पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही? कावळेच का येतात?

Submitted by हर्ट on 18 September, 2014 - 23:50

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो. बाकी पक्षी का येत नाहीत? पुराणातील दंतकथा नकोत प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की आयडिया नाही पण काही अंदाज,

१) मानवासारखा आहार इतर सर्वच पक्ष्यांना झेपत नसेल. ते दाणे टिपण्यात आणि किडे खाण्यात धन्यता मानत असतील.

२) वर्षानुवर्षे तो हक्क कावळ्यांचाच आहे हे समस्त पक्षीमात्रांच्या मनावर बिंबले असेल.

३) माणसाची दहशत - उदाहरणादाखल सांगतो, आमच्या दारातले पान खायला कधी कबूतर कडमडलेच तर आम्ही त्यांना हाकलवतो आणि कावळ्यांचेच स्वागत करतो. (अश्यावेळी त्या कबूतरांसाठी मग बाजूला वेगळे धान्यही टाकतो)
यात मला एक ईंटरेस्टींग गोष्ट आढळली ती अशी, कावळे कबूतरांना घाबरतात.

४) हे सर्वात महत्वाचे - पक्ष्यांमध्येही अंधश्रद्धा असतील Happy

कावळ्यांच्या रूपाने पितर येतात असे म्हणतात. कावळा हा देशाच्या सर्व भागांमध्ये आढळणारा पक्षी असल्यामुळे पितरांना ते सोयीस्कर असावे Happy

२) वर्षानुवर्षे तो हक्क कावळ्यांचाच आहे हे समस्त पक्षीमात्रांच्या मनावर बिंबले असेल.

+ १००००००

मलाही असेच वाटते कारण इतर कोणी चुकूनही आले तरी माणसे लगेच त्यांना हाकलतात.

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो. बाकी पक्षी का येत नाहीत? पुराणातील दंतकथा नकोत प्लीज.

बी, पिंडदान करण्यामागे जे धार्मिक कारण आहे त्याला शास्त्राचा आधार अजिबात नाही. धर्मात अनेक गोष्टी आहेत ज्याला आपण आपल्याला हवा तसा शास्त्रिय आधार जोडू शकतो, पण शास्त्रात माणुस मृत झाला म्हणजे सगळे संपले असे म्हटल्यावर मग फक्त माणुसच मृत झाला, त्याचा आत्मा आहे, तो अमृत आहे, तो अमुक एका दिवशी भोजन करतो व्.व. हे सगळे अर्थहीन होऊन जाते ना. मग कसला शास्त्रिय आधार.

पिंडदान हे केवळ हिंदू संस्कृतीतच नाही तर ब-याच संस्कृतीत मेलेल्या लोकांची आठवण म्हणुन काहीतरी करण्याची प्रथा आहे. तुम्हाला करावेसे वाटते, करा. नाही करावेसे वाटत, करु नका. पण म्हणुन जी गोष्ट ढळढळीत केवळ आपल्या समजुतीवर अवलंबुन आहे असे दिसतेय त्याला शास्त्रिय आधार शोधू नका. आणि त्याचबरोबर केवळ शास्त्राने सिद्ध झाले म्हणजेच ते खरे आणि करण्यासारखे आहे असेही मानु नका. कित्येक गोष्टी केल्याने केवळ आपल्याला मनशांती लाभते, एवढेच खरे. बाकी काही नाही

लीम्बुच्या अकाउण्ट लाच नजर लागलेली दिसतीये. एखादा लिंबू फोडा किंवा ओवाळून टाका. लीम्बुम्हाराज नक्की प्रकट होतील.

साधना,

तुझे म्हणने मला १०० टक्के पटले म्हणून मला आपल्या प्रथा कधीकधी पटतात. मग पुराणातील त्या त्या गोष्टी पटायला लागतात.

माणसाच्या सानिध्यात थोडेच पक्षीच राहतात ,कावळा चिमणी कबुतरं. बाकीचे पक्षी फारच रेअर व संख्येने कमी आहेत, झाडावर घरटे करणारेही कमी आहेत ,बरेच डोंगर कपारीत राहतात. माणसाच्या सानिध्यातल्या उपरोक्त तीन चार पक्ष्यात कावळा आकाराने मोठा, घोळक्याने खाणारा (scavenger) व वृत्तीने उग्र आहे. त्यामुळे चिमणी कबुतरं वगैरे जीवाच्या भीतीने त्यांच्या बाजुला फिरकत नाहीत, त्यामुळे पिंडाचे चवदार पदार्थ ते एकटेच खातात.

