पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही? कावळेच का येतात?

Submitted by हर्ट on 18 September, 2014 - 23:50

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो. बाकी पक्षी का येत नाहीत? पुराणातील दंतकथा नकोत प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.... मग अपुर्‍या इच्छेचे वचन मिळाल्यावर तो कावळा शिवतो हे ही पाहिले आहे. >> हे मीही प्रत्यक्ष पाहीलं आहे.

असं आहे तर इतर वेळीही कावळ्याला हाडहाड करण्यापेक्षा खायला ठेवावे, अगदी काव काव करून बोलावलेच पाहिजे >>>>>नको. एरवी त्याला बोलवावे लागत नाहीच.कावळे येतातच. निसर्गातील सफाई कामगार आहेत ते.
माझ्या वडलांनी कावळ्याला खायला घालून असं सोकावून ठेवलं होतं की दुपारी कधी झोपायची सोय उरली नव्हती
.दुपारच्यावेळी कावकाव्,क रSच कर्र,लिहिता येत नाही अशा स्वरात घसा साफ करीत असे.
एका नातेवाईकाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे येणारा कावळा, शिळी चपाती दिली की खात नाही.ताजी दिली तरच खातो.नवल म्हणजे ती देईपर्यंत गप्प बसून रहातो.

तुम्ही{सर्व} शास्त्रिय कारणे मागता पण शास्त्रिय विचारसरणीने कोणी विचार करू लागला तर पाखंडी ठरवून कावळ्यांसारखे चोची मारता त्यामुळे. या भानगडीत कोणी पडत नाही. आणखी बराच उहापोह करता येण्यासारखा आहे परंतू धार्मिक मनोवृत्ती बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृती करतांना मात्र मागे सरतात.
बाकी चालू दे.
कोणतीही गोष्ट शास्त्रिय पध्दतीने शोधण्याचे निकष असतात. परंतू ती दुसरी पायरी आहे. पहिली पायरी असे संशोधन करू देण्याला {विशेषत: धार्मिक अंतर्गत} समाज तयार होणार का?

मेले माणूस भोजना येते | या नांव भ्रम >>>
एकनाथ महाराज ब्राह्मण होते . त्यांची संतवृत्ती तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे . एकदा १ लहान महार मुलगी त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली प्रत्यक्ष देव तुमच्या हातून नैवेद्य खातो . तुम्ही माझ्या हातून खल का ? तिला एकनाथ महाराजांना खावू घालण्याची फार इच्छा होती. महाराजांनी ते मान्य केलं आणि तिची इच्छा पूर्ण केली .
त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. पण हा महाराच्या पोराला कडेवर उचलून काय घेतो , त्यांच्या हातचं जेवण काय खातो , ब्राह्मण धर्म बुडवायला निघाला म्हणून जेवायला यायला नकार दिला. तेव्हा एकनाथांनी मंत्रसामर्थ्याने आपल्या वडीलान्सकट त्या ब्राह्मणांचे जे पितर पितृलोकात होते त्यांना तीथे प्रत्यक्ष उपस्थित केलं आणि जेवू घातलं. ज्यांनी एकनाथांचा अपमान केलं त्यांनी त्यांचे पाय धरून क्षमा मागितली .

कोणतीही गोष्ट शास्त्रिय पध्दतीने शोधण्याचे निकष असतात. परंतू ती दुसरी पायरी आहे. पहिली पायरी असे संशोधन करू देण्याला {विशेषत: धार्मिक अंतर्गत} समाज तयार होणार का?>>>
समाज तयार आहे . तुम्ही शास्त्रीय पद्धतीने आधी हे शोधून तर काढा . आधी केले आणि मग सांगितले हे महत्वाचं

इथे चौकसपणा म्हणजे १)पिंड कसला अन्नपदार्थ असतो? २)वेगवेगऴया पक्षांना (कबुतर चिमणी पोपट मैना ) तो पदार्थ (भात)दिल्यास खातात का? ३)तोच पदार्थ सर्व पक्षी एकत्र असतांना कोण पुढे येतो? ४)तोच पदार्थ पिंड संबोधून ठेवल्यावर पक्षांच्या वागण्यात फरक पडतो का? इथे या कसोटीसाठी खरोखरचाच पिंड ठेवण्यास कुटुंबांनी सहकार्य दिले पाहिजे.

