आपली स्वप्न आपल्याला रेकॉर्ड करता आली तर??

Submitted by किश्या on 15 October, 2014 - 02:16

आज सकाळी एक मला स्वप्न पडलं, ते अस की मी ऑफीस मधे नाईट शिफ्ट ला आहे माझ्या काही कलीग्स सोबत. पहाटे काम संपल सो मी पहाटे ४ वाजता घरी आलो आणि थोड्याच वेळात पोलीस दारत हजर. मी दरवाजा उघडला आणि पहातो तर काय ते मला अटक करुन घेऊन जात आहेत. का तर म्हणे माझ्या एका कलीग चा खुन झाला आहे ऑफीस मधे आणि पोलीसांना संशय आहे की मी तो खुन केला आहे म्हणुन. :हाहा:.. मी गयावया करुन सांगत आहे कि मी नाही खुन केला दुसर्‍याने खुन केला आहे. पोलीस ऐकायला तयारच नाहीत.. मी रडतोय......

तेवढ्यात बायकोने मला जाग केल आणि विचारलं काय झाल?? मी तिला सगळ सांगितल आणि आम्ही दोघही हसायला लागलो...

मग मनामधे विचार आला कि आपली स्वप्न खरच आपल्याला रेकॉर्ड करा आली तर??? आपल्या किती भावना, आपण जागे नसतान जे जग बघतो ते परत बघायला किती मजा येईल.... फक्त एकच अडचण आहे बायका आपल्या नवर्‍याला दररोज कंपल्सरी मशीन लावायला लावतील....आणि बघतील कि कोण कोण स्वप्नात येतात त्या Wink

हा धागा ह्यासाठी काढावसा वाटला की... अजुन तरी अशी काही मशीन अस्तीत्वात नाहीये, आणि आपन प्रत्येकजण रोज काही ना काही स्वप्न पहात असतो, काही लक्षात राहतात काही विसरतात..... काही छान, वाईट क्षण आपन त्यात जगतो.... आपल्याला परत त्यांना उजाळा देता आला तर???

बघा काही आठवलं तर शेअर करा.. मला पण आवडेल वाचायला तुमच ते जगं... आणि आवडेल तुमची काही दुखःद स्वप्नातल दुख: शेयर करायला......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किश्या, बेडजवळ एक डायरी आणि पेन्सिल ठेवा. सकाळी उठल्या उठल्या स्वप्नांबद्दल त्यात लिहित रहा.
काही काही स्वप्ने आपल्याला नंतर प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात.. अर्थात तूमच्याबाबतीत हे स्वप्न कधीही खरे होणार नाही अशी खात्री आहे.

दिनेश जी हे असं खरच होत का?? Uhoh मी खरच जरा ह्याबद्दल साशंक आहे..

कारण मला एक स्वप्न सतत पडत असतं, कि मी एक कुठल्या तरी डोंगरावर आहे एकटाच आणि अचानक मी एका धबधब्यात पडतो. आणि वर येता येत नाही म्हणुन मी फक्त त्यात बुडतच जातो... आणि जाग येते..
तो डोंगर, तो धबधबा अजुन तरी मला दिसला नाही कुठेच....

अगदी तसेच नाही पण कधीतरी आयूष्यात तो धबधबा प्रत्यक्ष दिसेल आणि त्यावेळी वाटेल, हा आपण कधीतरी बघितला आहे आधी.

या विषयावर बरीच पुस्तके आहेत. डॉ. बाळ फोंडके यांचे मराठीतही एक पुस्तक आहे. अर्थात ते शास्त्रीय अभ्यासावर आधारीत आहे.
स्वप्नांचे अर्थ सांगणारी एक शाखा, ज्योतिषाशी देखील निगडीत आहे.

अगदी तसेच नाही पण कधीतरी आयूष्यात तो धबधबा प्रत्यक्ष दिसेल आणि त्यावेळी वाटेल, हा आपण कधीतरी बघितला आहे आधी.>>>
अगदी अगदी... एखाद्या ठिकानी गेल्यावर अस वाटंत राहतं Happy तुमचा एखादा अनुभव असेल तर शेअर कराना वाचायला आवडेल

अगदी खुपदा झालेय असे.. पण त्यात काही काळ वेळाचे तंत्र नाही. मी लिहून ठेवत नाही पण लक्षात असतेच.
माझ्या भटकंतीत अशा अनेक जागा दिसतात ज्या मी आधी बघितलेल्या आहेत असे वाटतात. पुर्वी नवल वाटायचे याचे, आता नाही वाटत. पण या जागा म्हणजे केवळ जागाच. प्रसंगाच्या बाबतीत असे क्वचितच घडलेय.

कल्पना छान आहे,
पण मला विचाराल तर स्वप्ने रेकॉर्ड करता येवो न येवो, पण ती जाग आल्यावर देखील परत चादर तोंडावर ओढून कंटिन्यू करता यायला हवीत. खास करून गुलाबी स्वप्ने Wink

दिनेशदा, आपण डेजावू (Dejavu) बद्दल बोलत आहात का?

