भोसला मिलिटरी स्कूलबद्द्ल माहिती हवी आहे.

Submitted by जाई. on 7 September, 2014 - 05:07

नमस्कार,

एका नातलगाचा पाल्य सध्या चौथ्या इयत्तेत शिकत आहे. पुढिल शिक्षणासाठी त्याला भोसला मिलिटरी स्कूल मध्ये दाखल करावे असा त्यांचा मानस आहे. शाळेची वेबसाईट त्यांनी पाहिलेली आहे. तिथले प्रवेश पाचवी पासून सुरु होतात अस लिहिलेलं आहे. तर ह्या शाळेसंबंधी माहिती हवी आहे. एकंदरितच सैनिकी शाळा, त्यांचा अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती , त्यांची फी, पुढे सैन्यात प्रवेश करण्यासाठी मिळण्यार्या संधी याबाबतही माहिती हवी आहे.

मायबोलीकरांचे याबाबतीतले अनुभव जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा भोसला मिलिटरी स्कूल मध्ये पाल्याला पाठविण्याचा उद्देश काय आहे त्यावर ते अवलम्बून आहे. आर्मीत ऑफिसर करायचे असेल तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पहावा. किती विद्यार्थी आर्मीत कोणत्या रँक मध्ये गेले आहेत.ईत्यादी . महराष्त्रात सर्वोत्तम सैनिक स्कूल हे सातार्‍याचे सैनिक स्कूल आहे. त्यातून चांगल्यापैकी संख्ये ने विद्यार्थी एन डी ए मध्ये प्रवेशित झालेले आहे. हे स्कूल महारष्ट्र व भारत सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने चलवले जाते. त्यात सर्व्हिंग आर्मी ऑफिसर्स मिलिट्रई शिक्षणासाठी डेप्युटेशनवर असतात. अर्थात प्रवेश स्पर्धा परिक्षेतून होतो. याच्या शी भोसलाची तुलनात्मक माहिती घेऊन प्रवेश घेता येईल. बाकी औपचरिक शिक्षण आणि:"संस्कार '' करायचे असतील तर शाळा म्हणू भोसला चांगलेच आहे....

धन्यवाद रॉबिनहूड!

माझा ऊद्देश नाहीये . नातलगांचा ऊद्देश आहे.

महराष्त्रात सर्वोत्तम सैनिक स्कूल हे सातार्‍याचे सैनिक स्कूल आहे. त्यातून चांगल्यापैकी संख्ये ने विद्यार्थी एन डी ए मध्ये प्रवेशित झालेले आहे. हे स्कूल महारष्ट्र व भारत सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने चलवले जाते. त्यात सर्व्हिंग आर्मी ऑफिसर्स मिलिट्रई शिक्षणासाठी डेप्युटेशनवर असतात. अर्थात प्रवेश स्पर्धा परिक्षेतून होतो.>>>>> ऊत्तम माहिती. कळवते त्यांना.

. बाकी औपचरिक शिक्षण आणि:"संस्कार '' करायचे असतील >>> याचा अर्थ कळला नाही. Uhoh

फॉर्मल एज्युकेशन म्हणेजे ११ वी १२ वी पर्यन्तचे शिक्शण व अभ्यासक्रमाव्यतिरिक्तचे उपक्रंम घोडेस्वारी, देशभक्ती , धर्मभक्तीप्रद संस्कार.

इतकेच ? भालाफेक , बर्चीफेक , दांडपट्टा , वाघनखे घालणे.. हेही हवे बुवा ! अंबारीतुन मिरवणे , वाघिणीचे दूध काढणे हेही हवे.

नमस्कार!
मी पुण्यातल्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ६ वर्ष होते. ही शाळा फक्त मुलींसाठी आहे. एका वर्षी आम्हाला नेले होते भोसला मिलिटरी स्कूलला. खूप छान आहे शाळा. आंबोलीला (सिंधुदुर्ग) देखील अशी सैनिकी शाळा आहे. माझ्या ओळखीतली एक जण आहे जी माझ्या शाळेत ८-१०वी होती मग ११-१२ वी भोसलातून केले. गरज असल्यास तुम्हांला विपु मधून माहिती देऊ शकेन Happy

मला जी थोडीफार माहिती आहे सैनिकी शाळांची ती इथे देते.
बऱ्याच वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने 'प्रत्येक जिल्ह्यात एक तरी सैनिकी शाळा असावी' यासाठी बर्याच शालेय संस्थांना आवाहन केले. यातूनच मग जश्या मुलांसाठी आहेत तश्या मुलींसाठी सुद्धा शाळा सुरु झाल्या. माझी शाळा ही यांत पहिली. साधारणतः या शाळांमध्ये महाराष्ट्र बोर्डाचाच अभ्यासक्रम असतो १२ वी पर्यंत पण सगळ्यात मोठा फरक हा आहे कि ११-१२वी ला भाषेऐवजी जनरल नॉलेज म्हणून स्वतंत्र विषय असतो जो फक्त सैनिकी शाळांमध्येच शिकवला जातो. शिक्षण पद्धती त्या शाळेवर अवलंबून आहे. शाळेव्यतिरिक्त अभ्यासक्रम म्हटलात तर त्यात मैदानी खेळ, अश्वारोहण, रायफल शूटिंग, संचलन, कराटे, NCC , participation in School Band, योगा, सेल्फ डीफेन्स , जलतरण (हे माझ्या शाळेत नाहीये पण भोसला ला आहे), शाळेतर्फे मनाली-धरमशाला (mostly they send to Atal Bihari Vajpayee Institute of Mountaineering and Allied Sports) इथे ट्रेक्ससाठी पाठवणे असते.

अजूनतरी मुलींसाठी एन डी ए सुरु झालं नसल्याने त्याबद्दल मी माहिती देऊ शकत नाही.

मी इथे दहावीचे विषय देते. शाळा इंग्रजी मध्यम असावी कि मराठी कि सेमी इंग्रजी हा प्रश्न शाळेवर अवलंबून असतो मात्र नेहमीच्या विषयांशिवाय जसे कि मराठी, हिंदी, संस्कृत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान , Environmental Studies, Personality Development या शिवाय Health & Physical Education, Defense Studies हे विषय असतात.

If the cadet wishes to join army, then these schools provide them all guidance. My seniors are in Navy, Army and Air Force as well. They went through Short Service Commision. If not army, there are many field close to that for example AFMS - Armed Forces Medical Service. If you need more info about Bhosala Military School or any other Military School, please let me know. I will contact my teachers asap. Happy

Here is the link of my principal's interview which was published in The Indian Express: http://expressindia.indianexpress.com/story_print.php?storyId=1072968

सैनिक शाळेत गेले म्हणजे पुढे फक्त सैनिक म्हणुनच करिअर करावी लागते हा खुप मोठा गैरसमज आहे. १२ वी नंतर आपल्याला हवे ते फिल्ड घेता येते. माझ्या काही ताया ज्यांना सैनिक व्हायचे होते त्या सैन्यात गेल्या. बाकीच्या माझ्यासरख्या त्यांना हव्या त्या क्षेत्रात गेल्या आणि आज आपापल्या क्षेत्रात आमच्या शाळेचे नाव ऊंच करत आहेत.