सच्चाई का सामना

Submitted by शिवम on 16 July, 2009 - 10:52

दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या सवंगपणाबद्दल थोडंसं...

आजकल दुरचित्रवाणीवर वाहिन्यांचा इतका महापुर आला आहे की काही विचारता सोय नाही. जितक्या वाहिन्या तितक्याच त्याच त्याच प्रकारच्या मालिका, कार्यक्रम. मागिल काही वर्षात तर स्त्रिवर्गाला आकर्षित करण्याचा एकता कपुरने जणु विडाच उचलला अन मग "क" च्या संपुर्णतः काल्पनिक कौटुंबीक मालिकांचा सपाटा सुरू झाला. मग प्रत्येक वाहिनीवर थोड्या अधिक फरकाने त्याच त्याच मालिका दिसु लागल्या.

मध्यंतरी दुरचित्रवाणीवर 'सत्यताप्रधान कार्यक्रमां'चे (रिअ‍ॅलिटी शो) पेव फुटले. याची सुरुवात कधी अन कशी झाली माहित नाही. "कौन बनेगा करोरपती"नं तर प्रसिद्धी चे उच्चांक मोडले. अश्या कार्यक्रमातुन मुबलक पैसा अन प्रसिद्धी मिळते हे उमगल्यावर तर मग प्रत्येक वाहिनीवाले काही ना काही सत्यताप्रधान कार्यक्रम घेऊन हजर होऊ लागले; अन ते प्रेक्षकांच्या माथी मारू लागले.

अश्या काही कार्यक्रमातुन सामान्य ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, तर काहींतुन नवीन कलागुणांना वाव मिळतो. उदाहरणादाखल आपण सारेगमप, एका पेक्षा एक, नच बलिये, होम मिनिस्टर, कौन बनेगा करोरपती ही नावं घेऊ शकतो. पण असे अनेक कार्यक्रम आहेत की त्यातुन त्यांना काय द्यायचं आहे तेच कळत नाही. उदा. खतरोंके खिलाडी, स्वयंवर राखी का, इस जंगल से मुझे बचाव. यामध्ये आपण इ-टीव्ही वरच्या क्राईम डायरी चा ही उल्लेख करू शकतो.

कालपासुन स्टार टीव्ही वर "कौन बनेगा करोरपती" च्या धर्तीवर एक सत्यताप्रधान कार्यक्रम सुरू झालाय - नाव आहे "सच्चाई का सामना". हा कार्यक्रमही एका इंग्रजी कार्यक्रमाची कॉपी आहे. अगदी कुतुहल म्हणुन हा कार्यक्रम पाहण्यास बसलो.

कार्यक्रमाचे साधारण स्वरूप असे : २१ प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर स्पर्धकाला १ कोटी रुपये मिळणार. पण प्रश्न संपुर्णतः वयक्तिक जिवनाशी निगडीत. प्रश्नांची उत्तरं बरोबर की चुक हे कोणी व्यक्ति नव्हे तर मशिन ठरवणार. कार्यक्रमापुर्वी हेच सारे प्रश्न 'पोलिग्राफ टेस्ट' च्या सहाय्याने स्पर्धकाला विचारलेले असतात. त्या उत्तरांशी कार्यक्रमादरम्यान स्पर्धकाने दिलेल्या उत्तराशी बरोबरी झाल्यास उत्तर बरोबर, नाहीतर चुक. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक.

कालच्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणुन एक स्त्री होती. विवाहाला १६ वर्षं पुर्ण झालेली. पती अन २ मुलं असा संसार. कार्यक्रमादरम्यान पती, दीर, आई अन बहीन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकानं विचारलेले काही प्रश्न साधारणपणे असे होते :

(१) काय तुम्हाला लग्नापुर्वी माहित होतं की तुमचे सासरे तुमच्या पतीपेक्षा सुंदर आहेत ?

(२) तुमच्या आई-वडिलांचं तुमच्यापेक्षा तुमच्या भावावर जास्त प्रेम आहे म्हणुन तुमची मनातुन जळफत होत असायची का?

(३) तुमच्या मोठ्या बहिणीचे वापरलेले कपडे, पुस्तके तुम्हाला वापरावी लागत, म्हणुन तुम्हाला तिचा राग येत असे का?

