५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
चांगला विषय. नेमकी चर्चा ़काय
चांगला विषय.
नेमकी चर्चा ़काय अपेक्षित आहे?
चार भिंतीच्या आत कोण काय करतं
चार भिंतीच्या आत कोण काय करतं हा त्यांचा अतिवैयक्तिक प्रश्न आहे. (सगळेच असं वागतात असं काही नाही). त्याने संस्क्रुतीला धक्के बसत असतील तर ती ठिसूळ असली पाहीजे. परंप्रेचा मुद्दा येईलच... तर नगरवधू वगैरे वसंतसेनेच्या रुपाने आपल्या गौरवशाली परंपरेत आहेच की... अंगवस्त्रंही संस्कृती किंवा परंपरेच्या ठेकेदारांना निषिद्ध असल्याचं दिसलेल नाही.
तरी देखील संस्क्रुती धोक्यात येते अशी चर्चा होते खरी. जोडीदाराच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, विश्वास तो जपण्याची तयारी हे मान्य असणे , नसणे आनि त्यासाठी आवश्यक असलेला संयम हा इथे अवांतर मुद्दा ठरेल.
ह्यावर लिहिण्यासारखे बरेच
ह्यावर लिहिण्यासारखे बरेच आहे. पण स्वत:ची मते येथे लिहीत बसण्यापेक्षा नेमके अपेक्षित काय आहे हे समजले तर बरे होईल. लेखाची मांडणी अशी झाली आहे की चर्चा अपेक्षित आहे की नाही, असली तर नक्की कशावर हे माझ्यातरी लक्षात आलेले नाही.
क्षमस्व!
लहान गावांत असं काही होतच
लहान गावांत असं काही होतच नाही म्हणायचंय का तुम्हाला? आपल्या दृष्टीआड असतं एवढंच..
की चर्चा अपेक्षित आहे की
की चर्चा अपेक्षित आहे की नाही,
<<
गुलमोहोरात ललितलेखनाचा धागा आहे.
टॅग गद्यलेखन असा आहे.
तेव्हा चर्चा अपेक्षित असण्याचा काय संबंध वाटेना.
*
अर्थात आपल्याकडे काय, गझलांवरही प्रचण्ड चर्चा करतात लोक. नैका?
इग्नोर्ड
इग्नोर्ड
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
हे आवडलं !
मी पण एक ओळ लिहू का ?
कोई किसीको चाहे, फिर क्यू गुनाह समझते है लोग ?
दिनेशदा या नात्यातल्या
दिनेशदा
या नात्यातल्या विवाहितांची जोडीदाराला हेच स्वातंत्र्य देण्याची तयारी असणार आहे का ?
अविवाहितांच्या बाबतीतही ज्यांना हा स्टँड मान्य आहे ते भविष्यात आपल्या जोडीदारावर बंधने लादणार नाहीत ही अपेक्षा ठेवता येईल का ?
@ इब्लिस, मी तुम्हाला इग्नोर केलेलं नाही हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार आहे
जे स्वातंत्र्य तूम्हाला हवे
जे स्वातंत्र्य तूम्हाला हवे आहे, ते जोडीदाराला दिलेच पाहिजे ना !
इफ यू लव्ह समवन, सेट हिम / हर फ्री.. इफ ही / शी कम्स बॅक.. ही / शी इज यूवर्स... अदरवाईज ही / शी नेव्हर वॉज !
दिनेशदा इश्क विश्क आठवला ..
दिनेशदा इश्क विश्क आठवला .. तुमच्याशी सहमत .
One Night Stand फिके वाटेल
One Night Stand फिके वाटेल असा Wife Swapping किंवा Partner Swapping हा प्रकार सुद्धा रुळावतोय. ( नावातच अर्थ उलगडतोय तरी माहीत नसल्यास गूगल करा वा अजनबी चित्रपट बघा)
तुर्तास या प्रकारांचे प्रमाण नको शोधायला जाऊया, वा नक्की कोणत्या समाजात, सोसायटीत हे होतेय ते ही नको बघूया, येणारा काळच हा प्रकार किती फोफावतोय हे ठरवेल. ते त्या पिढीवरच सोडूया. आपल्याला जर हि समाजाची अधोगती (?) बघवत नसेल तर आपण आपले त्या आधी डोळे मिटूया किंवा डोळे फिरवून दुर्लक्ष करूया.
