हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

Submitted by अविकुमार on 6 October, 2014 - 06:45

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही. कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!

तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.

नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.

फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो. जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.

वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.

तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠन्मेष
खामोश.
हे देवा यांना माफ कर, यांना स्वतःलाच कळत नाही हे हॅरी पॉटर बद्दल काय बोलताहेत ते. Proud
बाकी मी चेतन भगतचे एकही पुस्तक वाचलेले नाही. तेव्हा त्याबद्दल नो कमेंट्स.

ऋन्मेऽऽष, हॅरी पॉटर `वाचलेल्यां'चं सिनेमामें वो बात नहीं याबद्दल एकमत असेल. लेखनात आलेलं सगळं सिनेमात येणं शक्यही नाही.

जर तुमच्याकडे फक्त आउटगोइंग चालू अशी परिस्थिती नसेल तर या पानावरची किमान, रैना यांची पोस्ट वाचून पाहा.
नाही वाचलीत किंवा वाचूनही विचार करावासा वाटला नाही तरी हरकत नाही.

जर हे हॅरी पॉटर चित्रपट पुस्तकावरूनच असतील तर माफ करा त्या परीकथाच आहेत >>> हे प्रभू, याला माफ कर. हा काय म्हणतोय हे त्याला कळत नाहीये>> +१०००० फारच विनोदी विधान.

आशू २९ मी टू स्टेट्स वर सिनेमा आला आहे त्याचे परीक्षण लिहीले आहे ते जरूर वाचा. इथेच आहे.
आणि एक इंग्रजी भाषा प्रेमी व लेखक म्हणून मला चेतन भगतने भाषेची जी वाट लावली आहे त्याचे दु:ख होते व इतक्या सुमार दर्जाच्या लेखनाला इतकी प्रसिद्धी मिळते त्याचे ही.

ऋन्मेऽऽष, तुमच इतक्यात खूप काही वाचल. चांगल लिहता तुम्ही पण प्लीज हॅरी पॉटर ला परीकथा म्हणू नका. लेखनशैली काय आणि कथा काय. आधी वाचा.
आणि हो,

हॅरी पॉटर कोणी हिरोईनी सही आहेत म्हणून बघायला जात असेल असे वाचून मला खरच धक्का बसला

चेतन ची इंग्लिश भाषा मला तरी इतकी वाईट वाटली नाही वाचताना.
त्याच्या व्याकरण किंवा फ्रेजिंग चुकांचे कोणी उदाहरण देईल का? (उगीच आव्हान द्यायचे म्हणून नाही, खरंच काय चुकतेय हे कळायला.)

भरत मयेकर, तुम्ही खालील पोस्ट बद्दल म्हणत आहात का?

