पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही? कावळेच का येतात?

Submitted by हर्ट on 18 September, 2014 - 23:50

कुणाला शास्त्रिय कारण माहिती आहे का पिंडदानाच्या वेळी कावळा हा एकच पक्षी का येतो. बाकी पक्षी का येत नाहीत? पुराणातील दंतकथा नकोत प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावळा खायला शिकलेला असतो.पिंडाचे का लग्नाचे त्याला फरक पडत नाही.
किंवा त्यांच्यातही पिंडाचे खाणारे वेगळे किरवंत कावळे असतील.

लग्नाचे आणि मयताचे गुर्जी वेगवेगळे असताता तसंच कावळ्यातही असणार. लग्नाचा कावळा मयताला आणि मयताचा कावळा लग्नाला चालतो का ?

हुशार कावळ्याची गोष्ट असायची शालेत, मडक्यात खडे टाकून पाणी वर आणून पिणारा ..

पण वर्षानुवर्षे माणसांच्या श्रद्धेचा-अंधश्रद्धेचा फायदा उचलत आपल्या पोटापाण्याची सोय करने हि कावळ्यांची खरी हुशारी !

अ मर्डर ऑफ क्रोज जरूर बघा ! कावळ्यांबद्दलचे पुर्वग्रह कदाचित कमी होतील Happy

केवळ भारतातच व हिन्दू धर्मातच नव्हे तर जगातील जवळ जवळ सगळ्या कल्चर्स मधे कावळा हा डेथ आणि वाइट बातमिचा वाहक मानला जातो त्याच प्रमाणे आफ्टर लाइफ मधे आत्म्याला घेऊन जाणारा समजला जातो (नेटिव्ह अमेरिकन कल्चर मह्दे).

कावळा हा सर्वत्र काळाच असतो ना ? की युरोप अमेरीकेता गोरे कावळे पण असतात ?

रच्याकने,
भुतं रात्रीच्या काळ्या अंधारातच का बाहेर पडताता ? वाईट शक्ती अंधारातच का प्रभावी होतात ? वाईट जादूला काळी जादू का म्हणतात ? राक्षस काळे का ? काळ्या माणसाविषयी पहिली भावना मनात काय उत्पन्न होते ?

आपण डिस्कव्हरी चॅनल पहा. शिकार जरी बिबट्याने केली तरी सिंह आला की बिबट्या शिकार सोडुन पळुन जातो. हा शक्तीचा परिचय पक्षांमध्ये सुध्दा असावा.

जर अनेक पक्षी असलेल्या ठिकाणी आपण अन्न ठेवले तर कावळ्यांच्या जातीतला भारद्वाज पक्षाचा प्रथम मान असतो. तो तोंड लावत नाही तो पर्यंत इतर कावळे पुढे येत नाहीत.

भारद्वाज पक्षांची संख्या अल्प असल्यामुळे हा सीन नेहमी बघायला मिळत नाही.

कावळ्यात सुध्दा संपुर्ण काळा कावळा त्या ठिकाणी असल्यास तोच आधी खातो मग मानेला जरा ग्रे रंग असलेले कावळे यांना परवानगी असते.

भारद्वाज, संपुर्ण काळा कावळा, इतर कावळे मग साळुंक्या ( मैना ) असा क्रम पहायला मिळतो.

या कबुतरांनी फार उच्छाद मांडलाय. त्यांना म्हणाव जा त्या पिंडदानाला..कावळ्यांच प्रस्थ जरा कमी करा!

पिंडदानाचे काही माहीत नाही. पण आमच्या घरी मात्र रोज सकाळच्या वेळी दहा-बारा कावळे तरी जमतातच. आता त्यांना कळून चुकलेय की ही वेळ घराच्या मालकिणीच्या स्वयंपाकाची असते आणि त्या वेळी समोर जावून बसले की गरम गरम पोळी खायला मिळते. त्यामुळे रोज त्यावेळी कावळे, कबुतरे, क्वचित चिमण्याही पंगतीला हजर असतातच. Happy

मी ज्या टपरीवर अधे मधे पोहे खायला जातो, त्या टपरीचे मालककाका कावळ्यांना फरसाण खाउ घालतात चक्क.
त्यांनी चला यारे म्हणल्यावर कावळे रस्त्यावर फरसाण टिपायला.
आणि एक स्पेशल कावळा आहे तो फरसाण हवेत उडवल्यावर कॅच करुन खातो.
हे नवल वाटलेले पहिल्यांदाच पाहिल्यावर.

मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डोमकावळ्याच्या आकाराचा आहे.तसेच याला लाल कावळा,सुलक्षणी,कुंभारकुकडी या नावानेही ओळखतात.[१] याला इंग्रजीत Greater Coucal or Crow Pheasant असे म्हणतात तर याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus sinesis) असे आहे. भारद्वाजही ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही.

झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वसतीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज जास्तवेळ जमिनीवर राहतो. नर-मादी सारखेच दिसतात. लहान-मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर,सरडा हे याचे मुख्य अन्न आहे.

एकाने कुप कुप कुप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो आणि हा खेळ एका मागे एक ५ ते २० वेळापर्यंत आवाज काढून सुरू राहतो. भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धा स्थान आहे.

या कबुतरांनी फार उच्छाद मांडलाय. त्यांना म्हणाव जा त्या पिंडदानाला..कावळ्यांच प्रस्थ जरा कमी करा!>>>>>> मोठ्ठी सहमती.

कावळ्यांच्या जातीतला भारद्वाज पक्षाचा प्रथम मान असतो. तो तोंड लावत नाही तो पर्यंत इतर कावळे पुढे येत नाहीत.>>>>> भारद्वाजपक्षी वेगळा आहे.

कावळ्यांवर लिहिणारच होतो पण तंबी वाचली आणि थांबलो. आता बीसाहेब शेवटचा इशारा द्या जर ते आमच्या पिंडाला शिवून आत्म्याचं उत्थान करत नसतील तर आपणही कावळ्यांच्या पिंडाला गती द्यायची नाही.

>>>भारद्वाजही ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही.<<<

मग तो ह्या धाग्यावर काय टाकायला आला आहे?

भारद्वाज ~ डोमकावळा .. कन्फ्यूजन .. कोणी ठळक अक्षरात लिहून दूर करेल का ?

काही लोक सकाळी नजरेस पडणारा पहिला कावळा जर डोमकावळा असेल तर ते अशुभ असते असे मानतात यात काही तथ्य आहे का?

>>>काही लोक सकाळी नजरेस पडणारा पहिला कावळा जर डोमकावळा असेल तर ते अशुभ असते असे मानतात यात काही तथ्य आहे का?<<<

होय, डोमकावळ्याला अशुभ असते ते!

काही लोक सकाळी नजरेस पडणारा पहिला कावळा जर डोमकावळा असेल तर ते अशुभ असते असे मानतात यात काही तथ्य आहे का?<<<

मस्करी करू नका बेफी, आय अ‍ॅम डोम सिरीअस ! >>>>ऋन्मेssष,अहो कावळा काय नी मनुष्य काय दोन्ही निसर्गाचे भाग. मग एकाचे अस्तित्व दुसर्‍याला अशुभ कसे असेल?

अहो देवकी आय अ‍ॅम डोम सिरीअस म्हणजे मी कसला डोमबलाचा सिरीअस .. असे काही शुभअशुभ नसते हे मलाही ठाव आहे, अगदी घरातना बाहेर पडताना कावळा फांदीवरून उडत आडवा गेला तरी मी मागे फिरत नाही .. पण हे वरचे शुभअशुभ ऐकून होतो म्हणून विचारले इथे की कोण विश्वास ठेवते का यावर म्हणून .. कि पिंडाला शिवणारा कावळा तेवढी श्रद्धा आणि अशुभ डोमकावळा हि अंधश्रद्धा .. आपला तो सावळा आणि दुसर्‍याचा तो डोमकावळा .. Wink

Pages