साधना, खरे तर एखादा व्यक्ती जेंव्हा निघून जातो तेंव्हा तो आपल्याला आणखी प्रिय होतो. कारण, त्याचवेळी आपण सिंहावलोकन करतो आणि तो कीती चांगला होता आणि आपण त्याच्याशी कसे वागले बोललो ह्याचा विचार करतो. तो परत येणार नाही ह्या जाणिवेने आपण जळत असतो. आपल्या मनाची ही दशा आपल्यालाच ठावूक अस्सते. ह्याचे थोडे सांत्वन करण्यासाठी अशा प्रथा सांगितल्या आहेत. ज्या करुन आपण खरे तर आपल्याला मानसिक शांती देत असतो. जर आपल्याला गेलेल्या माणसापर्यंत पोचायची अशी वाट नसती मिळाली तर आपण आणखीनच शोक करत बसलो असतो. बहुतेकदा भावूक गोष्टी मनाला समजवतात. शांत करतात. शास्त्रिय कारणे उलट निराश करतात. तो गेला आता परत येणार नाही असे ऐकले की मन तुट तुट तुट्त राहते. पण तो श्राद्धाला येणार असे म्हंतले की बरे वाटाते. खोटे का असेना पण बरे वाटते असे ऐकले की.

माणसाच्या सानिध्यात थोडेच पक्षीच राहतात ,कावळा चिमणी कबुतरं. बाकीचे पक्षी फारच रेअर व संख्येने कमी आहेत, झाडावर घरटे करणारेही कमी आहेत ,बरेच डोंगर कपारीत राहतात. माणसाच्या सानिध्यातल्या उपरोक्त तीन चार पक्ष्यात कावळा आकाराने मोठा, घोळक्याने खाणारा (scavenger) व वृत्तीने उग्र आहे. त्यामुळे चिमणी कबुतरं वगैरे जीवाच्या भीतीने त्यांच्या बाजुला फिरकत नाहीत, त्यामुळे पिंडाचे चवदार पदार्थ ते एकटेच खातात.>>> चिमण्या, साळुंक्या सुद्धा खूप असतात आजूबाजूला. कावळे एक दोन असले तरी तेच येतात आणि चिमण्या १०० जरी असल्या तरी येत नहईत.

बी, तुम्हाला पिंडदान केल्याने बरे वाटेल, तुम्ही नक्की करा. शास्त्रिय कारण शोधु नका.

आणि माणुस गेल्यावर तो असताना आपण काय केले हे आठवुन जेव्हा वाईट वाटायला लागते तेव्हा आता सोबत असलेल्या माणसांबरोबर आपण काय वर्तन करतोय हे तपासुन पाहायचे. जे गेले ते गेले पण जे आज आहेत त्यांच्याबरोबर आपण जमेल तेवढे साहचर्याने वागायचे. तसेही आपण चांगलेच वागतो पण कित्येक वेळा त्यांची काही इच्छा असते, मागणी असते, आपल्याला करायचेही असते पण केवळ आपल्याला वेळ नाही म्हणून आपल्या हातुन ती गोष्ट होत नाही.

साधना यांच्याशी सहमत
याउपर एक साधासोपा विचार - पक्ष्यांना खाऊ घालणे हे सत्कर्म होत असेल आपल्या हातून तर चांगलेच आहे की Happy

साधना,

तू म्हणते आहेस तेच मलाही वाटते. पण तुला सांगू का माणूस गेल्यानंतरच त्याची किम्मत कळते. तो जिवंत असताना आपण त्याचे ऐकू, सहन करु असे होईलच असे सागता येत नाही. एक आईच हे सगळे करु शकते. पण तू म्हणते आहेस ते अमलात आणेल. धन्स

माणसाच्या सानिध्यातल्या उपरोक्त तीन चार पक्ष्यात कावळा आकाराने मोठा, घोळक्याने खाणारा (scavenger) व वृत्तीने उग्र आहे. त्यामुळे चिमणी कबुतरं वगैरे जीवाच्या भीतीने त्यांच्या बाजुला फिरकत नाहीत, >>>
हेच सगळ्यात जास्त सयुक्तिक आहे . कावळे माणसाना अजिबात घाबरत नाहीत . कावळे इतर पक्षांची अंडी , पिले सुधा खातात . आणि जिथे एवढे चवदार पदार्थ आहेत तीथे एवढ्या मोठ्या संख्येनी कावळे जमल्यावर इतर पक्षी घाबरून येत नाहीत .
मृताच्या पिंडाला कावळा शिवण्यामागे १ धार्मिक कारण बर्याच लोकांकडून ऐकलय . ते म्हणजे कावळ्यांना दिव्य दृष्टी असते . त्यांना आत्मा दिसतो . मृत माणसाचा आत्मा पिंडाला लपेटून बसतो . त्यामुळे कावळा पिंडाला शिवत नाही. त्याची इच्छा कोणीतरी बोलून दाखवली आणि पूर्ण होईल म्हणलं कि तो आत्मा पिंडापासून दूर होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो .

कावळा हा पक्षी कुठेही शिते दिसली तरी तुटून पडणारा आहे. आपले पितर कावळा होऊन येत नाहीत. ते आपल्या मार्गाने गेलेले असतात. एकदा का चालू जन्म संपला की त्यांचा आपला संबंध नाही. जे काही करायचं ते आपल्या स्मृतीत ते असतात म्हणून. त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता/त्यांना सद्गती मिळावी ही सदिच्छा म्हणून, आपला शोक हलका व्हावा म्हणून. ह्यातलं कर्मकांड बाजूला ठेवलं तर सार इतकंच असतं की त्या जिवाला (ज्याच्यात आपला जीव अजून गुंतलेला असतो आपण जिवंत आहोत म्हणून) भगवंताचरणी स्थान मिळो ही प्रार्थना करणे.

एखाद्या दुराचार्‍याचे साग्रसंगीत श्राद्ध घातले तरी तो काही उत्तम गती पावणार नाही आणि एखाद्या सदाचार्‍याच्या पिंडाला कुणी लाथ घातली तरी त्याची सद्गती अडणार नाही. हा, सदाचार्‍याच्या पिंडाला लाथ घालून त्याच्या अपमानाची भावना केल्याबद्दल लाथ घालणार्‍याला मात्रं दोष लागत असेल आणि हे तर माणूस जिवंत असतानाही पाळावे. सदाचार्‍याच्या डोळ्यात पाणी येईल असं शक्यतो वागू नये.

साधना +१

कावळे कितीही धीट असले, अगदी स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून ओरडलेही, पण कधी कधी पिंडाला शिवायला जाम तयार होत नाहीत. वर मोहिनी३३३ म्हणाल्या आहेत तसं त्याची इच्छा कोणीतरी बोलून दाखवली आणि पूर्ण होईल असं म्हणालं किंवा एखाद्याने एखादी गोष्ट कबूल केली (उदा. आता मी दारू पिणार नाही, शहाण्यासारखा वागेन) वगैरे ही ते लगेच येऊन शिवतात हे मी स्वत: बघितलेले आहे.

साधना आणि अश्विनी, उत्ताम पोस्ट्स.
आपल्या नातलगांच्या स्मृती जागवण्यासाठी काहीतरी करावे, याबाबद दूमत नाही. पण ते वर्षातून एकदाच करावे हे मात्र पटत नाही. त्या व्यक्तीकडून आपल्याला जे काही चांगले शिकायला मिळाले असेल ते अनुसरावे. पुढे चालू ठेवावे.. हे मी करतो. असे काही केल्याने त्या व्यक्तीच्या उपकाराची परतफेड होते हे मला पटत नाही. चांगल्या
संस्कारांची कुठे परतफेड होते ? आपण फारतर ते संस्कार इतरांवर करू शकतो.

रच्याकने, इथे अंगोलात कावळेच नाहीत !

कावळ्यांना दिव्य दृष्टी असते . त्यांना आत्मा दिसतो . मृत माणसाचा आत्मा पिंडाला लपेटून बसतो . त्यामुळे कावळा पिंडाला शिवत नाही. त्याची इच्छा कोणीतरी बोलून दाखवली आणि पूर्ण होईल म्हणलं कि तो आत्मा पिंडापासून दूर होतो आणि पुढच्या प्रवासाला जातो .
>>>>>>

हे मस्त लॉजिक आहे.
फक्त बोल्ड केलेले वाक्य बाऊंसर गेले.

कावळा हा तीस वर्षे जगणारा एकमेव पक्षी आहे. याची दिनचर्या साधारण पहाटे सुरु होते. रात्री गाडीच्या खाली आलेला कुत्रा सर्वप्रथम कावळ्याच्या दृष्टीला पडतो. थोडक्यात पहाटे भुक लागल्यामुळे आणी समुहाने राहिल्यामुळे आपल्याला नको असले तरी इतरांना बोलाउन ते अन्न खाऊ देण्यात तो वाकबगार असतो.

