लग्नातल्या गमतीजमती

Submitted by प्राची on 11 February, 2010 - 04:25

एका बाफवर सहज गप्पा मारताना मी माझ्या लग्नातली एक गंमत सांगितली.

सप्तपदीला मी एकटीच पहिली पाच पावलं चालले. नवरा माझा हात धरून एकाच जागी उभा. मग सहाव्या पावलाला त्याला पुढे झुकावं लागलं ते पाहून भटजी म्हणाले," अहो, तुम्ही नाही का सरकलात पुढे? तुम्हीही चालायचे असते." नवरा म्हणाला," तुम्ही सांगितलंच नाहीत." आणि टुणकन उडी मारून पुढे आला.:)

तुम्हांलाही तुमच्या लग्नात किंवा दुसर्‍या कोणाच्या लग्नात असे मजेदार अनुभव आले असतील. ते लिहा की इकडे. आपण सगळे ती मजा अनुभवू या.:)

या काही जुन्या हितगुजवरच्या गमतीजमती.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची,
छान विषय आहे
धन्यवाद या लेखाबद्दल !
माझ्या मावशीच लग्न ठरल्यावर त्याच दिवशी यादी मे शादी करायच ठरल्यावर साधारण ८ वाजले असतील ,त्यावेळी मी ८ वीत असेन , मला त्या वेळी व्यायाम करण्याच व्यसनच लागल होतं (रोज जोर मारायचो आणि ३ वाढवायचो),त्यामुळे घरात लग्नाची घाई चालु होती, पण त्यातही वेळ काढुन गोठ्यात येऊन १६० (१५७+३) जोर काढलेच,उठुन पाहिलं तर काही पाहुणे येऊन पहात उभे होते.

हा आणखी एका म.प्र.मधल्या शादीचा धमाल किस्सा...मध्यरात्री नंतर फेरे [बहुतेक नेहमीप्रमाणे अर्धवट झोपेत्]झाले..लग्नानंतर जेव्हा सीडी पाहिली तेव्हा लक्षात आले की फेरे उलटे फिरले आहेत..मग ज्योतिषी,पंडितजी गाठले गेले..यावर काय तोड /उपाय विचारला गेला..तर एकाने ज्योतिषाने सांगितले की पुन्हा एकदा फेरे सुलट करा ..म्हणजेच पुन्हा एकदा लग्न...उजवे-डावे फारसे समजत नसल्याने हा घोळ झाला..कारण पुजेच्या वेळी स्वाहा करताना डाव्या हाताचा वापर सर्रास करतात..अनर्थ टाळण्या साठी शेवटी पुन्हा एकदा एका मंदिरात लग्न [फेरे] लागले..

हा हा.... सुलेखा.... भारीच!!

एका मित्राचे लग्न ''हौसेपायी'' आग्र्याला ताजमहालाच्या साक्षीने पार पडले. त्याच्या होणार्‍या बायकोचे कोणी नातेवाईक तिथे राहात होते... त्यांनी बरीचशी व्यवस्था केली होती. मित्राची नोकरी बंगलोरची, बायकोचे गाव वेगळेच (बहुतेक लखनौ), मित्राचे घर पुण्यात, मूळ गाव कोलकाता अशी त्रिस्थळी की बहुस्थळी?? यात्रा होती. लग्न झाल्यावर त्याने लग्नाचे ना आग्र्याला रजिस्ट्रेशन केले ना बंगलोरला ना पुण्याला ना कोलकाता येथे..... मग दोन वर्षांनी साहेबांनी पुण्याला जॉब धरला. आता पुण्यात आल्यावर त्याला इथे लग्न रजिस्टर करावेसे वाटू लागले! Light 1 मग त्याची लग्न रजिस्टर करण्यासंबंधी सगळी चौकशी करुन झाली. ज्या माणसाने लग्न लावले, जिथे लग्न लागले त्याची सही, पुरावा वगैरे रजिस्ट्रेशन साठी लागतो म्हटल्यावर साहेबांचा विचार बारगळू लागला. कारण बायकोच्या ज्या नातेवाईकांनी आग्र्याची व्यवस्था पाहिलेली त्यांची अन्य गावी बदली झाली होती. शिवाय ज्या पुरोहिताने लग्न लावले त्याचा माग काढणे वगैरे हे वेळखाऊ व कटकटीचे काम होते. पण काही कायदेशीर बाबींसाठी लग्न रजिस्टर केल्याचा पुरावा तर हवा होताच! मग कोणीतरी मित्राला सांगितले, अरे पुण्यात लग्न रजिस्टर करायचंय तर तिथे कोर्ट मॅरेजसाठी फ्रेश अर्ज कर...जणू काही तू तुझ्या बायकोशी तिथे कोर्टातच लग्न करत आहेस, असं.... हाकानाका! मित्राने व त्याच्या घरच्यांनी तोवर बरीच डोकेफोड केली असल्यामुळे हा पर्याय त्यांना जास्त सोप्पा वाटला!!

