ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2009 - 14:45

मायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.
या वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.
IMG_1125.jpg
पुण्याहून-
yashwardhan, vegayan, atlya, utima, arun, arbhaat, devdattag, ankyno1, kmayuresh2002,
shyamali, dakshina, palli, chandanam, rajya, samir_ranade, kandapohe, himscool, Ramachandrac, aashu_D, krishnag, prabhuneyogesh, SAJIRA, sushya, aarfy, deepurza, limayeparesh

मुंबईहून-
ash_ananya, kavita.navare, pranav.kawle, ashwini_k, gharuanna, vinay_bhide, neel_ved, lalita-preeti, anand_suju, yo.rocks, reena, anandmaitri, chetnaa, Indradhanushya, kedar123, ashbaby, amruitsaya, ladaki, nandini2911, kishormundhe, kiru, amar_kulkarni, aavli, zankaar, needhapa, svalekar, amitdesai

काय काय झाले या ववित? मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस? लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले? सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली? मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय? बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या? 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी? खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस? सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट? ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार?

प्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत.. Happy

तर, सावरून बसा लोकहो! सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ए, दक्षिणाने माझ्या प्रश्नाचं उत्तर टाळलं बघा.. अगं सांस चे काम संपले आता.. त्या रोलमधून बाहेर ये आणि न टाळता उत्तर दे बघू! Light 1 Happy

योग्या तसा ही तुला तिथे नेक्स्ट राऊंडला प्रवेश मिळाला नसता
अंडर एटी मॅच होती ती... Proud

.

बा द वे, मला त्यांचा राग आलेला असं तुला कोण बोललं?

हिम्स म्हणतो तसा खरच पांशाचा टँकर किंवा धबधबाच सोडा रे इथे.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

तर मंडळी, वविकरांसाठी प्रश्नपत्रिका तयार आहे. कुणाचीही मदत न घेता नॉनवविकरांनीही सोडविल्यास त्यांच्या पुढच्या वविचे पैसे मी भरणार. (स्लार्टी सोडवेलच. तेव्हा त्याला सदेह पुढच्या वविला घेऊन जायला मी आनंदाने तयार!) Proud

बस किती सीटर होती? (रंग कोणता? हा प्रश्न जुन्या सिलॅबसमधला झाला.)
१) ३५ सीटर २) ५० सीटर ३) ५० सीटरच. पण ट्रॅव्हल एजन्सीच्या म्हणण्यानुसार अशी मोठी गाडी मावळसॄष्टीच्या अरुंद रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने तिलाच ३५ सीटर म्हणायचे. ४) कुणास ठाऊक! दोनदोनसीटव्यापीव्यक्तित्वे गाडीत अनेक असल्याने समजलेच नाही.

बशीत आवाज कुणाचा सर्वात मोठा होता?
१) खुद्द बसचाच २) बसव्यापी मीनूचा ३) हजर नसलेल्या आवाजाला टोमणे मारण्याचा ४) पांढर्‍या शाईचा ५) बशीत आवाज? बक्षिसे म्हणून वाटलेल्या बशांचाही आवाज झालाच का शेवटी? तरीच म्हटले, सगळेच कसे काय छान झाले?!!

सहा फुट रुंद पुलावरून सात फुट रुंदीची बस कशी गेली?
१) मीनूने खाली उतरून बस ढकलली २) एक तरी माता होतीच की बसमध्ये ३) सर्वांनी प्रचंड आवाज करून ड्रायव्हरचे डोके खाल्ले. मग त्याने घाबरून, डोळे मिटून थेट फ्लाईंग गियर टाकला ४) संयोजकांचीच कमाल हो. दुसरे काय?

एकूण किती थोर आणि लहान मा.सृ. च्या भुमीवर उतरले?
१) ७२+१० २) १०+७२ (लहान मुले शहाण्यासारखी वागत होती हो. मोठ्यांनीच लहानांपेक्षा जास्त कल्ला केला.) ३) तो आर्फ्या स्वतःला लहान समजतो. मग कसे मोजणार? ४) आकाराने थोर म्हणायचे आहे का? मग खरेच अवघड आहे हो मोजणे!

नाश्त्याला चहा होता, की कॉफी?
१) 'चहा'ला घाबरून सारे कॉफीच प्याले. २) अ.आ.सारखे लोक कॉफी मागत हिंडताना दिसले, पण मिळालीच नाही बहूतेक. ३) चहाच होता. थंडीला चहाच बरा हो. कॉफी कसली मागताय?!