Wife Swapping किंवा Partner Swapping .. यावरून नुकतेच माझ्या मैत्रीणीने सांगितलेला एक घाणेरडा (?) किस्सा शेअर करतो. ती तिच्या मैत्रीणींबरोबर सिनेमा बघायला गेली होती. समोरचा रांगेत शाळकरी किंवा फार तर ज्युनिअर कॉलेजची वाटावी या वयाची दोन मुले आणि दोन मुली बसले होते. ते चित्रपट बघायला आलेच नव्हते तर त्या अपुर्या उजेडाचा फायदा उचलत त्यांचे आपापसात सांगता येऊ नये असे चाळे चालू होते. मला हे माझ्या मैत्रीणीने सांगता मी इटस ओके हल्ली हे असेच चालते म्हणालो. पण त्यानंतर तिने जे सांगितले ते माझ्यासाठी तरी धक्कादायक होते. ती म्हणे ईंटर्रव्हल नंतर देखील त्यांचा हाच प्रकार सुरू होता, मात्र जोड्या बदलून, क्रॉस कनेक्शन .. आता बोला !
हा प्रकार / अनुभव सार्वजनिक फोरम वर शेअर करणे कोणाला अनुचित वाटले असेल तर क्षमस्व,
ऋन्मेऽऽष
बावरा मन, जेव्हा
बावरा मन,
जेव्हा विवाहसंस्थेच्या बाहेर स्त्रीपुरूष संबंध प्रस्थापित होतात, तेव्हा त्यातून जोडीदाराविषयी असलेली बांधिलकी कमी होत जाते. कमी झालेली बांधिलकी कुटुंबाला ठिसूळ बनवते. कुटुंबसंस्था ठिसूळ झाली म्हणजे गुन्हेगारी बोकाळलीच समजा. हे सगळं लगेच होत नाही. दोनतीन पिढ्या लागतात.
तुमचा लेख वाचून सीमा गैलाडच्या लेखाची आठवण झाली. माझी रिक्षा फिरवतोय : http://www.maayboli.com/node/30399?page=1#comment-1704498
आ.न.,
-गा.पै.
वन नाईट स्टॅन्ड, वाईफ
वन नाईट स्टॅन्ड, वाईफ स्वॅपिंग यात नवे काही नाही. संस्कृती वगैरे काही बुडत नाही आणि विवाह संस्थाही मोडकळीला येत नाही. प्रश्न आहे तो सुरक्षिततेचा आणि होणार्या परीणामांची जबाबदारी स्विकारण्याचा. कितीही नाही म्हटले तरी परीणामांची जबाबदारी टाळणे होते आणि समाज व्यवस्थेवर कालांतराने त्याचे ओझे होते.
नो स्ट्रिंग्ज अॅटॅच, वन नाईट स्टँन्ड हे सगळे ठीकच पण ऑफिस किंवा तत्सम सर्कल मधली मंडळी असतील तर फार कमी वेळा नंतरही हे तसेच रहाते. बर्याचदा भेटी गाठी वाढत जाणे आणि त्या अनुशंगाने बरेच काही घडते. यात अतिशय वाईट पद्धतीने ब्रेक अप ते अनप्लॅन्ड प्रेग्नंसी-पालकत्व- चाइल्ड सपोर्ट सर्व काही आले. सेफ रहाण्यासाठी तुम्ही कुठे जात आहात, कुणाबरोबर आहात हे कुणाला तरी - जवळच्या मित्र मैत्रीणीला- माहित असणे गरजेचे. वन नाइट स्टॅन्ड चुकीचे वळण घेऊ शकतो तेव्हा एक्झिट प्लॅन असावाच. योग्य प्रोटेक्शन न वापरता संबंध आल्यास आजारांचा धोका आहे. अल्कोहोल किंवा ड्रग्जच्या अमलाखाली संबंध आल्यास योग्य प्रोटेक्शन न वापरणे जास्त प्रमाणात घडते. बाकी हा प्रकार कमिटेड मंडळी जोडीदाराला न सांगता करत असतील तर ती जोडीदाराची फसवणूक/प्रतारणा. कमिटेड म्हणजे लग्न झालेले, लिवइन, एंगेज झालेले, आणि एस्क्लुझिव डेटिंग करणारे. अजून एक म्हणजे लपूनछपून वन नाईट स्टॅन्ड असेल तर तुम्हाला नंतर ब्लॅकमेल केले जाण्याची शक्यता देखील आहे.
