हाफ गर्ल्फ्रेंड - चेतन भगत उवाच

Submitted by अविकुमार on 6 October, 2014 - 06:45

नुकतीच १ ऑक्टोबरला चेतन भगतची नवीन इंग्रजी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेंड' प्रसिद्ध झाली. बरेच दिवसांपासून त्याबद्दल ऐकून होतो. या पूर्वी चेतनची five points someone आणि 2 states या कादंबर्‍या वाचल्या होत्या. त्यातली 2 states आवडलीही होती. म्हणूनच 'हाफ गर्ल्फ्रेंड' मोफत घरपोच ऑर्डरही करुन टाकली आणि विशेष म्हणजे २ दिवसांत घरपोच मिळालीही. कालच ५ तासांत वाचून संपलेल्या या पुस्तकाविषयीचे माझे वैयक्तिक मत. वाचून झाल्यावर मनात आलेले विचार लगोलग उतरवल्याने पुस्तकपरिक्षण म्हणने योग्य होणार नाही. समिक्षकाच्या चष्म्यातून विचार मांडणे हे शिवधनुष्य मला पेलवणारे नाही. आपण आपले 'हौशी वाचक'च बरे!

तर सर्वप्रथम कथा. पुस्तकाची कथा ठिकठाक म्हणावी इतपत बरी आहे. पण कित्येक ठिकाणी प्रसंग-मांडणी मनावर पकडच घेत नाही.पुस्तक वाचताना सतत जाणवत राहीलेली गोष्ट म्हणजे पुढे चालून या पुस्तकावरुन बॉलीवूडपट बनवायचाच आहे असे ठरवूनच जणू काही प्रसंग मांडणी केली असावी. त्यामूळे थोडक्यात एखादा प्रसंग मांडून तो फुलवायच्या आधीच 'कट' म्हणायची घाई झालेल्या डायरेक्टरप्रमाणे प्रसंग संपतोही.

नायकाचे पात्र बर्‍याच ठिकाणी निर्बुद्ध आहे की काय असे वाटण्याइतपत अपरिपक्व दाखविले आहे. त्यात कॉलेजातले प्रेम, नायिकेला मिळवण्यासाठी नायकाची धडपड ई. तेच ते प्रसंग 2 states मध्ये उत्तम रितीने फुलवलेले असल्याने इथे गुंडाळल्यासारखे आणि काही वेळेस चक्क कंटाळवाणे वाटतात.

फक्त पुढे काय होणार या उत्सुकतेपोटी आपण वाचत रहातो. जिथे नायक नायिकांचीच पात्रे मनावर पकड घेऊ शकत नाहीत तिथे बाकी पात्रांविषयी काय बोलणार. पुस्तकातला रोमांसही तोचतोचपणा (आधिच्या पुस्तकातील) आल्यामूळे फारसा प्रभावी, उत्कट न वाटता उथळ वाटत रहातो.

तसे पहायला गेले तर काय नाही या 'स्क्रिप्ट' मध्ये. एक गंगाकिनारेवाला गरिब बिहारी गाव का छोरा, शिकण्यासाठी (?) दिल्लीतल्या कालेजात, नायिका एक बिगडे बडे बाप की 'थोडीशी' बिगडी लडकी. प्रेम, विरह, गाव आणि तिथले राजकारण, राजकुमार आणि राणीमाँ, बॉलीवूडछाप धक्का तंत्र, बिछडना आणि मिलना, प्रणय, पाठलाग, परदेशातले सिन्स ई.ई. फक्त ते प्रसंग 'फुलवायला' चेतनभाऊ कमी पडलेत.

वाचणार्‍यांचा उत्साह टिकून रहावा म्हणून इथे मुद्दामच कथेबद्दल जास्त लिहीले नाही.

