सच्चाई का सामना

Submitted by शिवम on 16 July, 2009 - 10:52

दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या सवंगपणाबद्दल थोडंसं...

आजकल दुरचित्रवाणीवर वाहिन्यांचा इतका महापुर आला आहे की काही विचारता सोय नाही. जितक्या वाहिन्या तितक्याच त्याच त्याच प्रकारच्या मालिका, कार्यक्रम. मागिल काही वर्षात तर स्त्रिवर्गाला आकर्षित करण्याचा एकता कपुरने जणु विडाच उचलला अन मग "क" च्या संपुर्णतः काल्पनिक कौटुंबीक मालिकांचा सपाटा सुरू झाला. मग प्रत्येक वाहिनीवर थोड्या अधिक फरकाने त्याच त्याच मालिका दिसु लागल्या.

मध्यंतरी दुरचित्रवाणीवर 'सत्यताप्रधान कार्यक्रमां'चे (रिअ‍ॅलिटी शो) पेव फुटले. याची सुरुवात कधी अन कशी झाली माहित नाही. "कौन बनेगा करोरपती"नं तर प्रसिद्धी चे उच्चांक मोडले. अश्या कार्यक्रमातुन मुबलक पैसा अन प्रसिद्धी मिळते हे उमगल्यावर तर मग प्रत्येक वाहिनीवाले काही ना काही सत्यताप्रधान कार्यक्रम घेऊन हजर होऊ लागले; अन ते प्रेक्षकांच्या माथी मारू लागले.

अश्या काही कार्यक्रमातुन सामान्य ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, तर काहींतुन नवीन कलागुणांना वाव मिळतो. उदाहरणादाखल आपण सारेगमप, एका पेक्षा एक, नच बलिये, होम मिनिस्टर, कौन बनेगा करोरपती ही नावं घेऊ शकतो. पण असे अनेक कार्यक्रम आहेत की त्यातुन त्यांना काय द्यायचं आहे तेच कळत नाही. उदा. खतरोंके खिलाडी, स्वयंवर राखी का, इस जंगल से मुझे बचाव. यामध्ये आपण इ-टीव्ही वरच्या क्राईम डायरी चा ही उल्लेख करू शकतो.

कालपासुन स्टार टीव्ही वर "कौन बनेगा करोरपती" च्या धर्तीवर एक सत्यताप्रधान कार्यक्रम सुरू झालाय - नाव आहे "सच्चाई का सामना". हा कार्यक्रमही एका इंग्रजी कार्यक्रमाची कॉपी आहे. अगदी कुतुहल म्हणुन हा कार्यक्रम पाहण्यास बसलो.

कार्यक्रमाचे साधारण स्वरूप असे : २१ प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर स्पर्धकाला १ कोटी रुपये मिळणार. पण प्रश्न संपुर्णतः वयक्तिक जिवनाशी निगडीत. प्रश्नांची उत्तरं बरोबर की चुक हे कोणी व्यक्ति नव्हे तर मशिन ठरवणार. कार्यक्रमापुर्वी हेच सारे प्रश्न 'पोलिग्राफ टेस्ट' च्या सहाय्याने स्पर्धकाला विचारलेले असतात. त्या उत्तरांशी कार्यक्रमादरम्यान स्पर्धकाने दिलेल्या उत्तराशी बरोबरी झाल्यास उत्तर बरोबर, नाहीतर चुक. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक.

कालच्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणुन एक स्त्री होती. विवाहाला १६ वर्षं पुर्ण झालेली. पती अन २ मुलं असा संसार. कार्यक्रमादरम्यान पती, दीर, आई अन बहीन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकानं विचारलेले काही प्रश्न साधारणपणे असे होते :

(१) काय तुम्हाला लग्नापुर्वी माहित होतं की तुमचे सासरे तुमच्या पतीपेक्षा सुंदर आहेत ?

(२) तुमच्या आई-वडिलांचं तुमच्यापेक्षा तुमच्या भावावर जास्त प्रेम आहे म्हणुन तुमची मनातुन जळफत होत असायची का?

(३) तुमच्या मोठ्या बहिणीचे वापरलेले कपडे, पुस्तके तुम्हाला वापरावी लागत, म्हणुन तुम्हाला तिचा राग येत असे का?