(४) तुमच्या दुसर्‍या बाळंतपणाच्या वेळी तुमची आई जवळच असुनही तुमच्याजवळ आली नाही, यासाठी तुम्ही तिला माफ करू शकला आहात का?

(५) तुमच्या आईपेक्षा तुमची सासु तुम्हाला अधीक जवळची वाटते का?

(६) तुमचे पती पुन्हा दारूच्या आहारी जातील अशी अजुनही मनामध्ये भिती आहे का?

(७) तुमच्या पतीची हत्या करण्याचा विचार कधी मनामध्ये आला होता का?

हे, अन अश्या प्रकारचे प्रश्न उत्तरं मी शांतपणे ऐकत होतो. यावर कळस म्हणुन की काय सुत्रसंचालकानं हा प्रश्न विचारला...

(८) जर तुमच्या पतीला कळणार नसेल तर तुम्ही परपुरुषाची शय्या सजवाल का? (त्या प्रश्नाच हे सुसंस्कृत भाषांतर आहे. शब्दशः भाषांतर खुपच किळसवणं वाटलं असतं. अ‍ॅडमिनबंधु, कृपया यामध्ये काहीही काटछाट करू नका. लोकांनाही कळायला हवं!)

आता बोला!! हा प्रश्न ऐकल्याबरोबर माझं डोकंच गरगरायला लागलं. अन कहर म्हणजे तिने यावर "नाही" असं ठाम उत्तर देऊनही त्यांच्या मशिनने तिचं उत्तर चुक ठरवलं. या वेळी तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जर मी तिथे उपस्थित असतो तर नक्कीच पायातील वहाण काढुन त्याच्या श्रीमुखात सणकवली असती.

अरे काही तरी नितीमत्ता बाळगा. सत्यतेच्या नावाखाली काय तमाशा मांडता आहात तुम्ही? आपल्या समाजात घरी टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना कार्यक्रमातील ललनेच्या सौंदर्याची पतीराजांनी स्तुती जरी केली तरी पत्नी पतीशी भांडण करते. मग विचार करा अशा कार्यक्रमात पतीच्या समोर अगदी खुलेआम पत्नीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवले गेले तर त्यांच्या घरी नंतर काय वादळ निर्माण झालं असेल? २ मोठी कळणारी मुलं आपल्या आईबद्दल असं काही ऐकल्यावर काय विचार करतील? विचारच न केलेला बरा.

स्टार टीव्ही सारख्या नामांकीत वाहिनीवरील कार्यक्रमांची प्रतिमा इतकी खालच्या दर्जाची असु शकते यावर माझा विश्वासच बसेना. १ कोटीचं आमिष दाखवुन लोकांच्या भावनांशी खेळणं कितपत योग्य आहे? यात कसला आलाय खेळ? अशा कायक्रमातुन काय सिद्ध अन साध्य करु पाहता आहात तुम्ही? खरच तुम्हाला पैसे वाटायची इतकी हौस आहे का? प्रसिद्धी अन पैसा कमवायच्या हव्यासापोटी समाजाला कुठे घेवुन चालला आहात? तुमच्या अशा या बाजारू अन गल्लेभरू कार्यक्रमातुन कुणाची मनं दुखवली जातील, कायमची कटुता येईल, कुणाचे संसार उध्वस्त होतील याचं थोडंतरी भान ठेवा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवम,
तुझ्या विचारांशी मी १०० % सहमत आहे. तो आठवा प्रश्न वाचून असले कार्यक्रमच नव्हे तर या वाहिन्यानाही बंदी करावी , कार्यक्रमांवर जनतेनेच आता अंकुश ठेवायची वेळ आली आहे.असे वाटते.

बापरे! हे तर फारचं भयानक आहे! अमेरिकन लोकांसारखं वागण यालाच आता आपल्याकडे प्रगती म्हणतात!!
चॅनलवाले तर धंदाच करायला बसलेत... पण यांना असल्या कार्यक्रमात भाग घेणारे कुठुन सापडतात?
घरच्यांच्या भावना, मुलांवरचे संस्कार यापेक्षा प्रसिद्धी आणि पैसा प्यारा वाटतो यांना?!! दुसरं काय...

