लाईफ इज अ लॉन्ग ड्राईव्ह - सीमा गैलाड

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2011 - 05:26

"मी सिगरेट ओढत असले तरी पेटवत कधीच नाही"

'गैलाड' हे न ऐकलेले आडनांव धारण करणार्‍या आणि 'सीमा' हे तसे आधीच्या पिढीतील नाव धारण करणार्‍या त्या एक्स्प्लोझिव्ह रसायनाकडे बघत आणि वरील वाक्य ऐकत मी विचारात बुडलो.

'अत्यंत ज्वालाग्रही'

!!

मनातील विचारांना गाइड करण्याचे यंत्र निर्माण व्हायला हवे.

माझ्या फोर आर्मवरील केस त्या थंडीमुळे आणि गार वार्‍यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखवत निवडणुकीच्या उमेदवारासारखे उभे राहिले होते. त्यांच्या मुळाशी होते त्वचेचे अनेक थर! बाहेरच्या थराचे काम आतल्या थरापेक्षा वेगळे होते. केसांची मुळे बहुधा रक्तात पोचलेली असावीत किंवा नसावीतही! पण त्यांच्या मुळांशी आग होती. ही आग ऐंद्रिय अतृप्तीच्या अजरामर भडकण्यामुळे असलेली आग होती. रक्ताला उसळ्या मारायला लावणारी!

मी स्वतःच्या आत जायला लागलो. जातच राहिलो.

थर, आत थर, त्या आत थर!

'मी' असे नेमके काहीच नाही. आणि सगळे काही 'मी'च!

बाहेर दिसणारी माझी त्वचा आतमध्ये लालसर होती. त्या आत होती हाडे, मांस, स्नायू, रक्त आणि अनेक अवयव, जे आपले अस्तित्व दाखवत राहतातच!

यात कोठेतरी मी होतो. हृदयातील धडधड, डोळ्यांची आग, जिभेवरची कडवट चव, मेंदूत होणारी विचारांची उलाढाल आणि खालच्या मातीवर पायाच्या अंगठ्याने काढलेली निरर्थक अक्षरे किंवा आकृत्या! ज्या दिसत नव्हत्याच कारण दिवा अगदीच मंद होता आणि रात्रीचे दहा वाजलेले होते.

पद्मावती ढाबा!

पुणे बारामती रस्त्यावर असलेला पद्मावती ढाबा चोरून आमच्याकडे पाहात होता.

'बाई? इथे बाई? आणि अशी वागते?'

त्या सगळ्या नवलाच्या गर्दीत माझे एकटेपण डचमळत राहिले. माझ्या आत आत इतका गेलो की जिकडे पाहीन तिकडे मीच मी दिसायला लागलो. काही रस्ते होते, काही नद्या, काही तळी, काही गटारे, काही डबकी, काही लाल मातीच्या वाटा, काही माणसे, काही पशू, काही पक्षी जे उडून दूर जाऊ पाहात होते, काही ओकावेसे वाटेल असे दुर्गंध आणि काही नाचावेसे वाटेल असे सुगंध! एक असह्य भयाण खेडे! जे तडफडत होते मुक्त होण्यासाठी!

हळूहळू ते खेडे पंख असल्यासारखे उडू लागले. ढाब्यात असलेल्या ज्या 'हट'मध्ये आम्ही बसलेलो होतो त्या हटच्या एका भिंतीवर असलेल्या एका पालीच्या शेजारी जाऊन बसले. तिथून मला पाहू लागले. मग हळू हळू ते मलाच पाहीनासे झाले. मग हळूहळू माझे मीपण विस्तारत विस्तारत, माझ्यातून मला नष्ट करत करत पद्मावती ढाब्याला व्यापू लागले. आणि शेवटी आसमंतात भरून राहिले.

गुडांग गरमच्या धुरासारखे!

जो सीमा गैलाडच्या तोंडातून शिव्यांसकट बाहेर पडत होता.

"पुरूषही ओढतेस तू, पण पेटवत नाहीस"

माझे हे वाक्य सीमा गैलाडचे यौवन गदगदवत राहिले.

तोंडात अडकलेला धूर, हासण्याची इच्छा आणि नेहमीच शर्टचे वरचे एक बटन उघडेच ठेवण्याची बिनधास्त सवय यामुळे सीमा गैलाड ज्वालाग्रही दिसत होती.

मी जसा माझ्याशी वागतो तितक्याच मोकळेपणाने 'वयात आल्यानंतर' आजवर मी एकाच व्यक्तीशी वागलो आहे.

'सीमा गैलाड'!

सीमाबरोबर 'आपल्याला खरेखुरे आपण ' होता येणे हा अद्वितीय फायदा मी दोन वर्षे घेत राहिलो. नाहीतर परक्याबरोबर, या परक्यात आई, बाप, बायको, पोरे, मित्र सगळे आले, अशा परक्यांबरोबर आपल्याला 'आपण स्वतः' होताच येत नाही. आपण त्यांचे कोणीतरी आणि ते आपले कोणीतरी असतात. सीमा गैलाडचे मात्र तसे नाही. ती सीमा गैलाड असते, आपली कोणीही नसते, आपण आपण असतो, तिचे कोणीही नसतो आणि तरीही...

... सीमा गैलाड आणि आपण मिळून एक पूर्णपणे वेगळेच जग असते... जे इतरांना लांबून पाहून जाणवतच नाही.

सीमा गैलाड ज्या पुरुषांच्या जीवनात येईल त्यांनी जर तोवर लग्न केलेले नसेल तर ते कधीच करणार नाहीत.

सीमा गैलाड थुंकते या विश्वावर! पचाककन!

"पुरुषाला काय पेटवायचंय... च्युतमारीचे आईला पाहून चळतात"

पुरुषांना लावलेले हे विशेषण तिथल्या एकेकाने ऐकले. सगळेच जण एकमेकांकडे पाहून हासत होते गालातल्या गालात! पण सीमा गैलाड बहुधा त्यांना महिला पोलिस वाटत असावी. कारण ती तशीच दिसते. अर्थात, तिचा अवतार नेहमीच तसा असतो हे तिथल्या लोकांपैकी फक्त मलाच माहीत होते. तिच्याच भाषेत 'झाटभर मेक अप' न करता राहायची ती! केस खांद्यांच्या खाली जेमतेम पोचायचे. पुरुषाला मोहीत करणारे, तेही पहिल्याच दर्शनात, तिच्याकडे सगळे काही उत्तम होते. पण एक कुठलातरी शर्ट, एक टाईट जीन्स आणि पुरुषासारखीच बिनधास्त वावरण्याची अंगात भिनलेली सवय! यामुळे पुरुषच पहिल्यांदा वचकून असायचे.

"ओत... डोळे काढ बाजूला"

बहुधा माझी नजर नको तिथे आहे असे वाटून ती बिनदिक्कत तसे म्हणाली. तेही रिकामा ग्लास आपटत आणि दारू मागत. हेही सगळ्यांनी ऐकले असे दिसल्यावर मात्र मी ताडकन वेटरला बिल आणायला सांगितले.

"ए... नाईन्टी आण"

सीमाने परस्पर दिलेली ऑर्डर पाहून मात्र वेटर माझ्याकडे अजिबात न बघता नाईन्टी आणायला गेला. खरे तर दोघांत मिळून एकच क्वार्टर झालेली होती. पण सीमाची जीभ न पिताही अशी चालायची हे माहीत असल्यामुळे मी तिला बाकीची लॉन्ग ड्राईव्हवर पाजायचे ठरवलेले होते. अ व्हेरी.... व्हेरी लॉन्ग ड्राईव्ह! आमचा प्लॅन्ट त्या विभागात आहे तिथपासून ते पार पुण्यातल्या वाडिया कॉलेजपर्यंत!

त्या क्षणी एखाद्याने जरी तिला छेडले असते तर तिला वाचवायची हिम्मत माझ्यात अजिबात नव्हती. रस्त्यावर दिसलेला एक निर्जन ढाबा या क्वालिफिकेशनवर तो तिनेच जाता जाता निवडलेला होता आणि आम्हाला अंदाज नसला तरी केवळ गेल्या वीस एक मिनिटांत तिथे अचानक बारा पंधरा जण वेगवेगळ्या हट्समध्ये किंवा अंगणातील टेबलांवर बसलेले होते. आणि आत्ता प्रत्येक गिर्‍हाईक आणि स्टाफ तसेच मालक चोरून चोरून आमच्याचकडे पाहात होता.

"हा ग्रामीण विभाग आहे... आपण पुण्यात जाऊन बसू"

"तिकडे सगळे सज्जन असतात??? बघणार नाहीत माझ्याकडे??"

"तू तरी सज्जन आहेस का??"

मी कुजबूजत विचारले, कारण ती सज्जनच नाही असे इतरांचे उगाच मत व्हायला नको होते. प्रॉस्टिट्यूट सहज वाटते ती अगदी!

खणखणीत उत्तर दिले सीमाने!

"मी जगाला फाट्यावर मारते"

'कशाच्या फाट्यावर मारते' हे सांगितले नाही हे नशीब!

टेबलवर नाईन्टी येऊन पडली.

"तुला सगळे माहितीय... नाटकं करू नकोस... मी मुलगी असले तरी खरा मुलगाच आहे मी... क्काय???"

ते वाक्य तिने मला उद्देशून पण वेटरकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने बघत विचारल्यामुळे वेटरने पुन्हा एकदा तिच्या उघड्या बटणाकडे पाहिले आणि मग माझ्याकडे पाहात निघून गेला.

"तू पहिल्यांदा ते बटन लाव..."

"का? आपल्याला जे पाहायला मिळते ते दुसर्‍याला पाहायला मिळू नये म्हणून???"

"उघडीच राहा मग! शर्ट तरी कशाला घालायचा??"

माझ्या कुजबुजीला व्हॉल्यूमच सापडू शकत नव्हता.

"मच्छर येतील ना घोंघावायला.. हां बास बास.. सोडा जास्त टाकून मारू नकोस माझी"

सीमा गैलाड म्हणजे त्सुनामी!

"अशी पण मारता येते??" - मी किंवा माझी लज्जा!

