One Night Stand आणि आपण सगळे

Submitted by बावरा मन on 16 August, 2014 - 00:18

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२ किती सुरेख लिहितेस ग . खूप छान व्यक्त होता येत तुला
सुबोध खरे यांच्या पण सगळ्या पोस्ट उत्कृष्ट आहेत Happy

खरं तर संध्याकाळी बोटारीयाची लक्षणं दिसू लागली की आजची एक रात्र काळरात्र असल्याची चिन्हे दिसू लागतात.

स्वाती२ - खूप आवडल्या तुमच्या सगळ्या पोस्ट्स.

आणखी एक आवडलं ते म्हणजे उगाच प्रत्येक धाग्यावर multiple irrelevant पोस्ट्स टाकून धागा भरकटवण्याचा प्रयत्न करणारे, misogynistic विचार लिहून अटेन्शन सीक करु इच्छिणारे- यांना सर्वांनी रीतसर इग्नोअर मारलं आहे.
याउलट- स्वाती२ व सुबोध खरेंच्या चांगल्या व मुद्देसूद पोस्ट्सना अनुमोदन देणाऱ्या अनेक पोस्ट्स आहेत. गुड जॉब!

स्वाती२,

आपला इथला संदेश वाचला. प्रथम पारंपारिक कुटुंब म्हणजे काय ते स्पष्ट करायचं राहून गेलं त्याबद्दल क्षमस्व.

१.
तर पारंपारिक कुटुंब म्हणजे न्यूक्लियर फॅमिली. तुम्ही जे सावत्र आईबापांचे कुटुंब म्हणताहात ते पारंपारिकच आहे. मुलाच्या वाढीला आई आणि बाप दोघांची गरज असते. यापैकी कोणी एक अनुपलब्ध असल्यास ते अपारंपरिक कुटुंब होतं. सावत्रपणामुळे नाही.

२.
>> स्त्री कडे भोगवस्तू म्हणून पाहयची वृत्ती असेल तर एकरात्रसहवास असो किंवा लग्न संबंध बाईकडे भोगवस्तू
>> म्हणूनच पाहिले जाईल.

थोडा फरक आहे. विवाहबंधनातून मुलं होतात. बेक्कारात बेक्कार केस घेतली तरी बायको माझ्या मुलांची आई आहे, या भावनेने पुरूष तिच्यासोबत राहायला तयार होईल. पण अशी किमान बांधिलकीही एकरात्रसहवासात नसते. त्यात स्त्री केवळ भोगवस्तू म्हणूनच बघितली जाईल. हेच तर्कट पुरुषांनाही लागू आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>तर पारंपारिक कुटुंब म्हणजे न्यूक्लियर फॅमिली. तुम्ही जे सावत्र आईबापांचे कुटुंब म्हणताहात ते पारंपारिकच आहे. मुलाच्या वाढीला आई आणि बाप दोघांची गरज असते. यापैकी कोणी एक अनुपलब्ध असल्यास ते अपारंपरिक कुटुंब होतं. सावत्रपणामुळे नाही.>>
अशी एक पालक अनुपलब्ध असलेली कुटुंब पूर्वीही होती आणि आजही आहेत. भारतातली विधवा किंवा परीतक्त्या स्त्री कष्ट करुन एकटी मुलांना वाढवते तेव्हा ते कुटुंब अपारंपारिकच म्हणायला हवे. अशा कुटुंबातली मुलांचे पुढे पारंपारीक कुटुंब होते की.

>>पण अशी किमान बांधिलकीही एकरात्रसहवासात नसते>> च्च! तेच तर अपेक्षित आहे ना! . पुन्हा भेटणे अपेक्षित नाही म्हणूनच वन नाइट स्टॅन्ड.
असो!