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मला काय आवडते (वर झालेलेच मुद्दे पुन्हा लिहीत नाही) तरीपण प्रतिसृष्टी आणि कंटिन्युईटी हे त्यात अग्रक्रमावर.
तसेच
- विनोदबुद्धी, खासमखास इंग्रज विनोद (स्वच्छ पण मस्तं). आपण तर फिदा आहोत बॉ. काही पानं वाचली तरी अजून तितकेच ताजे हसू येते. उदा - कप्तान वुडसबद्दल मॅच हरल्यानंतर- we think he is trying to drown himself in the bathroom किंवा हॅरी कोकलत असतो तेव्हा- oh, its you harry.. we thought we heard your dulcet tones.
- डिटेलिंग. केवळ अफाट डिटेलिंग पीव्हज आणि डॉबी सकट सगळी बारीकसारिक पात्रे, ती भूतं (सर निकोलस), लुनी लव्हगुड, तिच्या वडलांचे क्विबलर, ती रीटास्कीटर.. हॅरी, हर्मायनी, रॉन, व्हॉल्डमॉर्ट आणि सर्व प्रमुख पात्रांबाबत तर बोलायलायच नको.
अगागागागागगा. मी पाया पडायला तयार आहे राऊलिंग काकुंच्या.
- हॅरी/रॉन/हर्मायनीचे वय. एकेका पुस्तकाबरोबर आपलेही वय वाढत जाते. उफ्फ्फ!! त्या त्या वयातील भावमुद्रा काय पकडल्यात रॉलिंगने.
- भाषा- इंग्रजी भाषेच्या प्रेमात न पडल्यास नवल.साधे स्पेल जरी घेतले तरी त्याचे लॅटिन रुटस, किंवा कुठलेशे संदर्भ. सॉर्टिंग हॅटची बदलत जाणारी गाणी. 'हाऊलर', 'रिमेंब्राल'- या शब्दांनाच दाद. शब्दप्रभु !!!!!!!
ब्युटी. ब्युटी !! _/\_
- आणि मोठ्यांमधील सर्व विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो तो मुलांना. ते रॉलिंगने खूप सुरेख दाखवले आहे. गुणाअवगुणांसकट हॅरीचे वडील, डंबलडोर, हेग्रीड, सिरीयस, लुपिन बरीचशी मोठी माणसे त्याच्यापर्यंत पोचतात. आपल्या मित्रमैत्रिणींची बलस्थाने आणि वीकनेस दोन्ही त्याला समजत असते, उमजतही असते आणि vice versa.
उदा- Ron who called her an insufferable know-it-all at least once a week.. वगैरे कित्ती बारीक सारिक तपशील आपोआप येतात. माणुस आकाराला येतो. व्यक्तिरेखा जिवंत करणे याला म्हणतात..
- डंबलडोरचे ते मोठे भाषण आहे ना.. forgive me Harry वाले. कितीही वेळा वाचा. डोळ्यात पाणी येते.
- माझ्या डोळ्यासमोर राऊलिंगबाई येते कधीतरी. छोट्या मुलांची आई. कॅफेमध्ये एका कॉफीवर पोटभरत, वेळ काढणारी, लिहु पाहणारी बाई. आजूबाजूचे सर्व लोक असे हैरान झाले असतील, की अरे हा जादुभरा पंछी आपल्या मध्यात होता, दिसला डोळ्यांना.. आपल्या डोळ्यासमोर इतिहास घडला!! असो. लै झाले.

Truly, Thank you Ms Rowling!!! From the bottom of my heart, for sprinkling a bit of magic in our muggle existence, ordinary as it is ! For years, I laughed and cried with Harry, grew inch by inch with him and his friends. Till I met you, thought that fantasies were 'infradig', that I was too old and cynical to truly appreciate you. But read one... and the rest is history!
Never looked back. (Well I did..to be honest..) Glad to have known you maam. Year's later you are still my 'Sunday meal and afternoon rest'. I thought, that love would not last forever, I was wrong (Apologies Auden for taking a bit of liberty with your line. I will return it. Love you too!) If my mind had a mantelpiece Ms Rowling, you would occupy a big frame ! Now, my little one loves you too, and I think 'all is well with the world' !

(When you are younger you appreciate the content,the plot, the magic and once older you appreciate the style, the craft, the magical existence. Please (Atheist)God, don't let me grow out of HP books !)

काय आवडत नाही.
- स्पेल थोडे अजून हवे होते बॉ. काय त्या साध्यासाध्या स्पेलनी हॅरी कधीकधी प्रतिस्पर्ध्यांना हरवतो. expelliramus चा तर कंटाळ आला सातव्याभागापर्यंत. ऐसा क्या रे !.
- थोड्याश्या, अगदी थोड्याश्या ऑबवियस गोष्टी. म्हणजे ग्रिफिंडोरला नेहमी प्रत्येक वर्षी अगदी शेवटी जास्त पॉईंटस मिळणे वगैरे. आणि शेवटची बॅटल. माझ्या डोळ्यासमोर महाभारत होते. आन हिकडे..
असो. मुलांचे वय पाहता शक्यही नव्हते म्हणा. पण epic होताहोता राहिले की हो असे वाटले खरे.
- रॉन flinched, अम्का flinched, तमका flinched वगैरेचाही कंटाळ यायला लागला नंतर. व्हॉल्डमॉर्टमध्येही थोडेसे रंग भरायचे राहुन गेले का काय असे कधीकधी वाटते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

खूप छान पोस्ट आहे,
माझे विधान मी मागे घेतो.