समाज रुढींना किती चिकटून आहे याची बरीच उदाहरणे देता येतील. ढोंगीपणा फार आहे. समुद्र ओलांडून दोन हजार वर्षाँत यवन डच युअरोपिअन लोक भारतात येताहेत हे आपण पाहतो. पण इकडे रामानुजम टिळकांना शुध्दी करायला लावली. तुमच्या श्रध्दा भावना ठीक आहेत. आदर ठेवतो. पण उगाच जेवणाचे काटे चमचे घेऊन शास्त्रिय चर्चेचा /कापाकापी /डिसेक्शनचा आव कशाला आणता?
वैयक्तिक विरोधाने आकसाने प्रतिसाद नाहीये.

कुठेतरी वाचले होते की समज त्या घाटावर/ जागेवर सर्वात आधी झालेल्या पिन्डदानाच्या वेळी कावळ्याने ते खाल्ले तर त्याचे पोट भरते, असेच बाकीच्यान्चे पण भरते. म्हणजे ज्याला भूक असते तो येतोच. पण एकदा पोट भरल्यावर कशाला तो येईल? मग लोकाना वाटते की ईच्छा अपुरी राहिली असेल

. तसेही आजकाल मोबाईल टॉवर्समुळे पण चिमण्या कावळ्यान्ची सन्ख्या पण रोडावते आहेच.

मतं लादत नाही. मी स्वत: कोणतंही क्रिया कर्म करत नाही. जे काय करायचं ते जिवंतपणीच केलं. कशाला त्यांचा आत्मा(?)चौऱ्यांशी सहस्र योनी भरकटेल?आणि भरकटला तरी काय ते निसर्गचक्रच आहे ना? पारशी लोक तर पिंड कशाला हाच देह खाऊ दे पशुपक्षी या विचारांचे आहेत. कोणत्याही जीवाला जीव जाताना यातना होतात हे पाहतो. परंतू याचबरोबर काही महान "आता माझं सर्व झालं अन्नपाणी सोडतो" आणि शांतपणे निसर्गचक्रास स्विकारतात.

जाताजाता :धार्मिक कल्पनांनी मोक्ष मिळवण्याचे परिणाम गंगानदी भोगते आहे.

हे असले ऐकोळी/निरर्थक धाग्याचे 'विषय' ह्या लोकांना सुचतातच कसे?

-----
वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो>>>>>

ह्या गोष्टीला काहीही शास्त्रीय कारण नाही अंधश्रद्धेला कुठलेही शास्त्रीय कारण नसते. ज्याच्या डोक्यातून हि सुपीक कल्पना निघाली तो पूर्वज अतिशय धूर्त होता ह्यात संशय नाही. कावळा हा पक्षीच पिंड दानाला लागतो कारण त्याचा सर्वत्र संचार असतो तो माणसाला बुजतही नाही. समजा हि प्रथा बनवणाऱ्या सुपीक डोक्यांनी कावळा हा पक्षी न घेता मोर घेतला तर त्यांना माहित आहे सगळे पिंड तसेच राहतील. त्यामुळे सर्वत्र आढळणारा नि काहीही खाणारा पक्षी म्हणून त्यांनी कावळ्याला निवडलेले दिसते हे स्पष्ट आहे .

त्याच प्रकारे देवाला बळी म्हणून काही काही ठिकाणी बोकड बळी देतात त्या बोकडाच्या गळ्यात हार घातला जातो त्याला कुंकू लावले जाते नि विधिवत पूजा होवून त्याला कापण्यात येते. बोकडच का कारण तो गरीब प्राणी आहे पूजेसाठी वाघ नाहीतर लांडगा बळी द्यायची प्रथा असती तर बहुदा यजमानांचाच बळी जाण्याची शक्यता असते असे सोपे सोपे सोफ्ट टार्गेट शोधून त्यांना धार्मिक गोष्टीत गुंफण्यात आलेले आहे.