(४) तुमच्या दुसर्‍या बाळंतपणाच्या वेळी तुमची आई जवळच असुनही तुमच्याजवळ आली नाही, यासाठी तुम्ही तिला माफ करू शकला आहात का?

(५) तुमच्या आईपेक्षा तुमची सासु तुम्हाला अधीक जवळची वाटते का?

(६) तुमचे पती पुन्हा दारूच्या आहारी जातील अशी अजुनही मनामध्ये भिती आहे का?

(७) तुमच्या पतीची हत्या करण्याचा विचार कधी मनामध्ये आला होता का?

हे, अन अश्या प्रकारचे प्रश्न उत्तरं मी शांतपणे ऐकत होतो. यावर कळस म्हणुन की काय सुत्रसंचालकानं हा प्रश्न विचारला...

(८) जर तुमच्या पतीला कळणार नसेल तर तुम्ही परपुरुषाची शय्या सजवाल का? (त्या प्रश्नाच हे सुसंस्कृत भाषांतर आहे. शब्दशः भाषांतर खुपच किळसवणं वाटलं असतं. अ‍ॅडमिनबंधु, कृपया यामध्ये काहीही काटछाट करू नका. लोकांनाही कळायला हवं!)

आता बोला!! हा प्रश्न ऐकल्याबरोबर माझं डोकंच गरगरायला लागलं. अन कहर म्हणजे तिने यावर "नाही" असं ठाम उत्तर देऊनही त्यांच्या मशिनने तिचं उत्तर चुक ठरवलं. या वेळी तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जर मी तिथे उपस्थित असतो तर नक्कीच पायातील वहाण काढुन त्याच्या श्रीमुखात सणकवली असती.

अरे काही तरी नितीमत्ता बाळगा. सत्यतेच्या नावाखाली काय तमाशा मांडता आहात तुम्ही? आपल्या समाजात घरी टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना कार्यक्रमातील ललनेच्या सौंदर्याची पतीराजांनी स्तुती जरी केली तरी पत्नी पतीशी भांडण करते. मग विचार करा अशा कार्यक्रमात पतीच्या समोर अगदी खुलेआम पत्नीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवले गेले तर त्यांच्या घरी नंतर काय वादळ निर्माण झालं असेल? २ मोठी कळणारी मुलं आपल्या आईबद्दल असं काही ऐकल्यावर काय विचार करतील? विचारच न केलेला बरा.

स्टार टीव्ही सारख्या नामांकीत वाहिनीवरील कार्यक्रमांची प्रतिमा इतकी खालच्या दर्जाची असु शकते यावर माझा विश्वासच बसेना. १ कोटीचं आमिष दाखवुन लोकांच्या भावनांशी खेळणं कितपत योग्य आहे? यात कसला आलाय खेळ? अशा कायक्रमातुन काय सिद्ध अन साध्य करु पाहता आहात तुम्ही? खरच तुम्हाला पैसे वाटायची इतकी हौस आहे का? प्रसिद्धी अन पैसा कमवायच्या हव्यासापोटी समाजाला कुठे घेवुन चालला आहात? तुमच्या अशा या बाजारू अन गल्लेभरू कार्यक्रमातुन कुणाची मनं दुखवली जातील, कायमची कटुता येईल, कुणाचे संसार उध्वस्त होतील याचं थोडंतरी भान ठेवा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol, पाहिले मी २-३ एपिसोड्स.
कोण तो फालतु अ‍ॅक्टर युसुफ किंवा ती उर्वशी यांना काय फक्त त्यांचं 'चारित्र'(!) या एकाच qualification वर बोलावलं का?
पण जोपर्यंत पब्लिक काही ना काही कारणाने असे शो चर्चेत ठेवते (अँटी पब्लिसिटी सकट) तोवर असे प्रोग्रॅम सुरुच रहाणार !
बहुसंख्य लोकांना खरच समजत नाही का , कि हे सगळं fake आहे, काही B grade junior artists(Including Mr.Kambli) आणि काही वादग्रस्त पर्सनॅलिटीज आणायच्या आणि काहीतरी controvesial सादर करायच, झाला रिअ‍ॅलिटी शो.. उगीच पब्लिक काही ना काही कारणानी दखल घेतं, मनःस्ताप करून घेतं आणि असे शो चर्चेत राहतात !
बाकी भारतात तर टी.व्ही साथी सेन्सर बोर्ड पण नाही अशा शोज ना रेटिंग द्यायला, तेंव्हा आनंदी आनंद च !