पण हायफंडू ईंग्लिश नेटाने वाचण्याची हिम्मत नसल्याने माझ्या फायद्याचे नाही हे पॉटर प्रकरण Sad

चेतन ची इंग्लिश भाषा मला तरी इतकी वाईट वाटली नाही वाचताना.

>> +१

उलट समजायला सोपी आहे. सॉर्ट ऑफ इंडियन इंग्लिश.
म्हणजे मीही इंग्रजीत बोलायचे ठरवले तर घरात सुद्धा बोलु शकेन अशी इंग्रजी वाटली मला ती.

मृणाल,
हॅरी पॉटर कोणी हिरोईनी सही आहेत म्हणून बघायला जात असेल असे वाचून मला खरच धक्का बसला
>>>>>

अगदीच असे काही नाही, मला ते चित्रपट बोर व्हायचे म्हणून जायचे नव्हते, तर मित्राने लालूच दाखवत एक खडा टाकला. मग नाईलाजाने मला माझी सो कॉलड फ्लर्ट वगैरे (स्त्रीलंपट नाही हं) इमेज जपायला जावे लागले. Proud

ऋन्मेऽऽष मला तुम्हाला काही म्हणायचे नाही. पण इतकी वर्षात कोणाचा असाही angle असू शकतो हे आज मला कळले म्हणून मी थक्क झाले.
बाकी असो प्रत्येकाची आपली आपली स्वतंत्र मते असतात

मृणाल, तुम्हाला मला जरी म्हणायचे असले तरी इटस परफेक्टली ऑल राईट. त्यात कुठेही वैयक्तिक टिका नव्हती वा आकसाचा रोख भासला नाही Happy

असो..

वर पियू यांची पोस्ट,
<<<<उलट समजायला सोपी आहे. सॉर्ट ऑफ इंडियन इंग्लिश.
म्हणजे मीही इंग्रजीत बोलायचे ठरवले तर घरात सुद्धा बोलु शकेन अशी इंग्रजी वाटली मला ती.>>>

हे मला माझी जीएफ सुद्धा म्हणाली होती. अगदी हेच. आणि तुलाही झेपेल म्हणत वाचण्यासाठी सुचवले होते.

पण हायफंडू ईंग्लिश नेटाने वाचण्याची हिम्मत नसल्याने माझ्या फायद्याचे नाही हे पॉटर प्रकरण>>> हायफंडू ईंग्लिश कसे असेल हो... primary target audience मुलंच आहेत. तुमच्यात पुस्तके वाचण्याचा patience नसेल तर तसं सांगा... विश्वास ठेवा, भाषा मात्र मुळीच अवघड नाहीये. १५-२० पारायणं केलीत आत्तापर्यंत सातही हॅरी पॉटर पुस्तकांची. एकदाच पहील्या पुस्तकाची पहिली ५० पानं वाचून पहा आणि पुस्तकं किती addictive आहेत ते तुमचं तुम्हालाच कळून येईल. Happy

मायबोलीवरच्या बहुसंख्य कथालेखकांपेक्षा/लेखिकांपेक्षा चेतन भगत बरंच बरं लिहितो. उगाच आपल्या कंपुबंधु/भगिनीम्च्या सुमार कथांना वाह वाह करणार्‍यांनी चेतन भगतला जिथे तिथे झोडपताना बघून दांभिकता म्हणजे काय ते कळते अन हसायला येते.
चे.भ. ग्रेट लेखक नाहिये हे मलाही समजतं. इंग्लिशही सुमार बोलीभाषेतत्लं हिंग्लिश आहे, हे ही मान्य. पण "ज्याप्रकारे/ज्या शब्दात" त्याच्या लेखनाला इथे झोडपले जाते त्यावरुन ह्या झोडपणार्‍यांची अभिरुची बर्‍यापैकी उच्च असायला हवी. मग असे माबोकर कथालेखक/लेखिका जेव्हा स्वतः लिहितात तेव्हा त्याच्याइतपत तरी बरं का लिहित नाहीत?

झोडपणे हा शब्द मुद्दाम वापरलाय, नावड व्यक्त करणे वेगळे.

नवीन व वेगळा विचार! छान वाटले.

"आम्हाला क्रिकेट खेळता येत नसले तरी तेंडुलकरबद्दल बोलू नये क्कॅय?"

