ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2009 - 14:45

मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
IMG_1125.jpg
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh

मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai

काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?

प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत.. Happy

तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत एकदा पार पडलेल्या धमाल वविसाठी सर्व संयोजकांचे मनःपूर्वक आभार.....

चला मंडळी पटापटा वृत्तांत लिहा.. आणि सर्वात महत्त्वाचे.. प्रथमच वविला आलेल्या लोकांनी जास्तीत जास्त वृत्तांत लिहा बरका....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

अरे ये टायपा बिगी बिगी .. नायतं म्या सुरु व्हइन.. हां Happy

खूप धमाल आली. संयोजक व सासंचे आभार Happy मला अजून केपीचा अभिनय डोळ्यासमोरुन जात नाहिये Proud
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

धमाल वविची कमाल मज्जा!
समस्त संयोजकांचे हार्दिक आभार! Happy
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

>>अरे ये टायपा बिगी बिगी .. नायतं म्या सुरु व्हइन.. हां >> ए या मीनुला केक द्या रे कुणितरी.. Proud

नको नको दक्षे.. तिला बोलूदेत.. तिच्या भावना उचंबळून आल्यात तर त्या एकदाच्या बाहेर पडूदेत.. नाहीतर किती बरं त्रास होईल तिला.. Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

नी तिला अशी मुभा मिळाली तर साज्याला पळून जावं लागेल, वृ ऐवजी ती १३, १२ असं कायतरी
बडबडायला लागेल. Lol

इतके दिवस उत्सुकता होती रोज कुणाशी गप्पा मारतो, कुणाचे वाद वाचतो, वाद घालतो Proud ते सगळे प्रत्यक्ष कसे आहेत ते बघण्याची. ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण झाली. आणि एक गोष्ट पटली आयडिज वरुन किंवा, इथल्या कमेंटसवरुन बांधलेली गृहितके पार कोलमडतात (चांगल्या अर्थी) प्रत्यक्षात पटकन सुर जुळुनही जातात. नविन मैत्री जोडायला नी आधी असलेली मैत्री घट्ट व्हायला ह्या ववीची मदत झाली.

बसमधे बसल्यापासुन जी धम्माल मस्ती सुरु होती ती बघणार्‍या बाहेरच्या माणसाला नक्की वाटेल कि हा एखादा कॉलेज किंवा त्याही आधीपासुनचा गृप चाललाय सहलीला. परकेपणा नावालाही नव्हता कुठे.

माझी तरी रोज हजेरी असते माबोवर म्हणुन माझ्याकरता सगळे आयडीज मुळे का होईना थोड्याफार परिचयाचे झालेले पण माझी लेक आणि नवरा ह्यांना कोणी माहीत नसताना देखील (अपवाद कट्टेकरी कारण आम्ही ह्या आधी भेटलेलो, सहलीला गेलेलो) कुठेही परकेपणा वाटला नाही.

-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार Happy

खर्रर्रर्रच खुप मज्जा आली .... संयोजकांचे आणि सास चे अभार !!
_____________________________
इथे प्रत्येकाला वाटतं, आपण किती शहाणे
यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे !!