शिवमा.. मी ७ व्या प्रश्न्नापर्यंतच बघितला कार्यक्रम.. नंतर पुढे काहींच्या दृष्टीने "नेहमीचे" नि काहींच्या दृष्टीने "भयंकर" प्रश्न्न विचारले जातील याची खात्री होती.. म्हणून आधीच टिव्ही बंद केला.. कशाला उगीच दुसर्‍यांच्या खाजगी बाबींमध्ये रस घ्या.. !!

१ कोटीचं आमिष दाखवुन लोकांच्या भावनांशी खेळणं कितपत योग्य आहे?>> पण तितकाच दोष सहभागी होण्याराचा आहे ! त्यांना आधीच कल्पना दिलेली असते !! माझ्यामते तरी सहभागी होणारा फक्त पैशाचाच विचार करत असावा !! तेव्हाच तर निव्वळ पैशासाठी हे लोक जगासमोर खाजगी बाब सार्वजनिक करायला तयार होतात !

<<जगासमोर खाजगी बाब सार्वजनिक करायला तयार होतात !>>

खाजगी बाब खरी असली तरी मशिन म्हणेल तेच खरे. उदा. वरील आठव्या प्रश्नाचे उत्तर!! तेंव्हा अएरिकन जेरि स्प्रिंगरसारखा भारतात पण एक शो!
अजून थांबा, तो अगदी गलिच्छपणा करणारा हावर्ड स्टर्न आहे, जो बायकांना कपडे काढायला सांगतो, नि बायका काढतात पण, त्याच्या शो चीहि नक्कल तिथे होईल.
Happy Light 1

काय? हे असे प्रश्ण विचारले? ती स्त्री जिने भाग घेतला तिला हे असे प्रश्ण एकावे लागले? आश्चर्य आहे.

जोपर्यंत असे शोज बघणारे आणि त्यात भाग घेणारे आहेत तोपर्यंत हे चालत रहाणार. ह्याला फक्त टि व्ही वाल्यांनाच दोष देण्यात काय अर्थ आहे?

जेरी स्प्रिंगर आणि हॉवर्ड स्टर्न पैसे देउनच लोकांना शो मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावतात असे ऐकले होते.
जर अमेरिकेसारख्या समृद्ध देशात लोकं पैशासाठी अशा शोजमध्ये भाग घेतात, तर भारतात का नाही?

बघितला हा प्रोग्रॅम यूटूब वर. एकदम सीक...फालतु एकदम. फुकटची रडारडी काय तीची. एक टीचर असून असले प्रोग्रॅम करणे विचित्र वाटले. शेवटी त्या व्यक्तिला जर जनतेसमोर 'नग्न' च व्हायचे असेल पैशासाठी तर टीवीवर असले प्रोग्रॅम चालणारच.

श्शी एकदम बेक्कार क्नसेप्ट आहे. आणि लोक पण पेशा साठि कोणत्या थराला जातात.

हे म्हणण मला एकदम पटल.

अतिशय उथळ आणि फालतू कार्यक्रम आहे. १ कोटी काय १० कोटीसाठी सुद्धा कुणी असला खेळ खेळू नये आयुष्यात. त्या बाईचा अल्कोहोलिक नवरा, तिला ७व्या प्रश्नापर्यंत व्यवस्थित साथ देत होता कारण ते फक्त त्याच्या अल्कोहोलिझम त्याला मारण्याच्या विचारापर्यंत सिमित होतं. पण वर नमूद केलेला ८ वा प्रश्न तिला विचारल्यावर आणि मशिनने तिचे उत्तर चुकिचे ठरवल्यावर वातावरण जे तंग झाले ते सांगता सोय नाही.
या कार्यक्रमाचे प्रश्न काढणार्‍याच्या ढुXXX ला मिरच्यांची धुरी द्यायला हवी, प्रथम त्याला उभं करा हे खेळायला म्हणावं. दुसरं म्हणजे मला एक कळत नाही की पोलिग्राफ मशिन इतकं विश्वसनीय कसं काय? माणसानेच बनवलंय ना ते? Uhoh
या कार्यक्रमावर सार्वजनिक कल्याण संस्थांनी बंदी घालायला हवी,
लोक पण काय ना पैशासाठी काहीही करतात. Sad

उद्या अगदी एखाद्या सुखी पण गरजू कपल ने १ कोटी जिंकले समजा, पण त्यातून नको असलेले प्रसंग, इच्छा, विचार हे दुसर्‍या पार्टनरला कारण नसताना रिव्हिल होतील, मग त्यांच्यात नातं ते काय रहाणार?

