ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2009 - 14:45

मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
IMG_1125.jpg
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh

मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai

काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?

प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत.. Happy

तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल, उखाणा मस्तच रे Happy
तु पडलास तेव्हा आमची अंताक्षरीची टर्न होती, त्यामुळे तेव्हा हसले नाही फारशी पण दुसर्‍या दिवशी आठवून आठवून हसू येत होतं Lol

~~~
मावळसृष्टी (ववि २००९) च्या निमित्ताने...

दुसरी बेल :
अरे बाबांनो आणि बायांनो फोटो टाका ना ...!
का नुसतं जळवता आहात ..
तुम्ही xxxxx तिथे तर मजा केलीतच आणि इथेही बीबी वर तोच धिंगाणा करुन आम्ही न आलेल्यांना जळवताय काय ...!
टाका लवकर फोटो नाहीतर मी तासाला पन्नास फोटो टाकीन बीबी वर आणि तेही एकदम फालतु मग बोलायच नाय आधीच सांगुन ठिवतोय !!!!!!

बिपिन, फोटो फक्त वविला आलेल्या लोकांसाठीच असतात.
इथे मनसोक्त जळालेले लोक पुढल्या वेळी वविला यावेत, त्यासाठी केलेली योजना आहे ही Happy

आणि प्रायव्हसी रीझन्ससाठी हे असे फोटो सार्वजनिक न करणेच योग्य असते.
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

अल्टिमेट बिप्या, उगाच अरण्यरुदन करु नकोस, काहीही उपयोग नाही त्याचा!
हां, आता मी जर गेलेलो अस्तो तर मी नक्कीच, निदान पोस्टस्टॅम्प साई़झ फोटो तरी नक्कीच इथे टाकले अस्ते, जिथे शक्य तिथे डोळ्यान्ना काळ्या पट्ट्या मारल्या अस्त्या! (कारण काहीन्ना त्यान्चे फोटो "पब्लिक्मधे" नकोसे वाटतात, साहजिकच आहे ते! - प्रायव्हसी रिझन- मला शब्द आठवत नव्हता)
पण यातल्या कशाचीही अपेक्षा तू करु नकोस
कारण एकतर तू वविला गेलेला नाहीस, त्यामुळे असले फोटो बघण्याचा "हक्क" तू "बाहेरचा ठरल्यामुळे" केव्हाच गमावुन बसलेला आहेस - तू "त्यान्च्यातला" नव्हतास, अन त्यातुन दुर्दैव तुझे की माझ्यासारखा उत्साही प्राणी जाऊ शकला नव्हता नाहीतर वर म्हणल्याप्रमाणे झाले असते! वेगवेगळ्ञा आयड्यान्व्यतिरिक्तचे तेथिल अनेक फोटो नक्कीच इथे टाकले अस्ते! काहि खास फोटो,फोटोतील आयडीची परवानगी घेऊन टाकले अस्ते Happy असो
हे सगळे विसर आता, वरल्या गाडी अन ब्यानरच्या फोटोवर समाधान मान, अन पुढच्या वर्षीच्या वविची वाट बघ!
तोवर मी पुढच्या वर्षीच्या वविकरता द्यायच्या सुचनान्च्या झब्बूत फोटोविषयक सुचना तयार करुन ठेवतो! Wink

[अन जमल्यास वविलाच जा, म्हणजे मग असल्या विनन्त्या करण्याची वेळच येणार नाही --- हा एक (महा)आगावु सल्ला! Proud ]

>>> अल्टिमेट बिप्या Rofl

>>>अन जमल्यास वविलाच जा, म्हणजे मग असल्या विनन्त्या करण्याची वेळच येणार नाही

लिंबूदा, येकदम सही बोला भाय Happy

~~~
मावळसृष्टी (ववि २००९) च्या निमित्ताने...

बिपीन जर तुझ्या खास ओळखीचे ववी ला गेले असेल तर त्या व्यक्ती कडुन तुला फोटो बघावयास मिळतील. पण खाजगीत. सार्वजनीक ठिकाणी नाही.