ठरल्याप्रमाणे रीतसर अर्ज करून कोर्ट मॅरेज झाले. साक्षीसाठी माझे अजून दोन मित्र होते. वर-वधूने एकमेकांच्या गळ्यात हार घातले, फोटो काढले, सह्या केल्या, उपस्थितांना पेढे खिलवले..... पण कशा अवस्थेत?? त्या वेळी पुण्यात स्वाईन-फ्लू ची जोरदार साथ चालू होती व लोक सगळीकडे तोंडाला मास्क लावून हिंडत होते! तर वर-वधूचे फोटोही तोंडाला मास्क लावलेलेच आहेत (कोर्टाच्या आवारात तर सार्वजनिक ठिकाण म्हणून संसर्गाचा जास्त धोका!!) .... सर्व वर्‍हाडी मंडळी तोंडाला मास्क लावून पोझ देत आहेत.... वर-वधू सजून धजून, गळ्यात हार घातलेल्या अवस्थेत तोंडाला मास्क लावून फोटोसाठी पोझ देत आहेत.... त्यांच्या डोळ्यांवरून ते हसत आहेत असे गृहित धरायचे! Lol बाकी मित्रमंडळींना हे सर्व कळाले तेव्हा त्यांनी आमच्या ह्या मित्राला, ''क्या रे, इतना डरता है क्या तू बीमारीसे'' वगैरे टाईमपास चिडवून चिडवून बेजार केले. शिवाय, ''क्या यार तेरा बॅडलकच खराब है... एकही बीवीसे फिर से शादी करनी पडी |'' सारख्या फालतू कोट्या करुन जनरल टाईमपास केला. आणि मित्रमहाशय? ''मैने दूसरी शादी की, मुझे कॉन्ग्रॅट्स करो,'' असे सर्वांना आनंदाने सांगत हिंडत होते!!

भटजींनी हातात एक तांदळाने भरलेले ताट दिले आणि काही मंत्र म्हणायला सांगितले.. आणि म्हणता म्हणता ते अंगठीने त्यात लिहायला सांगितले..... मी इमाने इतबारे सगळे ऐकत होतो आणि लिहित होतो.... एकदाचं त्यांचं सांगून आणि माझं लिहून झालं...

हुश्श.... करेस्तोवर भटजींनी शांतपणे गुगली टाकली.... "आता वाचा"...

काय? कसं ... म्हणजे... तांदळावर अंगठीने लिहिलेलं कसं काय बुवा वाचायचं !

हहाहाअ. सगळेच किस्से सही आहेत.
माझ्या लग्नात लक्ष्मीपुजेच्या वेळी मला घालण्यासाठी सा.बु. नी एक पोहेहार केला होता. गुरुजींनी तो हार आधी प्रतिकात्मक लक्ष्मीला (नारळाला)घालायला सांगितले ,तर माझा नवरा लहानाहुन लहान होत म्हणतो कसा?.....ओ,तो हार तर मायासाठी (माझे आधिचे नाव)केला आहे आम्ही ,नारळाला कशाला?..

आणिक एक....
माझ्या लग्नात आम्च्याकडची गैंग मोठी.....१०-१२ पोरी आणि ७-८ टगी मुले......आणि नवर्‍याकडे त्याचा एक (बारकुळा) मित्र आणि २ छोट्या भाच्या ( वय वर्षे १२ आणि ८ -९ अनु.) माझ्या नवर्‍याचे बूट पळविले. (तेंव्हा लै जोर होत या गोष्टीचा)... तर माझ्या २ छोट्या भाच्या काय करणार बिचार्‍या? पण त्या लै हुशार, आम्च्या गोटात आल्या आणि दिनवाणे तोंड करुन म्हणाल्या.....आमचा मामा खुप खुप गरिब आहे. त्याच्या कडे पैसे नाहीत हो तुम्हाला द्यायला.... आणि दुसर्‍या चपला पण नाहीत. तर कृपा करुन त्याचे बूट द्या.

