केल (पीठ पेरुन)

Submitted by हर्ट on 18 October, 2014 - 12:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) केल (सिंगापुरमधे ह्या भाजीला काईलान म्हणतात. चायना मधे चायनीज केल अथवा चायनीज ब्रोकोली अशीही नावे प्रचलित आहेत.)
२) बेसन पीठ - ४ चमचे
३) फोडणीचे साहित्य - मिरची, हळद, लसूण, कांदा, मोहरी, जिरे, मेथी, पंचपुरण
४) तेल
५) मीठ

क्रमवार पाककृती: 

१) केल पाण्याखाली धूवून नंतर नीट चिरुन घ्या.
photo 2_0.JPG

२) चिरलेली केलः

Kale cut.JPG

३) फोडणीचे साहित्य निवडून/चिरुन घ्या. मी ओली हळद जास्त वापरतो. पुड सहसा वापरत नाही.

photo 1_0.JPG

४) बेसन पिठ ताव्यावर भाजून घ्या किंवा कढईत भाजले तरी चालेल. आधी तावा/कढई मंदे आचेवर गरम होऊ द्यावा आणि नंतर चहूबाजूते तेल पसरले इतपत तेल टाकावे. असे केले की पिठ जळत नाही. पिठ भाजताना सतत हातातील सरट्याने पिठाला अरतपरत करत रहायचे. पिठाचा खरपुस वास यायला लागला की ते पिठ वाटीत काढून घ्यावे. जर आच बंद करुन कढईत वा ताव्यावरच पिठ ठेवले तर ते हमखास जळेल.

besan roasted.JPG

५) भाजीला फोडणी देऊन. भाजी शिजत आली की भाजीत बेसन घाला. भाजी आणि बेसन नीट मिसळवा. मंद आचेवर पातेल्यावर झाकण घालून एक वाफ आली की आच बंद करा. लगेच भाजी ढवळू नका. जेंव्हा वाढायला घ्याल तेंव्हाच परत पळीने एक हात फिरवा.
Kale Bhaji cooked.JPG

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तीला पुरेल.
अधिक टिपा: 

१) कच्चे बेसन घालू नका. त्यानी भाजी गच्च गोळा होते. शिवाय कच्चे बेसन खाऊन कदाचित पोट बिघडू शकते.
२) मी बेसनाच्या पदार्थात ओवा घालतो.
३) कोणत्याही भाजीला पीठ पेरायचं असेल तर जरा जास्त तेलाची फोडणी करायची.
(कॉन्व्हर्सली कधी चुकून जास्त तेल घातलं गेलं तर पीठ पेरायचं. )
४) चकलीचे पिठ उरले असेल तर तेही घालता येईल. पण पारंपरिक कृतीमधे बेसनचं असते.
५) भाजी ऑल्मोस्ट शिजत आली की पीठ पेरायचं, मग एक वाफ काढायची, आणि मग खरपुस आवडत असेल तर झाकण काढून थोडा वेळ परतायची - विशेषतः विकतच्या फाइन बेसनासाठी हे करावंच, नाहीतर खाताना पीठ घोळतं.)

माहितीचा स्रोत: 
सायोनारा, मैत्रेयी, स्वाती अंबोळे, शूम्पी, मृन्मयी, मेधा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! मस्त दिसतेय भाजी. अत्यंत उपयुक्त टिप्स! बेसन भाजून घेण्याची आयडिया आवडली! बेसन कच्चं राहण्याच्या भीतीने मी पीठ पेरून भाज्या फारश्या करत नाही. आता भाजून घेऊन नक्की करून बघेन!

तयार भाजीचा फोटो छान दिसतोय. पण माझं नाव माहिती स्त्रोतात का? मी तुला ही रेसिपी सांगितल्याचं आठवत नाही. इनफॅक्ट मी केलची भाजी आजवर केलेली नाही. फक्त सॅलडमध्येच खाल्लं आहे.

ह्म्म..आता पीठ भाजून घालून केल्या पाहिजे भाज्या. पण कांद्याची पीठ पेरुन अशी भाजी करताना बेसन शिजायला वेळ नाही लागत. पटकन होते भाजी.

सायो, गुरुवारी सकाळी तुम्ही टिपापावर चर्चा करत होता पीठ पेरुन भाजी कशी करायची त्याबद्दल. तो संदर्भ आठवला तर तुला तुझे नाव का अ‍ॅड केले ते लक्षात येईल. असो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

खूप मस्तं खमंग दिसतेय भाजी. ओली हळद वापरण्याची आयडिया आवडली.

अशीच भाजी ज्यांना बेसनाची आलर्जी आहे किंवा पचत नाही त्यांच्यासाठी मी मुगाचे पीठ वापरुन करते. अर्थात बेसन टाकून जेव्हडी चवदार लागते तेव्हडी नाही लागत पण एक बेसनाला पर्याय म्हणून मुगाचे पीठ ठीक आहे.