डिजे,
म्हणजे हे सगळं खोटं आहे? पब्लिकच्या तोंडाला पानं पुसणं आहे? Uhoh
मग या लोकांना पैसे खरंच मिळतात की नाही? आणि मी ऐकलं की काही लोकांनी आपल्या स्पाऊसेस नी उधळलेले गुण तिथे मान्य केल्यावर लग्नं मोडली बिडली म्हणे... ते सगळं खोटं आहे का? Uhoh

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

मला तर हे सगळे साफ खोटे वाटते... येणारा प्रत्येक माणुस वदग्रस्त कसा असतो >... उदा. कांबळे-सचिन वाद, तो तीन-चार लग्न केलेला युसुफ किंवा ती टीव्ही स्टार..

हे सगळे आधी ठरवलेले आहे असे मला वाटते..कारण ही लोक वादग्रस्त आहेत म्हणुन तर त्याची चर्चा होतेय्..आणि म्हणुनच तर हा बीबी निघाला :फिदी:, नाहीतर कुणी पाहिलाच नसता प्रोग्रॅम

दीपांजलींना पूर्ण अनुमोदन Happy

०-------------------०
संस्कृत स्तोत्रांचे संकलन

कधी कधी अस वाटत की "हिन्दुस्तानच्या" उरल्यासुरल्या सन्स्कृतीच्या कल्पनान्ना सुरुन्ग लावण्यासाठी तर हे "आक्रमण" नाही ना!
एनिवे, इतकेही आम्ही लेचेपेचे नाही!
मी या कार्यक्रमाच्या जाहिराती तथाकथित सबसे तेज आजतक वगैरेवर बघत होतो, मात्र प्रत्यक्ष कार्यक्रम बघण्याची माझ्यावर वेळच आली नाही
घरातल्या बाकी सर्वान्निच एकमताने या कार्यक्रमाला "रिजेक्ट" केले! Proud

फक्त एकच प्रश्न मनात उभा रहातो! "भारत सरकार" काय करते आहे? की सरकार नावाची चीजच अस्तित्वात नाही म्हणून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर "रस्त्यावर उतरुनच" काढावे लागणार आहे?

आजच्याच सकाळला वाचली बातमी.... या कार्यक्रमावर बंदी घाला म्हणून.

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

मि पण वाचलि बातमि लोकसत्ता मध्ये. बंद करा हा कार्यक्रम.
मि सुध्धा बघितले आहेत काहि भाग.
बेसलेस, बिनडोक, निरर्थक आहे.

त्या पेक्षा क्विझ शो / पर्यटनावरचा शो अस काहितरि चांगल ठेवायचा ना!

हिम्स्कूलाच्या आणि दीपांजलीच्या पोस्ट्सना अनुमोदन.

टीव्हीवाले धंद करायला बसले आहेत, अन पैसे मिळाल्याच्या बदल्यात शिव्या खायची त्यांची तयारी आहे, यातच काय ते ओळखावे. दुसर्‍यांच्या भानगडींत आपल्याला नेहेमी इंटरेस्ट असतो, याच गोष्टीचं त्यांनी भांडवल केले आहे.

सर्वसामान्य रुटीन जगणारी तुमच्याआमच्यासारखी माणसे याला घाणेरडं, विकृत म्हणतात, मात्र बघायचं काही सोडत नाहीत. ते कितीही अवास्तव, लौकिकार्थाने विकृत असलं; तरी 'चमचमीत' असल्याने आपण ते बघतोच. कारण वास्तव जीवनात असलं काही घडत नाही. याच कारणास्तव आपण अनेक अ आणि अ सिनेमे सुपरडुपरहिट करतो. Happy

आपली ही मानसिकता टीव्हीवाल्यांनी 'कॅश' केली तर बिघडले कुठे? ज्याक्षणी त्यांना 'हे कॅश होत नाहीये' असे कळेल, त्याक्षणी तो कार्यक्रम बंद होईल. कारण उत्तर पुन्हा तेच- बिझिनेस!!