@1234 तस नाय ओ . एक तर मला जे काही म्हणायचं आहे ते लेखात म्हणून झाल आहे . दुसर म्हणजे चर्चा खूप छान चालू आहे पण माझ्याकडे काही नवीन मुद्दा नाही मांडायला . उगाच just sake of it टाकायचा म्हणून प्रतिसाद टाकण्यात अर्थ नाही . स्वाती 2 यांचे मुद्दे जाम पटले

हा प्रश्न जितका व्ययक्तिक आहे तितकाच वैचारीक स्वातंत्र्याचाही आहे, ( जिसे बहूत पापड बेलेने पडेंगे)
तुम्ही जर एखादी स्त्रीला घरी घेवून गेलात आणि तुमच्या पत्नीला सांगितले कि मला हिच्याबरोबर वन नाईट स्टँड करायचाय तू आज माहेरी जा तर ती माहेरी जाईल कि नाही माहित नाही पण तुम्ही दवाखान्यात नक्कीच जाल. Happy

असो चर्चा चालू द्या ........... वन नाईट स्टँड ओके असला तरी ती व्यक्ती पुन्हा समोर आली कि तेच आकर्षण निर्माण होणार त्याचे काय ?

,

मी कितीही लफडी केली तर चालतील लग्नासाठी बायको मात्र "शुद्ध" हवी. >>>
हा सूर बरेचदा आवळला जातो पण शहरी भागात तरी हे कन्सेप्ट पार गंडलेय असे नाही वाटत.

शहरी भाग मुद्दाम म्हणालो कारण ज्या समाजात हा वन नाईट स्टँण्ड रुळलाय तिथे तरी तरी असले काही न होता या बाबतही स्त्री-पुरुष समानता आलीय.
म्हणजे तू बाहेर लफडे करू शकतोस तर मी देखील करू शकते आणि मी करू नये अशी अपेक्षा असेल तिथे मी तुझेही खपवून घेणार नाही.
भले मग लग्न झाले असले तरी स्वताच्या पायावर उभे असलेल्या मुली आजकाल घटस्फोट घेताना समाज काय बोलेल वा आईवडीलांची बदनामी होईल याचा फारसा विचार नाही करत.

लग्नासाठी शुद्ध बायको वरून एक कुठेतरी विनोद रुपात ऐकलेले आठवले.

"लव मॅरेज मध्ये आपण आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न करतो.
अरेंज मॅरेजमध्ये आपण दुसर्‍याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करतो."

असो, तर आजच्या जमान्यात मुलेही मुलीचा भूतकाळ जास्त विचारात घेत बसत नाहीत, अनलेस ऎंण्ड अंटील ती स्वताहून अजून त्यातून बाहेर पडली नसेल तर ...

भले मग लग्न झाले असले तरी स्वताच्या पायावर उभे असलेल्या मुली आजकाल घटस्फोट घेताना समाज काय बोलेल वा आईवडीलांची बदनामी होईल याचा फारसा विचार नाही करत. <<
घटस्फोट घेतल्याने आईवडिलांची बदनामी होते? समाज काय म्हणेल याचा घटस्फोट घेताना विचार करायला हवा?

अरे देवा!

घटस्फोट घेतल्याने आईवडिलांची बदनामी होते? समाज काय म्हणेल याचा घटस्फोट घेताना विचार करायला हवा?
अरे देवा!
>>>>>>>>>

असे करायला नको पण असा विचार मुलीतर्फे वा तिच्या घरच्यांतर्फे केला जातो हे सत्य आहे, जे तुमच्या माझ्या अरे देवा ने बदलनार नाही.
आपल्या थोर भारतीय लग्नसंस्थेतील हा दोष आहे असे समजा.

हा सूर बरेचदा आवळला जातो पण शहरी भागात तरी हे कन्सेप्ट पार गंडलेय असे नाही वाटत. >>
तुम्हाला आळवला म्ह्णायचे आहे का?