सूचना : हातात दिवे घेऊनच वाचा! Happy
गेला महिनाभर ज्याची अखंड चर्चा चालू होती तो वविचा दिवस उजाडला. संयोजकांनी केलेल्या सूचनेनुसार पुण्याची बस राजारामपूल, सिंहगड रोड येथून निघणार असल्याने तेथून चढणारे माबोकर ठरल्याप्रमाणे साडेसात ते पावणेआठच्या सुमारास हजर झाले. बसही वेळेत आली होती. परंतू एका धडाडीच्या संयोजकांची उणीव भासत असल्याने सारे त्यांची वाट पाहत थांबले होते. मग, त्यांच्या पत्नीला वविला येता येणार नसल्याने त्यांचा पाय घरातून निघत नसावा असा निष्कर्ष काढून आम्ही बसच त्यांच्या घराजवळ नेली. अखेरीस त्यांना आमच्यासोबत यावेच लागले. गणपती बाप्पा मोरया असा श्रीगणेशा करून बसने पौड रोडच्या दिशेने कूच केले. तिथे मीन्वाज्जी, अरुण आजोबा अशी ज्येष्ठ मंडळी खाऊच्या पिशव्या घेऊन बसची वाट पाहत तिष्ठत थांबलेली दिसताच आम्ही हळहळलो आणि "तुम्ही मागून सावकाश या" असे म्हणत तत्परतेने त्यांच्या हातातील खाऊच्या पिशव्या खिडकीतून आधी आत घेतल्या. अशा रितीने सगळा अवजड माल गाडीत भरल्यावर गाडी मावळसृष्टीच्या दिशेने निघाली.
लगेच सांस च्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मीनू, दक्षिणा सांसचे कार्यक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली. अंताक्षरीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच दक्षिणाने 'रे भोळ्या शंकराsssss" हे गीत हातात दोन फरशीचे तुकडे असल्याचे दाखवून साभिनय सादर करुन, नोकरी गेल्यास रेल्वेच्या डब्यात फिरुन एकट्या माणसाने करायचा कोणता उद्योग करायची आपली तयारी आहे याचीच चुणूक दाखवली. अंताक्षरी खेळून बोअर झाल्यावर डमशेराज खेळायला सुरुवात झाली आणि अँकीने दिलेला पहिलाच चित्रपट आज्जीला मूकाभिनय न करता आल्याने त्यांच्या गटाची विकेट पडली. त्यानंतर "मराठा तितुका मेळवावा" ची खूण अँकीने १०० वजा ४= ? असे करुन ९६ उत्तर दिल्याबरोबर आम्ही मराठा तितुका मेळवावा ओळखल्याने अँकीच्या हुशारीचे कौतुक करावे की ओळखणार्‍यांच्या तल्लख बुध्दीचे हे न कळताच बसमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला! एकेक करुन सर्वांनी या खेळात सहभाग घेतला. एवढे होईतो मला आनि अ.आंना जाम भूक लागली होती. पण त्या खाऊच्या पिशव्या आज्जीच्या ताब्यात असल्याने तिने काही प्रेमापोटी (?)आमच्या पोटात काही जाऊ दिले नाही.
तेवढ्यात बस थांबली. काय झाले पाहताच लक्षात आले की जेमतेम बस मावेल इतकासा एक अरुंद पूल समोर आला आहे आणि त्याखाली दुथडी भरुन \चहा वाहतो आहे! अर्भाट, साजिरा, हिम्या, मया असे खंदे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत हे पाहून आम्ही निश्चिंत झालो. तरीही बिचारी श्यामली भयभीत झाली होती. देवा शेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. बस काही हलत नव्हती. अखेरीस जेरीस येऊन तिने "आपण इथेच उतरूया का?" असा नामी उपाय सुचवला. कारण तिच्या मते बस जर पुलावर अडकली तर आपल्याला कुठूनच उतरता येंणार नाही.. मग घरी जाता येणार नाही..मग बकलावा करता येणार नाही.. असे एक ना दोन अनेक प्रश्न तिच्या पुढ्यात नाचत होते. शेवटी आजोबांच्या सल्ल्यानुसार ती डोळे मिटून बसली. तिच्या धाव्यामुळे किंवा देवाच्या कृपेमुळे बस एकदाची निघाली. (नंतर लक्षात आले की हिम्या, मया, आज्जी ही सारी मंडळी मागेच बसल्यामुळे बस पुढे खेचली जात नव्हती. काय झाले हे बघायला हे लोक एकदम पुढे गेले आणि बसला पुढच्या बाजूने जास्त फोर्स मिळाला अन त्यामुळे बस निघाली!) तरीही बसमध्ये आवाज फारच कमी वाटत आहे याची जाणीव सर्वांना होऊ लागली. इतक्यात कुणीतरी मीनूला "आज दुसरा लाऊडस्पीकर कुठे आहे?" अशी विचारणा करताच तिने "आज तो आपल्या आजारी पिलाची शुश्रूषा करत मातेची कर्तव्ये पार पाडत आहे" असे उत्तर दिले. ही उणीव आज आपल्याला सतत भासत राहणार या कल्पनेने सारेच हळहळले.