"आम्हाला अभिनय येत नसला तरी बच्चनवर टीका करू नये क्कॅय?"

Lol

आम्हाला काहीच येत नसले तरी प्रतिसादपटूत्व जमू नये काय? Proud

हॅपॉ आणि चेभ ही तुलना पटण्याजोगी नसली तरी नताशाला अनुमोदन.
नताशा.. आधीही आपण हेच कुठेतरी बोलून झालय असं आठवतय.. Happy

नताशा, नाही पटलं! मी थोडंफार लिहिते आणि मी भरपूर वाचते देखिल! पण लेखक मी आणि वाचक मी ह्या दोन वेगळ्या असतात आणि त्या वेगळ्या ठेवण्यातच शहाणपण आहे. लिहिताना माझ्यातला वाचक जागा झाला तर दोन ओळी सुद्धा लिहू शकणार नाही मी. Because I am a demanding reader! लिहिताना व्यक्त होणं ही माझी मुख्य गरज असते. ते किती वाचनीय आहे हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे वाचकाचा! तसंच वाचताना जर माझ्यातली लेखिका जागी झाली तर ती न्यूनगंडाने मरून जाईल! जे होणं योग्य नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे ना, राजहंसाचे चालणे..

ह्या धाग्यावरच्या माझ्या पोस्ट्स अवांतर वाटत आहेत मला म्हणून चेतन भगत आणि त्याच्या पुस्तकांबद्दल दोन शब्द: मी चे.भ. ची बरीचशी पुस्तकं वाचली आहेत. 5 point someone भयंकर आवडलं होतं कारण त्यावेळच्या आयुष्याशी रिलेट झालं होतं. नंतर one night आजिबात आवडलं नाही, 3 mistakes okay आणि थोडं फिल्मी वाटलं. 2 states was a fun read! आवडलं! Half girlfriend अजून वाचलेलं नाही पण सध्या हिंग्लीश वाचायचा मूड नाही त्यामुळे पुन्हा कधीतरी वाचेन.

>>>वाचताना जर माझ्यातली लेखिका जागी झाली तर ती न्यूनगंडाने मरून जाईल<<<

ज्यावर अनेक पाने लिहिता येतील असे विधान! (एक पूर्ण वेगळा धागा निघू शकेल असे)

(वैयक्तीक मत - हे विधान मान्य होऊ शकत नाही, पण असे एक मत असू शकते हे मान्य आहे)

जिज्ञासा, सर्वप्रथम आपण "चे भ ची पुस्तकं वाचून काही आवडली, काही नाही आवडली" असं प्रांजळपणे कबुल केल्याबद्दल धन्यवाद.
अशा लोकांविषयी माझं काही म्हणणं नाही.

जेव्हा लोक "अगदी भिकार, अति रटाळ इ. इ." असं सगळं सुपरलेटिव्ह वाईट बोलतात, तेव्हा असं वाटतं की असेल बुवा यांची आवड मुराकामी लेव्हलची. अशाही लोकांविषयी माझं काही म्हणणं नाही. अगदी स्वाभाविक आहे ते.

पण जेव्हा लोक "अगदी भिकार, अति रटाळ इ. इ." असं सगळं सुपरलेटिव्ह वाईट बोलतात फक्त चे.भ. विषयी अन इकडे माबोवर बघावे तर अगदी फिल्मी अन पाम्चट कथांना वाहवाह करतात, तेव्हा आश्चर्य वाटतं दांभिकतेचं. हेच लोक स्वतः कथा लिहिताना कसे लिहितात? अगदी ज्या गोष्टींविषयी चे.भ. ची खिल्ली उडवतात, तेच दोष स्वतःच्या लिखाणात नाहियेतना, हे कधी बघतात का? आय डाउट.
अशा लोकांविषयी माझ्या मनात सखेद आश्चर्य आहे.