>> भले मग लग्न झाले असले तरी स्वताच्या पायावर उभे असलेल्या मुली आजकाल घटस्फोट घेताना समाज काय बोलेल वा आईवडीलांची बदनामी होईल याचा फारसा विचार नाही करत. <<

>> पण असा विचार मुलीतर्फे वा तिच्या घरच्यांतर्फे केला जातो हे सत्य आहे, <<<

नक्की काय सत्य आहे? काहीतरी एक ठरवा

अमा, धन्यवाद
माझे मराठी शुद्धलेखन नेहमीच गंडते. पण इथे ही माझी टायपिंग मिस्टेक झाली. कारण मला हे दोन्ही शब्द माहीत आहेत.
आळवला कर्रेक्ट वर्ड !

नीधप,
दोन्ही सत्यविधान आहेत. वाक्ये त्या त्या संदर्भाने वाचा.
आपल्या बहुतांश समाजात हा विचार मुलीला आणि तिच्या घरच्यांना करावा लागतोच.
मात्र आधुनिकतेचे वारे वाहू लागलेल्या शहरी भागातील सुशिक्षित आणि स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मॉडर्न विचारांच्या मुलींनी हे धुडकावून लावले आहे. अर्थात हे प्रशंसनीय आहे.

एक सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या चर्चा आपण सरसकटीकरण करून करतो जे चुकीचे आहे.
गावखेड्यातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती फार भिन्न असते, त्यामुळे एकच एक निकष सगळीकडे लावता येत नाहीत.

हे बघा लेखक काय म्हणतो,

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला .

आता हेच जर तो पुण्याचा असता तर त्याला तितकासा धक्का बसला नसता,
आणि तेच जर तो मुंबईचा असता तर मन्नू तेरा हुआ अब मेरा क्या होगा अशी वर कॉमेंट केली असती.

आवरा. विषय वन नाईट स्टँड चा आहे. घटस्फोटाला तेवढेच असून चालत नाही. कान्ट स्टँड विथ... सिच्युएशन आहे ती. Proud

Asu dyat ki. Tv shirelit nahi ka pani ghalat. Shivay vishaya dharun lihave ashi parampara nahich

हो, विषय वन नाइट स्टँडचाच आहे, पण या वन नाईट स्टँडला घरी सांगून नाही जात कोणी की अग आज मी जरा आलो हं म्हणून....
म्हणून जिथे वन नाईट स्टँड आला तिथे प्रतारणा आली आणि जिथे प्रतारणा आली तिथे घटस्फोट आला.

बरं, मग त्याचे काय? घटस्फोट घ्यावा का नाही हा दुसरा विषय आहे. वनास्टॆ हे त्याचे एखादे कारण होऊ शकते, एखादा परिणामही.

आशूडी, ते घटस्फोट हे माझ्या मोठ्या पोस्टमध्ये एका वाक्यात आले होते. आजच्या समाजाचे, स्त्री-पुरुष समानतेचे, लग्नसंस्थेचे, उदाहरण द्यायला म्हणून. तो मुख्य विषय नाही आहे हे मलाही मान्य आहेच. तसेच आपल्या पुढच्या पोस्टमध्ये तुम्ही त्याकडे बोट दाखवल्यावर मी असेच गंमतीने मग काहीतरी संबंध जोडला बस्स !

ऋन्मेष, तुम्ही सुद्धा जनरलयझेशनच करताय की. परभणीत तसलं काही घडतच नसेल, तिथल्यापेक्षा पुण्यत जास्त आणि पुण्यापेक्षा मुंबईत जास्त असेल म्हणून. मुळात असले कॅज्युअल सेक्स प्रकार आपलया संस्कृतीत नाहीतच , गावात(च) संस्कृती (?) शिल्लक आहे, शहर म्हणजे मॉडर्नपणाच्या नावाखाली स्वैराचार ..... या सगळ्याच समजुती भाबड्या, ओव्हर सिंप्लिस्टिक .... थोडक्यात , जनरलाइज करणार्‍या आहेत.