स्टार, एकता, कीम्वा इतर कुणालाही शिव्या देण्यात काहीच पॉईंट नाही. ते आपल्यासमोर आरसाच नाही का धरत आहेत?

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

>>>> टीव्हीवाले धंद करायला बसले आहेत,
साजिर्‍या, मान्य, तस तर वेश्यादेखिल धन्दा करायला बसलेल्या अस्तात, पण त्या त्यान्च्या गल्लीत, खिडकीत! दारोदार फिरण्यास त्यान्नाही बन्दी हे कायद्याने!
पण हे टीव्ही प्रोग्रॅमवाले तर राजरोसपणे टीव्ही मार्फत तुमच्या घरात घुसतात, अन घरातील प्रत्येक व्यक्ति तुझ्यायेवढी "समन्जस, हुषार, बर्‍यावाईटाचे तारतम्य असलेली, तुझ्यायेवढ्या वयाची, तुझ्यायेवढे वाचन असलेली, तेवढीच सुसन्कृत" वगैरे वगैरे असेल असे नसते ना!
तेव्हा असल्या प्रसारणावर कायद्याने बन्धन हवेच! सेन्सॉर हवाच!
उगाचच्या उगाच "पब्लिकला बर वाईट कळत नाही का, खड्यात जातात कशाला" या अर्थाचे सरधोपट नि:ष्कर्ष काढून प्रेक्षकान्च्या माथी सगळे थापुन चालणार नाही!
प्रेक्षकान्ना काय आवडते/आवडेल याचा शहानिशा व त्यावरुन त्यान्च्या यशस्वी बिझनेसकौशल्याला दाद देण्यापेक्षा, स्वतन्त्र भारताच्या हिन्दुस्थानी नागरिकान्ना काय दाखवावे यावर नियन्त्रण आणणे मला जरुरीचे वाटते! Happy

पण त्या त्यान्च्या गल्लीत, खिडकीत! दारोदार फिरण्यास त्यान्नाही बन्दी हे कायद्याने!
>>>
लिंबुदादा, तुला संपूर्ण माहिती आहे का? Proud

असो. विकलं जातं, ते विकणारे विकणारच हा मुळ मुद्दा होता. सेन्सॉर कुठे कुठे लावणार? व्यक्तिस्वातंत्र्य अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य या बाबी पुन्हा आल्याच. "पब्लिकला बर वाईट कळत नाही का, खड्यात जातात कशाला" हे तु लिहिलेले वाक्य मी कुठेच म्हटले नाही. उलट बरे-वाईट सारे बघावे, पण तेवढ्या कारणाने खड्ड्यात जाण्याइतके दुबळे राहू नये, असे म्हणतो आहे. निव्वळ बघतात म्हणून 'टीआरपी' वाढतो, असे नाहीये, तर ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने 'परिणामकारक' आहे, म्हणून आपण बघतो आहे. तर, प्रश्न हा आहे, की ते परिणाजमकारक का वाटते आहे?

'भारताच्या नागरिकांना काय दाखवावे' या वाक्याच्या आधी 'स्वतंत्र' हा शब्दही तु वापरला आहेस ना! म्हणजे त्यांनी काय 'बघावे' याचेही 'स्वातंत्र्य' अध्याहृत आहेच. इथे नुसताच नैतिक-अनैतिकतेचा मुद्दा किंवा समाजव्यवस्था, कुटूंबव्यवस्था कोलमडून पडण्याचा मुद्दा नाही. वरती, दीपांजली म्हणते तसं- 'सगळं काही फिक्स झालेलं आहे' हे उमजूनही लोक बघतात. (बघा- 'राखीचे स्वयंवर' हा आणखी एक फार्स) का? तर, हे सामान्यपणे न घडणारे, परंतु अब्जावधीतून एखाद्या शक्यतेने आपल्याच बाबतीत 'घडू शकणारे' काहीतरी 'चमचमीत' आहे. शिवाय 'सच का सामना' सारख्या ठिकाणी हे स्वतःबद्दल नसून दुसर्‍याच्या बाबतीत आहे. काहीतरी 'भानगड' आहे, म्हणून! विवाहबाह्य संबंधांपासून घरातल्या, कुटूंबातल्या अनंत कटकटी दाखविणारे केकता, कलर्स का चालताहेत, त्याचंही उत्तर हेच असेल.