जुन २०१०मधे मधल्या दिराच लग्न झाल. झाल द्यायच्यावेळी जावेच्या माहेरी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी ते बघुन साबा पण डोळे पुसत होत्या (त्या टीव्ही सिरियलमधे कुणी रडल तरी रडतात). प्रसंग एकदम बाका. वाईट मलाही वाटत होत पण रडु वैगेरे येत नव्हत शेजारी हुंदका आला बघते तर नवरोजी रडत होते. त्याला विचारल्यावर म्हणाला की किमयाच्या (मुलगी वय १०) लग्नात हे असल काय करताना मला अजिबात बोलवायच नाही.

माझ्या लग्नात विधी सुरू असताना गुरुजी म्हणाले "कटीला हात लावा".
आजूबाजूच्या आवाजात मला पहिलं अक्षर ऐकूच आलं नाही. मी फक्त "टी" एवढंच ऐकलं.
मग विचार करुन हनवटीला हात लावला.

गुरूजी पण बिलंदर.....म्हणाले "अहो आत्ता नाही ते. आत्ता कटी म्हणजे कंबरेला हात लावा." smiley_laughing_01.gif

>>>>अहो आत्ता नाही ते. आत्ता कटी म्हणजे कंबरेला हात लावा."
गुरूजींच्या कटीला नाही ना हात लावलास? Proud

.....

आरे हो, आणखी एक. एकमेकांना पेढा भरवायला आमच्या हातात एकेक पेढा दिला. तो भरवायचा सोडून बायकोने स्वत:च गट्ट्म केला. मी मात्र (पेढा खायला) वासलेला आ घेउन तसाच.

एकंदरात गुरुजी जमात भारीच आचरट हो.....आम्हाला लाजाहोम च्या वेळेला अशी काही पोज दिली होती की माझ्या खांद्यावरुन हात टाकुन, ओंजळि जुळवुन हाताच्या, मग लाह्या टाकायच्या होमात. नवरा जाम लाजलेला

मंद्या... ! तुझे अर्धांग पण बिलंदरच!! >>>>> Proud

माझ्या लग्नात पंक्तीच्या वेळी घास भरवताना कोणीतरी ही कॄती माझ्या सासरच्यांना हिंदीतून भाषांतर करून सांगत असताना ऐकले .."अब ये उसे घास खिलायेगी!" कोण बोलले आणि त्यावरची माझ्या साबा आणि दिर-जावा यांची प्रतिक्रिया बघायची हिंमत झाली नाही. Biggrin

Rofl गुरूजींच्या कटीला नाही ना हात लावलास?>> Lol मंद्या...तुझे अर्धांग पण बिलंदरच!>>>> अगंगंगं Rofl धमाल नुस्ती!!

एकंदरात गुरुजी जमात भारीच आचरट हो.....>> अगदी अगदी! आणि ते अस्सल कोंकणी पाणी असेल तर मग विचारूच नका... आमच्या लग्नात भटजीच सर्वात जास्त खूष दिसताहेत सगळ्या विधींमध्ये Uhoh

माझा नवरा अतीपझेसीव असल्याने "लग्नात ते उचलण्याबिचलण्याचे फाजील प्रकार नकोत" असं मला निक्षून सांगितलेलं. त्यामुळे आमच्या मंगलाष्टका चालू असताना माझे तगडे भाऊ शेवटच्या रांगेत निवांत बसून येणारी जाणारी मुलाकडली हिरवळ बघत टवाळक्या करत होते... तेवढ्यात भटजीने हार घालायची सुचना करताच माझ्या नवर्‍याच्या सहा फूटी मामांनी व मित्राने त्याला उंच उचललं आणि हाही सिंहासनावर बसल्यासारखी पोझ घेऊन ऐटीत बघत होता. मी खालूनच "उचलायचं ठरलं नव्हतं ना रे" असं डोळयांनीच दटावून विचारतेय.. एवढ्या गोंधळात नी गर्दीत भावांना बोलवायला सुचतच नव्हतं. मग काय, चुलत बहीणीने आणि सव्वापाच फूटी मामेभावाने मिळून माझं पोतं कसंबसं उचललं... तरी काही हार घालता येईना.. मला भिती की यांनी भार सहन न होऊन माझं बोचकं खाली टाकायच्या आत हार घालून मोकळं व्हायचं!!! घाईघाईने मी हार फेकला... बरोबर नवर्‍याच्या गळ्यात...!!!

