australia & newzealand मध्ये प्रवास मदत

Submitted by मनीशा on 25 November, 2011 - 21:25

मी जून मध्ये माझ्या परीवाराबरोबर australia & newzealand मध्ये फिरायला येण्याचा विचार करत आहे. मी भारतातुन package tour घेतली नसुन येण्याजाण्याची सोय स्वत करत असल्याने तिथे फिरण्याकरता मला मदत हवी आहे. मी अशी tour शोधत आहे कि जी मला दोन्ही देश (hotel, sightseeing, indian veg food, travel from australia to Nz ) सोय करेल.अशी local tour कोणाला माहित आहे का? काही उपाय सुचवता येइल का? आम्हि २+२ असे येत असुन शाकाहारी आहोत. मला असे समजले कि खाण्याचे सामान आणु शकत नाहि. प्लीज मदत करा.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hi mee Neeta, tumhi june madhe yenar aahat, pan june is not a good season to come here as winte starts and the weather is bad, days are short.
if you need any info you can contact me on ngadgil66@gmail.com

Hi,

mee Bhakti. I have recently travelled to Australia - Sydney.
I'm looking for immeadiate accomodation.
Can anyone help me with pointers if any one is sub-letting their house.
Will prefer sharing with Indian family / girls.
Please help.

ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड फिरण्याबद्दल जनरल माहिती हवी होती. कधी जायचे ते ठरले नाही, पण माहीत असावे म्हणूनः

तेथे गेलेल्यांनी व इतर जाणकारांनी जरा माहिती द्या.

न्यू झीलंड
ऑकलंड मधे राहून ४-५ दिवसांत पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत का? कोणती ४-५ महत्त्वाची ठिकाणे तुम्ही सुचवाल? तसेच ऑकलंड मधे फॅमिली बरोबर राहण्याकरता कोणते भाग चांगले आहेत? आणि मुळात परदेशांतून येणार्‍यांनी ऑकलंडच निवडावे का फ्लाईट साठी, की इतर कोणते शहर?

तेथे पब्लिक ट्रान्स्पोर्ट सिस्टीम चांगली आहे का - म्हणजे शहरात बस वा ट्रेन ने फिरून सर्व पाहता येते का?

ऑस्ट्रेलिया - सिडनी
साधारण वरचे जे प्रश्न आहेत, तेच सिडनी बद्दलही.

फारेन्ड..
ऑकलंड बेस ठेवला तर म्यूझियम, टॉवर, बोटॅनिकल गार्डन बघता येईल. तिथूनच एका आयलंड वर आणि एका निद्रिस्त ज्वालामुखीवर जाता येते. झू पण बघता येईल.
रोटोरुआ आणि वायटामो केव्ह्ज साठी ओव्हरनाईट जावे लागेल. हॅमिल्टन ला एक पूर्ण दिवस लागेल.
एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या एक फ्री टुरीस्ट मॅगझिन मिळते. त्यात त्या महिन्यातले खास इव्हेंट्स असतात.

तिथली पब्लिक ट्रान्स्पोर्ट सर्व्हीस, खास करून बसेस खुपच छान आहेत. आपल्याला कुठून कुठे जायचे आहे असा सर्च केल्यास बस नंबर, टाईमटेबल सगळे नेटवर दिसते. बसेस अगदी वेळेवर येतात. टॅक्सी पण आहेत. टॅक्सी
ड्रायव्हर भारतीय पण आहेत. बसण्यापुर्वी साधारण किती मीटर होईल याचा अंदाज विचारून घ्या. पण त्या महाग आहेत.

एअरपोर्ट ट्रान्सफर साठी एअरपोर्ट्वर शटल असते, ती बरीच स्वस्त आहे. आधी बूक करता येते. ती मिनी व्हॅन आहे. सोबत आणखी पॅसेंजर्स असतात. ( तेवढेच फिरता येते ) रिटर्न ट्रान्सफर पण बूक करता येते.