" बर ते जाऊदेत.... बांदलचं मटन लुसलुशीत होतं का?"

सातारा रोडवरच्या एका मांसाहारी हॉटेलात तिला यायचं होतं, पण ते जमले नाही आणि मी एकटाच जेवून आलो हे तिला समजल्यामुळे आत्ताचा प्रश्न होता.

"एकदम..."

"कॉस्टलीय का?"

"होय... बोकडाला कॉस्टली पडतं... माणसाला नाही..."

"तुझ्यायला तुझ्या... "

सीमा गैलाडने हासत हासत अर्धा पेग एकाच घोटात ढकलला.

ती पुर्वी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर होती. तिथे एक भयानक प्रकार झालेला होता. कॉलेजचे नांव मुद्दाम लिहीत नाही आहे. चार मुलांनी तिला कॉलेजमागच्या गवतात ओढून नेले होते. त्या आधी ती अशीच बिनधास्त असली तरी कॉलेजला व्यवस्थित वागायची. शिव्या वगैरे द्यायची नाही. साडी नेसून जायची. तिला दारू आणि स्मोकिंगचे व्यसन तिच्या भावामुळे लागले होते. आई वडील नव्हतेच. भावाचे लग्न झाल्यावर मात्र भावाने सगळे सोडले आणि हिची व्यसने तशीच राहिली. लग्न होईना! दिसायलाही तशी तोंडावळ्याने सामान्यच! वहिनीने हाकलून द्यायची वेळ आणली. मग एका फ्लॅटमध्ये दोन बायकांबरोबर राहू लागली. तिघी मिळून भाडे भरायच्या त्या फ्लॅटचे! पण कॉलेजमध्ये मुलामुलींशी समान मोकळेपणाने वागत असल्यामुळे दिल्लीहून आलेल्या एका मुलांच्या ग्रूपला गैरसमज होऊन तिचा फायदा घ्यावासा वाटला. ते सरळ तिच्यावर लाईन मारायला लागले. तेव्हा तिने सावध होऊन त्यांना झापले. पण पुरुषी अहं दुखावला गेला. वर्कशॉपशी तिचा संबंध नव्हता. पण पार्किंग तिकडेच होते. ती संध्याकाळी सात वाजता स्कूटर घ्यायला पार्किंगपाशी गेली तेव्हा बॉयलर सूट घालून हे चौघे मिलिंग मशीनवर जॉब करत होते. एकाला ती दिसली. त्यांच्यात काहीतरी ठरले. दर बुधवारी तिचे एक प्रॅक्टिकल उशीरा असते हे लक्षात आले. एका बुधवारी अंधारात सरळ तिला उचलले अन मागच्या गवतात नेले. सीमा गैलाड महानच! तिचे तोंड दाबून धरले असले तरीहि तिने दोघांना लाफा लगावल्या. त्या गडबडीत एकाचा हात सुटला तसे तिने खच्चून बोंब मारली. पण उपयोग नव्हता. जवळपास जे होते ते वर्कशॉपमध्ये म्हणजे जवळपास सत्तर एक मीटर्सवर मशीन्सच्या आवाजात होते. पण सीमा घबरली नाही. तिने आणखीन एकाला फटके टाकले. आता हे सगळे तीच म्हणते म्हणा! पोरेच हादरली. उद्या काही प्रकार कोणाला समजला तर आपला बाप दिल्लीहून येऊन आपला मुडदा पाडेल हे त्या पोरांना समजले. सगळे पळून जायला लागले तर एका अशक्त पोराचा पाय हिने धरला. त्याचा बूट आला तिच्या हातात आणि तो तसाच पळत गेला. आवाज हिने ऐकून ठेवले.

दुसर्‍या दिवशी पोरांनी आळीमिळी गूपचिळी पाळली तरी ही प्राचार्यांकडे गेली. बूट दाखवला अन म्हणाली हा बूट ज्याचा आहे त्याला पोलिसात द्या! प्राचार्य हादरले. काही बोलेनात! पॉलिसी मॅटर झाले होते. ही टीचर्स रूममध्ये आली आणि तीन चार लेडी प्रोफेसर्सना आपले म्हणणे सांगितले. तिकडे प्राचार्यांनी संस्थापकांना फोन लावला. संस्थापकांनी हिला फोनवर बोलावले. हिने त्यांना प्राचार्यांसमोर आणि एका लेडी प्रोफेसरसमोर सांगितले.

"आमची इज्जत घालवायला कॉलेज काढलय काय?? थुंकते मी या नोकरीवर! मला नुकसान भरपाई पाहिजे नाहीतर चालले चौकीवर"

दमदार नुकसान भरपाई घेऊन ही दुसर्‍या किरकोळ कॉलेजला जॉईन झाली आणि मी बसवत असलेल्या एका नाटकाची जाहिरात पाहून तिने मला कॉन्टॅक्ट केला. त्या नाटकात तिच्यासाठी कोणताच रोल मॅच होत नव्हता. पण आणखीन एका पटकथेमध्ये मात्र एक रोल होता. हिचा एकंदर वावर मला व आमच्या ग्रूपमधील एकांना इन्टरेस्टिंग वाटला. काही कारणाने भेटी होत राहिल्या. ग्रूपमधील एका मुलीच्या लग्नात परत भेट झाली. तेव्हा जरा अधिकच जवळीक झाली. तिच्या बिनधास्त स्वभावात तेव्हापासून एक थरारक आणि आक्रमक व्यक्तीत्व आहे व ते अब्जावधी स्त्रियांपेक्षा खूपच वेगळे आहे हे जाणवायला लागले. मला काय, तिच्याच भाषेत बोलायचे तर कशातही काही ही जाणवेल भडव्याला!

तिच्या शिवराळ भाषेचे एक कारण होते. भावामुळे तिला अनेक सवयी लागल्या होत्या. त्या तिने सोडल्याच नाहीत. ती स्वतःला पुरुष समजत असल्यासारखीच वावरत राहिली. भावाने मात्र सगळ्याच सवयी सोडल्या. आता ही भावाचे थोबाडही पाहात नव्हती. जगात अगदीच एकटी होती असे नाही, इतर अनेक नातेवाईक होते, पण ते अधेमधे संपर्कात असायचे. फ्लॅटवरच्या दोन मैत्रिणी हे तिचे विश्व झाले होते. त्या मैत्रिणींना हिचे अती साहसी वागणे अत्यंत अप्राप्य असल्याने अत्यंत आकर्षक वाटत राहायचे. मात्र! सीमा गैलाड काही विशिष्ट लोकांच्या संगतीतच अशी अती साहसी वगैरे वागायची. अन्यथा ती सौम्य असायची. पण ती सौम्य असायची तेव्हा तिच्यात काही अर्थच वाटायचा नाही. आत्ताच्या कॉलेजमध्ये तिची जुन्या कॉलेजमधली बातमी पसरली होती. पण ती खाली मान घालून ते सहन करून व्यवस्थित नोकरी करत होती. मात्र जीवनात इतक्या कमी वयात आलेल्या घाणेरड्या अनुभवांमुळे तिच्यात असलेला कडवटपणा भावाने शिकवलेल्या शिव्यांच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त व्हायचा.

पण एक मात्र होते! सीमा गैलाड हा देवाने स्त्री जगतावर केलेला एक मोठा उपकार होता. आत्ताच्या कॉलेजमध्ये एका ट्रीपमध्ये एका मुलीला उद्देशून बोलणार्‍या एका विद्यार्थ्याच्या तिने सर्वांदेखत कानफटात वाजवली होती. आणि नंतर तिला भेटायला आलेल्या आणि त्या मुलाची तक्रार करू नयेत अशी विनंती करणार्‍या मुलांना तिने त्यांनाही जमणार नाहीत अशा शिव्या दिल्या होत्या, मात्र त्यांच्याशिवाय आसपास कोणी नाही हे पाहूनच! दातखिळी बसलेली ती पोरे निघून गेली होती. मात्र सीमा गैलाडने त्या विद्यार्थ्याचे करीअर बरबाद केले नाही, कारण ती मुलगीही काहीशी त्याच्यात गुंतल्याचे तिला संध्याकाळीच समजले होते.

सीमा गैलाड तिच्या फ्लॅटवरील दोन मैत्रिणींशी आणि माझ्याशी बोलताना मात्र 'नेमकी सीमा गैलाड' असायची. नो मुखवटा, नो खोटेपणा!

काहीही बोलायचो आम्ही!

एकदा इतर फ्लॅटधारकांनी सीमाच्या फ्लॅटमध्ये व्यसने चालतात व अधूनमधून शिव्या ऐकू येतात अशी तक्रार फ्लॅटच्या मालकाकडे केली. तो आला. त्याने विषय काढला. सीमा अतिशय सालसपणे त्याच्याशी बोलली. त्याही वेळेस फ्लॅटमध्ये सिगारेटचा वास येत होता. ते पाहून तो माणूस सरळ म्हणाला की तुम्ही सिगारेट ओढताय की? त्यावर ती म्हणाली ती भाडे देत असलेल्या फ्लॅटमध्ये आतमध्ये सिगारेट ओढतीय, तुम्हाला काय त्रास? तो काहीतरि अधिक बोलू लागला तसे तिने त्याला बजावले. 'एक तर मला नांव सागा कोणी तक्रार केली ते, नाहीतर मीच तक्रार करेन'! आता ही बया आधीच दिसायला अशी, त्यात तिचे बोलणे वागणे आणि पेहराव तसा! तो हादरला आणि निघून गेला. तो गेल्यावर हिने शेजारच्या तीनही फ्लॅट्सची दारे वाजवली. प्रत्येक घरातला एकेक माणूस दारात आल्यावर हिने निक्षून सांगितले.

"मी दारू पिते आणि विड्या फुंकते. मी जगावर थुंकते. तक्रार केलीतर ***********.... एकदाच सांगतीय"

जो तो सभ्यपणे दार लावून आत गेला. मैत्रिणी हिच्याकडे बघतच बसल्या. तेव्हापासून सीमा गैलाड सरळ टेरेसमध्ये बसूनच बिड्या फुंकायला लागली. आजूबाजूच्या फ्लॅटमधले लोक तेव्हापासून फारसे टेरेसमध्ये येणे कमी झाले.

