हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

Submitted by अविकुमार on 6 October, 2014 - 06:45

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही. कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!

तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.

नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.

फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो. जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.

वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.

तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षणाबद्दल आभार..

चेतन भगतची पंखा मीही आहेच. पण "पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी." हा प्रकार डोक्यात जातो.

चेतन भगतचे कधी ना कधी तरी हे होणारच होते.

एक गमतीशीर निरीक्षण. चेतनभाऊ आपल्या कादंबर्यांच्या नावामध्ये एखादा 'अंक' असेल्च याची खबरदारी घेताना दिसतात. 5 points someone, 3 mistakes of my life, 2 states, 1/2 (half) girlfriend इ. Happy

चेतन भगत ? वाचू आनंदे? सीरीअसली?

रटाळ कथावस्तू, भिकार इंग्रजी. पण चलनेवाली आयटम है. साजिद खानचा सिनेमा येइल.

5 points someone, 3 mistakes of my life, 2 states, 1/2 (half) girlfriend >>
या उतरत्या क्रमाने लिहित गेला तर पुढचा प्रवास शून्याकडे होतोय, नाही का? Wink

>>>> एक गमतीशीर निरीक्षण. चेतनभाऊ आपल्या कादंबर्यांच्या नावामध्ये एखादा 'अंक' असेल्च याची खबरदारी घेताना दिसतात. 5 points someone, 3 mistakes of my life, 2 states, 1/2 (half) girlfriend इ. स्मित >>>>

शेवटी हाडाचे ब्यान्कर आहेत ते. आकड्यांशिवाय काम चालत नसावे. Happy

टू स्टेट्स सारखा महाभिक्कार चित्रपट ज्याच्या कथेवर आहे त्या लेखकाचे इतर एखादे पुस्तक वाचणे म्हणजे ......

असो

टु स्टेटस, फाईव्ह पॉईंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर वाचली आहेत आणि प्रत्येकातले काही ना काही प्रचंड आवडले आहे. टु स्टेटस सुंदर आहे. वाचताना नायक नायिकेची प्रेम आणि आइ बाप दोघांची मनं सांभाळण्याची तडफड दिसते. लग्न पूर्ण होतं तेव्हा पुस्तक वाचणारे आपण सुटकेचा निश्वास टाकतो खरे.

लव्ह २०२० (असेच काहीतरी नाव) पण वाचली होती पण शेवट आनंदी न केल्याने जरा चिडचीड झाली.

वन नाईट वरचा चित्रपट टुकार असला तरी कादंबरी चांगली आहे. बक्षी चे पात्र तर क्षणोक्षणी रिलेट करता येते.

फाइव्ह पॉइंट मधे रायन रुढार्थाने जास्त यशस्वी न झालेला पाहून जरा आसुरी आनंद झाला कॉलेजातला खूप रुबाब झाडणारा मुलगा घसरुन पडला की होतो तसा .

>>>टु स्टेटस सुंदर आहे. वाचताना नायक नायिकेची प्रेम आणि आइ बाप दोघांची मनं सांभाळण्याची तडफड दिसते. <<<

हे केव्हा होते?

होस्टेलमध्ये दोघे 'अनवधानाने' एकमेकांच्या पूर्ण जवळ येतात तेव्हा?

त्यांचं जवळ येणं हा मला पूर्ण कथेचा एक भाग वाटला. त्याला खूप जास्त वावा किंवा शीशी म्हणावे इतका महत्वाचा तो भाग वाटला नाही.
मुख्य कथा क्रिश चेन्नईला गेल्यावर घडणे सुरु होते.

शेवटी हाडाचे ब्यान्कर आहेत ते. आकड्यांशिवाय काम चालत नसावे.>>>>>त्याने स्वत:च असे सांगितलेय एफ एम वर परवा!

रेवोलुशन २०२०, वाचली होती, तद्दन फिल्मी वाटली. पण २ स्टेट्स खूपच आवडली होती, कथेत फारसं नाविन्य नसूनही, ती फुलवली महान होती. Happy

ज्यांना चेतन भगत वाचू आंनदेत नको वाटतात, ते ईथं फिरकतातच का? Happy म्हणजे काय वाचावं? हे कूणी ठरवावं?

चेतन भगत यांचे काही अजून पर्यंत वाचले नाही, मात्र हॅरी पॉटरच्या जादूई परीकथांना डोक्यावर उचलून धरणारे तमाम चेतन भगतच्या पुस्तकांत भरभक्कम कथा आणि साहित्यदर्जा शोधायला जातात असा अनुभव बरेचदा घेतलाय. Happy

हॅरी पॉटरच्या जादूई परीकथांना डोक्यावर >>>>> हॅरी पॉटर मला आवडला बुवा.अर्थात दोन्ही अनुवाद वाचले. ट्रेनमधील एक ओळखीची बाई तन्मयतेने हॅ पॉ.वाचताना पाहिल्यावर मी उत्सुकतेने वाचायला घेतलं.२ दिवसांत वाचून झालंही.
चेतन भगतचं २ स्टेट्स वाचलं.aashu29 नी म्हटल्याप्रमाणे कथा फुलवली छान होती.