पुलाच्या धक्क्यातून बाहेर येत नाही तोच अजून एक प्रसंग आमच्यावर ओढवला.ड्रायव्हर रस्ता चुकला आणि मायबोलीच्या या परंपरेला याही वर्षी अपवाद झाला नाही. पुन्हा एकदा खंदे कार्यकर्ते पुढे सरसावले. या गोंधळामुळे पुण्याच्या आधी मुंबईची बस पोचेल आणि आपले जंगी स्वागत होईल या कल्पनेने खरंतर आम्ही हुरळून गेलो होतो. पण तसे व्हायचे नव्हते! साधारण साडेदहा वाजता आमची पालखी विसाव्याला पोचली. आणि साक्षात शंकर पार्वती आम्हाला सामोरे आले! त्यांच्या दर्शनाने आम्ही पावन झालो. केपी सकुसप त्याच्या रथातून आधीच तेथे पोचला होता. सकाळपासून घसे ताणल्यामुळे सगळ्यांना सणकून भूक लागली होती. मस्त गरम पोहे उप्पीटाचा नाष्ता झाल्यावर कढत चहाने सगळ्यांनी घसे शेकून घेतले.
आता मुंबईची बस येईतो काअय करावे हा विचार करत असतानाच १३ आणि १२ नंबरच्या खोल्या आपल्याला मिळाल्या आहेत हे आनंदाने ओरडतच साजिरा आला. त्याला नक्की आनंद कशाचा झालाय म्हणजे खोल्या मिळाल्याचा की १३ आणि १२ नंबरच्याच खोल्या मिळाल्याचा हे (न )कळल्याने आम्ही साशंक मुद्रेने त्याच्याकडे पाहत राहिलो!
खोल्यांमध्ये सामान वगैरे ठेवल्यावर "हॉल" वर चला असा आज्जीने फतवा काढल्याने आम्ही सारे आज्जीच्या मागे निघालो. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आज्जीने रस्ता माहित नसल्याचा निर्वाळा दिला. (परंपरा!)
कोलंबसाच्या आवेशात ती हॉल शोधायला निघाली. खाली पसरलेले घनदाट जंगल, वरुन पडणारा रपारप पाऊस यात एखादा वाघबिघ सामोरा आला तर या कल्पनेने घाबरुन जाऊन आज्जीला हॉल सापडला तर आवाज द्यायला सांगून आम्ही तेथेच थांबलो . बराच वेळ झाला तरी आज्जी आवाज काही देइना आणि दिसेनाशीही झालेली. आमच्या मनात नसत्या शंका! पण आत्मविश्वासाने अतुल की रामचंद्र ? म्हणाला "अरे घाबरताय काय? आज्जीला शोधू नका ..त्यापेक्षा पळून जाणारा वाघ दिसतोय का पहा."
शेवटी एकदाचा कोणत्याच बाजूने भिंत नसलेला, गोल छप्पर आणि ओली फरशी असलेला दिमाखदार हॉल आम्हाला सांस चे कार्यक्रम करण्यास मिळाला. लहान मुले पळापळी खेळू लागलेली पाहताच आज्जी व अतुल ला आपले बालपण आठवलेआणि त्यांनीही लंगडी घालायला सुरुवात केली आणि सतत दहा मिनिटांच्या धरणीकंपाने अवघी मावळसृष्टी दणाणली.
बारा वाजता मुंबईची बस येऊन मुंबईकर सकाळचा नाष्ता करतायत अशी खबर आल्यावर आजच्या दिनक्रमात थोडे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार सारे जण धबधब्याच्या दिशेने निघाले. रामचंद्र यांच्या नेतृत्वाखालील तुकडी पाण्याच्या आवाजाच्या विरुध्द दिशेने का गेली या देवाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. धोधो वाहणारा धबधबा , वरून पडणारा रपारप पाऊस यात चिंब भिजूनही एकमेकांच्या अंगावर हाताने पाणी उडवणारे महान माबोकर चाणाक्ष कॅमेर्‍यांनी टिपलेले आहेत.