शनिवार संध्याकाळ आली की एकमेकांना आठवण यायची आम्हाला! कारण ती पिते हे मला कळल्यानंतर एकदा आम्ही दोघे आणि काही ग्रूपमधील सदस्य एकदा गेलो होतो तेव्हा धमाल आली होती. तेव्हापासून शनिवारी ती एसेमेस वगैरे करायची. एसेमेस तरी काय?

'ढकलायची का आज थोडी?'

'कुठेयस रे टवळ्या?'

'शनिवार आहे, निजवायची का व्हिस्कीची आई?'

मला तर दुसरा छुपा मोबाईल फोन घेऊन ठेवावा असेच वाटायला लागले होते.

मी शक्य तितक्या वेळा नाही आणि शक्य तितक्या वेळा हो म्हणायचो. मी नाही म्हणालो की ती डायरेक्ट पुढच्या बुधवारी वगैरेच बोलू लागायची. मी हो म्हणालो की काही वेळा तिलाच काही ना काही अडचण येऊन तिचेच रद्द व्हायचे. तेव्हा मात्र अगदी माफीनामा असल्यासारखे एसेमेस करायची रात्रीपर्यंत! आणि दोघांचेही हो असले आणि कुणालाच कसलीच अडचण नसली तर हे असे संवाद व्हायचे.

"तू एरवी शिव्या वगैरे न देता कशी काय बोलतेस गं? आणि मीच भेटलो की तोंड कसे सुटते?"

"थोबडाच तसाय तुझा... पुढे बघून गाडी चालव... "

"समजा... मी इथेच थांबलो आणि कुठे गेलोच नाही तर..."

" ************ "

संपला विषय!

आज आम्ही असेच बसलो होतो कुठेही जाऊन!

मी म्हणालो.

"आपलं काय ठरलवतं?? गाडी चालवताना लावायची"

"मी इथे पिणार... तू जा गाडीतून"

"अन तू एकटी इथे बसणार??"

"बिडी दे.."

गुडांग गरमने ओठ बदलले. आणि दोन तीन झुरक्यांनंतर पुन्हा गुडांग गरमने ओठ बदलल्यावर मी ओठाला लावत म्हणालो.

"ह्यॅ... कडवट लागायला लागली च्यायला बिडी आता.."

"घरी जाऊन निजलास की बायकोही म्हणेल... काय करायचं ते खाली करा.. तोंड आणू नका जवळ"

मी अनेक क्षण हादरून नुसता बघत बसलो. ती या लेव्हलला जायची हे मला माहीत असले तरी सगळ्यांसमोर जाईल याची कल्पना नव्हती. पब्लिक बघत होते माझ्याकडे! मी उठलो.

"सीमा... उठ.... उठ... ताबडतोब उठ..."

"जमणार नाही... "

"मग आता एक शब्द बोलायचा नाही"

"तेही जमणार नाही..."

"मला एक समजत नाही... कुणाचं थोबाड पाहतो मी सकाळी म्हणून तुला भेटायची मला बुद्धी होते..."

"आपण कुठे भेटलोयत??"

खरे होते! मी सीमाला कधीच भेटलो नव्हतो. खर्‍या अर्थाने! तिने एकदा भेटायची संधीही दिली होती आणि सुचवलेही होते. मला जमणे शक्यच नव्हते. तेव्हा तिने माझी साले काढली होती. नंतर सकाळी तिच्याच लक्षात आले की ती बहुधा चुकीची वागली. मग एसेमेस चा सपाटा सुरू करून माफीबिफी मागीतली आणि मैत्री पुढे सरकवली.

मला ती संध्याकाळ आठवते. सोलापूर रोडवरील चौफुला की कुठून आम्ही असेच गाडीतून येत होतो. तिने तिची स्टोरी मला सांगितली होती. वयाची पहिली दहा वर्षे तिला मुलाप्रमाणेच वाढवले होते. दोन मोठे भाऊ होते. आई वडील तिच्या जन्मानंतर पाच वर्षातच गेले. मोठा भाऊही वारला. मधल्या भावाने सांभाळले. गल्लीत थट्टा व्हायला लागली तसे तिला जाणवू लागले की फ्रॉक, स्कर्ट असे काहीतरी घालायला हवे. तोवर ती जीन्स टीशर्ट घालून क्रिकेटच खेळायची. पोषाख बदलला तरी आवडिनिवडी तशाच राहिल्या. अजूनही मुलांमध्येच खेळायची. अगदी शरीराने वेगळेपण दाखवून दोन वर्षे होईपर्यंत आणि गल्लीतल्या काही जणांनी तिचा आणि भावाचा जाहीर अपमान करेपर्यंत ती तशीच वागली. यात दोष तिचा नव्हता. तिला शिकवलेच गेलेले नव्हते. मग ती अगदी शालीन मुलीसारखी वागू लागली. पण तिच्याबाबतीत त्याच बेधडकपणाची आठवण मनात असल्यामुळे काही मुलांनी वारंवार त्रास द्यायचा प्रयत्न केला. तसे मात्र तिने तिचे सिंहिणीचे स्वरूप दाखवले. पण यामुळे बदनामी झाली ती झालीच! तिकडे भाऊ व्यसनी झाला आणि त्याने हिलाही शिकवले. बाविसाव्या वर्षापासूनच ती स्मोक करू लागली, पण फक्त घराच्या आतच! विचारणारे कुणीच नाही. भावाचे लग्न ठरले तसा त्याने आधी हिच्या लग्नाचा प्रयत्न सुरू केला. हिची कथा येणार्‍या स्थळांना हळूहळू कळू लागल्यामुळे कोणालाच पसंत पडेना! त्यातच दिसायला अतीव सुंदर नव्हती. चारचौघींसारखीच! पण हिला कधी नीट वागावे, लग्न करावे असे वाटलेच नाही. लग्न ठरतच नाही म्हंटल्यावर तिने आणखीन काही अटी धुडकावल्या. आता ती पुन्हा यथेच्छ स्मोक करू लागली घरातच! त्यातच शर्ट पॅन्ट शिवाय काही घालेना! सरळ गल्लीच्या टोकाशी असलेल्या पानाच्या टपरीवरून सिगारेटचे पाकीट आणू लागली. अर्थातच वहिनी भडकून भांडणे काढू लागली. पर्यवसान भावाने हिला भाड्याची खोली घेऊन देऊन हाकलून देण्यात झाले. मात्र या दरम्यान तिने इंजिनियर होऊन सिव्हिल डिपार्टमेन्टची लेक्चरर म्हणून नोकरी तेवढी मिळवलेली होती. अर्थातच खासगी कॉलेज असल्यामुळे पगार चांगलाच होता. सुट्या भरपूर, फ्लॅटवरील मैत्रिणी व्यसनांची निंदा न करता सांभाळुन घेणार्‍या आणि मोकळा वेळच वेळ! मग काहीतरी करू, काहीतरी करू म्हणत लिहू लागली. चित्रे काढू लागली. शेवटी नाटकात काम करायला माझ्याकडे आली होती. तिला वाटले असावे हा साला बराच मोठा कोणी आहे. तिच्याच भाषेत सांगायचे तर मला नाटकातले 'झाट काही समजत नाही'!

हे सगळे मला सांगताना ती अतिशय गंभीर आणि उदास झाली असली तरी भाषा तशीच टपोरी राहिली होती.

"सीमा... तू... अशी का बोलतेस मवाल्यासारखी?? तुला राहायचे तसे राहा पण भाषा का बदलत नाहीस??"

"मस्त वाटतं! आई बहीण काढायला एकेकाची"

"आई बहिण??? तूही बहिण आहेस, आई होऊ शकशील... तुला चालेल का तुझ्या भावाला कोणी असं बोललं तर??"

"लई वेळा! त्याला तर मीच शिव्या घालते तोंडावर"

"आणि उद्या तुझ्या मुलाला कोणी असं बोललं तर??"

"मुलगा व्हायला चढणार कोण आहे??'

"हे तुझं बोलणं अत्यंत घाणेरडं आहे.."

"तूही बोलतोस की असा??"

"हो, पण मी मित्रांमित्रांमध्ये बोलतो... मी कधीच शिव्या देत नाही..."

"मी देते... चीअर्स"

"चीअर्स... सीमा... तुला कधी एखादा पुरुष आवडला का गं?"

"दोन! दोन पुरुष आवडले मला.."

"कोणते??"

"एक माझा बाप! आणि दुसरा मन्या! वाड्यात एक मन्या होता मन्या! मस्त होता. लाईन द्यायचा! पण त्याच्या आईने आई घातली"

"व्वा! वा वा! काय शब्द आहेत! आणि बाप का आवडायचा??"

"कारण तो लवकर मेला... "

बराच वेळ मी धीम्या धीम्या गतीने गाडी चालवत राहिलो. नंतर विचारले.

"मन्याप्रमाणे कोणीच आवडले नाही??"

" नाही. शेपूटघाले साले सगळे! त्यापेक्षा ते कॉलेजमागे नेऊन दाबणारे बरे, **त दम तरी होता त्यांच्या"

"...... हो.... पण तसे कोणीच आवडले नाही??"

"तसे काय! अनेक आवडतात. हा दिसायला बरा, तो बोलायला, तो हसायला, तो फिरवायला, हा चढवायला, तो खर्चाला, एखादा स्वभावाने बरा, एखादा ********"

"मग??"

"मग काय???"

"मग कोणाशी तरी विषय का काढत नाहीस??"

"कसला???"

"लग्नाचा??"

सीमाने जहरी शिवी हासडली.

"का गं???"

"का काय का?? मी लग्न करीन असं वाटतं तुला??'

"का?? लग्न का करणार नाहीस म्हणे??"

"पुरुषाशी कसं लग्न होईल माझं??"

"म्हणजे काय??"

