मुलीने रडायला हवं ......तर मुलाकड्चेच रड्ताहेत......जणू मुलगाच सासरी चालला आहे.....सर्वात आवडता किस्सा आहे माझ्यासाठी हा.....

आमच्या लग्नात आदल्या दिवशी रात्री सिमांतपुजना नंतरचं फोटोसेशन/व्हिडीओ शुटिंग चालू होतं. मी आणि नवरा मस्त स्टेजवर उभे राहून पोज देत होतो. जास्त कोणी लोकं नव्हती. खाली फक्त माझा चुलत भाऊ आणि काका उभा होता. तर हे फोटो प्रकरण चालू असताना एकदम गॅस सुटण्याचा आवाज आला. त्या दोघांपैकी कल्प्रिट कोण होतं ते नाही कळलं Happy पण आम्ही व्हिडीओ मध्ये तुफान हसताना दिसतोय Happy

माझा हा मायबोलीवरील पहिला प्रतिसादः सांभाळून घ्या.

माझ्या कॉलेज मधील मित्राच्या लग्नातला हा गोंधळ. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही अशी ही गंमत पुण्याच्या सदशिव पेठेतल्या हॉल मधे घडलेली. गुरुजीही हॉलच्याच कंत्राटातुन आलेले.

१. आमच्याकडे लग्न लागण्या आधी वधूच्या वडिलांनी मुलाला नि त्याच्या घरच्यांना लग्न मंड्पात आत घ्यायचं असतं. त्यासाठी आम्ही वरासकट बाहेर जाउन उभे राहीलो तर मुलीच्या वडिलांचा पत्ताच नाही! शेवटी आम्हीच स्वतःहून आत मध्ये शिरलो. तसच त्याचं शूटिंगही झालं. इतकं फनी वाटलं ते!

२. लग्न मुहूर्त समयी वराच्या मागील मंडळीत आळस झटकून उभे रहाताना अचानक मला दिसलं की वर्-वधूच्या हातात वरमालाच नाहियेत! दोघे नुसतेच आपले गुरुजींच मंत्रपठण ऐकत उभे! गुरुजी तर मक्ख चेहर्याने भराभर लग्न लावायच्या घाईत. आता कधीही 'शुभमंगल...' होइल... बापरे, मला घामच फुटला! तशीच गर्दीतून मुसंडी मारुन मी वरपक्षाच्या खोलीत गेले, तिथे कुठेतरी कोपर्यात मला एकदाचे हार सापडले, आणि धावत जाऊन मी ते वर्-वधूच्या हातात दिले..नि हुश्य केलं.

३. वरमाला प्रकरण मिट्ल्यावर अजून एक गोष्ट मला दिसली ती म्हणजे, करा धरलेली कुणीच करवली नव्हती! आता माझ्या सहनशक्तीची हद्द झाली. मी सरळ मित्राच्या काकूला ते सांगीतलं. तर ती त्या करवल्यांच्याच अंगावर डाफरली, "करा कुठे टाकलात ग पोरींनो?" झालं. हॉलभर शोधाशोध सुरु झाली. करा कुठे सापडेना, तेव्हा त्यातल्या एका पोरीने सरळ रुखवतात मांडलेला शोभेचा करा हातात धरला, नि ती वरामागे उभी राहिली! मला प्रश्न पडला, की आता ही त्यातलं पाणी दोघांच्या डोळ्यांना कुठून लावणार?? दिव्याचा तर पत्ताच नव्हता. गुरुजी आपण त्या गावचेच नसल्यासारखे वागत होते. ..................................................गंमत म्हणजे, लग्न यथास्थित पणे पार पडे पर्यंत या सगळ्या गोधळाची कुणाला कल्पनाही आली नव्हती!

मग मात्र पुढ्चा गोंधळ पहाण्यासाठी मी लग्न लागायची वाट न पहाता तिथून सटकले!

महेश | 11 February, 2010 - 20:37

ह्म्म्म उत्तरेकडील लोक पहाटे विधी करतात !