म्हणून जिथे वन नाईट स्टँड आला तिथे प्रतारणा आली आणि जिथे प्रतारणा आली तिथे घटस्फोट आला.>> असे सरसकटीकरण नाही होउ शकत. इतर कारणांनी एकत्र राहावेच लागते अशी खूप जोडपी असतात. प्रतारणा सोसून,अ‍ॅक्सेप्ट करून घेउन एका घरात राहतात. घटस्फोट घेणे इतके सोपे नाही.
परत नव्याने सुरुवात करणे ही अवघड असते. त्या परिस्थितीत गेल्या शिवाय काय तडजोड एखादी व्यक्ती करेल, काय मार्ग काढेल ते समजणे अवघड आहे. हे मार्ग कदाचित नैतिकतेच्या रूढ राजमार्गावरचे नसतील पण जगणे शक्य करणारे असतात. इतर कोणाच्याही वन ना. स्टॅ. ला परक्याने मॉरल जजमेंट लावणे, त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासारखे आहे. It can be a liberating , happy, joyous experience. and may be part of the process of self discovery. getting rid of a marriage that is not working for oneself. गाव शहराचा काहीच प्रश्न नाही. ही प्रक्रिया कोठे ही होउ शकते.

गामा, न्यूक्लीयर फॅमिली हे कारण मला पटले नाही.
अशा अपारंपारीक कुटूंबात वाढलेल्या आणि तरीही आपल्या क्षेत्रात श्रेष्ठ ठरलेल्या अनेक व्यक्ती आहेत.
सई परांजपे, लता आणि आशा.... अनेक नावे सांगता येतील.

मैत्रेयी, ते जनरलायझेशन नाही झाले. शहरातील वातावरण आधुनिक असते तर गावखेड्यात जिथे सुधारणेचे वारे पोहोचले नाहीत तिथे तितकेसे नसते. अर्थात अपवाद सगळीकडे असतातच. स्वैराचारी वृत्ती म्हणाल तर ती शहरवासीयांमध्ये जास्त आणि गावकर्‍यांमध्ये कमी असते असे मी कुठेही म्हणालो नाही. पण त्यावर रिअ‍ॅक्ट होण्याचे वा त्याकडे बघण्याचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात.

अमा,
ते "वन नाईट स्टॆंड - घटस्फोट" संबंधाचे वाक्य असेच होते. संदर्भासाठी वरचेखालचे प्रतिसाद बघा.

<<<<<<इतर कोणाच्याही वन ना. स्टॅ. ला परक्याने मॉरल जजमेंट लावणे, त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासारखे आहे.>>>>>>>
१ ना. स्टॅ. असो वा समलिंगी संबंध वा आणखी काही, जोपर्यंत एखाद्याच्या या गोष्टींचा त्रास आपल्याला होत नाही वा समाजाला त्याचे दुष्परीणाम भोगावे लागत नाहीत तोपर्यंत कोणाच्या वैयक्तिक बाबीत हस्तक्षेप करायचा, वा आपण म्हणता तसे मॉरल जजमेंट लावायचा अधिकार कोणालाच नाही आणि इथे तो मलाही नकोय.

मात्र या १ ना. स्टॅ. मुळे समाजाचा र्‍हास होतो किंवा थोर भारतीय संस्कृती बुडतेय की नाही हा मात्र चर्चेचा विषय होऊ शकतो. माझे स्वताचे मत नाही असेच आहे.

माझ्यामते वन नाईट स्टॅंड हा स्वैराचार नसून प्रतारणा वा जबरदस्ती हे स्वैराचारामध्ये मोडते.

बाकी चालुद्यात पण गाव-खेड्यात हे प्रकार चालत नाहीत म्हणजे कोंबडे झाकण्याचा प्रकार आहे. 'उसाच्या फडात, ओढ्याकाठी, वावरात' असे लै म्हन्जे लैच किस्से असतात. त्यात श्रीमंत, गरीब, जात-पात असाही फरक करता येणार नाही. शहरात राहून खूप लोकांच्या गावाबद्दल बर्‍याच समजुती असतात त्यातली ही एक.

Pages