"मीच पुरुष आहे.. "

"पहिल्यांदा तू बाईसारखी वागायला लाग... "

"म्हणजे काय करू?? साडी नेसू?? डोक्यावरून पदर घेऊ??? पावलापावला लाजू??? स्वयंपाक करू??? पोरांना जन्माला घालू?? नवर्‍याचे पाय चेपू?? सासरच्यांची सेवा करू?? महिला मंडळात जाऊ?? पाकक्रिया शिकू?? कीर्तन करू?? कष्ट करू?? आई *** त्या लग्नाची ... अ‍ॅन्ड आय होप यू आर नॉट गोईन्ग टू टेल मी दॅट लग्नाने स्त्रीच्या आयुष्याला अर्थ बिर्थ मिळतो... "

मला व्यक्तीशः सीमाचे विचार फार.... फार..... फार पटायचे.

पण स्वतःच्या बायकोने माझ्याशी लग्न केल्यावर तिला हे वरचे सगळे करायला लागू नये असे मात्र माझ्या मनात येत नव्हते. एक पारंपारिक पुरूष! सीमाच्याच भाषेत *****!!!!!!

लग्नाने आयुष्याला अर्थ मिळतो ही समाजाची धारणाच चुकीची आहे. लग्नाने फक्त आणि फक्त स्त्रीला एक सामाजिक स्टेटसच मिळते हे दुर्दैव दुर्दैवाने खरे आहे. इतकेच, की त्या स्त्रीकडे पाहण्याचा लांडग्याच्या डोळ्यांच्या आणि कोल्ह्याच्या मेंदूच्या पुरुषांचा दृष्टिकोन फक्त आणि फक्त 'किंचितसा' बदलतो. नवरा आपल्या बायकोचे रक्षण करू शकेलच असे मुळीच नाही.

जगातील सर्व संस्कृती स्त्रीला मध्यवर्ती ठेवून डिझाईन केल्या गेल्या. आणि स्त्रीला मध्यवर्ती ठेवून म्हणजे स्त्रीला प्राधान्य देऊन मुळीच नव्हे, तर स्त्रीला वस्तू बनवण्यास प्राधान्य देऊन!

सीमा अशा धारणांवर नियमीतपणे थुंकायची.

आणि आज ज्या ढाब्यात बसलेलो होतो तिथे ती तिच्या प्रत्येक श्वासागणिक अशीच थुंकत होती.

स्त्री दारू पीत नाही, सिगारेट ओढत नाही, शिव्या देत नाही, बारमध्ये किंवा ढाब्यावर अशी बसत नाही या सर्व धारणांमुळे पब्लिक गालातल्या गालात हसत असताना ती त्यांना हासत हासत आणि मला चिडवत चिडवत त्या धारणांना 'फाट्यावर मारत' होती.

"आणि मला हे सांगण्यासाठी तू पुरुषासारखा वागायला नकोस का??? निदान 'नवर्‍यासारखे'??? आत्ता तू घरी असायला हवास ना? निदान माझ्याबरोबर गाडीत दारू ढोसतोयस हे तुझ्या बायकोला किंवा घरातल्यांना माहीत तरी असायला हवे ना?? "

मी गाडी गंभीरपणे घराच्या दिशेला, म्हणजे फुरसुंगीकडे न नेता स्वारगेटच्या दिशेने न्यायला लागलो तेव्हाही ती सॉरी म्हणाली नाहीच आणि तिने सॉरी म्हणायलाच नको होते. ती मला बोलली म्हणून मी रागावलो असलो तरी ती खरे बोलली होती. तिने हेही विचारले नाही की तू रागावला आहेस म्हणून लगेच घरी जायचे आहे का! नुसती पीत बसून राहिली.

शेवटी मलाच लाज वाटली. तिला सल्ले देत असताना मी मला दिलेल्या सल्ल्यामुळे मात्र रागावलो होतो. पण नंतर असाही विचार आला की मी तिला असे कुठे काय चुकीचा सल्ला देत होतो? निदान लग्नामुळे मन गुंतण्याची एक प्रदीर्घ सोय तरी होतेच ना? आणि मूल वगैरे झाल्यावर जीवनाबाबतचा दृष्टिकोन पूर्णतः बदलतो यामध्ये काहीतरी तथ्य असणारच ना? आता पुन्हा मलाच राग आला, पण तोवर तिचा राग शांत झाला होता.

"मी तुझी ठासली असे मानू नकोस... एकंदर बोलले मी..."

"आत्ताही तू ठासली, मारली असल्याच भाषेत बोलतीयस..."

"राधिका आणि वैशू नाहीयेत आज.."

"का???"

"राधिका बहिणीकडे गेलीय... वैशू गावाला!"

"ओह... मग आज तुला एकंदर समाजातील रूढी, प्रथा यांना शिव्या घालायला रात्र मोकळी आहे तर..."

"........."

"..... आता काय झाले???"

" मला दोनच पुरुष आवडले"

"... म्हणजे??... मग??"

"तिसरा नाही आवडला.."

"........... त्या... तिसर्‍यालाही तू नाही आवडलीस..."

"विचारतंय कोण तुझ्यायला तुझ्या... "

"तुला कोण सांगतंय पण तुझ्यायला तुझ्या?"

"तुला माझ्यात काय आवडतं???"

"काहीही नाही... "

"मग येतोस कशाला फिरायला ???" (थोडक्यात ** घालायला असे तिला विचारायचे असावे)

"तुला नेणार कोण नाहीतर फिरायला??"

" *********** "

"घातली! घातली शिवी पुन्हा! "

"येतोस का???"

"कुठे??"

"फ्लॅटवर??"

"फ्लॅ... आणि??"

"आणि काय??? मला परत शिव्या द्याव्याश्या वाटणारच नाहीत असं काहीतरी कर..."

".... मी नाही येऊ शकत.."

"का??? "

" कोणी पाहिलं बिहिलं म्हणजे काय??"

" ******* "

"नीट बोल हं सीमा.. आधीच सांगतोय"

" म्हणजे कोणी पाहणार नसतं, बायको विचारणार नसती तर आला असतास...."

"म्हणजे??"

"म्हणजे मनातून असं नाही वाटत की आपण शुद्ध राहावं... आई ****** पुरुषांची..."

मला आता हसू यायला लागलं होतं!

मी हासत आहे हे तिला समजले.

"गाडी थांबव... "

"का??"

"थांबव..."

मी गाडी थांबवून तिच्याकडे बघितले. तिने हिंस्त्रपणे माझे तोंड स्वतःकडे ओढून घेतले. मला स्वतः दारू प्यायलेलो असूनही तिच्या ओठांना येणार्‍या दारूच्या वासाची शिसारी आली तसे जाणवले की माझी कोणालातरी कितीवेळा तरी शिसारी येत असेल. चोवीस तासात चोवीसशे शिव्या देणारी, पुरुषासारखी वागणारी सीमा गैलाड त्या प्रसंगी मात्र हळव्या स्त्रीसारखी वागली आणि नंतर मला दूर करून सरळ गाडीबाहेर जाऊन उभी राहिली. मी हादरलो, हा काय नवीन प्रकार!

"काय गं??"

"सॉरी..."

"म्हणजे??"

"मी तुला नासवलं..."

"मला कसलं घंट्याचं नासवलंस?? मी हे जग नासवण्यासाठी जन्माला आलेलो आहे."

" घाण वाटली मला तुझी..."

"का??"

"मढ्यासारखा किस घेतोस..."

"मढ्या... म्हणजे??"

"काही आवेश बिवेशच नाही.."

"तिच्यायला एक तर नाही ते करायला जायचे... चल आता..."

"मला फ्लॅटवर सोड.."

"मग काय घरी नेणारे?? दार लावून घे..."

"ऐक ना??? नगर रोडवर ** घालायची का??"

"नको... नगर रोडला आई नाहीये.."

"परवा मी टेरेसमध्ये असताना पाहिले... रस्त्यावर एका कुत्र्याच्या पायावरून कार गेली... ते कॅ कॅ करत होते.."

"मग??"

"तू तसेच करतोयस..."

"असूदेत..."

"दारू आहे का दारू??"

"आता मात्र मीच शिव्या देईन हां?? गपचूप बस..."

त्या दिवशी तिला फ्लॅटवर सोडल्यावर तिने मागे वळून पाहिले आणि जमीनीवर पच्चकन थुंकली. आणि निघून गेली. मी संतापून घरी आलो. च्यायला बायकांनी वेळ मिळाला की आपल्या घरी बोलावून घ्यावा असा माणूस आहे का काय मी??

दुसर्‍या दिवशी सकाळी एसेमेस आला.

काल तिचा वाढदिवस होता आणि भांडणे कायमची मिटवण्यासाठी भाऊ आणि वहिनी फ्लॅटवर राहायला आले होते. त्यांच्याशी माझी ओळख करून देण्यासाठी आणि मला आणलेला एक शर्ट मला देण्यासाठी ती वर बोलावत होती.

चोवीस प्रकारांपैकी 'जीझस... कॅरोल' नंतर पहिल्यांदाच मी एकांतात थोडासा रडलो.

नंतर विचार केला, तिच्या भावाला आणि वहिनीला अचानक कशी काय उपरती झाली असावी??

मी एसेमेस केला. तर म्हणाली... वहिनीलाही नोकरी करायची आहे आणि लहान भाच्याला सांभाळण्यासाठी मी घरी कायमचे यावे म्हणून भांडणे मिटवायला आले होते. तुला वर नेऊन मी दाखवणार होते की मनाने चांगला असलेला एक माणूस तरी स्वतःच्या डोळ्यांनी बघा! पण आता माझ्यामते तू मनाने चांगला नाहीस. संधिसाधू आहेस. सगळे सुरक्षित वातावरण असले तर माझी *********

आणि त्यानंतर आज आम्ही तीन महिन्यांनी लॉन्ग म्हणजे अतीच लॉन्ग ड्राईव्हला जाऊन पद्मावती ढाब्यावर बसलेलो होतो.

"ते जाऊदेत... शर्ट कुठे आहे माझा??"

"**त गेला..."

'का??"

"लायकी नाही तुझी माझी गिफ्ट स्वीकारण्याची..."

" तुझी मात्र आहे लायकी माझ्याबरोबर फिरण्याची..."

"निघू का मी??"