माझी सासू मागून दणदणीत ओरडली..."काय गं बास्केट बॉल खेळायची प्रॅक्टीस दिसतेय चांगलीच!!" माझा धाकटा भाऊ हळूच पुटपुटला, "बास्केटबॉल कसला! मला चांदोबा अंकातल्या वरमाला सोंडेने फेकून राजा निवडणार्‍या हत्तीच्या गोष्टीची आठवण झाली..." Sad

आता माझा टर्न होता हार घालून घेण्याचा!! भटजींनी हळूच खाजगी आवाजात गहन शिक्रेट सांगितल्या सारखं कुजबुजत सांगितलं, "खाली बस". मला वाटलं असेल बुवा इथला विधी .. नवरीला बसवून हार घालायचा...!! मला काय, मी बसले धाप्पकन पायाखाली ठेवलेल्या पाटावर... पाय अवघडलेले नाहीतरी एवढा वेळ उभं राहून!! मला चक्कर आली असं वाटून नवर्‍यासकट सगळे पुढे सरसावले... भटजींनी घाई केली "मुहुर्त टळतोय आधी हार घाला..." नवर्‍याने वाकूनच हार घातला. नंतर त्याची मावशी त्याला ओरडत होती.. "लग्नातच बायकोपुढे वाकलास??? आता आयुष्यभर वाकावं लागणार!!!" Proud (तसंपण वाकावं लागतंच उंचीतल्या फरकामुळे Happy )

सप्तपदीला तर हा येवढ्या घाईघाईने फेर्‍या मारायला लागला... जशी विरार फास्ट पकडायची आहे... मी अवजड शालूमध्ये आणि एप्रिलच्या प्रचंड उकाड्यात हैराण झालेले... आणि हा हात जोरात धरून अक्षरशः पळतोय... मी ओरडले "अरे हळू, मी पडेन ना...". भटजी म्हणताहेत.. "पळून बिळून गेलीस तर रामदासांसारखी..." तेवढ्यात दुसरे भटजी पुटपुटले... "मुंबैकरांना प्रत्येक गोष्टीची घाई असते... भविष्याचा विचार करून ते वर्तमानातच घाई करतात" Blush

जिर्‍याचा विडा तोंडात धरायला सांगितलेला तर नवरोबांनी अर्धाअधिक चघळून खाऊन टाकलेला... भटजींनी तो विडा थुंकून टाकायला सांगितल्यावर उरलेला चोथा कसाबसा थुंकला आणि म्हणाला, "मी तोच विचार करतोय जेवायच्या आधी विडा काय दिला... लग्नात सगळ्या विधी बहुतेक उलट्या असतात असं वाटून मी खाल्ला!"

हुश्श! असो... शेवटी एकदाचं लागलं आमचं लग्नं!!!

"बास्केटबॉल कसला! मला चांदोबा अंकातल्या वरमाला सोंडेने फेकून राजा निवडणार्‍या हत्तीच्या गोष्टीची आठवण झाली..." >>> Rofl

आमच्याच लग्नातला किस्सा. माझे एक काका WC मधून तणतणत बाहेर आले आणि इकडे तिकडे शोधक नजरेनं पाहू लागले. त्याच वेळी माझा एक आतेभाऊ तिथे होता त्यानं विचारलं, "काय रे, काय शोधतो आहेस 'बाहेर' येऊन?"

काका आधीच वैतागलेले होते. ते म्हणाले, "साबण ठेवलेला नाहीये आत. तोच शोधतोय. कारण आमच्यात हगून झाल्यावर हात धुतात".

"हो का? आमच्यात कुले धुतात" दादा पटकन् उत्तरला. smiley_laughing_01.gif

>>>
Rofl Rofl Rofl Rofl
अश्यक्य

माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नात ..... हार घालतांना ....मजा आली.... नवरदेवाला त्याच्या मित्रांनी उचलले.... माझी मैत्रीन थोडी लठ्ठ असल्यामुळे ...मुलीकडच्या मंडळींनी रिस्क नाही घेतली.... म्हणुन तिने तो हार नवरदेवाच्या गळ्यात पडावा म्हणुन फेकला तर तो हार भटजी च्या गळ्यात पडला.... Rofl मग खुप सगळे हसले ... भटजी मात्र राग राग पाहत होते....

Pages