चहानाश्त्यानंतर लोक लगेच सांस्कृतिक हॉलमध्ये का गेले?
१) गेले, पण चालत नाही गेले. धडपडत, घसरत, ठेचकाळत, पाचेकशे फुटांच्या घसरगुंड्या खात गेले. २) सां.स. ला प्रचंड घाई झालेली कार्यक्रम सुरू करायची. ३) सांस्कृतिक हॉलात नाही, दरीत गेले, हरवलेल्या सां.स. ला शोधायला. ४) तो काय सां. हॉल होता? छपराखाली पण ओलागच्च असणारा ओटा होता तो. मीनूने संयोजकांकडे फुकट का थयथयाट केला, हॉल बदलून मिळण्यासाठी?

धबधब्याखाली कोण कोण काय काय करत होते?
१) नवपरिणित. दुसरे कोण? अन काय करत होते म्हणुन सांगू? २) सब गधे बारा टक्के. सार्‍यांनाच भिजून दंगा करायची हौस. नवपरिणितांना काय विचारता? ३) भिजल्यावर भयानक अवतार दिसत होते सारे. त्यामुळे ओळखू आले नाही. ४) धबधब्या'खाली' नाही. धबधबा अडवून उभे होते. यशवर्धन सारखे लोक तिथे बसल्यावर तर बंधारा बांधल्यासारखे पाणी अडत, किंवा दुसरीकडे वळत होते! ५) संयोजकच स्वतः चिंबून खिदळत होते. एकच बिचारा कोरडा राहून घसा खरवडत होता. तो कुणाकुणाला नि कायकाय बघणार?

जेवणात काय काय लिमिटेड अन अन्लिमिटेड होते?
१) मुळात पदार्थ काय होते, ते न बघता हादडले. चिंब भिजून दमल्यावर दुसरे काय होणार? २) लिमिटेड होते का काही? मी तर कढी ओरपली नि गुलाबजाम हादडले बेदम. (म्हणून नंतर कमी पडले की काय?) ३) बरेच काही लिमिटेड होते, पण आमच्याकडे घारूअण्णा होतेच ना कर्तव्यदक्ष पालक म्हणून! ४) ते काही असो. चव चांगली होती हो.

जेवणानंतर माबोकरांचा कब्जा कुणी घेतला?
१) विश्वव्यापी मिनू २) ७० एमेम पडदाव्यापी दक्षिणा ३) धाकदपटशावाली नंदिनी ४) असले काय काय बोलू नका हो. सां.स. म्हणा की.

मुकाभिनयात बाजी कुणी मारली?
१) केपीचे गाढव २) घारूअण्णा टीम ३) 'के' फॅक्टरवाली टीम. म्हणजे अँकी, केश्विनी, कविता यांची टीम. ४) संयोजक सामील असलेली टीम. औदार्य दाखवून, स्वतः हरले, म्हणून इतरांना जिंकायची संधी मिळाली. असे आजकाल कुठे होते का?

सर्वात गोड गळ्याने कोण गायले?
१) दक्षिणा नि मीनू असे उत्तर हवे आहे का? (सां.स. मधे चानस मारला नि काय!) २) आर्फी (आयूष्य म्हणजे कांदेपोहे, असे काहीतरी म्हणत होता निरागसपणे. 'बघायचा' प्रोग्राम चालू आहे की काय?) ३) आनंदसुजू (आयडीला साजेलसा घसा सुजला होता की हो!) ४) संयोजकांसह सगळेच गोड गायले हो. (एकदाचे. जास्त गायले नाही, हे नशीब.)

सर्वात छान नृत्यप्रदर्शन कुणी केले?
१) आशू_डी ने. (आपली टीम शेवटून दुसरी आली, म्हणून किती तो आनंद?!) २) घारुअण्णा (मुकाभिनय यशस्वी झाला, की काहीतरी अगम्य करतात. त्याला नाच म्हणायचे की नाही, यावर वाद होईल बहूतेक!) ३) सुश्या (नॉर्मलीपण जे काय करतो, त्याला नाचच म्हटले तरी चालेल.) ४) संयोजक (दिवसभर वेगवेगळी आयोजने करीत नाचत फिरत होते बिचारे.)