"बस... मी निघू म्हणतोय तर आणखीन बटणं काढून बसायला तयार होतीयस... आणि म्हणे आता निघू का मी??'

"शर्ट भावाला दिला मी... त्याचाही बेचाळीसच साईझ आहे.. मन्याचा जास्त आहे... चव्वेचाळीस "

"मन्याचा काय संबंध इथे??"

"कारण त्याचा घटस्फोट झाला..."

मी अक्षरशः अर्धवट उठून उभाच राहिलो धक्का बसून!

"घटस्फोट झाला???? कसा काय??"

माझा अंदाज सरळ होता, हिनेच त्याच्या घरी जाऊन अर्वाच्य बडबड केलेली असणार कधीतरी!

" कारण तो तिला **यचा तेव्हा त्याच्या मनात मी असायचे..."

हसून हसून मुरकुंडी वळली माझी.

"आणि हे त्याने तुला येऊन सांगितले असेल... नैक्कॅ???"

"नाही.... तो चुकून तिला 'आय लव्ह यू सीमा' म्हणायचा..."

मला किती हसावे तेही समजेना!

" हास भडव्या तू.. "

हे सीमाचे वाक्य ऐकून मात्र ढाब्याचा मालक आमच्या टेबलपाशी आला आणि मला म्हणाला...

"सैब शक्यतो श्यीगाल करू नका... फ्याम्ली बस्तात हितं"

"नाही नाही... सॉरी... आता नाही करणार"

मी माघार घेतली मालकापुढे!

पण सीमाने उसळून त्याला बोलावले... बोलावले तेही कसे???

"अय.. फॅमिली बसतात म्हणजे काय??? ही फॅमिली नाहीये का?? आं??? तुझ्यायला तुझ्या... "

मालक भंजाळून माझ्याकडे पाहू लागला. दिसायला तर काही सीमा 'तशी' वगैरे दिसत नव्हती. पण वागत 'तशी'च होती. मी तिला आवर घातला तसा तो निघून गेला.

"तुला अक्कल नाही का गं??? हे हॉटेल त्यांचंय... हाकलून देतील ... हळू बोल जरा... तू ग्रेट आहेस हे जगाला समजायला नकोय..."

सीमा उठली आणि माझ्या शेजारी येऊन बसली आणि कुजबुजत बोलू लागली.

"हा हॉटेलचा मालक ***** आहे... हं... तर मी काय सांगत होते .... हां.. तो *** मन्या.."

मीच उठून तिच्या खुर्चीवर बसलो. आता खुर्च्यांची अदलाबदल झाली.

"हं... आता तिथेच बसून बोल... फक्त शिव्या देऊ नकोस.. "

"हं... तर त्याच्या बायकोला मागचं कळालं सगळं.."

"काय कळालं?? काही झालं कुठे होतं तुमच्यात???"

"झालं कुठे होतं म्हणजे?? दिवस गेले होते मला..."

मी निर्जीव झालो होतो निर्जीव!

"हे... हे कधी झालं होतं???"

मला वाटले मन्याच्या लग्नाआधी झालं असेल!

"त्याच्या लग्नाला सात वर्षं झाल्यावर..."

".... त... तुझं तुला कळतंय का काय बोलतीयस ते??? का तारेत बोलतीयस??"

"आणखीन मागव... हेच सांगेन..."

"पण हे कसं काय झालं??"

"त्याचं माझ्याशी लग्न न करून त्याच्या आईने जो ******** केला होता त्याचा मी सूड घेतला..."

"हा सूड घेणे आहे???"

"तुला मगाशीच नाही का म्हंटलं मी??? पुरुषांना कुठे पेटवावे लागते??"

"अगं पण... "

"मी त्याला भेटत राहिले होते... भरीस पाडलं... यायचा फ्लॅटवर.. मग केला एक दिवस तमाशा मी त्याच्या घरासमोर.. त्याच्या आईचं तोंड हे एवढंसं झालं होतं... तुला माहितीय??? बाई बोलत नाही म्हणून बदनाम होत राहते... बाई जर बोलली ना??... तर जळून जाईल हे जग... बोलत नाहीत बायका... मी बोलते.. ***********... मन्याची आई सगळ्यांसमोर पाया पडायला आणि तोंड धरायला आली.... म्हंटलं रांड समजता का काय मला?? पण त्याची बायको फुत्कारत होती... वर्षात घटस्फोट झाला... अख्ख्या वस्तीत बदनाम झाला मन्या... "

"हे... काय तू बोलतीयस..???"

"नवीन तर ऐक?? हे झालं जुनं..."

"पण... हे सगळं होत असताना मला कसं माहीत नाही??"

'तू काय नवरा आहेस काय??? गेलास ****** "

"नाही पण आपण भेटायचो तेव्हा काही बोलायचीच नाहीस म्हणजे तू???"

"मला तू आवडतोस... मला तुला घालवायचे नव्हते... "

"मला काय घेणंय का देणंय तुझ्याकडे तो आला तर??"

"तरीही तू आवडतोस मला.."

"पण आता झालंय काय???"

"काल भाऊ आणि वहिनी म्हणाले घरी चल... मन्या तुला स्वीकारायलाही तयार आहे.. तिथेच माहेर आणि तिथेच सासर..."

"क्काय??? मग???"

"म्हंटलं ** *****.... "

"बरोबरच्चे..."

"हे असलं चाललवतं त्या दिवशी फ्लॅटवर... म्हणून म्हंटलं तुला वर न्यावं आणि त्यांची ** ***.... माझा वाढदिवस होता ते वेगळंच... काय रे भाडखाव??? माझ्यासाठी काही गिफ्ट आणलीस का??"

"तू बाई आहेस का बुवा ते मला समजत नाही... म्हणून गिफ्ट म्हणून ही पार्टीच मान्य कर.."

"काय करू रे मन्याचं???

"काहीही कर... "

"मला काय वाटतं माहितीय का भूषण? मला वाटतं की... "

".... काय??"

"तेव्हाच... तेच मूल मी जन्माला येऊ दिलं असतं तर रे???"

"का? असं का वाटतं?? पुरुषाला मूल होतं कधी??"

"त्या अडीच महिन्यात मात्र मला पहिल्यांदाच वाटलं तिच्यायला.."

"काय? की तु बाई आहेस??"

"हां! भेंचोद काय फीलिंग होतं ते"

"किती सुंदर वाक्य आहे हे नाही? 'भेंचोद काय फीलिंग होतं ते'! वा वा! आणि फीलिंग कुठलं? तर ह्यांना दिवस गेले होते ते फीलिंग! ते फीलिंग भेंचोद होतं????"

'तवायफ' वगैरे हासते तशी जोरात हासली सीमा गैलाड! दचकून सगळे पाहू लागले.

"मग आता काय मन्या स्वीकारणार आहे म्हणा तुला! आता कुठला मित्राला भेटायला वेळ मिळणार?"

माझ्यातलं नुकतंच जन्माला आलेलं मांजरीचं पिल्लू कुचकुचलं!

"मन्या स्वीकारणार म्हणजे उपकार आहे क्काय??"

"सीमा... ऐक ना! आय वॉन्ट टू स्पीक टू यू..."

"बोल.."

"तू मन्याला स्वीकार! तुझ्यात खूप फरक पडेल..."

"मी आहे तशी तुला आवडत नाही का?"

"मला तू भयंकर आवडतेस, तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण एका निराळ्या धुंदीत जातो, पण बायका अशा नाही वागत! उगाच बदनाम जीवन का जगतीयस??"

"प्रत्येक नात्याच्या हिर्‍याला एका नावाच्या कोंदणात बसवून त्याची आई का *** रे तुम्ही?"

"तसं नाहीये! तू तुझ्या फ्लॅटवर एकटी, आता तर काय, तोही एकटाच, त्याच्या मुलाबाळांचं काय ते मला माहीत नाही, पण त्यांना हे सगळे समजण्याच्या वयाची ती असणारच! असतील की बारा एक वर्षापर्यंतची! आं? आता मन्या एकटाच! तो तुझ्या मैत्रिणी नसताना तुझ्या फ्लॅटवर येत राहणारच! नाहीतर तुला बाहेर नेत राहणार! तुला त्याच्या बायकोचे स्थान कधीच नसणार! आणि प्रेम तर असणार! हे असे प्रेम वासनेच्या अस्तित्वावर अवलंबून असते. समाज मन्याला काय म्हणणार? समाज बोलणार तुला! तुला पब्लिक कॉलगर्ल समजू लागेल. "

बराच वेळ गंभीरपणे ती व्हिस्की सिप करत राहिली आणि नंतर 'चल, निघू' म्हणाली.

मात्र गाडीत बसल्यावर पुण्याऐवजी ती उलट्या दिशेला जाऊ म्हणाली.

आजची रात्र आही बरेच दिवस प्लॅन करत होतो. खूप खूप लांब ड्राईव्हला जायचे. ड्रिन्क्स घ्यायची आणि दम लागेपर्यंत बडबडत बसायचे, खिदळायचे, एकमेकांना शिव्या द्यायच्या. थोडक्यात, आपण जसे मुळात आहोत तसेच व्हायचे. त्यामुळे आज मी पुण्याबाहेर ऑफीसच्या कामाला आहे असे घरी सांगितलेले होते. माझी वाट कोणीच बघणार नव्हते आणि सीमाची वाट बघायला कोणी नव्हतेच!

कित्येक मिनिटे भरधाव वेगाने जाणार्‍या गाडीत बर्फाळलेल्या वार्‍याच्या भपकार्‍यांना चेहर्‍यावर सोसत ती तशीच बसलेली होती. नंतर बोलू लागली.