>>> विधी बहुधा पहाटेच्या सुमारासच करण्याची सगळी कडेच पद्धत आहे. नाही का?
खिखीखिखीखिखीखिखीखिखीखिखीखिखीखिखी

परिमला, मायबोली वर स्वागत. लग्नाचा बीबी आहे म्हणून पेढे व अत्तर गुलाब पण.
मस्त किस्सा आहे. परवाच मी एका डिझाइनर लग्नाला गेल्ते तिथे ही असंच. लग्नाच्या वेळी सनईपण नाही. फुल्ल सन्नाटा. कोणीही पाव्हण्यांचे स्वागत करणारे नाही. एका करवलीने चक्क हैद्राबादी मुस्लिम घालतात तसला गरारा व केसातले दागिने घातलेले हे हो काय? पण नवरा नवरी क्यूट होते. नववधू नऊवारीत आणि
नवनवरा पुणेरी पगडी घालून व्हता. अक्षि साजिरे दिसत होते दोघे.

मामी, त्या करवलीने घातलेल्या हैद्राबादी गरार्‍याच्या किश्शावरून आठवले.... माझ्या एका बहिणीचे लग्न होते. पुण्याच्या शनिवारपेठेतील टिपिकल मध्यमवर्गीय ''पेठी'' कार्यालय व तसेच साजेसे वातावरण. तेव्हा (म्हणजे त्या काळात) मी नुकताच कॉलेजात प्रवेश केलेला, आणि त्यातच सदान् कदा टोटल आंग्लाळलेल्या मोडमध्ये असायचे! (सारख्या विंग्रजी कादंबर्‍या-पुस्तके वाचण्याचा आणि हॉलीवूडचे पिक्चर पाहण्याचा परिणाम! दुसरं काय?!!!)
तर त्या लग्नासाठी मी करवली असणार आहे हे नक्की झाल्यावर मी स्वतःची अक्कल लावून एक वेलवेटचा झगा शिवून घेतला होता माझ्यासाठी. पायाच्या घोट्यापर्यंत येणारा, पफ बाह्यांचा, रॉयल ब्लू कलरचा.... चौकोनी गळा. कमरेपासून प्लीट्स. त्यावर कमरेला घालायला सिल्वर कलरचा नाजूक बेल्ट. कानात, गळ्यात खड्याचा चमचमता सेट. हातात खास कँपातील एका कॅथलिक दुकानातून घेतलेले किरिस्ताव नववधू हातात घालतात तसे पांढरे लेसचे हातमोजे.... पायांत सिल्व्हर शेडचे शूज.... डोक्याला निळ्या डार्क शेडचा सिल्क प्रिंटेड स्कार्फ (त्याऐवजी हॅट घालता आली असती तर ती पण घातली असती!!! फूल्ल्टू कार्टूनगिरी! :खोखो:) तर अस्सा वेष करून मी सार्‍या लग्नात वावरले, करा दिवा हातात (आपलं, हातमोज्यात) घेऊन नववधूच्या मागे उभी राहिले.... फोटोसाठी पोजेस दिल्या... आणि सर्वात मजा म्हणजे मला न ओळखणारे सर्वजण माझ्याशी मी कोणीतरी 'फॉरेन'ची आहे असं समजून कटाक्षाने (पेठी) इंग्रजीतून बोलत होते. दोन-तीन जणांनी 'तुम्ही कोणत्या देशी वास्तव्य करून असता?' टाईप्स प्रश्नही विचारले! Lol मी व माझ्या इतर बहिणी नंतर ते आठवून व फोटोग्राफ्स बघताना हसून हसून पुरत्या लोटपोट झालो होतो!

अकु, :D. आणि हे सगळे मे-जून च्या लग्नाच्या सीझन मधल्या एखाद्या लग्नात घातले असशील तर महान!