बरं एवढ्यावरच हे थांबत नाही. "आम्ही नै बुवा चेतन भगत वाचत" असा आव आणायचा अन दुसरीकडे जागोजाग "मला वाचनाची इतकी आवड की भेळेचा कागदही वाच्ते/वाचतो " वगैरे.. . का " आम्ही नै बुवा चे.भ. वाचत" हा सोपा प्रकार आहे, स्वतःला एलिट प्रुव्ह करण्याचा? (काही लोक खरंच तसे एलिट असतील, त्यांच्या विषयी ही माझं काही म्हणणं नाही)

अजुन एक मला कळत नाही की ज्याची खरोखर उच्च अभिरुची (म्हणजे काय ते सध्या जाउ दे) आहे, त्यांची तशी सगळ्याच बाबतीत असायला हवी असा माझा अंदाज. एकीकडे चे.भ. ला वरेमाप शिव्या घालायच्या अन दुसरीकडे बॉलोवुड मसालापट, हिंदी मराठी सिरिअल्स आवडीने पहायचे, हे कसं जमतं? अन जर हे नॉर्मल वाटत असेल तर चे.भ. आवडणार्‍याला मुराकामी आव्डत नसेलच अशी गृहितकं मांडून त्याचं पॅकेज कशाला ठरवायचं?

तर हे सगळं तुझ्या पोस्टला उत्तर म्हणून नाहिये, फक्त जी विसंगती दिसते ते लिहिलंय.

नताशा,

तुम्हाला माझे लेखन अनेकदा आवडत नाही आणि तुम्ही त्यावर अतिशय बोचरी टीका करता हे तुम्हाला, मला आणि इतरांनाही ठाऊक आहे. त्यालाच अनुसरून मी वर दोन प्रतिसाद दिले होते जे तुम्हाला उद्देशून आहेत हेही तुम्हाला आणि इतरांना ठाऊक आहेच.

पण हा आत्ताचा तुमचा जिज्ञासांना उद्देशून लिहिलेला जो प्रतिसाद आहे त्यातील एका मुद्याबाबत मला माझे मत मांडावेसे वाटत आहे.

>>>अजुन एक मला कळत नाही की ज्याची खरोखर उच्च अभिरुची (म्हणजे काय ते सध्या जाउ दे) आहे, त्यांची तशी सगळ्याच बाबतीत असायला हवी असा माझा अंदाज. एकीकडे चे.भ. ला वरेमाप शिव्या घालायच्या अन दुसरीकडे बॉलोवुड मसालापट आवडीने पहायचे, हे कसं जमतं? अन जर हे नॉर्मल वाटत असेल तर चे.भ. आवडणार्‍याला मुराकामी आव्डत नसेलच अशी गृहितकं मांडून त्याचं पॅकेज कशाला ठरवायचं?

तर हे सगळं तुझ्या पोस्टला उत्तर म्हणून नाहिये, फक्त जी विसंगती दिसते ते लिहिलंय.<<<

ह्यावर मी जे म्हणत आहे ते अज्जिबातच कोणत्याही प्रकारे माझ्या वैयक्तीक लेखनाशी निगडीत नाही आहे ह्याची खात्री बाळगावीत.

ही विसंगती नाही. अभिरुची चांगली वा वाईट असणे, वाचक म्हणून व लेखक म्हणून असणे, वाचक व चित्रपटाचा प्रेक्षक म्हणून असणे, वाचक व वाचनावर संकेतस्थळावर प्रतिक्रिया नोंदवणार्‍याची असणे हे सर्व सापेक्ष आहे.

अतिशय गंभीर वाचन करणारा माणूस निव्वळ मजा म्हणून सचिन पिळगावकरचे जुने मराठी विनोदी चित्रपट अगदी थेटरमध्ये जाऊन पाहू शकतो.

वर जिज्ञासांच्या त्याच विधानाबाबत मी ते(च) म्हणनार होतो पण चर्चा भरकटली असती. (ती आता भरकटत नाही आहे कारण तुमचा प्रतिसाद ह्या लेखाकडून चर्चेला अभिरुचीतील अध्याऋत विसंगतीकडे नेत आहे).

वाचक म्हणून मी जे वाचेन (आवडीने व अभिरुचीने) तितक्याच तोलामोलाचे मला चित्रपटाकडूनही हवे'च' (च ला अवतरण आहे) असेल असे नाही. जेथे क्षणाक्षणाला माणसाचा मुड बदलतो, गरजा बदलतात, स्ट्रेस लेव्हल बदलते, प्राधान्ये बदलतात तेथे ह्याला विसंगती म्हणणे ही चूक ठरेल.