कावळ्याच्या मानाने चिमण्या, कबुतरे आणि मैना फारच कमी आयुष्य जगतात. एकमेकांशी संवाद करण्याची कला ही का़वळ्या इतकी विकसीत नाही. माणसाची देहबोली जाणण्याचे सामर्थ्य कावळ्यात आहे ते इतर पक्षात नाही.

हक्काचे आणि बिनकष्टाचे अन्न मिळवण्याचे ठिकाण म्हणजे दशपिंडाचा घाट. इथे रोज एखादा दशपिंड होतो तिथे कावळा माणसांचा वावर सुरु झाला की तयारीत रहातो. ही कला कावळ्याने पिढ्यान पिढ्या खपुन तयार केलेली आहे. शिवाय नॉनव्हेज पासुन व्हेज पर्यंत रेंज ही विकसीत केली आहे.

मायबोलीवरच एका मिलिट्री रिटायर्ड व्यक्तीने दर शनिवारी १२ वाजता पार्टी सुरु होई आणि कावळे बियर मध्ये भिजवलेले ब्रेड चे तुकडे खात हे लिहलेले आठवते. यात महत्वाचा उल्लेख जेव्हा पार्टी साठी रिकाम्या मैदानात टेबले ठेवायला सुरवात होई तेव्हा कावळे जमा व्हायला लागत हा आहे. ही हुशारी अन्य पक्षात कमीच.

अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या दशपिंडाच्या घाटाला सकाळी ९ ते १० च्या दरम्यान कावळा आलाच नाही असे घडत नाही. मात्र जी शहरे नव्याने निर्माण होतात तिथे ही अडचण येते.

चार वेगवेगळ्या मृतांचे पिंड असताना एका पिंडाला कावळे अजिबात स्पर्श करत नाहित हे पाहिले की या कावळ्यांना पिंडावर बसलेला आत्मा दिसतो असे म्हणतात ते पटते. मग अपुर्‍या इच्छेचे वचन मिळाल्यावर तो कावळा शिवतो हे ही पाहिले आहे.

कुणाकडे खास फोटोग्राफी करण्याचा कॅमेरा असल्यास याची फोटोग्राफी करण्यास मला उत्साह आणि वेळही आहे. खरच पिंडावर आत्मा असतो का आणि नातेवाईकांच्या हवाल्या नंतर तो जातो का हे पहाण्याची मला खुप उत्कंठा आहे.

गुरुजी दशपिंडाला सकाळी ९ ते १० ह्या वेळातच यायला सांगतात कारण कावळे या वेळात सर्वात जास्त भुकेले आणि उपलब्ध असतात. एकदा का १२ वाजुन गेले की कावळे आपले भोजन उरकुन आराम करायला गेलेले असतात. अश्या वेळी आपले पोट भरलेले असताना इतर कावळ्यांना बोलावणे करणारा कावळा सुध्दा दिसत नाही आणि विनाकरण मात्र मृताचे नातेवाईक कष्टी होतात.

हुशार दशपिंडि ब्राह्मण या पिंडावर दही घालायला सांगतात. दही भात हे कावळ्याचे आवडते अन्न आहे. मुळ विधीत काळे तिळमिश्रीत भात असा रिवाज असताना दही घालणे किंवा काही समाजात भाकरी पिंडाच्या खाली भाकरी ठेवणे हे कावळ्याला लाच देणे असा प्रकार आहे. तरी सुध्दा काही वेळा कावळे शिवत नाहीत हे ही पहाण्यात आले आहे.

एक मजेशीर प्रकार आमच्या एका काकांनी सांगीतला. त्यांना गुरुवारी सुट्टी असे. त्या दिवशी त्यांची पत्नी गरम पोळ्या करायला १०-११ वाजता बसे. नुकतेच सासरे वारले होते त्यामुळे काकांना त्यांच्या सासर्‍याची आठवण येई. मग पत्नीला ते एक पोळी टेरेस वर ठेवायला सांगत. कावळा ही फक्त गुरुवारीच येई आणि ती पोळी खाऊन जाई.उशीर झालातर ओरडा आरडा करे.

असे बरेच दिवस झाले. काकांच्या सुट्टीच्या दिवसाच्या पेहेरावाची किंवा देहबोलीची त्याला सवय असावी अन्यथा कॅलेडरवरचा गुरुवार शोधुन तिथे येण्या इतका कावळा हुशार नक्कीच नाही.