आता १३ व १२ मध्ये कपडे बदलण्यासाठी एकच झुंबड उडाली. ओल्या कपड्यांनी कुडकुडत असताना पटपट आवरुन दरवाजे उघडण्याची घाई करताना नळावरचे सुखसंवाद ऐकायाला मिळतील काय असा विचार मनात येत असतानाच.."ओल्या कपड्यांमुळे खोलीचे नुसते तळे झाले आहे अगदी". "विचार करा, हे विचारतळे तर नाही ना?" अशा संवादांमुळे हास्याची खसखस पिकली.
तीन वाजता भात आमटी,मटकीची उसळ, बटाटाभाजी, पोळी, कढी, अळूची भाजी, मसालेभात, पापड, कोशिंबीर, गुलाबजाम अशा सुग्रास भोजनाचा आस्वाद सार्‍यांनी घेतला. त्यातही त्या वाढप्यांनी काही पदार्थ लपवून ठेवून चापलूसी करत असल्याचे घारुआण्णांच्या घारीसारख्या नजरेने अचूक हेरले. त्यांनी जरा दरडावून "पापड कुठेत रे?" असे विचारताच घाबरगुंडी उडून त्या बिचार्‍या वाढप्याने पापडाचे आख्खे पिंपच परातीरत रिकामे केले! असे भरपेट सहभोजन झाल्यावर त्याच उपाहारगृहाचा सां.स. च्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये रूपांतरण करण्यासाठी साजिरा, हिम्या यांनी शब्दश: ढोरमेहनत घेतली.
वेळेअभावी ओळख परेडचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची सांस सदस्यांनी घोषणा करताच उगाच माxxxच्या हातात कोलीत देण्याची पंचाईत टळली म्हणून एक मोठा नि:श्वास बाहेर पडला. मग हिंदी-मराठी चित्रपटागीतांवर आधारीत कार्यक्रम दक्षिणाच्या सुरेल गाण्याने सुरु झाला. त्यात ४ जणांचे ५ गट असून वेगवेगळ्या बीबींची नावे त्यांना देण्यात आली होती. भेंड्या, ड्मशेराज असे खेळ खेळत कार्यक्रम रंगात आला होता. रामचंद्र यांना "मसक्कली" या गाण्याचा मूकाभिनय करायचा होता. त्यासाठी त्यांनी हाताचा पहिले बोट वर बाकीची बोटे मिटलेली अशा स्थितीत दोन्ही हात एकदा खांद्यांच्या रेषेत वर व एकदा गुडघ्यांपाशी असा कवायतीचा प्रकार सादर केला. साहजिकच तो त्यांच्या गटाला ओळखता आला नाही. पण चतुर आज्जीने नंतर ते गाणे "यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी" असल्याचे ओळखले आणि प.सं. लावा मध्ये आपली मक्तेदारी असू शकते हे सिध्द केले. त्यानंतर एक "बझर राऊंड" होता. प्रथम हात वर करणार्‍यास प्रथम संधी हे ऐकताच मी व अँकीने सूत्रसंचालकांच्या अल्ट्राऑडिओविज्युअलपॉवर बद्दल शंका उपस्थित केली. त्यावर उपाय म्हणून साजिरा शूटिंग करत असल्याने त्याला थर्ड अंपायर म्हणून घोषित करण्यात आले. थर्ड अंपायरची गरज आम्हाला पहिल्याच प्रश्नाला लागल्याने बझर राऊंड बाद झाला! असे करत अखेरीस गजाली (मी, नी, अँकी व राज्या) आणि पुपु (नीलवेद, विनय भिडे.. (बाकी २ नावं सांगा कुणीतरी प्लीज))यांच्यात टाय झाला. टायब्रेकर म्हणून एक प्रश्न विचारताच त्यात पण टाय झाला. शेवटी "आता आम्हाला एकेक टाय देऊन टाका" या आनंद केळ्करांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन अजून एक प्रश्न विचारला गेला. अँकीने त्याचे अचूक उत्तर दिले. पण नीलवेदला रेखाच्या कोणत्याही ३ चित्रपटांची नावे सांगताना रेखावर त्याची विकेट पडून काय काय आठवावे हे न कळून त्याला तिसरे नाव सुचले नाही आणि आमचा गट विजयी झाला!