राहता राहिला तुमचा बाकीचा प्रतिसाद! तुमचा बाकीचा प्रतिसाद ज्या सांसदीय भाषेत आहे ती व्यक्तीशः माझ्यासाठी (तुमच्याकडून) दुर्मीळ आहे, त्यामुळे तुम्ही असा प्रतिसाद लिहिलात ह्याचे आधी नवलच वाटले. पण ते असो! तुमचा बाकीचा प्रतिसाद वैयक्तीक अपेक्षांमधून अधिक आलेला असून एकुण कलाकृतीच्या आस्वादप्रक्रियेशी त्याचा तितकासा संबंध नाही हे जाणवत आहे.

अतिशय अवांतर - अति भिकार वगैरे विशेषणे ज्यांनी वापरली त्यांच्यात जर चुकूनमाकून तुम्ही मला गणत असाल तर मी टू स्टेट्स ह्या चित्रपटाला महाभिकार म्हणालो आहे. हाच प्रकार दुनियादारीबाबतही घडलेला आहे की मूळ कादंबरीपेक्षा चित्रपट सुमार निघाला. तुम्ही माझ्या प्रतिसादाला उद्देशून काही लिहिलेले नसलेत तर ह्या अवांतराचा प्रश्न उरतच नाही.

बेफि, नेहमीप्रमाणेच तुमचा बहुतांश प्रतिसाद माझ्या डोक्यावरुन गेला.
जे समजले त्यापैकी-
क्षणाक्षणाला माणसाचा मुड बदलतो, गरजा बदलतात, स्ट्रेस लेव्हल बदलते, प्राधान्ये बदलतात >> हेच एखादे पुस्तक आवडण्यामागेही अस्ते ना.. म्हणून तर म्हणतेय मी एखाद्याला समजा चेभ चे पुस्तक भयंकर आवडलं, तर लगेच पॅकेज का काढतात लोक? अन बरं हे जे लोक असतात, ते स्वतः मात्र चेभ ला नावं ठेवत स्वतः त्याहून सुमार दर्ज्याच्या कलाकृतीना मात्र वाहवा करतात. ही विसंगती म्हणतेय मी.

>>>अन बरं हे जे लोक असतात, ते स्वतः मात्र चेभ ला नावं ठेवत स्वतः त्याहून सुमार दर्ज्याच्या कलाकृतीना मात्र वाहवा करतात. ही विसंगती म्हणतेय मी.<<<

ह्या विसंगतीबाबत मी वर दिलेला प्रतिसाद पुन्हा देण्याचे कारण नाही.

>>> हेच एखादे पुस्तक आवडण्यामागेही अस्ते ना.. म्हणून तर म्हणतेय मी एखाद्याला समजा चेभ चे पुस्तक भयंकर आवडलं, तर लगेच पॅकेज का काढतात लोक?<<<

कारण ते पुस्तक आवडल्याची चर्चा संकेतस्थळावर होत आहे आणि येथे चेहरामोहरा नसलेले लोक दुसर्‍याच्या अभिरुचीवर शिंतोडे उडवायला (मायबाप अ‍ॅडमीनच्या कृपेने) मुखत्यार असतात. ही चर्चा त्या माणसाने वन टू वन केली तर आपण त्याचा असा अपमान करणार नाही. हीच चर्चा त्या माणसाने एका सभागृहात एक व्याख्याता म्हणून व्याख्यान स्वरुपात केली आणि आपण श्रोते असलो तर आपण मूकपणे ऐकून निघून येऊ. ज्याला जेव्हा जे शक्य आहे तेव्हा तो ते करतो. हे कदाचित स्वतःला फसवणे असल्यासारखे वाटेल. पण ते स्वतःला फसवणे नसते तर स्वतःला निमिषभर हसवणे असते. कोणत्यातरी क्षणापुरता आपल्या इगोचा विजय झाला ही भावना माणसाला सुख देते. ही भावना माणूस 'फोरम' बदलला की अनुभवू शकत नाही, शकेलच असे नाही.

तेव्हा पॅकेज काढणे ही आंतरजालीय फोरमची कॅरॅक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे असेच गृहीत धरून चालावे लागणार!