तर...लोक पुस्तक वाचतील? चेतन भगतचे पंखे नक्कीच वाचतील (मी नाही का वाचले?). आणि इतर लोक कालांतराने सिनेमा पहातीलच की!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला चे भ चे काही शब्द प्रयोग आवडतात.
(My mother gave a mini nod in appreciation of the international nuts. ‘Where’s
our Dolly?’ my mother inquired, claiming the heiress of three gas stations as hers
without hesitation.

‘Here only, Dolly!’ Pammi aunty screamed hard to reach the upper floors of the
hydrocarbon-funded mansion. )
असे बरेच आहेत जिथे मजा वाटते वाचायला.(पण आता शोधून उदाहरणे पेस्टायला कंटाळा आलाय.)

चेभ मलाही आवडत नाही पण तरीही तेवढ्याच आतूरतेने पुढचं लिखाण वाचलं जातं माझ्याकडुन कारण मला त्याची लेखनशैली आवडते. किमान या पुस्तकात काही तरी चांगलं असेल अशा अपेक्षेने मी ते पुस्तक वाचते.
चेभची पुस्तके मला सुंदर पुस्तकं वाचल्यावर मिळणारा सुकुन देत नसली तरी माझी करमणुक नक्कीच करतात.
मूड खराब करत नाहीते.

'उच्च अभिरुची' ही फारच सापेक्ष संज्ञा आहे असं माझं मत. उच्च आणि नीच कोण ठरवतं? 'क्लासेस' आणि 'मासेस' ही विभागणी सहसा कशाच्या आधारावर होते हे मला आजही न उमगलेलं कोडं आहे. चे.भ. वाचतो म्हणजे मी क्लास की मास? आणि हे कोण ठरवणार? आणि त्यानी मला काय फरक पडतो? का पडावा?

चे.भ. वाचतो म्हणजे मी क्लास की मास? आणि हे कोण ठरवणार? आणि त्यानी मला काय फरक पडतो? का पडावा?
>>>>>>>

सहमत आहे,

आणि हो वेका, माझ्या आतापर्यंतच्या इथल्या पोस्टमध्येही हाच मुद्दा होता, फक्त आपली सांगायची स्टाईल वेगळी आहे इतकेच Happy

फाईव्ह पॉईंट समवन फार गाजली म्हणून लायब्ररीतून नंबर लावून आणून आधाशासारखी वाचली.
आणि नंतर पश्चाताप झाला. फारच फिल्मी लिखाण असल्याने युथ ला आवडेल हा अंदाज अचूक ठरला चेभ चा.. त्यामूळे ते पुस्तक चाललं खूप. बाकी पुढे मी त्याचं कोणतंच पुस्तक वाचलं नाही. (शितावरून भाताची परिक्षा केली असेल) पुढची पुस्तकं पण यंग क्राऊड खेचणेबल असेल (असा माझा अंदाज)

पण मला या लेखावरचा अमाचा प्रतिसाद जाम आवडला.. Lol

मलाही तसंच काहिसं म्हणायचं आहे असं धरून चाललं तरी चालेल Wink

बाकी नताशाचे सर्व प्रतिसाद तुलनात्मक आहेत. कोणतंही लिखाण उच्च किंवा भिकार वाटू शकतं पण असू शकत नाही. भिकार आणि उत्तम या दोन्ही प्रतिक्रिया व्यक्तिसापेक्ष आहेत. त्यामूळे लिहिता आलं तरंच एखाद्या लेखकावर टिका करता आली पाहिजे असं काही नाही. त्यामुळे प्रतिसाद पटला नाही.

असो...

अमा पुन्हा एकदा Rofl तुमच्या प्रतिसादाला.