दोन कार्यक्रमांच्या मध्ये फिलर म्हणून मायबोली क्विझ ठेवण्यात आला होता. (सांस चे पाठांतर/ अभ्यास कमी असल्याने त्यांनी उत्तरे मागच्या पानावर लिहून ठेवली होती. ) त्यात अर्भाटला प्रश्न विचारायच्या आधी प्रेक्षकांकडून "अ‍ॅक्टिव्ह असतोस का?" असे विचारण्यात आल्यावर त्याने"नाही" असे उत्तर दिले व मागुन "आयडी म्हणून नसतो व्यक्ती म्हणून आहे" अशी पुरवणी का जोडली हे नंतर आम्हाला कळालेच. त्याला "मायबोलीचे नवे प्रशासक कोण?" असा प्रश्न विचारताच त्याने त्यांच्या नावासकट आयडीही सांगितला. माबोवर अर्भाट या आयडीने इनअ‍ॅक्टिव्ह राहूनही इतकी लेटेस्ट माहिती कशी याचा उलगडा आम्हाला तात्काळ झाला!अर्भाट सवयीनुसार वविला देखील रोमातच हिंडत होता. या क्विझ मध्ये राज्या, नीधप, दीपूर्झा यांनी बक्षीसे मिळवली. अक्षरवार्तामध्ये प्रसिध्द झालेल्या ९ पैकी ४ पुस्तकांची नावे कुणालाच न आठवल्याने माबोकरांच्या साक्षरतेबद्दल शंका उपस्थित झाली. तरीही त्यात नीलवेदने २ नावे बरोबर सांगितल्याने बक्षीसाची अर्धी बशी त्याला द्यावी का हा प्रश्न अनिर्णयित राहिला.
मग सुरु झाला शब्दखेळ (की शब्द्छल?) यात मराठी पुस्तके, म्हणी व शब्द ओळखा असे राऊंडस होते. त्यात हिम्याला एक पुस्तक क्ल्यू देऊन इतरांना ओळखायला लावायचे आल्यावर क्ल्यू म्हणून त्याने आधी अनिल कपूर व नंतर "खूप मोठा" असे सांगितले. सारेच जण अचंबित झाले! कुणी म्हणे स्लमडॉग मिलेनियर का? पण नाहीच! अखेरीस ते पुस्तक "महानायक" असल्याचे कळताच सगळ्यांच्या हसून हसून गडाबडा लोळणार्‍या बाहुल्या झाल्या! केपीला "गाढवाला गुळाची चव काय" याचा मूकाभिनय साजिरा व मयुरेश यांना करुन दाखवायचा होता. त्यात त्याने गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण' आपण या आधी का नाही ओळखला असे वाटून नेहाला भरुन आले. तो गुळाची खूण करताना ऊसापर्यंत पोचला कारण त्याला प्रत्येक गोष्टीचा मूळापासून विचार करण्याची सवय आहे.अर्थातच ही म्हण मयुरेश व साजिरा यांनी न ओळखून ती सिध्दच करुन दाखवली. अ.आंना सहज ओळखता येणारे या दोन लागोपाठच्या राऊंडस मध्ये एकदा तोंडाने बोलून क्ल्यू द्यायचे होते व एकदा मूकाभिनय करायचा होता. त्यात स्पर्धक बरोब्बर उलटेपालटे करत असल्याने म्हणजे मूकाभिनायत बोलणे, आणि क्ल्यू देताना मूकाभिनय करणे सर्वांचीच मजेदार करमणूक होत होती! शब्द ओळखा मध्ये "जेवणावळ"असे सोपे आणि सतत वापरलेले शब्द अ.आंनाच आल्याने यात कुठे पार्शियालिटी तर नाही ना असा संशय प्रेक्षकांना आला. या खेळात विनय भिडे यांचा ग्रुप विजयी झाला.
या नंतर विजेत्यांना तसेच संयोजक सांस चे सदस्य यांना बक्षीस वाटप करण्यात आले. तोपर्यंत बाजूला केक, बाकरवडी, वेफर्स चहा कॉफी याची चोख व्यवस्था लावण्यात आली. चहापान झाल्यावर एकमेकांचा हसत निरोप घेत सर्वजण आपापल्या बशीत बसले! बसमधून जाताना साजिरा याचेबरोबर मित्रप्रेम, माणुसकी, सुखाच्या गप्पा, एकहजारतीनशेबारा नंबरची खोली या विषयावर मी, दक्षिणा, नी व मीनू या चां. चौकडीच्या मौलिक गप्पा झाल्या. ज्याला जिथे उतरायचे तिथेच त्याला उतरवून बस शेवटच्या थांब्याकडे निघाली. शेवटी मी , हर्षद व आर्फी उतरणार असल्याने बसमध्ये काही विसरले असल्यास ते योग्य व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवून संयोजक घराकडे परतले. आम्हाला बसच्या माळ्यावर एक लेडिज चप्पल आढळली. ती पाहून एक चप्पल मागायला लोकलाजेस्तव (!) कुणी येणार नाही व ती विकून पैसेही यायचे नाहीत असा तात्विक विचार करुन आम्ही ती चप्पल मायबोलीकरांची आठवण म्हणून बहाल करायचे ठरवून बसमधून उतरलो (त्यामुळे जिची कुणाची ती असेल तिने नवीन चप्पल खरेदी करायला हरकत नाही. )व घराच्या दिशेने चालू लागलो!