असे काहीतरी (ज्याला आपण उथळ, पांचट, विवेकहीन म्हणुन या) बघून जर आपली मानसिकता चटकन बदलून जात असेल, मुलांच्या मनावर परिणाम होत असतील, संशयांची किल्मिषे तयार होऊन अख्खी कुटूंव्यवस्था मोडीत निघत असेल; तर आपली मानसिकता म्हणा, की कुटूंवव्यवस्था- त्या मुळात कितपत बळकट अन युगानुयूगे तरणार्‍या होत्या? नसतील, त्या मोडीत निघणेच सोयीस्कर नाही काय?? हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा, अन याच दृष्टीने हे सारे आपल्याला 'आरसा' दाखवत आहेत, असे म्हटले. Happy

---
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..!

साजिर्‍या, बाळा तुला कशाकशाची माहिती हवी आहे? सान्ग बघू पटापट! Wink

>>>> असो. विकलं जातं, ते विकणारे विकणारच हा मुळ मुद्दा होता
ठीक आहे, पण इथे हे लागू पडत नाही! कारण टीव्हीवरच्या सर्व सिरीयल्स महिना केवळ अडीचशे रुपये भरुन "जशा आहेत तशा" आधी बघुन तपासुन विकत घेतल्या जातात असे होत नाही!, तर त्या सेरियल्स, त्यान्चे त्यान्चे प्रायोजक, पब्लिकच्या माथी मारतात! पब्लिकला काय हवे नको, काय दाखवावे न दाखवावे याचा काडीचाही विधीनिषेध कोणतेच च्यानेल/मिडीया वापरत नाही हे २६/११ च्या वेळेस पुरते सिद्ध झाले आहे! त्यामुळे "पब्लिक डिमाण्ड" करतय म्हणूनच केवळ या असल्या सेरियल्स दाखविल्या जातात या म्हणण्याला अर्थ नाही!
तुला कदाचित माहित असेलही, आधी सेरियल्स बनतात, तिथे पब्लिकला "गृहित" धरले जाऊन त्या बनविल्या जातात, काय गृहित धरले जाते ते जो तो निर्माता ठरवतो! अन प्रायोजक मिळाला की त्या दाखविल्या जातात! ते देखिल "सार्वजनिक रित्या" - जवळपास फुकटात!
एनिवे, यावर शब्दच्छल करण्यापेक्षा, वर कुणीतरी म्हणले तसे आता शिवसेना-मनसेनेच हे प्रश्न हातात घेऊन कृती करायला पाहिजे हे नक्की!
अन्यथा, सारसबागेत, मटणपार्ट्या करणार्‍यान्ना हाकलविणार्‍यान्वरदेखिल व्यक्तिस्वातन्त्र्याच्या नावाखाली गळे काढून खडे फोडणारे याच पुण्यात आहेतच की! पुणे तिथे काय उणे म्हणा! Proud

>>>>> 'भारताच्या नागरिकांना काय दाखवावे' या वाक्याच्या आधी 'स्वतंत्र' हा शब्दही तु वापरला आहेस ना!
बाळू, वरील सेरियल्सचे आक्रमण बघता, तो शब्द "भारत" अजुनतरी स्वतन्त्र आहे की नाही याची शन्का असल्याने "भारताकरता" वापरला आहे!

>>>> की कुटूंवव्यवस्था- त्या मुळात कितपत बळकट अन युगानुयूगे तरणार्‍या होत्या? नसतील, त्या मोडीत निघणेच सोयीस्कर नाही काय??
नाही, इतक्यात काही मोडीत काढायची वा निघायची गरज नाही! काळजी नको!

