पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही? कावळेच का येतात?

Submitted by हर्ट on 18 September, 2014 - 23:50

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो. बाकी पक्षी का येत नाहीत? पुराणातील दंतकथा नकोत प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो नितीनचन्द्र , भारद्वाज् वेगळा पक्षी आहे हो. थोडासा तपकिरी रन्ग, लाम्ब शेपटी. याचे दर्शन शुभ मानतात. ( आता याचेच दर्शन शुभ का यावरुन वाद वा नवीन बाफ नको)

आगाऊ.:फिदी:


असा.

ए काय रे बी. आम्हाला नाही आवडत बाबा प्रत्येक वेळी लम्बोडका चेहेरा करुन बसायला. उगाच मग फिलॉसॉफी पाजळल्यासारखे वाटते.

बी आधी सिरियसली चर्चा केलीच होती हो, अगदी इब्लिस देखील सिरियसली लिहित होते.

पण लोक कावळा डोमकावळा भारद्वाज असे पक्षीसंग्रहालय आले मग काय करणार, पण ओरिजिनल धाग्याचा आदर मनात आहेच.

कावळ्याला माणसाने स्पर्श केल्यास त्याला इतर कावळे चाटून चाटून मारतात हे खरे आहे का?
म्हणजे एक कावळ्याची अशी त्याच्याच बांधवांकडून धुलाई चाललेली पाहिली तेव्हा मित्राने हि माहीती पुरवली होती.
एवढ्यासाठी वेगळा धागा नको म्हणून यातच विचारतो.

कावळाच काय बाकी पक्षाना पण असे माणसाने वा त्याच्या ( माणसाच्या ) पिल्लाने स्पर्श केलेला चालत नाही( चावट्ट आहेत मेले). त्याना माणुस या जमातीबद्दल घृणा असेल. काही अपवाद आहेत तसे, म्हणजे मिठ्ठु वगैरे. आणी काही वेळा घरट्यातुन पडलेल्या पिल्लाला सुद्धा लोक परत घरट्यात ठेवतात की. जसा पक्षी तशी त्याची नियत.

चाटून चाटून ???? >>>>

ऊप्स सॉरी .. टोचून टोचून .. म्हणजे टाइपताना बोललो तसेच पण कीबोर्डवर बटणे दाबताना अदलाबदल झाली.
(तसेही धुलाई शब्द वापरताना टोचण्यापेक्षा चाटण्याची क्रिया जास्त समर्पक वाटते नाही Wink )

तसेही धुलाई शब्द वापरताना टोचण्यापेक्षा चाटण्याची क्रिया जास्त समर्पक वाटते नाही
>>>
बाप रे अवघड आहे. धुलाई = चाटने ????

कावळे टोचुन टोचुन मारतात असे म्हणायचे असेल.

मायबोलीवर हा अनुभव लगेच येतो. एक शब्द चुकायचा अवकाश मग ते पिल्लु असो ( नवीन मायबोलीकर ) किंवा जुना मायबोलीकर. ( चिमण्या ).

पिल्लांनी कविता करायच्या सोडल्या आणि आपले वाडःमयीन जीवन संपवले.

या कावळ्यांच्या टोचण्याला त्रासुन चिमण्या मायबोलीचा पक्ष सोडुन मिसळपाव पक्षात गेल्या आहेत. तर काहिंनी नविन पक्षाची स्थापना केली आहे ( स्वतंत्र ब्लॉग काढुन ).

कुणीतरी म्ह्णायला हवे " या चिमण्यांनो, परत फिरारे घराकडे आपुल्या "

पक्षी कोणाला टोचून मारतात? ज्या पक्षाला माणसाने स्पर्श केला आहे अश्या पक्ष्याला. म्हणजे जो `बाटला' त्याला.

पु.भा.भावे यांची एक कथा होती अशीच कबुतराच्या पिलाबद्दल.

मायबोलीवर बाटला म्हणजे

तो संघाच्या विचाराचा, पुरोगामी, रुढीवादी, आणि ब्राह्मण कुळात जन्माला आलेला.

बाटायचं म्हणजे दुसर्‍या कोणाचा स्पर्श/संपर्क होऊन परत आपल्या लोकांकडून नाकारलं जाणं. मग ते कोणाला लागू होणार?

पुरोगामी आणि रूढीवादी हे दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात?

बाटायचं म्हणजे दुसर्‍या कोणाचा स्पर्श/संपर्क होऊन परत आपल्या लोकांकडून नाकारलं जाणं. मग ते कोणाला लागू होणार?<<<

अनेक उदाहरणे आहेत. जसे गांधी कुटुंबीय, सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, चिमण्या!

धाग्याशी सुसंगत प्रतिसाद देण्याची तीव्र इच्छा असलेला

-'बेफिकीर'!

===================

धाग्याशी सुसंबद्ध प्रतिसाद!

मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या पक्ष्यांपैकी बहुधा कावळा हा एकच पक्षी असावा जो (अजूनसुद्धा) माणसावर विश्वास ठेवून माणसे आजूबाजूला असतानाही तेथे ठेवलेला पदार्थ खायला येत असावा.

('====' च्या आधी दिलेला प्रतिसाद हा काँसिक्वेन्स असून तो उडवायचा असल्यास कृपया आधीचे संबंधीत प्रतिसादही उडवले जावेत अशी नम्र विनंती)

छे छे '==== च्या आधीचा प्रतिसाद पटलेलाच आहे. मलाही कधीतरी मेकॉले-शिक्षणपद्धतीमुळे बाटलेला असे सर्टफकट मिळालेले आहे. माझ्या जोडीला ती महान नावे वाचून जन्माचे सार्थक झाले.

Pages