तळटीप : इतका उत्कृष्ट ववि संयोजक, सांसचे सदस्य, टी शर्ट समिती सदस्य व हातभार देणारे सारेच जण यांच्या अपार मेहनत व मूल्यवान वेळाशिवाय यशस्वी होऊच शकला नसता. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! अतिशय अनुभवी संयोजन व सहकार्य यामुळेच कोणतीही गडबड गोंधळ न होता हा व वि पार पडला याचे श्रेय त्यांच्याबरोबरच वविला आलेल्या माबोकरांचेही आहे! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

(मला मुंबईकरांविषयी अधिक माहिती नसल्याने मी त्यांचा नावानिशी उल्लेख करु शकले नाही , काही गोष्टी ओघात राहून गेल्या असल्या तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. उत्साही माबोकर यात भर घालू शकले तर त्यात मला आनंदच आहे!) Happy

ऐश केलेली दिसतेय लोखो! करा करा!

आशु Happy मस्त लिहिलयंस वर्णन एकदम.
फक्त एक बदल, आपण आधी रस्ता चुकलो होतो मग पुलावर अडकलो होतो. Happy

आशु, छान वृत्तांत ! पण शब्दखेळात विनयचा गृप विजेता व आमचा (कविता नवरे गृप) उपविजेता ठरला Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सॉरी लोक्स! मी वर लिहिल्याप्रमाणे, काही चुकले असेल तर तुम्हीच इथे तुमच्या पोस्टीत बरोबर ते नमूद करा. मला थोडाच वेळ माबो अ‍ॅक्सेस असल्याने मी ते दुरुस्त करु शकेनच असे नाही.

हो आणि अंताक्षरी मधे उपविजेत्या गटात विनय भिडे नव्हता..
आनंदसुजु, आनंदमैत्री, घारूअण्णा आणि नीलवेद होते.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

चुकांच्या दुरुस्तीसोबत तुमचे वृत्तांतही लिहा की Happy
आशू, धन्स Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

लगेच सांस च्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मीनू, दक्षिणा सांसचे कार्यक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली. अंताक्षरीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच दक्षिणाने 'रे भोळ्या शंकराsssss" हे गीत हातात दोन फरशीचे तुकडे असल्याचे दाखवून साभिनय सादर करुन, नोकरी गेल्यास रेल्वेच्या डब्यात फिरुन एकट्या माणसाने करायचा कोणता उद्योग करायची आपली तयारी आहे याचीच चुणूक दाखवली.>>>>>

Lol
Biggrin
Rofl

शेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. >>
त्यात त्याने गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण' आपण या आधी का नाही ओळखला असे वाटून नेहाला भरुन आले.>>>
Lol
या ज्युमाने इथे वृतांतात पण लावला का पयला नंबर?