बाकी, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पब्लिकच बघते, खडे फोडते, पुन्हा बघायला जाते!
(अन उद्या कोणी सेना-मनसे वाले उठून तोडफोड करु लागले तरी हेच पब्लिक अहो असे का करता म्हणून त्यान्ना विचारेल यात नवल ते काय? कलियुग रे बाबा घोर कलियुग)
फक्त तू एक विसरतोस, इथे लिहिलेल्यान्पैकी बहुतेकान्नी या मालिका बघत नाही वा बघण्याच्या लायकीच्या नाहीत असे लिहीले आहे, तरी इथल्या शीतावरुन एकन्दरीत समाजाच्या शिजलेल्या भाताची परीक्षा करणे अवघडच हे मान्य करुनही, जे काय मुठभर आम्बटशौकिन असले कार्यक्रम बघतात त्यान्ना साक्षीला धरून, आख्खाच्या आख्खा समाजच हे कार्यक्रम बघतो अन म्हणून विकल जात तर खपत असले "घाऊक" नि:ष्कर्ष निदान मला तरी काढता येणार नाहीत, अन समजा खपल जात असेल तर ते का थाम्बवावे असले अवसानघातकी चोचलेही मला सुचणार नाहीत!
तसे तर ड्रग्जही खपतात, सवय लावली की गिर्‍हाईके अजुन वाढतात....... या सवय लावण्यास कुणीतरी पायबन्द घालायलाच हवा ना? की पायबन्द काच घालावा यावरच वाद व्हावा? हे देखिल कलियुगाचे लक्षण म्हणा! Proud

<<"भारत सरकार" काय करते आहे?

सरकारचा काय संबंध इथे? कायदा जर मोडल्या जात नसेल नि पहायला लोक तयार असतील, तर सरकारचा काय संबंध? आता सरकार का तुम्हाला सांगणार काय दाखवायाचे नि काय पहायचे?

तुमचा तुमच्या सरकारवर फारच विश्वास दिसतो आहे. एव्हढे विद्वान नि उच्च नीतिमूल्ये असलेले लोक कुठल्याहि सरकारात विरळाच. भारतात असतील तर माहित नाही. पण अमेरिकेत नक्की नाहीत.

"रस्त्यावर उतरुनच">>

असले काही करायला नको. तो शो बघायचा नाही, त्या शोला जाहिराती देणार्‍यांचा माल विकत घेणे बंद केले की कळेल. फक्त तसे एक पत्रक काढून त्यावर १ लाख स्वाक्षर्‍या गोळा करून निर्मात्याकडे पाठवा. इथे हे मार्ग यशस्वी झाले आहेत.

पण तुम्ही म्हणाल, ते तुमच्या अमेरिकेतले तिथेच ठेवा, तुम्हाला भारतातले काही कळत नाही. तसले आमच्या इथे चालत नाही. खरे आहे. तुमची अहिंसा, गांधीगिरी ही फक्त सिनेमापुरती नि जगाला सांगण्यापुरती, तुमच्या स्वतः साठी नाही. तिथे राडाच पाहिजे. शंभर एक टाळकी फोडायची, चार दोन बिल्डिंगा, पाचसहा बसेस, नि दहा एक गाड्या जाळायच्या. लै धमाल.

Happy Light 1

च्या मारी ......
काही तरी सच्चाई वर वाचायला मिळेल म्हणुन खुप अपेक्षेने हे सदर ओपन केले तर , हे काही भलतचं प्रकरण निघालं. जगात कॉपी करण्यासारख्या खुप चांगल्या गोष्टी पण आहेत. पण हल्ली लोक फक्त असल्या फालतु गोष्टीच कॉपी करताना दिसतात.
अरे देवा वाचव रे बाबा ...............................

