आपली स्वप्न आपल्याला रेकॉर्ड करता आली तर??

Submitted by किश्या on 15 October, 2014 - 02:16

आज सकाळी एक मला स्वप्न पडलं, ते अस की मी ऑफीस मधे नाईट शिफ्ट ला आहे माझ्या काही कलीग्स सोबत. पहाटे काम संपल सो मी पहाटे ४ वाजता घरी आलो आणि थोड्याच वेळात पोलीस दारत हजर. मी दरवाजा उघडला आणि पहातो तर काय ते मला अटक करुन घेऊन जात आहेत. का तर म्हणे माझ्या एका कलीग चा खुन झाला आहे ऑफीस मधे आणि पोलीसांना संशय आहे की मी तो खुन केला आहे म्हणुन. :हाहा:.. मी गयावया करुन सांगत आहे कि मी नाही खुन केला दुसर्‍याने खुन केला आहे. पोलीस ऐकायला तयारच नाहीत.. मी रडतोय......

तेवढ्यात बायकोने मला जाग केल आणि विचारलं काय झाल?? मी तिला सगळ सांगितल आणि आम्ही दोघही हसायला लागलो...

मग मनामधे विचार आला कि आपली स्वप्न खरच आपल्याला रेकॉर्ड करा आली तर??? आपल्या किती भावना, आपण जागे नसतान जे जग बघतो ते परत बघायला किती मजा येईल.... फक्त एकच अडचण आहे बायका आपल्या नवर्‍याला दररोज कंपल्सरी मशीन लावायला लावतील....आणि बघतील कि कोण कोण स्वप्नात येतात त्या Wink

हा धागा ह्यासाठी काढावसा वाटला की... अजुन तरी अशी काही मशीन अस्तीत्वात नाहीये, आणि आपन प्रत्येकजण रोज काही ना काही स्वप्न पहात असतो, काही लक्षात राहतात काही विसरतात..... काही छान, वाईट क्षण आपन त्यात जगतो.... आपल्याला परत त्यांना उजाळा देता आला तर???

बघा काही आठवलं तर शेअर करा.. मला पण आवडेल वाचायला तुमच ते जगं... आणि आवडेल तुमची काही दुखःद स्वप्नातल दुख: शेयर करायला......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यावर या धाग्याचा परिणाम झालेला दिसतोय ...

काल रात्री मला स्वप्न पडले, ज्यात माझ्या कॉलेज आणि ऑफिसमधील मिक्स मुले मुली आल्या होत्या. आम्ही सारे एका मैदानावर नवरात्रीचे गरबा आणि डिस्को दांडिया खेळत होतो. मी नाचात फारच तुफान फॉर्मात होतो आणि मुलीही मला खूप भाव देत होत्या. नंतर अचानक मला समजले की हे स्वप्न चालू आहे म्हणून मी मोबाईल काढून त्याचा विडिओ घेऊ लागलो, जेणेकरून जाग आल्यावर देखील हे माझ्या रेकॉर्डला राहील. यातच कुठेतरी ते स्वप्न संपले. पण उठल्यावर मी खरोखरच माझा मोबाईल काढून त्यात विडिओ रेकॉर्डिंग सेव्ह झालेय का चेक करू लागलो. अर्थात त्यात काही दिसले नाहीच. पण हे पटायला किंचित वेळ गेला, पचायलाही तितकेच जड गेले. Sad

जनरली मला झोपेतील स्वप्न फार काळ लक्षात राहात नाहीत. जे चांगलच आहे वाईट स्वप्नांसाठी .'जे मनी वसे ते स्वप्नी दिसे' या म्हणी प्रमाणेच बहुतेक वेळा स्वप्न पड्तात उदा. परीक्षेच्या कळातील घाबरवणारी (जी सगळ्यांनाच पडतात Happy ), पेन न सापडणे ,शाई संपणे ,काहीच न लिहीता येणे ,चुकीचा किंवा दुसराच पेपर असणे.भुताचा चित्रपट पाहुन त्याविषयीची मजेदार स्वप्न पड्णे.माझ्या भावाला तर वल्ड्कप च्यावेळेस हमखास क्रीकेटची स्वप्न पड्तात .ज्यांना गुढ स्वप्न पडतात त्याच्याविषयी मला कायम कुतुहल असते.पण असं काही नसत यावर विश्वास असतो.

आपली स्वप्न खरच आपल्याला रेकॉर्ड करा आली तर??? >> तो डेटा आणखी कुठे ठेवणार.परत तो चोरीला चुकीच्या हातात जाण्याची भिती. Happy नकोच ते .स्वतः पुरतच बरं .आणि 'जे मनी वसे ते स्वप्नी दिसे' हे इथे कोणालाही उद्देशुन लिहिले नाही. नाहीतर तेच समजवण्यात लिखाणाचा वेळ जातो.तरीही ज्यांना लाईट्ली घ्यायचे आहे त्यांनी घ्या. Happy .

कुणाला दिपिका सारखी (चे एक्स्प्रेस) झोपेत स्वप्न पड्तात का?

तो डेटा आणखी कुठे ठेवणार.परत तो चोरीला चुकीच्या हातात जाण्याची भिती.>>> हा हा हा.. चांगला मुद्दा आहे. देवाऽऽ किती भांडी फुटतील, आणि किती जणांचे ब्रेकअप होतील असे झाले तर ...

Pages