एकदम धम्माल ववि झाला. बसमध्ये प्रचंड मजा, मावळसृष्टीचे जादूई वातावरण, झिम्मड पाऊस (हे एक बरे झाले. पाऊस न आल्यास पैसे परत मागण्याची प्रेमळ धमकी काही प्रेमळ माबोकरांनी दिली होती), पुर्ण भरात आलेला धबधबा, अन नितांतसुंदर झालेले सांस्कृतिक कार्यक्रम, माबोकरांची मोठी उपस्थिती.. इ. अनेक गोष्टींसाठी हा ववि लक्षात राहील. होऊ शकणारे गोंधळ वेळीच निस्तरल्याने काही अडचणी आल्या नाहीत. सर्व मायबोलीकरांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे हे कार्य सुखरूप सिद्धीस गेले.

वोक्के. झाला माझा वृत्तांत. Proud

हायलाईट्स टाकणार होतो. पण त्यात सारे भारदस्त व्यक्तिमत्वांचे, व्यापून अन भारून टाकणारे सिनेमास्कोप चेहरेच आठवत आहेत. काय करावे? Proud

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

आशू, मस्त वर्णन..
मी चुका शोधतोय अजुन.. :p

साज्या तू पण तुझी कामगिरी चोख पार पाडलीस १३-१२ नंबर घेऊन..

साजिरा बिचारा त्या भारदस्त(??) Proud चेहर्‍यांमध्ये असणार नाही, कारण पुर्णवेळ तो स्वत: केमॅरा घेऊन सर्वांना शूट करण्यात बिझी होता

धमाल आली. Lol आशु मस्त वृत्तांत.

शेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. >>
गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण'>>>
ही म्हण मयुरेश व साजिरा यांनी न ओळखून ती सिध्दच करुन दाखवली>>> Lol

मला काही गोष्टी खटकल्या पण एकुणच सां. स. व संयोजक घेत असलेल्या कष्टांपुढे त्यांना फारसे महत्व द्यावेसे वाटत नाही. संयोजक, सां.स. व टीशर्ट समिती तसेच हा ववि परत एकदा यशस्वी करणार्‍या सर्व पडद्यामागच्या सभासदांचेसुध्दा मनःपूर्वक आभार व अभिनंदन. Happy

आशू, मस्त वृत्तांत. २००४नंतर मी हुकवलेला हा पहिला ववि. Sad वृत्तांत वाचून समाधान मानावे झाले. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

माते आमच्या ध्यानात आलेले आहे.. तू प्रश्नरुपाने तिथेच उपस्थित होतीस ते... Lol
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

आशु- मस्त वृत्तांत. मजा आली वाचून. Happy

बरं, लोकहो आता जे लोक धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेले होते त्यांना एक प्रश्न.
कालच्या हजर मेंबरांमधे (मेंढरांमधे असे वाचल्यास त्या व्यक्तीचा दृ.दो. :फिदी:) एक नव परिणीत जोडपे होते जे धबधब्याच्या खाली गुडघाभर पाण्यात उभं राहून एकमेकांच्या अंगांवर चार थेंब मी तुझ्या अंगावर टाकतो,चार थेंब तू माझ्या अंगावर टाक स्टाईलने पाणी उडवत होते ते कोणते ? Proud
बरोबर उत्तरास बशी बक्षीस संयोजकांकडून अर्थात पुढच्या वर्षी Happy
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......

केदार१२३ आणि विज्ञा Happy
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

आशू, मस्त वृत्तांत एकदम.

मी मिसलं, मी मिसलं Sad

मुंबईकरांचा वृ‍ येऊ दे आता लवकर... बसमध्ये काय धमाल केलीत, कोण उशीरा आलं, कोणी काय खाऊ आणला होता, सगळं कळू दे..

कोण उशीरा आलं,<<
हा एका ठराविक मायबोलीकरीणीसाठी प्रश्न आहे का मंजुडे? Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Pages