एका रात्रीचा सोबती यात भावनिक
एका रात्रीचा सोबती यात भावनिक गुंतवणूक बर्याच वेळेस होते. माझ्या वंध्यत्व विभागातील कामात मी हे पहिले आहे कि कित्येक मुली अगोदर गर्भधारणा झाली होती का हे विचारल्यावर बाहेर/ नवऱ्या समोर "नाही" सांगतात आणी तपासणीसाठी आत गेल्यावर अपराधीपणे सांगतात कि लग्नाआधी एक गर्भपात केला होता. हे अपराधीपण सहजासहजी जात नाही. अर्थात यात स्त्री आणी पुरुष यांची विचार करण्याची पद्धत/ विचार सरणी वेगळी आहे. भरपूर मैत्रिणी असणारा मुलगा हा स्मार्ट समजला जातो तेच भरपूर मित्र असलेली मुलगी वाह्यात समजली जाते. त्याच विचारसरणीने एका रात्रीची सोबत पुरुषाला पौरुषत्व बहाल करते पण स्त्रीला वेश्या समजले जाते. समाजाचे दाम्भिकपण यातून दिसून येते. या विचार सरणी मुळे अपराधीपण स्त्रीला जास्त वेळ खात राहते.
अर्थात यात निसर्ग आड येतो हे सत्य आहे. सहज भेटले आणी सोबत केली तर पुरुष मोकळाच राहतो आणी स्त्री पुढची पाळी येईपर्यंत तणावाखाली राहते. यामुळे तीन मिनिटांची मजा आणी तीन आठवड्याची सजा यातून बहुतांश स्त्रियांना जावे लागते. ( बरयाच वेळेस संधी अचानक येते. ठरवून करणारे फारच कमी. )
बरोबर कि चूक असे काहीच नसते. शेवटी ते स्वतःच्या विचारांच्या बैठकीवर अवलंबून आहे. एकाच परिस्थितीतील दोन पैसे खाणारी माणसे-- एक पैसे खाऊन भरपूर मजा मारताना दिसतो तर दुसर्याचे मन त्याला खात राहते.समर्थन ब्रम्ह्चर्याचेही करता येते आणि बहुपत्नीत्वाचेही.
प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? जे आपल्याला योग्य आहे ते मुलांना सुद्धा योग्य असायला हवे. असतेच असे नाही. शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो.
स्वाती२ आणि सुबोध खरे,
स्वाती२ आणि सुबोध खरे, पोस्ट्स आवडल्या.
स्वाती२ आणि सुबोध ़खरे यांनी
स्वाती२ आणि सुबोध ़खरे यांनी अगदी माझ्या मनातलं लिहीलंय.
डॉ.खरे, छान पोस्ट. अशा
डॉ.खरे, छान पोस्ट. अशा पोस्ट्स इथे वारंवार लिहिल्या जायला हव्यात. दुसर्या बाजूने विचार करणाराही एक वर्ग इथे आहे त्यांच्याकरता.
स्वाती२ बरोबर लिहिलय
स्वाती२ बरोबर लिहिलय एकदम.
सुबोध खरे, एक्सलंट पोस्ट! Very well put!
बावरा मन, खूप विचारप्रवर्तक
बावरा मन, खूप विचारप्रवर्तक असा हा विषय आहे. तुम्हाला हा विषय सुचला आणि तो तुम्ही व्यवस्थित लोकांपुढे मांडला ह्याबद्दल तुमचे अभिनंदन!
सुबोध, तुमचा अभिप्राय खूप आवडला.
ऋन्मेऽऽष: सिनेमागृहात अपुर्या उजेडात स्पर्शसुख घेणारे अनेक जण मी पाहिले आहेत. इतकेच काय दिवसा भर उजेडात रस्त्यात बाईकवर, प्रवास करताना गाडीमधे जिथे संधे मिळेल तिथे हे सगळं सुरु असतं. ह्यासाठी काळोखच हवा असे नाही.