दिवसभर निमूट, सर्वात गरीब राहिलेला, सद्वर्तनी प्राणी कोण?
१) अतल्या (मीनूचा सर्वव्यापी वावर समोर चालू होता. करणार काय बिचारा? तशात बिचारा खुर्चीतून एकदा पडलाही. म्हणून माझी सहानुभूती त्याला.) २) मयूरेश (कार्याध्यक्ष खरे तर, आहेत फार बिलंदर. पण साळसूद 'दिसतात' तरी कमीत कमी.) ३) अरभाट (सारखा 'उभा' होता हो पोरगा. कामं करून दमला बघा.) ४) साजिरा (आजच नाही, नेहेमीच शांत असतो बरं हा.) ५) सारे गरीबच होते हो. ते दाक्झवायला स्टेजवर आले नाहीत, म्हणून काय झाले?

बक्षीसांवर काय कॉमेंट?
१) मागल्या वर्षी कप होते, आता बशा / प्लेटी. पुढल्या वर्षी किटल्याच बहूतेक. (फक्त जास्तीची वर्गणी मात्र मागू नका.) २) काजू ठेवण्यासाठी बशा दिल्या का? मग ग्लास कोण देणार? ३) मुकाभिनय करताना, गाणी अन पुस्तके ओळखताना फारच कष्ट पडतात हो, त्यामानाने बक्षीस लईच छोटे. ४) पुढल्या वर्षी वविच्या आधी आठ दिवस '२१ अपेक्षित' वगैरे रिलीज करा. म्हणजे एकापेक्षा जास्त मिळविता येतील.

---
नियम व अटी
१) भलीमोठी दिव्यांची माळ घेऊनच वाचावे, कृपया.
२) वरची कोडी-कम-प्रश्न सोडवून आमच्या कार्यालयात न पाठवता, स्वतःच ताडून बघावीत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे द्यावीशी वाटल्यास, तसे स्वातंत्र्य आहे, पण स्पष्टीकरण मात्र द्यावे. (म्हणजे तेही स्वतःलाच.)
३) एखाद्या प्रश्नाचे उत्तर 'यापैकी नाही' असे म्हणून निराळेच उत्तर शोधण्यास हरकत नाही. हेही स्वातंत्र्य आहेच.
४) मुंबईचेही पेपर सेटर आहेत, त्यांनीही इथे प्रश्नपत्रिका टाकावी.
५) परीक्षार्थींनीही स्वतःच पेपर सेटर बनून आणखी काही प्रश्न विचारायला हरकत नाही.

धन्यवाद.

दिपक, मस्तच प्रश्नपत्रिका Happy दक्स आणि आर्फि छान गायले. तुझा तो "पुत्र व्हावा ऐसा गुंडा...." वरचा अभिनय सॉलिडच होता हं. केपीची नात काय अन काय काय Lol

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

साज्या,
पुण्याच्या परतीच्या बशीतल्या चर्चेवर प्रश्न नाही काढलेस हिर्‍या...
मग तुलाच मोठ्ठी दिव्यांची माळ घ्यावी लागेल Proud

साजीर्‍या Lol सहीच. त्या धबधब्यापाशी स्वःत पाण्यात न उतरता वरचे तिडपे बघत होतास ना? लब्बाड. Proud

साजिर्‍या.. ही प्रश्न पत्रिका पुढच्या वविला विचारयला पाहिजे.. वविप्रश्न म्हणु...

काल एक सांगायचे राहून गेले... पुणे बसला लावलेला मायबोलीचा बॅनर हा 'रुमा'ने बनवलेला होता, जो नंतर सासंचे कार्यक्रम चालू असताना मागे लावलेला होता
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

ह.ह.पू.वा. !!!
भारी लिहिल आहेस साजीरया !!
आनंदसुजू (आयडीला साजेलसा घसा सुजला होता की हो!) >>> Happy

परतीच्या रस्त्यावर टवाळ लोकांनी माझ्यावर 'माणुस'की, चहा, ३७७ अशा विषयांवर हिणकस, द्वेषमुलक, व्यक्तिगत टीका व चर्चा करून माझे १२ च काय, पण अक्षरशः तीन-१३ वाजवून टाकले. यामध्ये ज्युमा, नीधप, दक्षिणा, मीन्वा, अर्भाट आघाडीवर होते. मया, हिम्या, देवा अन इतर अनेक टवाळ लोकही काड्या टाकून मजा बघत होते. Sad

या सर्वांचा मी इथे जाहीर निषेध करत आहे. Proud Proud

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ..