"च्युत्या तत्वज्ञान स्सालं! माझ्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत कोणालाही नाही. मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला! आणि नवरा असला की तो चोवीस तास बारा महिने बायकोची काळजी घेऊ शकतो किंवा घेऊ इच्छित असतो असे काही नाहीच! त्यातही तो नवरा, ज्याला मुळातच मुले आहेत आणि निम्मा संसार त्याने तिसर्‍याच यड**बरोबर केलेला आहे. त्याने मला स्वीकारायची तयारी दाखवली की मी बोहल्यावर चढायचे आणि नंतर तो माझ्यावर! ****** ! कोण ठरवणार हे सगळं?? तुम्हाला लहान मूल आहे आणि आता नोकरी करायची आहे म्हंटल्यावर बहिणीची आठवण झाली का? की आता तिने आपल्या घरी परतावे असे आता वाटू लागले का? लहानपणी माझ्या बापाने साठवलेल्या पैशावर जगले आणि आता माझ्या स्वतःच्या! आय अ‍ॅम नॉट डिपेंडंट अ‍ॅट ऑल... ऑन एनी वन! मी आणि तू फिरायलाबाहेर पडलेलो आहोत, त्यातसुद्धा कित्येक आठवड्यांनी, कारण आपले वाद झाल्यानंतर आपण भेटलोच नव्हतो! आजच्या भेटीतून मला काय अपेक्षित असेल??? तर केवळ भन्नाट मजा! गप्पा, दारू आणि फिर्णे! वाट्टेल तिथे, वाट्टेल तेव्हा आणि कसेही! चालत नाहीतर कारने! तुला काय अपेक्षा असेल आजच्या भेटीतून?? तर जवळपास तीच..... प्लस.... माझी कहाणी ऐकून द्रवल्यामुळे मला तत्वज्ञान शिकवणे!

बाई म्हणजे तुम्हाला बेअक्कल माणूस वाटते का रे? तिला काही विचार नसतील? तिच्या काहीच पॉलिसीज नसतील ?? तिचे अस्तित्व एका मंगळसूत्रावर अवलंबून??? का?

माझ्या आयुष्याबाबत माझ्या पॉलिसीज ठरलेल्या आहेत. तुझ्यासारख्या मित्रांबरोबर मजा करायची, आवश्यक तितके पैसे मिळवायचे, वाचन करायचं, मुख्य म्हणजे इतर कसलीही जबाबदारी घ्यायची नाही, एकटं राहायचं, बिड्या फुंकायच्या आइ एक दिवस मरून जायचं! मरण्यापुर्वी आजार झाला की अ‍ॅडमीट व्हायचं! नाहीतर वय झालं की सरळ वृद्धाश्रमातच राहायला जायचं! आणि हो... भरपूर भरपूर चित्रे काढायची. चित्रांचं एक प्रदर्शन ठेवायचं! त्याची ******* बातमीच छापून आनायची स्साली! फोटोबिटोसकट!

विचार का असं म्हणून! विचार ना! सांगते मी! सगळे सांगते, पण पहिल्यांदा तुला ते धक्कादायक किंवा तिरस्करणीय वाटेल. म्हणून मला मधे तोडू नकोस! पूर्ण बोलूदेत!

भूषण! माणूस चुकतो. त्याला काय हवे असते तेच भेंचोद त्याला समजत नसते.

आनंदाचे प्रकार असतात. दारू पिण्याचा एक आनंद्! सिगारेटचा एक! नाचण्याचा एक! मैत्री निभावण्याचा एक! फिरण्याचा एक! कुटुंबाचा भाग बनून राहण्याचा एक! मुलांना जन्म देण्याचा एक! शिकण्याचा आणि नोकरी करण्याचा एकेक! नवे कपडे घेण्याचा, दागिन्यांचा एक! सेक्सचा एक! प्रतारणेचा एक! विश्वास जपण्याचा एक!

माणसाचं काय चुकतं माहीत आहे का????

या समाजाने केलेल्या नियमांमुळे त्याला हे सगळे आनंदाचे प्रकार एकाच व्यक्तीकडून शोषावे लागतात.

सीमा गैलाड तशी नाही. मी तशी मुळीच नाही. मी तुझ्याबरोबर फिरेन, दारू ढोसेन, तुला किस करेन, पण बेडमध्ये मन्याबरोबर जाईन! शेजारच्या कौमुदी या दोन वर्षाच्या मुलीला खेळवेन, पण स्वतःच्या भाच्याला खेळवेनच असे नाही. मी सगळे आनंद वेगवेगळ्या व्यक्तींकडून मिळवते आणि तेच आनंद त्याच व्यक्तींना देतेही! मी याला माझी बदनामी समजत नाही. समाज समजत असेल! *** **** समाजाची! मी पर्समध्ये एक बारीक हत्यार ठेवूनच फिरते. मला कोनताही आनंद 'शोषावा' लागत नाही. फक्त बोटाने मध चाटावा तसा मी त्या माणसाकडून तो सहजगत्या मिळवते. त्या माणसाचे काहीही नुकसान करत नाही. त्याचा माझ्यावर विश्वास असावा असे मला वटत नाही. माझाही त्याच्यावर नसतो.

हे सगळे करत असताना स्थैर्य मात्र घालवून बसते मी असे वाटेल! पण माझ्यासाठी आयुष्य एक लॉन्ग ड्राईव्ह आहे. ज्यात मुळातच स्थैर्य नाही, सातत्यही नाही. मग मी काय घालवते म्हणे?? काहीही नाही. घालवतात त्या बायका, ज्यांना हे साधे तत्व समजत नाही की एक व्यक्ती म्हणून जगायला गेलो तर आपल्यासाठी आयुष्य हा वसंत ऋतू आहे.

मन्याच्या मिठीत असताना मला तुझी आठवण येऊन जातेही, पण ती त्यासाठी नाही, ती येते ती इतरच कशानेतरी! तुझ्याबरोबर रात्री बेरात्री भटकताना मी आज कित्येकवेळा मन्या, मन्या असे म्हणाले. पण त्याने तुला दु:ख झाले नाही.

भूषण, नाती निर्माण करताना आपण खूप खूप प्रॉब्लेम्स निर्माण करत असतो. फालतू जबाबदार्‍या आणि फालतू कर्तव्ये! मला ती नको आहेत. मी फ्री आहे आणि तशीच राहणार! एकटी स्त्री म्हणून वाकड्या नजरेने बघणार्‍या पुरुषांच्या हातून मी कधीही बरबाद होणार नाही. कारण मी समर्थ आहे. शरीर थकले की मरून जाणार! मला या खूप प्रदीर्घ लॉन्ग ड्राईव्हमध्ये कंटाळायचे नाही आहे. मला एन्जॉय करायचे आहे.

एका क्षणी मात्र वाटले होते की आई व्हावे. पण माझ्या विचारसरणीतून जन्माला आलेले आणि बापाचे नांव नसलेले मूल नको होते. खूप क्रूरपणे वागले. पण आता वाटते मी त्या आत्म्यावर दयाच केली.

मी वाईट आहेच! पण मी मूल ठेवावे असे सांगण्याची मन्याच्या **त हिम्मत होती का? कोणत्या बेसवर तो मला असे सांगू शकत होता? शपथा घेऊन त्या मोडल्यावर आणि कित्येक वर्षे संसार केल्यावर माझ्याकडे कोणत्या अधिकाराने यायचा? केवळ मी एक एकटी, तरुण, जुन्या जमान्यापासून जवळची आणि स्वतःच आमंत्रण देणारी स्त्री आहे म्हणून? म्हणजे अगदी तुझ्यासारखंच की? म्हणजे जोपर्यंत आपण वाईट वागतो हे कोणाला कळत नाही तोवर वाईट वागायचे, वागत राहायचे! नाही का? पकडा गया वो चोर है!

थुंकते मी असल्या समाजावर! ही अशी!

पुरुषांची मजा बघायला फार आवडते मला! कारण मला केवळ एक स्त्री इतकीच ओळख देतात ते! म्हणून! म्हणून मी मन्याचा संसार नष्ट केला. म्हणून मी पद्मावती ढाब्याच्या वेटरला हवे ते दिसेल म्हणून हे वरचे बटन ओपन करून ठेवले. म्हणून मी भावाच्या विनंतीवरून घर गेले नाही. म्हणूनच मी व्यसनेही करते आणि शिव्याही देते!

मला स्त्री म्हणून जगायचेच नाही. आत्यंतिक तिटकारा आहे मला अशा पांगळ्या स्त्रीत्वाचा! "

खूप वेळ गाडी नुसती जातच राहिली. दोन विचारांमध्ये गढलेल्या व्यक्तींचे डोळे रस्त्याकडे लागलेले, एक सिगारेट पेटलेली आणि वार्‍याने अर्धवट शरीरे गोठलेली.

शेवटी घाट उतरायला लागलो तेव्हा तीच बोलू लागली.

"तू फायदा का घेतला नाहीस माझा?? "

"मला तू... तशी आवडत नाहीस... मला तू एक बेधडक बाई म्हणून आवडतेस.. पण प्रोफेसर असून अशी वागतेस ते मात्र आवडत नाही...."

"माझ्या व्यवसायाचा संबंधच नाही.... पण तुला तशी का आवडत नाही मी?? म्हणजे सहज जाणून घ्यायचंय!"

" माझ्या मनात असलेली स्त्रीची किमान प्रतिमा शिव्या देत नाही... दारू स्मोकिंग ठीक आहे.. "

"आणि पुरुष देतात त्या प्रत्येक शिवीत उल्लेख मात्र स्त्रीचाच असतो... "

"त्याचा इथे काही संबंध वाटत नाही... "

"आज तू रात्रभर मोकळाच आहेस... तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो की तुझ्या मावशीच्या रिकाम्या फ्लॅटवर जाऊन चोरून एकटेच झोपायच्या ऐवजी तू माझ्याही फ्लॅटवर राहू शकतोस आणि मला हातही न लावता रात्र काढू शकतोस... नाही का??"

"मी तुझ्या फ्लॅटवर नाही येणार... मला कोणी पाहण्याची भीती जितकी वाटते त्यापेक्षा मला तुझी भीती जास्त वाटते.."

"का???"

"कारण तू आत्ता केलीस ती सगळी बडबड, तुझे एकंदर वागणे, वगैरे!"

"हं!... म्हणजे.... आता संपलं सगळं.... नाही का???"

"अगदी तसंच नाही सीमा... "

"प्लीज शट अप.... प्लीज..."

"वुई आर फ्रेन्ड्स... पण मैत्रीत हे प्रकार मला तरी...."