मला तर कधी कधी असं वाटत आपल्या समाजात ही नको तेवढी झाकपाक आणि बंदीस्तपणा इतका आहे की ह्याच कारणामुळे सेक्स हा विषय चुकीच रुप धारण करत आहे.
स्वाती२ म्हणतात तेवढा
स्वाती२ म्हणतात तेवढा गुन्ह्याचा (रेप-मर्डर इ. जीवितास असुरक्षितता किंवा ब्लाक्मेल) महत्त्वाचा मुद्दा. तेव्हा माझा मुलगा काय किंवा मुलगी काय किंवा ट्रान्सजेंडर अपत्य काय कमिटेड अपत्य काय किंवा फुटलूज बाळ काय ह्याना मी अनोळखी व्यक्तीबरोबर वन नाईट करू नये हाच सल्ला देईन.
बाकी गर्भधारणा, त्याची भीती, भावनिक गुंतवणूक इ. इ. हे माझ्या मते वन नाईट चे प्रश्न नसून एकूणच ती व्यक्ती आपल्या सेक्सलाईफ/इमोशनल लाईफ व्यवस्थित हँडल कसे करते त्याचा प्रश्न आहे. कारण हे प्रश्न वन नाईट काय विवाह काय ह्या मध्ये कधीही येऊ शकतात. विवाह/कमिटेड रिलेशन मध्ये व्यक्तीस थोडा तयारीस अवधी मिळालेला असतो. वन नाईट मध्ये जे होईल त्यास समोरे जावे लागणार.
स्वाती२ आणि सुबोध खरे
स्वाती२ आणि सुबोध खरे दोघांच्याही पोस्ट आवडल्या.
प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? << हा प्रश्न आपली मुलगी वा मुलगा एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? असा असायला हवा ना?
नाही @ नीधप. त्यांनी करेक्ट
नाही @ नीधप.
त्यांनी करेक्ट प्रश्न विचारला आहे.
त्यांच्या प्रतिसादाचं शेवटचं वाक्य वाचा.
>>
"शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो."
<<
त्याची काँटेक्स्ट ही आहे->
>>भरपूर मैत्रिणी असणारा मुलगा हा स्मार्ट समजला जातो तेच भरपूर मित्र असलेली मुलगी वाह्यात समजली जाते. त्याच विचारसरणीने एका रात्रीची सोबत पुरुषाला पौरुषत्व बहाल करते पण स्त्रीला वेश्या समजले जाते. समाजाचे दाम्भिकपण यातून दिसून येते.<<
म्हणून मुलीने असं केलं तर चालेल का हा प्रश्न आहे.
परत परत वाचलं पण तुम्ही
परत परत वाचलं पण तुम्ही म्हणता तो अर्थ जाणवला नाही. असो.
स्वाती२ आणि सुबोध खरे
स्वाती२ आणि सुबोध खरे दोघांच्याही पोस्ट आवडल्या
सीमंतिनी, पोस्ट आवडली. डॉ.
सीमंतिनी, पोस्ट आवडली.
डॉ. खरे, भारतीय मानसिकतेचा विचार करता तुमची पोस्टही योग्यच.
>>प्रश्न आपली मुलगी एका रात्रीचे सोबती ठेवेल तर तुम्हाला मान्य होईल काय? जे आपल्याला योग्य आहे ते मुलांना सुद्धा योग्य असायला हवे. असतेच असे नाही. शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो.>>
अपत्य सज्ञान आहे, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे, सामाजिक दृष्ट्या देखील कुणाला उत्तर द्यायला बांधिल नाही. माझ्या छपराखाली रहात नाही असे असेल तर मुलीने/मुलाने एका रात्रीची सोबत ठेवावी की नाही हा तिचा/ त्याचा प्रश्न! माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा - परीणामांची जबाबदारी स्विकारण्यासाठी आपले अपत्य सक्षम आहे की नाही? त्याचा/तिचा याबाबतचा होमवर्क झाला आहे ना ?मनात काही चुकीची गृहितके नाहित ना? बेसिक रुल्स माहित आहेत, एक्झिट प्लॅन आहे, उद्या काही कारणाने गफलत झाली आणि अनप्लिझंट सरप्राइझ मिळाले तर झेपणार आहे तर मग वन नाईट स्टॅन्ड हा माझ्यासाठी अयोग्य वाटत असला तरी अपत्याच्या निर्णयाचा आदर करेन.
