मायबोली गणेशोत्सव २०१४ : '' रंगात रंगुनी सार्‍या '' (उपक्रम)

Submitted by संयोजक on 17 August, 2014 - 03:24

Chitra Rangava Poster.jpg

नमस्कार मंडळी ,
गुणांचा ईश असा गणपती आणि आपली बच्चेकंपनी यांच नातं अतूट आहे . हे लोभस असं नातं अजून वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 'रंगात रंगुनी सार्‍या' हा केवळ छोट्या दोस्तांसाठीच असलेला उपक्रम. चला तर मग !

१) हा बच्चेकंपनीसाठीचाच उपक्रम आहे. ही स्पर्धा नाही.

२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.

३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे. मायबोलीकरांच्या नातेवाईक / मित्रमंडळीच्या पाल्यांना यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्या पालकांना प्रथम मायबोलीचे सभासद व्हावे लागेल .

४) या उपक्रमासाठी मुलांचा वयोगट ४ -१० वर्षे असा असेल .

५) या उपक्रमात अ) निसर्गप्रेमी बाप्पा आणि ब) बाप्पाची किक अशी दोन चित्रे देण्यात आलेली आहेत. यापैकी कोणत्याही एका चित्राची प्रिंट लॅण्डस्केप मोड मध्ये काढून ते रंगवणे अपेक्षित आहे .दोन्हीही चित्रे रंगवल्यास त्याचेही स्वागत आहे. आपल्या पाल्याने रंगवलेले ते चित्र स्कॅन करा किंवा त्याचे छायाचित्र/फोटो काढा व इथे अपलोड करा.

६) चित्र/चित्रे गणेश चतुर्थीपासून (२९ ऑगस्ट २०१४, भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत (८ सप्टेंबर २०१४, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रकाशित करता येतील.

७) चित्र पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २९ ऑगस्टला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

८) 'मायबोली गणेशोत्सव २०१४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

९) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (कृपया 'मायबोली गणेशोत्सव २०१४' या ग्रूपमधील 'गप्पांचे पान' व 'नवीन कार्यक्रम' हे पर्याय वापरू नयेत.

१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
रंगात रंगुनी सार्‍या - मायबोली आयडी - पाल्याचे नाव

११) विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.

१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये 'मायबोली गणेशोत्सव २०१४', 'रंगात रंगुनी सार्‍या' हे शब्द लिहा.

१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच मजकुरात प्रकाशचित्र टाका. यासाठी आपल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची स्कॅन कॉपी अथवा इमेज फाईल अपलोड करा. त्या फाईलचे आकारमान १५० kb पेक्षा जास्त असू नये.

१४) मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.

प्रत्येक प्रकाशचित्राच्या वर त्याचं नाव लिहा. उदा :- जर तुम्ही दोन्हीही चित्रे टाकणार असाल, तर "निसर्गप्रेमी बाप्पा" असे लिहून त्याखाली त्याचं प्रकाशचित्र, "बाप्पाची किक" असं लिहून त्याखाली त्याचं प्रकाशचित्र असं अपलोड करा.
कृपया दोन्ही चित्रे एकाच धाग्यात समाविष्ट करा

१५) त्याच्या खाली पाल्याचे नाव, वय याची माहिती लिहा.

१६) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

१७) Save ही कळ दाबा.

१८) जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून मजकुरात बदल करू शकता.

चला तर दोस्तलोक ! आम्ही सर्वजण उत्सुक आहोत तुमचे नानाविध रंगांनी सजलेले बाप्पा पाहायला.

अ) निसर्गप्रेमी बाप्पा

ब ) बाप्पाची किक

दोन्ही चित्रं फार मस्त आहेत.
नीलू, मस्त गं!

स्पर्धेचं पोस्टर पण मस्त आहे. आरोहीचा हात आहे का? Happy

दुसर्‍या किकच्या चित्रात डाव्या कोपर्‍यात वर 'मायबोली गणेशोत्सव २०१४' लिहायला हवं आहे ना?

मंजू, शीर्षक टाकून चित्र अपलोड करतो आहोत. धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल.

पोस्टरातला हात सानिकाचा आहे (कविन). Happy

दीडशे किलोबाईट ची लिमिट रिडिक्युलस आहे, असे माझे मत.
रद्दड पिक्चर क्वालिटी येईल अगदी.>>> इब्लिस, गेल्यावर्षीचा उपक्रम 'गणराज रंगी नाचतो' पाहिला आहे का तुम्ही?
त्याही आधीच्यावर्षीचा उपक्रम पाहिलात तरी चालेल.

दोन्ही चित्र सुपर क्युट आहेत Happy

दिडशे केबी पेक्षा मोठं असलेलं चित्र स्वतःच्या पिकासा किंवा तत्सम अकाउंटवर अपलोड करून त्याची लिंक (इमेज लोकेशन) इमेज टॅगच्या सोर्समध्ये देता येते.

दोन्ही चित्र क्युट आहेत. बच्चे कंपनीला काय मला ही खूप आवडली आहेत. एक्सप्रेशन्स मस्त आहेत.

@साती | 22 August, 2014 - 20:13 नवीन
अजून एक पाल्यही आहे घरात जिची शाळेत ऑफिशीयली मी पालक आहे तिची पण एंट्री देऊ का?
<<< हो, जरूर द्या.