सच का सामना एका हद्दीपर्यंत ठिक आहे, प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं खाजगी जीवन असतं ते असं पैशासाठी सर्वांसमोर उघडं करणं मला तरी चुकिचं वाटतं. म्हणून तर देवाने माणसाला खुप बुद्धी दिली माणूस त्यातून खूप समृद्ध झाला, त्याने वेगवेगळ्या टेक्नॉलोजिज डेव्हलप केल्या पण मृत्यू वर मात आणि दुसर्‍याच्या मनातलं ओळखण्याचं टेक्निक माणसाला कधीच हाशिल होणार नाही.

अरे हा सगळा बनाबनाया मामला आहे. मला नाही वाटत यातले काही खरे असेल. सुरुवातीच्या प्रसिद्धीसाठी आहे हे! खात्रीने सांगते स्वतःला भीरू म्हणवणारे आणि आंबटशौकीन दोघेही सारख्याच उत्सुकतेने हा कार्यक्रम बघावेत म्हणून केलेली सोय आहे ही!

"क" मालिका नाही का? सासु बघते कारण असे असावे माझ्या सुनेने सोशिक! असा असावा सासूचा, मोठ्यांचा दरारा! आणि सुना बघतात कारण - बघा मी नव्हते सांगत माझी "xxxxx" अगदी अश्शीच आहे ह्या सिरिअलमधल्या खलनायिकेसारखी! तसेच आम्ही नाही हो त्यातले पण ही सिरिअल पहावेत आणि आमच्यासारखे इतरही गर्तेत आहेत म्हणणारे हा कार्यक्रम बघावेत ह्यासाठीची उपाययोजना आहे ही!

अरे तो विनोद कांबळी सचिनच्या विषयी काहीतरी बकला आहे...ते याच कार्यक्रमा मधे काय ?
एकदम भिकार आहे हे तर Sad

लोक पैशांसाठी कुठच्याही थराला जातील Sad

भाग घेणारे आणि कार्यक्रम दाखवणारे दोघेही तितकेच दोषी आणि पैशांचे लोभी....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

पैशासाठी असलं काही करणं हे वाइटच , पण त्या बाईला इतकं सत्य बोलूनही काही पैसे मिळाले की नाही शेवटी ?
--------------------------------------------
कैसे मुझे तुम मिल गयी .......

शिवम, मी तुझ्या विचारांशी १०८ % सहमत आहे. मी ही हा भाग पाहीला होता.. प्रथमच आनी मला ही खुप राग आला त्या शेवट्च्या प्रश्नाच्या वेळी...
----------------------------------
जगदंब, जगदंब सारा भरवासा तुझा!!

तुमच्या मुली पेक्षा लहान वयाच्या स्त्री बरोबर तुमचा ..... झालाय का ?
ह्या प्रश्नाच उत्तर ज्याला प्रश्न विचारलाय तो 'हो' देत असेल तर जगातल कुठल मशीन ते उत्तर चुक ठरवु शकत? ???????????????????????????????????????
हा प्रश्न विचारण आणी त्याला उत्तर देण म्हणजे समाजातल्या नराधम पुरूषांना प्रोस्ताहन नाही का???
सत्य सांगण्याच 'धाडस' ह्या नावा खाली आपण केलेल्या कुकर्मां बद्दल वदन करण हा सत्य पणा झाला की बेशरम पणा?????????????????
लोक खालच्यातल्या खालच्या दर्ज्याची किंबहुन दर्जाहिन काम करुन त्याचा बोलबाला करुन पैसा आणी प्रसीध्दि मीळवताय ... भारतातल्या सामाजीक संघटना, स्त्री संस्था, समाज सुधारक झोपलेत की केवळ मोठ्या पडद्यावर काही दाखवल तर त्याचाच निषेध करायचा हा त्यांचा विडा आहे.... बाळा साहेब , शीवसेना ई. ई. सगळ्या भारताने पुढे येवुन हा कार्यक्रम ताबडतोप बंद केला पाहिजे!!!!