अगदी खुपदा झालेय असे.. पण त्यात काही काळ वेळाचे तंत्र नाही. मी लिहून ठेवत नाही पण लक्षात असतेच.
माझ्या भटकंतीत अशा अनेक जागा दिसतात ज्या मी आधी बघितलेल्या आहेत असे वाटतात. पुर्वी नवल वाटायचे याचे, आता नाही वाटत. पण या जागा म्हणजे केवळ जागाच. प्रसंगाच्या बाबतीत असे क्वचितच घडलेय.>> हे माझ्या बाबतीत बरेचदा घडते. आताशा सवय झालिये

मला नेहमीच एक स्वप्न पडते म्हणजे मी पुलावरुन चाललेली असते खुप पुर आलाय नदी दुथडी भरुन वाहतेय खुप मोठ्या लाटा वाहतायेत जोरजोरात...म्हणजे अगदी आता थोड्याच वेळात पुलावरुन पाणि जाईल आणि मी जीव मुठीत धरुन पुल पार करतेय्...खुप खुप खुप भिती वाटते हे स्वप्नात अनुभवताना
ह्या स्वप्नाचे एक विशेष आहे पाणी आणि पुल नेहमी वेगवेगळे असतात,कधी कधी धरणाचा बंधारा पण असतो तो पण दोन्ही बाजुने काठोकाठ भरलेला...वेळ संध्याकाळची असते संधीप्रकाश ते पाण्याचे भयानक रुप मला न पाहता पार करायचे असते पण पाणी दिसतेच दिसते.आता लेटेस्ट मागच्या वीकमध्ये पडलेल्या स्वप्नात मात्र पाणी खुप जोरात होते आणी गढुळ होते...
कोणी सांगु शकेल का याचा अर्थ...

सिमा मी कुठेतरी वाचयल की खुप पाणी स्वप्नात दिसल तर आपली प्रगती होनार असते म्हणे....
माहीती नाही किती खरं ते

सिमा मी कुठेतरी वाचयल की खुप पाणी स्वप्नात दिसल तर आपली प्रगती होनार असते म्हणे....
माहीती नाही किती खरं ते
>>
आता ७-८ वर्षापासुन हे स्वप्न दिसतय्...मागच्या वर्षी लग्न झाले आता लग्न हे प्रगतीच्या व्याख्येत बसत असेल तर खर आहे बाबा...:हाहा:

मला तर बर्‍याचदा खूप मजेशीर स्वप्न पडतात.....

एका स्वप्नात तर मी Activa चालवत होते. वळणावर अचानक कोणीतरी पुढे कडमडलं आणि मी ब्रेक मारणार तेव्हड्यात लक्षात आलं की स्कूटरच हॅंडल तर मी बॅगेत विसरले. मग पटकन गळ्यात लटकवलेल्या शबनम मधून हॅंडल काढलं आणि ब्रेक मारला... Lol Lol

परवा नवरा म्हणाला मी त्याला रात्री 2:30 ला उठवून सांगितलं की दूध उतू जातयं.. ..जावून बंद कर..त्याने मला उठवायचा प्रयत्न केला तर मी त्याला म्हंटलं की इतक्या रात्री कशाला उठवतो आहेस?? झोपू दे की... (ह्याला म्हणतात चो उ बों :D) अर्थात मला काहीही आठवत नाहीये...

स्वप्नांवर ऑलरेडी दोन धागे आहेत.

नेहमी पडणारी स्वप्ने : http://www.maayboli.com/node/44262

आणि

स्वप्न काय सांगतात- भविष्य, भूतकाळ की गतजन्म? : http://www.maayboli.com/node/50886

स्नु Rofl
लै भारी....

मला एकदा रुम पार्टनर ने सांगीतल की मि रात्री १ वाजता उठुन सांगीतल की तिथे ग्लास ठेवलाय तो निट ठेव वितळुन जाईल.... का ते मलाही आठवत नाही Lol

बहुतांशी स्वप्ने ही सुचक असतात. मला लहानपणी (अगदी सातवी-आठवीत येइपर्यंत) कायम एक स्वप्न पडायचे. एक म्हातारा स्वप्नात दिसायचा आणि तो खिश्यातून एक कागदाची पुडी काढून माझ्यासमोर ठेवायचा. तीमध्ये मातीचे काही कण ठेवलेले असायचे. पण गंमत म्हणजे खुप प्रयत्न करुनही त्यातला एकही कण मला साधा उचलता सुद्धा येत नसे....