या लग्नाला आता पंचवीस वर्ष होऊन गेली. आणि नवरा नवरी, मी आणि नवर्‍याची बहीण सोडल्यास कुणालाच हे माहीत नाही. मित्राच्या बायकोला लग्नाच्या आधीपासून ओळखत होतो. दोघे मराठी असले तरी ती दिल्लीला राहिल्यामूळे तिला मराठीची सवय नव्हती. भटजी काय सांगतात त्याचे भाषांतर करुन तिला सांगावे म्हणून तिने मला विनंति केली होती.
हौसेने नऊवारी साडी नेसली होती. एका विधीसाथी ते दोघे पाटावर बसले होते. मी दोघांच्या मधे पण मागे, नवर्‍याची बहीण नवर्‍याच्या मागे. भटजींनी ऊभे रहायला सांगितले, नवरा पटकन उभा राहिला, तिच्या अंगावरची शाल पण वर उचलली गेली पण तिने ती खाली खेचली. भटजी काय म्हणाले ते मी तिला परत सांगितले, तर तिने मला सांगितले, टेल हिम टु सीट डाऊन. मी त्याला तसे सांगितले तर तो म्हणाला अरे तिला उभे रहायला सांग.
तिची अवस्था केविलवाणी, मोडक्या तोडक्या मराठीत बोलली, अरे माझं सुटलं ना.
माझ्या लक्षात आले नाही, पण मित्राच्या बहीणीच्या लक्षात आले. बिचारीचा कास्टा मागून सुटला होता.
हे सगळे थोडक्यात निभावले. आम्ही चौघेही अजून हसतो यावर.

फारएण्ड, लग्न डिसेंबरातले होते आणि सक्काळी लवकरचा मुहूर्त होता म्हणून बचावले!! Lol
जाजु, शोधते ते फोटो आता.... आहेत कोणत्यातरी अल्बममध्ये! सॉलिड ध्यान दिसत असणार आहे मी! Proud

एक एक खतरा आठवणी आहेत.<<अरे माझं सुटलं ना.>>:D
आणि अकु तू नक्की फोटो टाक Proud
साधू <<त्यांच्या आई आल्या त्यापण तशाच रडायला लागल्या व मला म्हणाल्या माझ्या पिंट्याला (संदिपला)सांभाळ >>
त्यांच्या पिंट्याच लग्न होत ना.. त्यामुळे त्यांना काळजी . आपल्या पिंट्याच कस होणार?..:D Lol

अकु. Happy लै भारी ग. मी पण चुलत भावाच्या लग्नात ट्विंकल नायलॉनचा निळाच फ्रॉक. त्यास टिकल्या लावलेल्या असा ड्रेसकरून वावरले. मला लोकांची लग्ने फार बोअर होतात म्हणून खादाडी करून इथे तिथे जागा मिळेल तिथे झोपा काढल्या. अगं तू सारखी झोपतेस काय असे एका काकुंनी दटावले पण. किति रम्य ते दिवस. पण ह्या लग्नात अप्रतिम दोन बटाटेवडे व खोबर्‍याची बर्फी मिळाली.

एक भयंकर गंमत वाचा लोकहो

माझ्या मावसबहिणीचे लग्न! साल १९८३! ती, तिचे आई (माझी मावशी), बाबा आणि लहान बहिण (पुण्यातीलच) उत्तमनगरला राहायचे. तिचे बाबा सेन्ट्रल बिल्डिंग (पुण्याच्या रेल्वे स्टेशनजवळील शासकीय इमारत) येथे कामाला होते.

लग्न ब्राह्मण मंगल कार्यालयात होते. सीमांतपूजनाच्या संध्याकाळी चार वाजताच उत्तमनगरहून सगळे निघणार होते. मात्र बरेचसे सामान असल्यामुळे व उत्तमनगरमधील अनेक लोक येणार असल्यामुळे एक मोठा ट्रकस्वरुपाचा टेम्पो भाड्याने घेतला. आता नवरी मुलगी टेम्पोतून आली असे होऊ नये म्हणून माझी मावशी व दोन्ही मावस बहिणी रिक्षेतून निघाल्या. वधुपिता स्वभावाने गरीब (बनवलेला) असल्याने ते टेम्पोत चढले आणि पाठोपाठ भरपूर सामान व दहा जणही मागे चढले. वधुपिता टेम्पो ड्रायव्हरच्या शेजारी बसलेले होते.