लंपट पणा जग जाहिर करण आणी मान्य करण म्हणजे ईमानदारी?????????? त्या साठी पैसे मीळतात वरुन समाजातले मुर्ख लोक टाळ्या पीटतात... हे काय चाललय!!!!!!!!!!!!!!!!!!!... जगात रीसेशन मुळे लोक ऊपाशी मरत आहे ह्या चायन्ल वाल्यांकडे ईतका पैसा कुठुन येतो वाटायला????????????? .... I m really upset Sad

अन त्यानंतरचाहि प्रश्न म्हणजे अगदिच कळस.. वेश्यागमन.. अन त्यावर होय असं उत्तर..शी.. शी..
कुठे चाललय सारं? ह्याचा समाजमनावर काय परीणाम होणार.. ह्याचा विचार तरी थोडा करावा..

मी मूळ अमेरिकन शो पाहिला होता.. सगळंच प्रकरण इतकं उबग आणणारं होतं की बघवलं नाही! आता इथे देखील? वा!
टिव्ही सेन्सॉरशिप आणायची वेळ आलीये आता!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

मंडळी, हा कार्यक्रम बंद पाडणे हे आपल्याच हातात आहे... जोपर्यंत ह्याचा टी आर पी एका ठराविक लेव्हल पर्यंत आहे तो पर्यंत तो चालू राहिल..
अमिताभ बच्चन चे केबीसी बरेच दिवस चालले कारण त्याला बच्चनच्या नावाचे वलय होते.. पण तेच शहारुख खानने केले तेव्हा पार झोपले.. कारण त्याला अपेक्षित असलेला टी आर पी मिळालाच नाही... तेव्हा कार्यक्रमाला नाव ठेवण्या बरोबरच तो न बघणे हा उपाय ही तितकाच महत्त्वाचा आहे... थोडक्यात काय तर अनुल्लेखाचे हत्यार कायम बरोबर ठेवून ते कुठे वापरावे हेही बघणे गरजेचे आहे...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

सध्याचा एक तरी खाजगी चॅनेल अभिरुची, नितीमत्ता सांभाळणारा आहे का?
एक देखिल नाही! सारेच गल्लेभरू हीन आणि आपला टीआर्पी वाढवू पहाणारे!
असल्या गल्लीच्छ चॅनेलपासून दूर रहाण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचे कार्यक्रम न पहाणे! त्या चॅनेलचे कनेक्शन पण नको!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

मध्ये कॅलीफोरनियाला असतांना थोडे दिवस माझ्या कडे टि. व्हि होता तेव्हा मी हि मूळ अमेरिकन शो पाहिला होता फक्त एकदाच ते भयानक प्रकरण भारतात अस सोसाटेल वाटल नव्हत Sad ... ते जेरी स्प्रींग प्रकरण पण येईल भारतात काही दिवसांनी Sad

आता माझ्या कडे टि. व्हि नाही याचा मला याचा खुप आनंद आहे Happy .... यु ट्युब च एक चांगलय तीथे असलेल्या व्हिडियोतुन आपल्याला हव तेव्हा हव तेवढच पहाता येत स्वःतावर जास्त अत्याचार होण्या पासुन बचावता येत Happy

आणि सत्यच उगाळून घ्यायचं असेल तर अनेक प्रकारची सत्य माणसाकडून काढून घेता येतात, उदा. कधी चोरी केली आहे का? मग हे असे प्रश्न न विचारता, वेश्यागमन केलं का, आपल्या मुलिपेक्षा लहान मुलीबरोबर शय्यासोबत केली का? इ. असले घाणेरडे प्रश्न विचारून त्यांची कबुली म्हणजेच आयुष्यातलं सत्यवचन आहे का? Angry
प्रश्नावली काढणारा स्वत:च इतका भ्रष्ट आहे की त्याला सगळे असलेच प्रश्न सुचतायंत.