समाजातली दांभिकता व्यक्तीला असुरक्षित करते. सेक्शुअली अॅक्टिव व्हायचा निर्णय विचारपूर्वक घेतल्यास बरेच धोके टाळता येतात. सेक्शुअली अॅक्टिव होण्याआधी योग्य वॅक्सिनेशन, गर्भधारणा टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव बाबत मार्गदर्शन आणि योग्य कॉन्ट्रासेप्टिवचा सातत्याने वापर, एसटीडी टाळण्यासाठी प्रोटेक्शन जवळ बाळगणे वगैर गोष्टी सुरवातीपासूनच पालक आणि फॅमिली डॉकच्या मदतीने सांभाळल्या गेल्या तर बरेच प्रश्न कमी होतात. याच बरोबरीने सुरक्षितता आणि कायदे याबद्दलही मार्गदर्शन हवे. साधे पहिली दुसरीच्या वर्गाची परीक्षा असेल तर पालक मुलांची केवढी तयारी करुन घेतात पण लैंगिकतेसारख्या, संपूर्ण आयुष्याचा तोल ढासळवू शकणार्या गोष्टीबाबत प्रचंड डिनायलमधे असतात. शिकून नोकरीला लागलेली तरुण मंडळीही क्लूलेस असतात. बरेचजण बेसिक रुल्स समजून न घेता या खेळात भाग घेतात आणि मग पस्तावतात.
लेखात म्हटल्याप्रमाणे कोवर्कर बरोबर वन नाईट स्टॅन्ड हे खरे तर बीग नो. त्यात फेसबुक फ्रेंडलिस्ट मधे असणे, शिवाय मॅरीड असणे म्हणजे अजूनच लोचा. लेखकाने जरी वन नाईट स्टॅन्ड म्हटले असले तरी माझ्या मते हे साधे पारंपारिक अफेअर आहे. ऑफिस पॉलिसी माहित करुन घ्यावी. बरेचदा नोकरीही जाऊ शकते.
स्वाती२ धाग्याला अवांतर पण
स्वाती२ धाग्याला अवांतर पण माझ्या दृष्टीने जरुरी - मी सीमंतिनी. इथे सिमन्तिनी असा दुसरा आयडी आहे, ज्याच्याशी माझा काही सम्बन्ध नाही
दीर्घ वेलांटी माझ्या अस्मितेचा प्रश्न 
ओह! बरे झाले सांगितलेस.
ओह! बरे झाले सांगितलेस. दुरुस्ती करते.
.
.
बी, संधी मिळेल तिथे ती साधणे
बी,
संधी मिळेल तिथे ती साधणे याचे समर्थन `नैसर्गिक गरज' किंवा `आपल्या समाजात याबाबत तसा कोंडमाराच होतो मग असे हे होणारच' असे होऊ शकते. पण बरेचदा यातही जपून घाबरून पुरेशी काळजी बाळगून केले जाते ते लोकलज्जेखातर.
पण हा स्वॅपिंग प्रकार म्हणजे मला फार भयानक वाटतो. कारण मग यात विवाहबाह्य संबंधासारखी लपवाछपवीही नाही. दोन्ही पार्टीनी सौदा केल्यासारखे खुलेआम म्हणजे मनाचीही लाज सोडल्यासारखे झाले. यानंतर एकमेकांशी नजर मिळवायचेही धाडस असते या लोकांमध्ये. कदाचित मी आजवर भारताबाहेर पडलो नसल्याने मला हे पचवायला जड जात असेल, तर तो माझा दोष.
शेवटी आपण सर्वच थोडेफार
शेवटी आपण सर्वच थोडेफार दांभिक असतो. >>
जर हे मुलगा-मुलगी भेदाबाबतच असेल तर इथे दांभिकता नसून मुलापेक्षा मुलीची काळजी जास्त असणे, जे नैसर्गिकच आहे असे नाही का वाटत. प्रत्येक गोष्टीत तर आपण स्त्री-पुरुष समानता आणायचा हट्ट धरू शकत नाही ना. खास करून ज्या बाबी कौमार्याच्या बाबतीत निगडीत आहेत तिथे मुलीचीच काळजी जास्त वाटणे साहजिकच आहे.
Pages