ह्या अश्या फोरम्सवर होणारी टीका ही त्यामुळेच सेफली हर्टिंग अदर्स (?) अशी असते.

पण जेव्हा लोक "अगदी भिकार, अति रटाळ इ. इ." असं सगळं सुपरलेटिव्ह वाईट बोलतात फक्त चे.भ. विषयी अन इकडे माबोवर बघावे तर अगदी फिल्मी अन पाम्चट कथांना वाहवाह करतात, तेव्हा आश्चर्य वाटतं दांभिकतेचं. हेच लोक स्वतः कथा लिहिताना कसे लिहितात? अगदी ज्या गोष्टींविषयी चे.भ. ची खिल्ली उडवतात, तेच दोष स्वतःच्या लिखाणात नाहियेतना, हे कधी बघतात का? आय डाउट.>>>>>

@ नताशा - जेंव्हा वाचक पुस्तका बद्दल एखादे मत व्यक्त करतो तेंव्हा त्यात खालील गोष्टींचा अभावित पणे विचार झालेला असतो.

१. त्या पुस्तका/सिनेमा बद्दल प्रसार माध्यमांनी कीती अवडंबर माजवले आहे. चे,भ. च्या पुस्तकाबद्दल इतके अवडंबर माजवले जाते आणि जणु काही ती क्लासिक किंवा गंभीर साहित्य असल्यासारखी. मग वाचक चे,भ. च्या पुस्तकांना त्या क्लासिक साहीत्याशीच तुलना करुन बघणार. मग त्या दृष्टीने चे,भ. जर टुकार वाटला तर चुक काय आहे.
२. माबो वर जे कोणी लिहीतात ते हौशी लोक आहेत, एका कुटुंबातले असतात तसे आहेत. सोसायटीच्या गणपतीत कोणी गाणे सादर केले तर जसे लोक कौतुक करतात तसेच माबो वरचे कौतुक असते. हे कौतुक करताना कोणी बेफींची गजल गालिब च्या गजलेच्या तुलनेत "भिकार" आहे असे म्हणत नाही.
३. बेफी सचिनचे सिनेमा बघतात, मला ते पण महाभिकार वाटतात. माझ्या मते बेफींना पण ते महाभिकार वाटत असतील, पण ते मनोरंजना साठी बघतात. सचिन च्या सिनेमांची तुलना जर हॉलीवुड क्लासिक शी केली तर बेफी सुद्धा सचिन च्या सिनेमांना महा भिकार म्हणतील, पण बघु नये असे होत नाही. आणि बेफी सचिनचे सिनेमा बघतात म्हणजे त्यांना दुसर्‍या कुठल्याच सिनेमांना महाभिकार म्हणता येणार नाही हे चुक आहे.

हे कौतुक करताना कोणी बेफींची गजल गालिब च्या गजलेच्या तुलनेत "भिकार" आहे असे म्हणत नाही. <<<

Lol

ही दोन नांवे एका वाक्यात आल्याचे दुसर्‍यांदाच झाले आजवर! Proud

आधी एकदा मी केले होते तसे!

मी कोण ते समजायला काहीच शतके राहिली
गालीब माझ्यासारखा ना मीर माझ्यासारखा Proud

(अवांतराबद्दल क्षमस्व)

तुमचा प्रतिसाद जवळपास पटलाच!

अजुन एक मला कळत नाही की ज्याची खरोखर उच्च अभिरुची (म्हणजे काय ते सध्या जाउ दे) आहे, त्यांची तशी सगळ्याच बाबतीत असायला हवी असा माझा अंदाज. एकीकडे चे.भ. ला वरेमाप शिव्या घालायच्या अन दुसरीकडे बॉलोवुड मसालापट, हिंदी मराठी सिरिअल्स आवडीने पहायचे, हे कसं जमतं?>>>

@ नताशा - माबोवरची ( किंवा एकुणच ) जी लोक हिंदी मराठी सिरियल्स बघतात त्यातली ९९ टक्के लोक त्या सिरियल्स ना नावे ठेवतात, पण बघतात वेळ घालवण्यासाठी.
त्या सिरियल्स फाल्तू आहे हे माहीती असते तरी बघतात. पण त्या सिरियल्स बघतात म्हणजे त्यांची अभिरुची चांगली नसते असे नाही. मी वर म्हणलो तसे, चेतन भगत एक अभिनवेश घेवुन येतो की मी काहीतरी भारी लिहीतोय असा, मग लोक त्या पुस्तकांची खरी लायकी शोधतात.