कुणी काही म्हणा, सच्चाई का सामना चा होस्ट मात्रं XX आहे एकदम Wink

अ‍ॅडमिन पांशा ची सोय लवकर करा बुवा.. Proud
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

>>>> कुणी काही म्हणा, सच्चाई का>>>>>>>>
इथे तुला कुणी "सच्चाई का सामना" करायला लावत नाहीये ग बयो! Wink Proud Lol

दक्षिणा, राजीव खंडेलवालला जास्त वेळ बघायचं असल्यास 'आमिर' बघ Wink

बघा अता काही राजीव खंडेलवाल चे पंखे आहेत म्हणून पहाणार, काही लोकं हा शो नेमका किती वादग्रस्त आहे ते पहाण्या साठी पहाणार, काही लोक हा शो पाहून चर्चा करता यावी म्हणून पहाणार, काही लोक संसदेत गदारोळ करता यावा म्हणून पहाणार , काही लोक कोणाची लग्न टिकली, कोणाची मोडली हे पहाण्या साठी पहाणार, काही लोक विनोद कांबळी सचिन विषयी नक्की काय बोलला, अता त्याला प्रति उत्तर म्हणून सचिन पण येइल का हे पहाण्या साठी पहाणार, काही लोक राखि सावंत -शायनी सारखे वादग्रस्त लोक इथे येऊन काय काय दिवे लावतील त्यांना कधी बोलावतील पहाण्यासाठी पहाणार ..थोडक्यात काही ना काही कारणाने पहाणार पण पहाणार नक्की , शिवाय चर्चाही करणार Happy
हेच तर हवे असते शो यशस्वी करायला.. !

बाकी साजिर्‍याच्या 28 जुलै, 2009 - 00:36 पोस्ट ला १००%अनुमोदन, या लोकांचे काम च आहे सगळ्या गोष्टी निर्लज्ज पणे कॅश करून घेण्याचा... खरच अशा शोज ची चिड असेल तर शो चं टी आर पी वाढु देउ नका, आपो आप बंद होइल :), आधी शो बघून मग नावं ठेवण्याचा , निषेध नोंदवायचा काहीच उपयोग नाही !

deepanjali >>>> १०० % पर्फेक्ट बोललात.....

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

सायो हा$$य..... किस जालिम चिज की याद दिला दी.... Blush
आमिर मी पाहीला आहे, तरिच सच्चाई चा एपिसोड (पहीला आणि शेवटचा) पाहताना मी सारखी आठवत होते या कुठे पाहिलाय कुठे पाहिलाय Uhoh म्हणून.. वयानुसार आठवत नाही हो, तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल आभार. पण वाढवलेल्या केसात राजिव जास्ती चांगला दिसतो नै? Proud

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

दक्षिणा, आमिर बघते नी मग कळवते कुठला चांगला वाटतो ते. Wink परत सच का सामना बघता येणार नाहीये तेव्हा माझ्या मनात उतरलेल्या त्याच्या फोटोशीच पडताळून बघायला हवं. Proud

>>परत सच का सामना बघता येणार नाहीये >> ते का? Uhoh
कार्यक्रमावर बंदी पक्की झाली का? कधीपासून?

----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------

बंदीचं माहित नाही पण इथे दिसत नाहीत ही सगळी चॅनल्स मला.

तेव्हा माझ्या मनात उतरलेल्या त्याच्या फोटोशीच पडताळून बघायला हवं.

मनात उतरलेल्या फोटोंमध्ये त्याचा फोटो नक्की कोणता ते ओळखू येईल ना??? Proud

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

अरे मी तर म्हणतो त्या साल्या कसाबलाच आणा ना या कार्यक्रमात. बघुया किती खरे बोलतो ते. म्हणजे काय होइल माहितीये? जे जे मंत्री यात गुंतले असतील तेच हा कार्यक्रम बंद पाडतील

**************************
नतद्रष्ट वायरसमुळे खुपच त्रास होतयं
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
**************************

माझ्या घरी केबल नाही. दूरदर्शन सुद्धा नाही. आम्ही आमचा उत्तम TV फक्त आवडत्या चित्रपटांच्या CDs बघण्यासाठी वापरतो. ज्यांना हे समजतं, ते विचारतात, " TV शिवाय तुम्ही जगता कसे? " , माझं उत्तर असतं, " अतिशय आनंदात !"

कारण तुमच्या पोस्ट चे संपादक तुम्हीच असता.:)
तुम्ही पोस्ट केलेला प्रतिसाद तुम्ही त्याच्यावर क्लिक करुन एडीट करु शकता.

काल मला युट्युब वर एक व्हिडियो पहायला मिळाला ,Iss Jungle Se Mujhe Bachao , हा नक्की प्रकार तरी आहे काय ?

Pages