रिशी पकुर, चेतन भगत बद्दल मी लिहित नाही कारण एकच पुस्तक वाचले आहे पण हॅरी पॉटर ही फक्त परीकथा नाही हेच त्याचे वैशिष्ठ्य आहे.>> +100

मात्र हॅरी पॉटरच्या जादूई परीकथांना डोक्यावर उचलून धरणारे तमाम चेतन भगतच्या पुस्तकांत भरभक्कम कथा आणि साहित्यदर्जा शोधायला जातात असा अनुभव बरेचदा घेतलाय.\>>> नो कमेम्ट्स ऑन चेतन भगत, पण हॅरी पॉटर "परीकथा?????????????" इसकू हॅरी पॉटर समझाईच नही. मायबोलीवर हॅरी पॉटरवर एक बीबी आहे. तो वाचून बघा. >> +10000

हॅरी पॉटर (रोलिंग) आणि चेतन भगत एका वाक्यात म्हणजे दम बिर्याणी आणि फोडणीचा भात एका ताटात. ईथे बोललात ठीक आहे दुसरीकडे कुठे असे काही बोलू नका. ईथल्या बर्‍याच लोकांना मायबोली मगल्सवर (मायबोली अज्ञानी) क्रुशिएटस कर्स वापरायची य दिवसांपासून खुमखुमी आहे, तुमचा नाहक बळी जायचा.>>> हाहाहाहा, i agree.. हॅपॉची तुलना नाहीच होऊ शकतं... तो पूर्णपणे वगेळाच मुद्दा आहे हो.. एक वेगळं जग आहे हॅपॉ पंख्यांचं ते... बाकीच्यांना (मगल्स) कसं समजणार????????

नताशा, आईशप्पथ!! खल्लास प्रतिसाद आहे तुझा... एकदम अचूक!

हाफ गर्ल्फ्रेंड भाचीला बक्षीस म्हणून मिळालंय.... ते मी आणवून वाचायच्या तयारीत आहे, म्हणून या बाफवर डोकावले तर ज्या गल्लीत जावेसे वाटत नाही तिथेच ठाण मांडून कैच्याकै वाफा सोडणारे महाभाग नजरेला पडले. मनोरंजन झालं.

नताशा | 9 October, 2014 - 12:10
चे.भ. ग्रेट लेखक नाहिये हे मलाही समजतं. इंग्लिशही सुमार बोलीभाषेतत्लं हिंग्लिश आहे, हे ही मान्य. पण "ज्याप्रकारे/ज्या शब्दात" त्याच्या लेखनाला इथे झोडपले जाते त्यावरुन ह्या झोडपणार्‍यांची अभिरुची बर्‍यापैकी उच्च असायला हवी.
>>
+१
नंदिनी | 9 October, 2014 - 22:41
चेतन भगतला शिव्या घालणे हा सध्याचा एक ट्रेण्ड आहे. आणि त्याची चेतन भगतला पूर्णपणे कल्पना आहे. त्याला जितक्या शिव्या बसतात त्याच्या दुपटीनं त्याचें फॅन्स वाढत जातात.इंग्रजी वाचनामध्ये (भारतीय क्ण्टेक्स्ट धरून) त्यानं जे काही गेम चेंजिंग रूल्स आणले आहेत त्याबाबतीत त्याला मानायलाच हवं.
>>
+१
बेफ़िकीर | 9 October, 2014 - 12:51
हे कदाचित स्वतःला फसवणे असल्यासारखे वाटेल. पण ते स्वतःला फसवणे नसते तर स्वतःला निमिषभर हसवणे असते. कोणत्यातरी क्षणापुरता आपल्या इगोचा विजय झाला ही भावना माणसाला सुख देते. ही भावना माणूस 'फोरम' बदलला की अनुभवू शकत नाही, शकेलच असे नाही.
>>
+१

एकदम उत्तम वाद!. राजकारण किंवा जातीवाचक नसलेला वाद वाचायला मजा येते.
म्हणजे (बरीचशी ट्रेंडने चालणारी) दुनिया दांभिक का तिला दांभिक म्हणणारा गुरुदत्त हा स्वतःच दांभिक चिरंतन वाद आहे!
दोन्ही बाजुचे मुद्दे जेंव्हा अचुक, सडेतोड असतात असे क्वचितच वाटते.

Pages