"तुला आवडत नाहीत आणि मला आवडतात यातील नेहमी तुलाच काय आवडते तेच का महत्वाचे??? त्याचा अर्थ असा होतो ना की मी गरजू आहे???"

"मैत्रीत गरज बिरज नसते... "

"पुस्तकी वाक्ये फेकू नकोस ******* "

"मी मला जे योग्य वाटत आहे ते बोलत आहे... "

गप्प बसली ती! पण गप्प बसणे तिच्या स्वभावात नव्हते. ती कशी काय गप्प बसली समजेना!

बर्‍याच वेळाने तिच्या घराखाली गाडी थांबली. गाडीत बसूनच ती बोलू लागली पुन्हा!

"यानंतर फक्त एसेमेस आणि कॉल्स वगैरे करत जाऊयात... भेटायला नको... कारण तुला माझ्या अनेक गोष्टी आवडत नाहीत... आजवर मला सहन केलेस त्याबद्दल थॅन्क्स... ही आपली...... "

माझ्या डोळ्यात पाणी आले होते. का माहीत नाही. माझ्यातले खेडे माझीच थट्टा करत होते. मी तिच्याकडे पाहिले तर.. मला कधीही न पाहायला मिळालेले दृष्य दिसले... ती रडत होती... तिच्या डोळ्यातून काही थेंब गालांवर आलेले मला अंधुक प्रकाशात जाणवले... तिचा आवाजही भरून आलेला होता...

"ही आपली शेवटची भे..... भेट... मी वर जाऊन तुझ्यासाठी आणलेला शर्ट घे... ऊन येते... तोपर्यंत थांब... आणि हं.... आणखीन एक... मी... मी मन्याला स्वीकारणार आहे... तू म्हणतोस तशी वागणार आहे... थाब इथेच... आले मी"

मला ते सहन होईना! मीही गाडीबाहेर येऊन लॉक करून तिच्या मागे चार पावले चाललो.

"तू का येतोयस वर??"

"मला... मला वर यायचंय.."

ती आणि मी अजूनही तशाच मनस्थितीत होतो.

"का???"

"मला तो शर्ट घालूनही बघायचाय... तुला घालून दाखवायचाय सुद्धा... "

एक अक्षरही न बोलता ती लिफ्टकडे गेली. आम्ही दोघे तिच्या फ्लॅटपाशी गेलो. लॅचच्या किल्लीने तिने दार उघडले.

"अरे राधिका?? तू जागी आहेस???"

सीमा गैलाडने आत असलेल्या मैत्रिणीकडे बघत विचारले. ही राधिका फ्लॅटवरच असताना मगाशी सीमा मला कशाला बोलावत होती ते समजले नाही. मी खूप ओशाळलो होतो. त्या दोघी अ‍ॅट ईझ होत्या मात्र!

पण राधिकानेच तो प्रश्न सोडवला. हासत हासत म्हणाली..

"आय जस्ट वॉन्टेड टू सी हिम... कोण आहे तो ज्याच्या विषयावर तू आमचे कान किटवतेस आणि ज्याच्यासाठी तू मन्याचा प्रस्ताव नाकारत आहेस...."

स्टन्ड!

तीव्र धक्का बसून मी सीमा गैलाडकडे पाहात होतो. ती राधिकाकडे हादरून आणि अविश्वासाने! आणि राधिका माझ्याकडे खेळकरपणे आणि लाजरे हासत म्हणाली...

"नॉट अ बॅड चॉईस सीमा... आय नो ही इज मॅरिड..बाय... गुड नाईट...."

राधिका वीजेसारखी आतल्या खोलीत निघून गेली.

आपण कोणालातरी प्रमाणाबाहेर आवडत असणे आणि त्याला आपण पूर्णपणे प्राप्त न होणे ही भावना सुद्धा खूप खूप दु:खदायक असते.

सीमा गैलाड सोफ्यावर आदळली तसा मीअलगद तिच्या शेजारी बसत म्हणालो...

"तू... हे मला काहीच माहीत नव्हते... मी तुला... इत..."

"हो! आवडतोस... अप्राप्य आहेस हे माहीत आहे... पण आवडतोस... मन्याशी लग्न केले तर आपण कसे भेटणार???"

स्वतःहून आणि अगदी स्त्रीसुलभपणे तिने माझ्या खांद्यावर मान टेकवली. त्या क्षणी जरी आपण कोणालातरी फार फार आवडतो याचा मला अभिमान वाटत असला तरी तिच्या त्या दु:खाने आणि येऊ घातलेल्या प्रदीर्घ विरहाच्या कल्पनेने मी स्वतःही खूप दु:खी झालो.

करकचून मिठी मारली आणि ती मिठी कितीतरी वेळ तशीच होती. जोवर मी तिला असे म्हणालो नव्हतो की...

"प्लीज डोन्ट मॅरी हिम... आय लव्ह यू टू....."

क्षणभरातच ती बाजूला झाली आणि माझ्याकडे बघत म्हणाली... अगदी कोरडेपणाने...

"हा शर्ट... घाल बरं?"

मी शर्ट घातला... मला आणि तिलाही आवडला...

मीपुन्हा तिच्या जवळ जायला लागलो तेव्हा तिने आश्चर्यकारकरीत्या अत्यंत वेगळ्याच स्वरात मला फटकारले....

"लांब हो... तुझ्या थेंब थेंब प्रेमाच्या शिडकाव्यासाठी मी एकटी राहू होय रे ******????"

सीमा गैलाडचे आडनांव आता बदलले आहे. एक मुलगी आहे तिला! भेटणे केव्हाच बंद झाले. दोन घरे सोडली की लगेच माहेरही आहे तिचे!

शर्ट अजूनही ठेवला आहे मी! घालत मात्र कधीच नाही... उगाच खराब व्हायचा!

तिची आठवण आली की हृदय क्षणभर थांबतेच!

नो संपर्क!

आई निजवली मैत्रीची स्सालीने!

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो

-'बेफिकीर'!

(नावे काल्पनिक)

====================================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

==================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

धन्यवाद दोस्तांनो!

पण सीमा तर खरी आहे. मन्यासंदर्भातल्या निर्णयाबाबतची मानसिकता व तिची कारणमीमांसा थोड्या वेळाने प्रतिसादात लिहीन. Happy

-'बेफिकीर'!

(अवांतर - अनघा मीरा - चोवीस हा आकडाही कमी आहे. आणि आकडा मला आठवत नाही. पण सगळेच लिहिण्यासारखेही नाही. मात्र खोटे काही नाही. मला कथा लिहिताना अनेक गोष्टी जमवाव्या लागतात. एक म्हणजे रंजकता यायला हवी. दुसरी म्हणजे स्त्री वर्गाला किमान - कसा का असेना - प्रतिसाद देण्याइतपत त्यात वाव राहील इतपत स्वीकारार्ह लेखन हवे. तिसरे म्हणजे व्यक्तिरेखेला थोडेसे तरी ग्लोरिफाय करायला लागते. वास्तविक सीमा जी आहे ती माझ्यासमोर बोलण्यात टिकायचीच नाही. पण येथे दाखवताना मी तसे लिहिले असते तर तो माझाच शहाणपणा लिहित बसल्यासारखे झाले असते. चौथे म्हणजे प्रत्यक्षात झालेल्या अनेक बाबी वगळाव्या लागतात. 'नसलेल्या नात्याच्या दाहकतेचे नांव', 'बेभानतेची अमावास्या' , 'द एक्स्ट्रॉ मॅरायटल' व 'इस्पिकचा काळा रंग' या चार कथांमध्ये तर अनेक गोष्टी वगळाव्याच लागल्या. अशा गोष्टी वगळल्यावर प्रतिमांच्या किंवा अवांतर बडबडीच्या सहाय्याने प्रकाश टाकावा लागतो. एवढे सगळे करून त्यातील सत्य व कल्पनाविलास यांचे मिश्रण असे बनवावे लागते की ज्यांना हा विषय माहीत आहे त्यांना सत्य जाणवत राहील व इतर वाचकांना ती एक कथा वाटत राहील. आता सीमा गैलाड मला नंतरही भेटली, भेटत असते, हे येथे लिहून मला काहीच मिळवता आले नसते. ती कथा 'एक कथानक' म्हणून तेथेच संपली. Happy असो! आपल्या परखड व प्रामाणिक प्रतिसादाने खूप आनंद झाला.)

पुढील प्रतिसादात सीमाच्या त्या मानसिकतेची मीमांसा द्यायचा प्रयत्न करेन.

Happy

-'बेफिकीर'!

मला कथा लिहिताना अनेक गोष्टी जमवाव्या लागतात>>>>१००% अनुमोदन.
सीमा गैलाड कोणाला खरी वाटेल तर कोणाला खोटी. ते प्रत्येकाच्या वे॑यक्तीक अनुभवावर आधारीत आहे.
एक अनुभव कथा म्हणुन मला तरी पटली.
बेफि...पु.ले.शु. Happy

बरोबर आहे बेफी. थेटरात डॉक्युमेंटरी बघायला आपण जात नाही. तिथे सिनेमाच लागतो. तसं काहीसं.

छान

कौतुक शिरोडकर | 8 November, 2011 - 22:07 नवीन
बेफी, सीमा खरी वाटली नाही. दारू पिणार्‍या, सिग्रेट ओढणार्‍या, शिव्या घालणार्‍या किंवा सेक्सबद्दल इतकी स्पष्ट मते असणार्‍या स्त्रिया नसतात अस मी म्हणत नाही. पण तिचं अंतरंग आणि तिचा बाह्य मुखवटा ह्यात तफावत आहे. जगाला फाट्यावर मारणार्‍या स्त्रीला मनातल्या गोष्टी तोंडावर बोलता येत नाहीत हेच मुळी पटलेलं नाही. कसं जगेन याबद्दल ती जे बोलली तसं जगणं तिला सहज शक्य होतं असं मला तरी वाटतं. आयुष्याच्या तत्वज्ञानाचे इतके डोस पाजणार्‍या सीमाने शेवटी चाकोरीबद्ध गोष्टीच आपल्याश्या केल्या. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की साधी 'मैत्री' तिला राखता आली नाही. त्यामुळे मला तुमची सीमा काही खरी वाटत नाही.