>>>>> जर तुझ्या खास ओळखीचे ववी ला गेले असेल >>>>
माझ्या खास ओळखीतले बरेच जण गेले होते
पण मी एकाहीकडे फोटो मागितले नाहीत, मागणारही नाही! माझ्या तत्वात ते बसत नाही! Happy

बाकी, "प्रायव्हसी रिझन" मुळे काही निवडक फोटो न टाकणे समजू शकते, मात्र एकही फोटो न टाकणे हे मज पामराच्या आकलनशक्तीबाहेरचे आहे!

तू वविला नव्हतास ना लिंब्या तेव्हा हा निर्णय तुझा नाही. तुला पटो न पटो. वविला गेलेल्यांचं जे म्हणणं आहे ते महत्वाचं. त्यातही मेजॉरीटी.
इथे आपण सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतो पण असे अनेक जण असतील जे रोमात असतील. मेंबर नसतानाही इथलं बरचसं वाचता येऊ शकतंच की. तेव्हा असे कोणी लोक त्या फोटोंचा मिसयुज करणार नाहीत याची काय गॅरंटी?
वविला लहान मुलं असतात, आपली कुटुंबे घेऊन येतात लोक... तेव्हा कुणाला जर त्यांची छायाचित्रे उघड करायची नसतील तर त्यात चुकीचं वाटण्यासारखं काय आहे हे माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचं आहे..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हे घ्या मावळसृष्टीचे फोटो..

DSC03720.jpgLGIM0184.jpgLGIM0185.jpgLGIM0194.jpg

ओक्के नाऊ? आता येणार ना पुढच्या वविला? Proud Proud Proud

कुणी प्रायव्हसी रीझन म्हणा, की अजून काही. वविकरांच्या व्यतिरिक्त फोटो दाखविले जाऊ नयेत, हा पॉलिसी डिसीजन आहे, आणि तो कुणी एकाने घेतलेला नाही. ववि हा पहिल्या पासून शेवटपर्यंत फक्त आनंदाचा व्हावा, यासाठी काही गोष्टी केल्या जातात, त्यातली ही एक.

अर्थातच सर्व मायबोलीकर इथे येऊन लिहू शकतात. परंतू हा वविच्या 'वृत्तांत व प्रतिक्रियांचा बीबी' आहे, हे लक्षात ठेवावे ही अतिनम्र विनंती. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

आहाहा ... तो ऐतिहासिक धबधबा Happy
धन्यवाद फोटोंसाठी Happy
-------------------------
Light 1

हाय, लेको खुप मजा केली ना,
फोटो इतकेच का?
पण पुढच्या वविला नक्की येणार

साज्या,
सॉलिड डोकं लढवलंस तू... Lol

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

ललि, अगाऊ बोचकी... Rofl

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

लले बरोबर आहे,
पुणेकरांनी ना आपण येइपर्यत तिथल्या शांततेचा कोरम फुल्टु पाळला होता

*************
सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

आता इथुन पुढे मी इथे काही पोस्टणार नाही
फक्त
ही लिन्क बघ रे साजिर्‍या..........
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/113322.html?1153840972
होप सो, तुला माझी फोटोन्ची आयडीया लक्षात आली तर येईल यावरुन

>>>>>>इथे मनसोक्त जळालेले लोक पुढल्या वेळी वविला यावेत, त्यासाठी केलेली योजना आहे ही>>>
या जळणासाठी मी ही थोडी लाकडं टाकीन म्हणतो...

" फोटो अतिशय सुन्दर आहेत रे, आणि बसल्या बसल्या परत मावळस्रुष्टीला जाउन आल्यासरखं वाटलं"

मिसलत रे लोकहो लै, पुढल्या वेळी दवंडीपासुन लक्श ठेवा रे

*************
सध्या चर्चा नको .....
पुढच्या सभेला अजेंड्यावर घ्या हा विषय, काय.....

फोटो सहीच रे.. परत एकदा सगळा परिसर डोळ्या समोर आला..

चांगभलं! वविच्या नावाने चांगभलं!!