कालांतराने ते स्वप्न पडायचे बंद झाले. पण आता खुपदा एक गोष्ट जाणवते की कधी कल्पनाही केल्या नव्हत्या अश्या घटना जीवनात सहज घडताहेत. उदा. परदेशप्रवास, स्वतःचे घर, चारचाकी. पण ठरवुनही अगदी सहजसाध्य असलेली स्केचींगची आवड पुन्हा जोपासणे मात्र कठीण जाते. तेव्हा आर्थिक समस्यांंमुळे तबला शिकायचा अर्धवटच राहून गेला होता. आता सहज साध्य असुनही त्यासाठी वेळ काढणे जमत नाहीये Sad

त्यावेळी स्वप्नात उचलता न आलेले ते मातीचे सुक्ष्म कण आता न जमणार्‍या या छोट्या-छोट्या गोष्टींची सुचना तर देत नसतील?

स्नु पहील स्वप्न कम्माल आहे Rofl अगदी..

माझा नवरा मला नेहमी चिडवत असतो की तु झोपेत हसत असतेस म्हणुन... मला अज्जिबात विश्वास नाही या गोष्टीवर.. आणि त्याच नेहमीच वाक्य आहे यावर "पुढच्या वेळी तुला रेकॉर्ड करुन ऐकवतो" ते आजतागायत काही ऐकायला मिळालेल नाही..

बाकी, मला स्वप्न लक्षात नाही रहात

सीमा स्वप्नात स्वच्छ पाणी दिसल तर ते आर्थिक भरभराटीचे संकेत असतात.. अस ऐकलय.. गढुळ पाण्याबद्दल काही माहीत नाही..

सीमा स्वप्नात स्वच्छ पाणी दिसल तर ते आर्थिक भरभराटीचे संकेत असतात.. अस ऐकलय.. गढुळ पाण्याबद्दल काही माहीत नाही..
>>
वॉव्....म्हणजे तुमची पार्टी कन्फर्म.....

दुर्देवाने मला स्वप्नात मृत्यूची सूचना मिळते. म्हणजे कुणीतरी गेलेलं दिसतं (त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं असं म्हणतात.) आणि ३ आठवड्याच्या आत ओळखीचं, नात्यातलं असं कुणी ना कुणी गेलेलं असतं. आपण नंतर म्हणतो ना, मला ही ही व्यक्ती गेलेली दिसली आणि आता हे ऐकू आलं तसं मी म्हणायचे पण कुणी फारसं गंभीरपणे घेत नव्हतं. मी तसं स्वप्न पडलं की घरात सांगते आता आणि खरंच ३ आठवड्याच्या आत काहीतरी वाईट बातमी येतेच हे प्रत्येकाला पटलंय. ते ३ आठवडे खूप ताणाचे जातात.

दुर्दैवाने मला स्वप्नात मृत्यूची सूचना मिळते>>>> माझ्याही बाबतीत असावं असं बहुतेक. वाईट अनुभव आहेत!

मला तर कधी कधी स्वप्ने अगदी फालतु प्रसंगाची पडतात पण ते प्रसंग पुढे जसेच्या तसे घडतात. एखादा प्रसंग असा घडतो, की समोरचा माणुस काय बोलणार हे आधीच माहित असतं स्वप्नामुळे. अजुनही अश्या प्रसंगी दचकायला होतं

मी लहात असताना पप्पा गेले, त्यांनतर थोड्या दिवसात एक स्वप्न पडलं. मी आणि मम्मी अंधारातुन चालत होतो, मी विचार करत होतो कि आता प्रकाश कसा पाडायचा, या अंधारात पुढे कसं जायचं? तेव्हढ्यात मागुन कोणीतरी टॉर्च घेऊन आलं. बघितलं तर समर्थ रामदास हातात टॉर्च घेऊन. अजुनही हे स्वप्न आठवलं की, का कुणास ठाऊक, मनाला धीर येतो!

अजुन एक अतिविनोदी स्वप्न पडलेलं म्हणजे मी अशा प्रदेशात गेलोय जिथे फक्त म्हशीच म्हशी! बाकी कुठलाच प्राणी नाही. आणि मी एकटाच माणुस तिथे, आणि सगळ्या म्हशी माझ्याकडे टवकारुन बघताहेत, "कोन बाई ह्यो नवा पाव्हना" टाईप! Proud

कुलु / मोहना तूम्ही उगाच या गोष्टीचा ताण घेताहात. एकदोनवेळा घडले असेलही पण तसे योगायोग आपल्या आयूष्यात नेहमीच घडत असतत.

कुलु.. आफ्रिकेला येणार काय ?

अफ्रिकेतल्या बाया आणि म्हशी ह्यांची तुलना का बर?? बिल्कुल नाही आवडली...
सॉरी पण तुम्ही च त्यांच्या रंगा वर आणि आकारावर जात आहात

सॉरी माधुरी, चुकलेच. आता संपादीत केले आहे. मी स्वतः अनेक वर्षे आफ्रिकेत रहात आहे. त्यामूळे तसे लिहायला नको होते.

Pages