उ.दा.
तुमची मैत्रीण जर थोडे फार बरे गात असेल, तर तुम्ही तिचे कौतुक कराल आणि म्हणाल की चांगली गाते. पण तिने स्वताला किशोरी आमोणकर समजुन मोठी जहिरात करुन प्रोग्रॅम केला तर बाकीचे लोक महाभिकार म्हणणारच ना, कारण आता तुलना किशोरीबाईं बरोबर असते.

माझी मायबोलीवरची दोन निष्कर्षे -

१) चेतन भगत / फराह खान - हे मासला आवडतात आणि क्लासला नाही.
२) सई ताम्हाणकर - हि क्लासला आवडते मासला नाही.

वरील विधाना आपल्या सोयीने "सो कॉलड" हे विशेषण वापरावे. Happy

नताशाची पोस्ट पटली.
मला स्वतःला चेतन भगतची कॉल सेंटर आणि टू स्टेट्स आवडली. समवन, रिव्होल्यूशन, थ्री मिस्टेक्स तितकी नाही आवडली. पण वाचून काढलीच.

तो लेखक तुम्हाला आवडणं न आवडणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण चे भ आवडणार्‍यांना judge का केलं जातंय हे नाही कळलं. म्ह्णजे तुम्हाला चे भ आवडतो म्हणून तुम्ही तुच्छ असा का आव आणला जातोय? 'तुला आवडलं का पुस्तक? ओके. मला नाही आवडलं.' इतकं सहज म्हणून विषय संपवा की. किंवा इतका तिटकारा असेल चे भ चा तर त्याचं नाव असलेला धागा उघडूच नका. व्हाय धिस निगेटिव्हिटी?

ऋ, आधी (अजिबात न वाचलेल्या) हॅरी पॉटरला मध्ये आणून तुम्ही बहुतेक स्वतःची करमणूक करून घेतलीत, त्याचा पार्ट टू सताला मध्ये आणून सुरू करणार का? काय राव किती फूटॅज खाता तुम्ही ?

मला चेतन भगतचं फाईव्ह पॉईन्टसमवन, टू स्टेट्स आणि वन्नाईट अ‍ॅट कॉल सेंटर आवडली. थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ अजिबात आवडलं नव्हतं. हाफ गर्लफ्रेण्ड अजून वाचलेले नाही, त्यामुळं नो कमेंट्स!

अजुन एक मला कळत नाही की ज्याची खरोखर उच्च अभिरुची (म्हणजे काय ते सध्या जाउ दे) आहे, त्यांची तशी सगळ्याच बाबतीत असायला हवी असा माझा अंदाज>>> अभिरूची उच्च असणं म्हणजे काय ते मला अद्याप समजलेलंच नाहीय. माझ्यासमोर कुणी मुराकामी, हॅरी पॉटर आणि सिडने शेल्डन वाचायला ठेवला तर मी सर्वात आधी सिडने वाचेन, मग पॉटर आणि सरतेशेवटी मुराकामी. मला सिडने शेल्डन आवडतो म्हणजे मुराकामी नावडलाच पाहिजे किंवा समजलाच नाही पाहिजे असं कुणीतरी मानत असेल तर ते त्याचं त्याला लखलाभ. माझी आवड माझ्यापाशी.

चेतन भगतला शिव्या घालणे हा सध्याचा एक ट्रेण्ड आहे. आणि त्याची चेतन भगतला पूर्णपणे कल्पना आहे. त्याला जितक्या शिव्या बसतात त्याच्या दुपटीनं त्याचें फॅन्स वाढत जातात. इंग्रजी वाचनामध्ये (भारतीय क्ण्टेक्स्ट धरून) त्यानं जे काही गेम चेंजिंग रूल्स आणले आहेत त्याबाबतीत त्याला मानायलाच हवं. त्यावर एक सविस्तर केस स्टडी लिहायचा विचार आहे तेव्हा लिहू. Happy

Pages