दोनशे प्रतिक्रिया पुर्ण- वृत्त्तांत आणि प्रतिक्रियांच्या बीबीवर.

(हं. घ्या. हे माझं लाकूड. Proud )

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

नमस्कार मंडळी,

न आलेल्याना जळवण्याचा हेतु पुर्ण सफल Happy पुढच्या वर्षी भारतात आल्यावर वविला यायचा नक्की प्रयत्न करणार ..पोराबाळांसकट.

फोटो सार्वजनिक न करण्यामागचे नीधप यानी दिलेले कारण अगदी सयुक्तीक आणि योग्य वाटते. (विशेषतः कुटुंबे सहभागी असताना).

ववि संयोजकांचे अभिनंदन!

म्हणजे काय मनस्मी, कुटुंबाशिवाय आलेल्यांना काय प्रायव्हसी रीझन्सच नाहीत? ऐ.ते. न! Proud
उलट त्यांनाच तर जास्त.. Wink Lol

आशु,

Proud Proud

साज्या धन्स!! Happy

*********************

My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,
मला तुमचा हा फोटो न टाकण्याचा नियम माहीत नव्हता अन्यथा मी मागणी केलीच नसती (आणि मी स्वतः आलो असतो तर ...... सांगायची आवश्यकता आहे का ?) निसर्गात जाऊन माणसांची प्रकाश्चित्र काढायला मला तरी शक्य झाले नसते.......
त्यामुळे कृपया ह्या मुद्यांरुन कोणीही गुद्द्यावर येऊ नये.

आणखीन एक तुम्ही जळवताय हे मी आधीच जाहीर केले की आणि तुमचा जळविण्याचा हेतु सफल ही झाला की. ..... पण प्रत्येकालाच जमु शकेल वविला यायला असं होऊ शकत नाही. अनेक कारण आसतात न येण्याची. ......

<<<कारण एकतर तू वविला गेलेला नाहीस, त्यामुळे असले फोटो बघण्याचा "हक्क" तू "बाहेरचा ठरल्यामुळे" केव्हाच गमावुन बसलेला आहेस - तू "त्यान्च्यातला" नव्हतास, अन त्यातुन दुर्दैव तुझे की माझ्यासारखा उत्साही प्राणी जाऊ शकला नव्हता नाहीतर वर म्हणल्याप्रमाणे झाले असत<<<
लिम्ब्या : अगदी नेमके वर्मावर बोट ठेवले की तु
Rofl

साजिर्‍या : तु छान आइडीया केलीस की .... आणखीन काही असतील तर येऊ दे की. *(जरी माणसविरहीत असली तरी अर्थात वविमध्ये सामिल झालेल्यांची हरकत नसेल तर हं .. ) Proud

सगळ्यांनी खुप छान लिहिलं आहे.. विशेषत: मला आशु, यो व कृष्णा..क्रमश: वृ खुप आवडले. Happy
मायबोलीवर आल्यापासुन या पाच वर्षात कधीहि वविला नाहि जावु शकले पण वृ अन फोटो पाहुन जाउन आलेल्यांबरोबर मिहि वविचा आनंद घेतला. यावेळेसहि तुमची वविधमाल वाचुन मजा आली. Happy

आयला मी सगळे गेल्यावर आलोय बहुतेक...
पण मुद्दाम सांगावस वाटतय ते म्हणजे..अश्विनी धमशेराज खेळताना हावभाव करत होती आणि प्रभुणे आणि कविता ओळखत होते.... म्हण काहितरी राजा आणि डोळ्याची होती त्यात अश्विनी ४ बोट दाखवत होती .... किरुने म्हण पटकन ओळखली
" आंधळा मागतो १ डोळा आणि देव देतो " Lol

योग्या >>>>>
तरी बर मी दुसरा स्पिकर नाही आणला....

----------------------------------
रिमझीम रिमझीम बरसती धारा...

विन्या भावा, त्याने चुकीची ओळखली म्हण. ती "अंधेर नगरी चौकट्/पट राजा" ह्या म्हणीची अ‍ॅक्शन करत होती Proud

--------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात

Pages