पूजेसाठी वाघ नाहीतर लांडगा बळी द्यायची प्रथा असती तर बहुदा यजमानांचाच बळी जाण्याची शक्यता असते असे सोपे सोपे सोफ्ट टार्गेट शोधून त्यांना धार्मिक गोष्टीत गुंफण्यात आलेले आहे.>>>>>>:हाहा: पटले.

प्रश्न पडणे ही चांगली खूण आहे. आयझॅक न्यूटनला देखील प्रश्न पडत असत. म्हणूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आणि त्यानंतर सफरचंदं झाडावरून खाली पडू लागली.

>> बोकडच का कारण तो गरीब प्राणी आहे

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रं बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक:

असं एक सुभाषित शाळेत शिकल्याचं आठवतंय.

बोकडच बळी द्यायचे आणखी एक कारण म्हणजे बोकड किंवा कोंबडी हे आपले खाद्य आहे. गाढव किंवा कुत्रे आपण खात असतो तर त्यांनाही पकडून मारले असते. उगाच मारायचे आणि मग फुकटचा खर्चा आणि न खाता त्यांच्या बॉडीची विल्हेवाट लावत बसायची, कोणी सांगितलेय ..

ईईईईईईईईईईईई! काय हे ऋन्मेष.:अरेरे::फिदी: आपण काय चायनीज-जॅपनीज किन्वा कोरीअन आहोत का? वॅक वॅक! कल्पनेनेच पोटात ढवळायला लागलेय.:अरेरे:

आहो मी कुठे आपण चायनीज-जॅपनीज आहोत म्हटले, उलट नाही आहोत म्हणून तर जे खातो तेच बळी देतो.

संस्क्रुत सुभाषित छान आहे, बळी दुर्बळांचा जातो हे देखील कबूल, पण जेव्हा स्वार्थ असतो तेव्हाच बळी घेतला जातो. इथे स्वार्थ म्हणजे आपण देवाच्या नावावर आपण स्वताच बोकड मिटक्या मारत खातो. अन्यथा दुर्बळ प्राण्यांना कमी नाही जगात ..

ऋन्मेष, सही बात! ज्या गोष्टी खातो त्या देवाला ंद्यायच्या.

आमच्या गावात नारळ मिळणे मुष्कील आणि मिळाले तरी एकदा फोडल्यावर प्रसद सोडल्यास त्याचं आणखी काय करावं हे लोकांना माहिती नाही.
इथे शुभकार्यात चक्क भोपळा फोडतात.
Happy

काय अर्थ होतो ह्या श्लोकाचा:
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रं बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक:
?????

आपल्या मराठी भाषेत एक फारच विनोदी प्रकार मी पाहिला आहे. बहुतेक सगळेच लेखक संस्कृतमधे एखादा सुविचार सांगतील, एखादा श्लोक सांगतील आणि जणू वाचकांना संस्कृत माहिती आहे असे समजून दिलेल्या श्लोकाचा अर्थ सांगत नाही. मी कित्येकदा अशा लेखकांच्या नावाने बोटे मोडली आहेत Happy

घोडा नाही,हत्ती नाही, वाघ तर मुळीच नाही.
बळी द्यायला नेहमी बोकडच वापरतात. खरेच देव हा दुर्बळांसाठी घातक ठरतो.

अजापुत्रं बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक:>>> हा श्लोक देव दुर्बलस्य घातकः असा आहे का?

खरेच देव हा दुर्बळांसाठी घातक ठरतो.>>> सातींनी अर्थ सांगितला आहेच.थोडक्यात काय तर बलवानाच्या पाठी देव / दैव असते.

देवः शब्दाचे रुप देवो असे होते>>

म्हणजे काय नकी? वरील वाक्य "थोडक्यात काय तर बलवानाच्या पाठी देवो / दैव असते." असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

बी, अकारान्त पुल्लिंगी देव शब्द 'चालवण्या'चा तो नियम आहे. सौंस्क्रूत वॅक्रणाचं शिक्रण कठीण अस्तं, जौद्या Wink

- फोनेटिक e-bliss

अरे देवा, काय संस्कृत संस्कृत चालूय इथे .. मला शाळेत असताना नेहमी ९० च्या आसपास असायचे मार्क, पण आता यातील काही आठवेल तर शप्पथ.. रट्टा झिंदाबाद होता बस्स ..

Pages