एका गुरुवारी खुप उशीर झाला. कावळा ही बराच अस्वस्थ झाला. काका म्हणाले नाना ( त्यांचे सासरे ) सोकावलेत. तेव्हापासुन मात्र कावळा आला नाही याची कारण मिमांसा काही समजली नाही.

प्रत्येक जण आपले मत मांडत आहे .. ते पटो वा न पटो पण वेगवेगळी कारणे वाचायला छान वाटत आहे.

मी भाताचा पिंड पाहिलाच नव्हता. आमच्याकडे आई वरण भात भाजी पोळी खीर कढी वडे भजी कुरडई असे ताट करते श्राद्धाला. बाबा एक एक घास एकत्र करुन अग्निघास करायचे आणि मग उरलेला छतावर टाकायचे.

नाशिक ला ह्यावेळी तीन दिवस राहिलो. त्यावेळी तिथे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दहीभाताचे पिंड, काळे तिळ घातलेले पिंड, चांदक्यासारख्या जाड भाकरी - हे सगळे पाहून पहिल्या दिवशी मला इतके भरुन आले होते ना.. खूपच!

पिंड नंतर पुजा करुन झाल्यावर पाण्यात टाकतात ते का कळले नाही. आणि अजून एक कळले नाही जिथे आपले घर आहे तिथे सहसा आत्मा सहवास करता असावा ना.. तो नाशिक किंवा इतर कुठेही कसा काय येतो?

मी भाताचा पिंड पाहिलाच नव्हता. आमच्याकडे आई वरण भात भाजी पोळी खीर कढी वडे भजी कुरडई असे ताट करते श्राद्धाला. बाबा एक एक घास एकत्र करुन अग्निघास करायचे आणि मग उरलेला छतावर टाकायचे.

पिंड दहाव्याला आणि पहिल्या वर्षश्राद्धाला करतात. नंतरच्या वर्षी वर लिहिले तसे सर्व जेवण करुन ते केळीच्या पानात काढुन कावळ्याला देतात. पिंड नंतर दरवर्षी करत नाहीत.

पिंडदान हे केवळ हिंदू संस्कृतीतच नाही तर ब-याच संस्कृतीत मेलेल्या लोकांची आठवण म्हणुन काहीतरी करण्याची प्रथा आहे. तुम्हाला करावेसे वाटते, करा. नाही करावेसे वाटत, करु नका. पण म्हणुन जी गोष्ट ढळढळीत केवळ आपल्या समजुतीवर अवलंबुन आहे असे दिसतेय त्याला शास्त्रिय आधार शोधू नका>>>>>> माझ्या मनातलं म्हणून आवडलंच.

कावळा , हा काळा कुळकुळीत आणि आवाज तर ऐकायला नको.त्याला ना कोणी आनंदाने खाऊ घालेल ना कोणी हौसेने पाळेल.हकनाक त्याला मारू नये म्हणून कदचित मिळालेले अभय असावे.काहींच्या म्हणण्यानुसार कावळ्यात पितरांचा आत्मा प्रवेश करतो.जर असे असेल तर कावळ्याचा मूळ आत्मा त्यावेळी कुठे जातो? एरवी त्याच कावळ्याला हाड हाड करतो यावेळी कावकाव करून बोलावतो.असो.

पितृपक्षात पितरांची आठवण ठेवली जाते.Thanksgiving म्हणा की आणि काही,पण उद्देश चांगला आहे.
वर दहीभाताचे लिहिले आहे ते अगदी खरे आहे. म्हणजे कावळ्याला दहीभात आवडतो की नाही ते माहीत नाही,पण त्याकडे आकर्षिले जातात एवढे खरे.

असं आहे तर इतर वेळीही कावळ्याला हाडहाड करण्यापेक्षा खायला ठेवावे, अगदी काव काव करून बोलावलेच पाहिजे असे नाही.
कावळ्याला आपण खायला ठेवले नाही तरी त्याच्या टप्प्यातले तो उचलून नेऊच शकतो. खिडकीच्या जवळ ठेवलेली, तीही काचेच्या मागे( पण कावळ्याला वेगवेगळे कॅमेरा अँगल असतात) फर्साणची पिशवी कावळ्याने क्षणात पळवली आणि समोरच्या इमारतीच्या वॉटरपंप केबिनच्या छतावर बसून आम्हाला दाखवून दाखवून फर्साण संपवलं. तर कावळ्यालाही जंक फूड आवडतं.

Pages