साज्या मला मध्ये घेऊ नकोस, मला तो समस पण दाखवला नाहीस, आणि माझं नाव मात्रं घेतोस होय?
फक्त मी तिथं हजर होते हाच काय तो मज बिचारीचा दोष? Proud

साजिरा, फुल्ल टू सुटलाय Lol
मला उत्तरं द्यायचा मोह होतोय, पण बशी नक्को मला म्हणून नाही देत Proud
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

पण बशी नक्को मला म्हणून नाही देत >>>.
का ग वैनी.. तुला गेल्या वर्षी कप मिळाला नव्हता का..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

वर आणि त्या माणसाची मजाल पाहीलीस? दोघी दोघींना घेऊन बसला होता.. >>>>>>>>

अरे हे तर काहीच नाही.
मी जरा लवकर धबधब्यातुन वर आलो तर हा कन्हैय्या पाण्यातच थोडा मागे उभा होता आणि त्या गोपींची क्रिडा चालु होती Proud ३७७ चा फायदा उठवत होत्या बहुतेक Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

द्वेषमुलक<<
?? आम्ही तर प्रेममूलक बोलत होतो. तुला काही करून तो विषय काढायचाय म्हणून तू असे हिणकस आरोप करतोयस.. तेव्हा मात्र तुझ्या मनात गुदगुल्या, उकळ्या असं काय होत होतं साजिर्‍या!

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>>तेव्हा मात्र तुझ्या मनात गुदगुल्या, उकळ्या असं काय होत होतं >> म्हणजे? Uhoh
आत्ता होत नाहियेत असं म्हणायचंय का तुला नी? Biggrin

वविचे फोटो कधी मिळतील बघायला?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

केश्विनी, आज कार्यध्यक्ष जरा त्यांच्या कामात बिझी दिसत आहेत. त्यांची कार्यबाहुल्यांतून सुटका झाली की पाठवतील ते सगळ्यांना फोटोची मेल......
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

साजिरा तिडप्याचं शूटिंग पण केलसं काय?

<<<<वर आणि त्या माणसाची मजाल पाहीलीस? दोघी दोघींना घेऊन बसला होता.. >>>>

कोणा कोणाच्या नशिबात काय काय लिहिलेले असते ते देवालाच माहित.

वविपेक्षा जास्त चर्चा त्या तिघांवरच होतेय असं नाही का वाटत?? आणि सर्व गम्मत जम्मत गृहित धरून सुद्धा आपल्याला भलत्याच लोकांबद्दल कुणीही काहीही बोलायचा अधिकार कुणी दिला आहे?? आपण एक मोठा ग्रूप घेऊन गेलो होतो ज्यामधे बायाबापडे, लहान मुलं सर्व काही मनसोक्तपणे पाण्यात खेळत होते. उद्या कुणी आपल्यापैकीच कुणाला असं म्हटलं तर चालेल का?

आपापसांत हवी ती चेष्टा करणे वेगळे आणि ज्यांचा संबंध नाही त्याची चेष्टा करणे वेगळे.

जवळ जवळ ऐंशी प्रतिक्रियांमधे वीसहून जस्त प्रतिक्रिया त्याच तिघांबद्दल आहेत. आणि बीबी वविच्या वृत्तांताचा आहे याचं भान राहू द्या.

ज्या गोष्टी आवडल्या हे जसं मनापासून सांगितलं तसंच जे खटकले, ज्यामधे सुधारणा अपेक्षित आहे तेही मनापासून सांगा. इथे सांगावंसं वाटत नसेल तर प्रत्यक्ष संपर्क साधून सांगा. शेवटी हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे तो यशस्वी करणे हे सर्वांचे काम आहे. Happy

--------------
नंदिनी
--------------

साजिर्‍या! Lol बिचार्‍या अतुलचा खुर्चीचा किस्सा विसरलेच होते मी . आणि आमची टीम काही शेवटून दुसरी नाही तर पुढून पहिलीच आली होती! तुला तसं नाचायला मिळालं नाही म्हणून का? Proud
नंदिनीला मोदक. त्या तिर्‍हाईतांबद्दल आपण बडबडून काय मजा? बोलण्यासारखे इतके विषय असताना!

तो बॅनर रूमाने केला होता हे आत्ता कळलं. मस्त आहे बॅनर.. Happy

आणि आमची टीम काही शेवटून दुसरी नाही तर पुढून पहिलीच आली होती!<< होना. साजिर्‍या का रे असं?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

फुल धमाल केलेली दिसतेय.
माझ्या नशिबात कधी असेल ववि?

जेव्हा ववि हवं ववि हवं असा ध्यास घेणार नाहीस तेव्हा.. Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Pages