ऋन्मेऽऽष | 7 October, 2014 - 00:26 नवीन
चेतन भगत यांचे काही अजून पर्यंत वाचले नाही, मात्र हॅरी पॉटरच्या जादूई परीकथांना डोक्यावर उचलून धरणारे

>>
रिशी पकुर, चेतन भगत बद्दल मी लिहित नाही कारण एकच पुस्तक वाचले आहे पण हॅरी पॉटर ही
फक्त परीकथा नाही हेच त्याचे वैशिष्ठ्य आहे.

मात्र हॅरी पॉटरच्या जादूई परीकथांना डोक्यावर उचलून धरणारे तमाम चेतन भगतच्या पुस्तकांत भरभक्कम कथा आणि साहित्यदर्जा शोधायला जातात असा अनुभव बरेचदा घेतलाय.\>>> नो कमेम्ट्स ऑन चेतन भगत, पण हॅरी पॉटर "परीकथा?????????????" इसकू हॅरी पॉटर समझाईच नही. मायबोलीवर हॅरी पॉटरवर एक बीबी आहे. तो वाचून बघा.

<<नो कमेम्ट्स ऑन चेतन भगत, पण हॅरी पॉटर "परीकथा?????????????" इसकू हॅरी पॉटर समझाईच नही. मायबोलीवर हॅरी पॉटरवर एक बीबी आहे. तो वाचून बघा.>> +१

हॅरी पॉटर (रोलिंग) आणि चेतन भगत एका वाक्यात म्हणजे दम बिर्याणी आणि फोडणीचा भात एका ताटात.

ईथे बोललात ठीक आहे दुसरीकडे कुठे असे काही बोलू नका Wink
ईथल्या बर्‍याच लोकांना मायबोली मगल्सवर (मायबोली अज्ञानी) क्रुशिएटस कर्स वापरायची य दिवसांपासून खुमखुमी आहे, तुमचा नाहक बळी जायचा.

ऋन्मेऽऽष, हॅरी पॉटर सीरीजची पारायणे केली आहेत. अजूनही करेन. चेतन भगतच्या एकाही पुस्तकाला बोटही लावलेले नाही. लायब्ररीत दिसलं तरी दुसर्‍या पुस्तकाने ढकलून बाजूला करतो.

हॅरी पॉटर मी वाचले नाही. पण चित्रपटाचे दोन भाग पाहिलेत.

पहिला भाग लहानपणी आणि हिंदी अनुवादीत पाहिला. त्या वयात मौज वाटली फार. प्लॅटफॉर्म नंबर पावणेपाच की पौणे दस, झाडूचे विमान, जादूचे प्रयोग, चित्रविचित्र कॅरेक्टर हे परीकथा नव्हते तर मग शेवटच्या भागात हे स्वप्न म्हणून दाखवलेय का? तरी पण फॅन्टसी ती फॅन्टसीच ना ..

दुसरा भाग आला तेव्हा मी मोठा झालो असल्याने यात मौज वाटायचे बंद झाले. त्यामुळे पुढचे काही भाग पाहिलेच नाहीत.

त्यानंतर कधीतरी ईंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला पेपरच्या आदल्या रात्री आम्हा दोन मित्रांना जाम टेंशन आल्याने त्याच्या आयडियेनुसार कुठलासा एक भाग पाहिला होता. मित्र म्हणाला, त्यातील हिरो आता मोठा झालाय आणि हिरोईनी सुद्धा सही आहेत. झाले, फसलो. बघतो तर तेच ते पुन्हा. जादूचे प्रयोग. हिरोईनी दिसायला छान होत्या, नो डाऊट, पण त्या वातावरणात त्या चिमुरड्याच वाटल्या.

असो, लिहायला बरेच आहे पण सध्या वेळ कमी आहे.

जर हे हॅरी पॉटर चित्रपट पुस्तकावरूनच असतील तर माफ करा त्या परीकथाच आहेत. Happy

तळटीप - मी लेखनशैलीला काही बोलत नसून कथेला परीकथा म्हणत आहे हे ध्यानात घ्या.

मला स्वतःला "टू स्टेट्स" कादंबरी आवडली होती पण चित्रपटाने बट्ट्याबोळ केला.
"वन नाईट अ‍ॅट कॉल सेंटर" चांगली असेल एकवेळ पण हॅलो हा मुव्ही भंगारात सुद्धा टाकायच्या पात्रतेचा नाही.
"थ्री मिस्टेक्स" खुप आवडली होती पण कायपोचे एवढा भावला नाही.
"फाईव्ह पॉईंट समवन" मस्त होती. केवळ आमिरचा टच मिळाला म्हणून थ्री इडिय्ट्स फुलला.. आवडला.

तस्मात.. नॉव्हेल चांगले असते. चित्रपट करतांना काहीतरी गंडते.

हेच बहुतेक हॅरी पॉटर आणि दुनियादारीच्या बाबतीतही घडले आहे असे त्या त्या कादंबर्‍यांच्या फॅन्सकडून ऐकले आहे. मी दोन्ही कादंबर्‍या वाचल्या नाहीत. डायरेक्ट चित्रपट पाहिले आहेत.

जर हे हॅरी पॉटर चित्रपट पुस्तकावरूनच असतील तर माफ करा त्या परीकथाच आहेत >>> हे प्रभू, याला माफ कर. हा काय म्हणतोय हे त्याला कळत नाहीये. Happy

Pages