इकडे आम्ही आणि प्रत्यक्ष मुलगी, तिची आई व बहिण तसेच मुलाकडचे सगळे कार्यालयात पोचले आणि टेम्पोची वाट पाहू लागले. पाच वाजता पोचायचा तो टेम्पो साडे सातला आला आणि वधुपित्याला अक्षम्य गुन्हा केल्याबद्दल तीव्र शब्दात समज मिळाली जी अत्यंत अपेक्षित होती. मात्र उशीर का झाला हेच कुणी विचारत नव्हते. टेम्पोतून आलेल्या उत्तमनगरमधील पब्लिकला 'उत्तमनगरहून ब्राह्मण मंगल कार्यालयात यायला' अडीच तासच लागतात असे वाटत होते.

यात घोळ असा होत की मुलीचा होणारा नवरा हा तिचा व माझाही मावस भाऊच होता. मावस भाऊ बहिण यांच्यातच प्रेमविवाह होता. त्यामुळे दोन्ही घरचे लोक वधुपित्याला मधूनच बोचरी टीका करून भंडावत होते व ते करण्याचा तितकाच अधिकार दोन्ही पक्षांना होता.

लग्न लागून दुसर्‍या दिवशी कार्यालय सोडताना खरा प्रकार समजला.

वधुपित्याला उत्तमनगरहून थेट ब्राह्मण मंगल कार्यालयाचा पत्ताच लक्षात येत नसल्यामुळे सदाशिव पेठेत टेम्पो वाट्टेल तसा फिरला आणि शेवटी वधुपित्याला लक्षात आले की सेन्ट्रल बिल्डिंगपासून त्यांना कार्यालयाचा रस्ता नक्की नीट माहीत आहे. त्यामुळे त्यांनी वैतागून टेम्पो स्टेशनपाशी नेला आणि तिथून रस्ता दाखवत दाखवत कार्यालयात आणला.

-'बेफिकीर'!

Happy ब्राम्हण मंगल कार्यालय मला फार आवडायचे कारण बोहल्याच्या दोन्ही बाजूला बार्क्या जिन्यांसारखे होते त्यावरून वर खाली करता यायचे. अगदी एक पाउलच मावायचे त्या जिन्यावर. अजूनही नक्की हे कार्यालय कुठे आहे माहितच नाहिये. कारण लहानपणी आईबाबांबरोबरच गेलेले तिथे.

अजूनही नक्की हे कार्यालय कुठे आहे माहितच नाहिये. >>>

नागनाथ पाराचा रस्ता पुढे जातो तिकडे आहे. किंवा गाडगीळ स्ट्रीटवरूनही जाता येते.

गंमत म्हणजे तेथील व्यवस्थापक एक प्रकार करायचे. पाच वाजता कार्यालय सोडावे लागायचे. पाच वाजले की ते गजराचे घड्याळ वाजवायचे. पण कसे वाजवायचे? तर स्वतःच्या खोलीच्यादाराच्या आत उभे राहून फक्त घड्याळ धरलेला हात बाहेर काढायचे. ते घड्याळ वाजताना दिसले की तो अर्धवट हातही दिसायचा. यातील उद्देश असा होता की 'पुणेरी परखडपणा तर करायचा आहे, पण वाईटपणा मात्र नको आहे'. Lol

माझी मुंज भट मगल कार्यालयात झाली होती. ते एक महानच कार्यालय आहे. (की होते? )

आमच्या गावी नवरा मुलगा लग्नमंडपात घोड्यावरुन येतो.
असेच एकदा माझ्या मामाच्या गावी एका लग्नात, नवरा मुलगा घोड्यावरुन येत असताना बॅन्डच्या आवाजाने घोडा उधळला आणि नवरा मुलगा घोड्यावरुन खाली पडला Sad
बिचारा संपुर्ण कार्यात अजिबात हसला नाही आणि फोटो काढतानाही गपचुप होत.. बिचारा लागले असेल तरी सांगता येत नसेल Wink
आम्हाला मात्र खुप करमणुक झाली होती.

mazhya lagnachya veli bhataji ne tandalvarti suparicha nahi tevlya hotya tyamule mi supari sarkavaycha evaji tandulach sarkavat hote:D

Pages