अगदी ऑकलंड मधे जरा ट्राफिक असते त्यामूळे शहराच्या बाहेर राहिले तर चांगले. टूअर साठी मात्र ऑकलंडला यावे लागेल. ट्रेनचे जाळे मर्यादीत आहे. टुरिस्टसाठी हॉप ऑन - हॉप ऑफ बस चांगली आहे.

मी आजवर नेहमी ऑकलंडलाच उतरलो आहे. क्राईस्टचर्च ( साऊथ आयलंड ) अजून करायचे आहे. तिथेही काही फ्लाईट्स जातात. विलिंग्डन ला पण जातात. पण ऑकलंड सोयीचे आहे.

ऑकलंड बद्दल आणखी माहिती हवी असेल तर सांगू शकेन. मी बघितलेल्या सर्व जागांचे फोटो मायबोलीवर
आहेतच.

>>माहिती हवी होती. कधी जायचे ते ठरले नाही<< फारएण्ड.. कधी ते ठरले की सांगा.. पत्ता / फोन कळवतो.. दिनेशदांनी सिडनी साठी वेळ नव्हता काढला...म्हणुन सांगतो.. Wink

एप्रिल-मे मध्ये ऑस्ट्रेलिया- न्युझीलंड करायचा विचार आहे . मार्गदर्शन हवे आहे .
२ आठवड्याचा विचार करतोय .
सिडनीला रहायची सोय होउ शकेल ,तिथून न्युझीलंडला जाउन परत यायचं,असा बेत आहे.
मी , नवरा आणि सहा वर्शांचा लेक .
लेकाने सिन्गापूरमध्ये बर्ड पार्क , झू , युनिवर्सल स्टुडिओ वगैरे गोस्टी फार एन्जोय केल्या .
ऑस्ट्रेलिया- न्युझीलंड मध्ये त्याला आवडतिल अशी काय काय ठिकाणे पहावीत ??

दोन आठवड्यात एकच देश केल्यास जास्त enjoy कराल.

ऑस्ट्रेलिया मध्ये दोन आठवड्यात मेलबर्न , सिडनि आणि गोल्ड कोस्ट /ब्रिस्बेन ला जाउ शकाल.

गोल्ड्कोस्ट मध्ये sea world आणि दोन पार्क आहेत. मेलबर्न आणि सिडनि मोठी शहरे आहेत जी बघायला चांगली आहे. गाडी चालवत असल तर मेलबर्न ते सिडानि किंवा सिडनि ते गोल्ड कोस्ट २-३ stop over घेउन country side बघु शकाल.

nz कदाचित पुर्ण बघु शकाल. पुर्ण enjoy करायचे असल्यास उत्तर किंवा दक्षिण nz ह्यापैकी एक करावे. गाडी चालवायला येत असल्यास जास्त enjoy कराल

पण एप्रिल मे मधे तिकडे थंडी असेल, विंटर ची सुरूवात असेल बहुधा. त्याप्रमाणे प्लॅन करा. न्यूझीलंड मधे कोणत्याही एका भागात (नॉर्थ किंवा साउथ) २-४ दिवस ठेवलेत तर नीट पाहता येइल.

फारेण्ड, तुमची मागच्या वर्षातली पोस्ट आत्ता बघितली. तुम्ही येऊन गेलात का?
एप्रिल में मध्ये थंडी असेल खुपच. त्यात दिवस लहान.. बीचेस वर जाता येणार नाही.

साहिल शहा +१

वर दिल्याप्र्माणे एप्रिल मे मधे बर्यापैकी थण्दीअसते. गाडी रेन्ट केल्यास जास्ती बरे होईल, कारण पब्लिक ट्रान्स्पोर्ट मोठ्या गावात (मेल्बोर्न, सिडनी) बरा आहे. पण लाम्ब जाताना आपली गाडी असलेली बरी.

तसेच दोन आठवड्यात दोन्ही देश म्हणजे फारच पळापळ होईल.