मी कधीच कुठलाच 'रि. शो' पहात नाही. कलेवर आधारीत पण हल्ली नको वाटते पाहायला , त्यातल्या नाटकांमुळे. (सा रे ग म पण कमी केले आहे पाहण्याचे) कारण मला नेहमी असेच वाटते की 'रिअ‍ॅलिटी शो' नेहमी खोटाच असतो आणि त्यात भाग घेणारे पण नटच असतात. सर्व काही ठरलेले असते ... बोलणे, रडणे,हसणे,चिडणे इ.इ. .. पण तरीही वर लिहिल्याप्रमाणे बेताल प्रश्न विचारु नयेत.. मी अमेरिकन किंवा हा पण कार्यक्रम पाहिला नाही पण कल्पना आली किती खालच्या टोकाला जाऊ शकतात लोक.

मी तिथे असताना ४,५ एपिसोडस पाहिले 'सच का सामना' चे. वर दिलेल्या बाईच्या उदाहरणापेक्षाही दुसर्‍या दिवशी आलेला 'युसुफ हुसेन' नामक हिरव्या म्हातार्‍याचं आयुष्य जास्त खळबळजनक होतं. त्याने सांगितलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी/गुपितं जर त्याच्या घरच्यांना आधीच माहित होती तर टीव्हीवर येऊन स्वतःच्याच आयुष्याचा तमाशा बनवायची गरजच काय, आणि तेही फक्त ४,५ लाखाकरता? ते नाही कळलं.
विनोद कांबळीही इरिटेटींग होता.

<<अमेरिकेसारख्या समृद्ध देशात लोकं पैशासाठी अशा शोजमध्ये भाग घेतात, तर भारतात का नाही?>>
अनेक कारणे:

अमेरिका समृद्ध नाही. जगातला अत्यंत गरीब देश आहे. भारत त्यामानाने खूप श्रीमंत आहे.
अमेरिकेची संस्कृति(??) हा एक वदतोव्याघात आहे (Oxymoron).
भारतीय संस्कृति अत्यंत उच्च आहे. अनेक कारणांमुळे. त्यातलेच एकः
पैशासाठी जे करतात ते त्याची जगभर प्रसिद्धी करत नाहीत!
इ. इ.
Happy Light 1

इतक्या हिन पातळीचा कार्यक्रम आज पावेतो पाहिला नाही.
यात म्हटले आहे कि, प्रश्न हळुहळु वैयक्तीक होत जातील. म्हणजे काय अश्लील व्हावेत?
यामुळे किती लोकांचे आयुष्य बरबाद होतील याचा विचार निर्मात्याने केला का? मी तर म्हणेन नक्कीच केला असेल. पण ही आहे अँटी पब्लिसिटी करुन TRP वाढवण्याचा प्रयत्न.
या निवेदकाला स्व:त "स्पर्धक व्हाल का?" असे विचारता हरामखोर नाही तयार होत.
यांना तर भर चौकात नागव करुन चबकाने फोडले पाहिजे!

माझे सगळ्या विनंती करतो कि,
१) हा का ब न ( हा कार्यक्रम बघु नका) म्हणजे त्याचा TRP कमी होईल व कार्यक्रम बंद होईल.
२) त्या वाहिनी चे साईट वर जावुन निषेध नोंदवा.

मी अजुन त्यांच्या विरुध्द काय करतो ते केल्यावरच सांगीन.

पन्ना, विनोद कांबळीचा एपिसोड दोन भागात होता. पैकी पहिलाच भाग मी पाहिला. तो तिथे फक्त पैशाकरताच आला होता. आपल्या आत्त्ताच्या बँक बॅलन्सवर खूष नाहीये म्हणाला. सचिनचं नी त्याचं सध्या काहीतरी खटपटलेलं आहे. त्याची सफाई द्यायला, त्यावर बोलायला कुठेतरी वाव मिळावा नी त्याचवेळी बँकेत काहीतरी धन जमा व्हावं ह्या उद्देशानेच तो आला असावा. शेवटी पाच-दहा लाख घेऊन क्विट केलं त्याने.

सचिन बद्दल तो ह्याच कार्यक्रमात बरळला म्हणून खट़के उडालेत. म्हणजे खरच उडालेत की मिडीआ दाखवतेय ते देवच जाणे.
------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से

मला वाटतं सचिनचं नी त्याचं आधीपासूनच काहीतरी झालेलं आहे. हा त्याचा एपिसोड गेल्या मंगळवार्/बुधवारी झाला.

Pages