>>>

कौतुक , झक्की
तुम्ही उत्तम लेखक आहात म्हणुन थोडे रसग्रहण.
लेखाची भाषा याबाबतः
ललित लेखाची भाषा शिवराळ आहे, पण भाषा शिवराळ असणे काही नविन नाही आणि झक्की भाषा शिवराळ असणे म्हणजे ब्लु फिल्मची पटकथा नव्हे. विजय तेंडुलकरांनी तर अशी नाटके रंगमंचावर आणली.
शेक्स्पियरची भाषा आणि विषय त्याच्या कालात शिवराळ होतेच आणि कालिदासाचे कुमारसंभव म्हणजे तर पहायला नको. आपल्या पुराणातील लेखकांनी आणि परदेशस्थ सिडने शेल्डन (या कादंबर्या तर फक्त कामुकच असतात त्यात बाकी फारसा दम देखिल नसतो) सारख्या लेखकांनी काही लिहिले तर त्यांचा पंखा व्हायचे आणि समकालिन लेखकांचा राग राग करायचा असे का?
स्त्रीलेखकांना तर असे लिहिण्याचा अधिक त्रास होतो. मागे मणिकर्णिका हिने सुंदर लेख लिहिलेला, जास्त काहिच नव्हते तर तिला बिचारीला ह्यात काहीच उल्लेख नाहित असे सांगायला लावले. खरे असे उल्लेख त्या लिखाणात होते आणि असण्यात काही वावगेही नव्हते (जोपर्यंत असे उल्लेख ही लेखाची मध्यवर्ती कल्पना नाही). अ‍ॅडमिन अजय हेच सांगत होते बरेच जणांना ते कळले नाही.

जगाला फाट्यावर मारणार्‍या स्त्रीला मनातल्या गोष्टी तोंडावर बोलता येत नाहीत हेच मुळी पटलेलं नाही हे कौतुक ह्यांचे म्हणणे काही वेळा बरोबर असले तरी नेहेमी साठी बरोबर नाही. आईवडिल नसलेली सीमा
ही शोषित व्यक्ति आहे तिच्या लहानपणी तिने अनेक मानसिक (कदाचित शारिरीक) अत्याचार भोगले आहेत. अशा व्यक्तिंची सेल्फ एस्टीम खुप कमी असते यामुळे ती जरी लाउड शब्दांनी या स्वतःच्या मानसिकतेचा प्रतिरोध करित असली तरी लो सेल्फ एस्टीम तिला लेखकाशी उघड भावना व्यक्त करु देत नाही. तरी कधी कधी तुला माझ्याबद्दल काय वाटते? असे प्रश्ण विचारुन ती अंदाज घेत रहाते.

आयुष्याच्या तत्वज्ञानाचे इतके डोस पाजणार्‍या सीमाने शेवटी चाकोरीबद्ध गोष्टीच आपल्याश्या केल्या.
हो कारण तिचे तत्वज्ञान तिला स्वार्थी बनण्यात लाज वाटु देत नाही. लेखकाकडुन जर काहिच होणार नाही तर तिथे वाट पहात बसण्यात तिला काहिच रस नाही यामुळे दु:ख्ख झाले तरी ती मन्याबरोबर जाणे पसंद करते.

लेखकाच्या एका मताबद्दल माझा आक्षेप आहे जिथे सीमाने मांडलेले तत्वज्ञान कमी पडते. सीमाला असे वाटते की तिला हवे ते सुख हवे तिथुन घ्यायला लावणारा समाज आहे पण खरे तर समाजाची इथे कोणतीच मुख्य भुमिका नाही. प्रश्ण हा आहे की प्रत्येक संबंधात व्यक्ति एकमेकापासुन वेगवेगळ्या अपेक्षा करत असतात.
सीमा ही मन्यापासुन कौटुन्बिक सुरक्षितता इच्छित असेल पण मन्याला ती आपल्याशी एकनिश्ठ रहावी ही अपेक्षा असेल. अशा वेगवेगळ्या अपेक्षातुन नाती जन्माला येतात तेंव्हा स्व्तःच्या इच्छांना मुरड घालावीच लागते. यशश्रीने लेखकाशी एवढी तडजोड केली आहे तेंव्हा तिला लेखकाकडुन काय अपेक्षा आहेत हे त्याना माहित आहेच या अपेक्षा लेखकाला पुढे जाण्यापासुन परव्रुत्त करतात आणि सीमाला मन्याकडे जाण्यास भाग पाडतात. विजय तेंडुलकरांच्या नाटकात पण जेंव्हा पत्रकाराच्या पत्नीला जाणवते की आपली स्थिती पण विकत घेतलेल्या मुली पेक्षा फार वेगळी नाही तेंव्हा ती पत्रकाराला सोडुन जात नाही कारण किंमत वेगळी असली तरी पत्रकार पण तिला विकला गेला आहे हे ती जाणते (हे अनेकांना आवडले नाही तरी योग्य होते) आणि संबंधातील वेगवेगळ्या स्तरावरची देवाण घेवाण ओळखल्यानेच मला वाटते की विजय तेंडुलकरांचे साहित्य मला व पु काळे , जयवंत दळवी यांच्यापेक्षा सकस वाटते.

व. पु मन उदार करणे हे उत्क्रुष्ठ संबंधांची गुरुकिल्ली समजत. मन उदार करणे हे जरी जरुरी असले
तरी ती उत्क्रुष्ठ संबंधांची गुरुकिल्ली नव्हे कारण यात मन उदार करणारा माणुस शोषित रहातो.

जयवंत दळवी बरेचदा उत्स्फुर्ततेला आणि गुप्ततेला जास्त अधोरेखित करत. यात जे जोडीदाराला दुखवेल ते गुप्त ठेवणे हे मला योग्य वाटते पण उत्स्फुर्तता नाही अशी अत्स्फुर्तता आपल्याला आढळुण येतेही
पण तो नियम नव्हे.

तिसरा मुद्दा लेख सत्य अनुभव आहे का, हा मला सर्वात गौण वाटतो. सीमा आहे तसा द्रुष्टीकोन असलेला पुरुष लेखकाने पाहिला असेल कदाचित लेखकाच्या मित्राचे हे अनुभव असतिल. आपल्याला याच्याशी काय मतलब आहे? हे शक्यतेच्या परिघात आहे का ते महत्वाचे. ते शक्यतेच्या परिघात मला वाटतात.

विं दा नी लिहिले आहेच.
"स्वप्नात पहिले मी म्हणुनी कसे असत्य.
स्वप्नास सत्य असते सामिल जाहलेले..."

निलिमाजी, माझा मुद्दा साधा सरळ आहे. चारचौघात वाट्टेल ते उघडपणे बोलणारी स्त्री किंवा लेखकाला स्वतःहून निमंत्रित करणारी स्त्री... तिच्या साध्या सरळ भावना त्याच्यासमोर मांडू शकत नाही हेच मुळी पटत नाही. तो आवडतो किंवा त्याच्यावर प्रेम आहे हे मांडणे तिला जड जाते हे कसं पटावं ? त्यामुळे तुमचं स्पष्टीकरण पटत नाही.
आयुष्याच्या तत्वज्ञानाचे इतके डोस पाजणार्‍या सीमाने शेवटी चाकोरीबद्ध गोष्टीच आपल्याश्या केल्या.
हा मुद्दा स्पष्ट आहे. माझ्यामते ती फक्त बोलून तिचा जगावरचा असलेला सॉ कॉल्ड राग व्यक्त करते. मुळात प्रवाहाविरुद्ध जाण्याचा तिच्यात जोम नाही. ती फक्त बोलू शकते. लग्न करणार नाही म्हणता लग्न करते... असेल काही तरी परिस्थिती जन्य कारण... मुलं नको म्हणता मुलं जन्माला घालते... पुन्हा काही तरी परिस्थितीजन्य कारण... ते का आणि कसं झाल हे लेखकाने लिहीलं नाही. पण तिचं जीवनाबद्दलच तत्वज्ञान मात्र मांडलय. असे तर जगात सगळेच तत्वज्ञान मांडतात. पण ते फक्त बोलण्यापुरतं असेल तर ते फोल. जर साधी मैत्री सुद्धा ती राखू शकत नसेल तर तिच्या त्या बोलभांड मताना माझ्या मते काही किंमत नाही.
इथे बेफीच्या मतांना मी खोडू इच्छितो असे नाही. असेलही हा अनुभव त्यांच्यापुरता खरा. एक वाचक म्हणून मुळात मला ती व्यक्तीरेखा पटली नाही. हा माझा वैयक्तिक दोष असेल. पण जे आहे ते आहे. मी ते प्रांजळपणे बेफीसमोर मांडू इच्छित होतो आणि मी ते केलं. बाकी माझा कोणत्याही गोष्टींना कसलाही आक्षेप नाही. Happy

@निलिमा, "स्वप्नात पहिले मी म्हणुनी कसे असत्य.
स्वप्नास सत्य असते सामिल जाहलेले..." ही बहुतेक विंदांची कविता आहे.

इथे बेफीच्या मतांना मी खोडू इच्छितो असे नाही. असेलही हा अनुभव त्यांच्यापुरता खरा. एक वाचक म्हणून मुळात मला ती व्यक्तीरेखा पटली नाही. हा माझा वैयक्तिक दोष असेल.
>>
असे काही नाही मलाही कधी कधी काही व्यक्तीरेखा पटत नाहित. यात आपला वैयक्तिक दोष काहिच नाही, आपाआपले अनुभव. Happy

@निलिमा, "स्वप्नात पहिले मी म्हणुनी कसे असत्य.
स्वप्नास सत्य असते सामिल जाहलेले..." ही बहुतेक विंदांची कविता आहे.

हो रेशिम मी चुकली. त्या कॅसेटमध्ये बर्याच शांताबाइंच्या कविता होत्या म्हणुन घोळ झाला

कथा छान आहे. माझ्या मते आर्थिक स्थैर्य असल्याने असे वागणे जमले. अर्थात तिच्या जडणघडणीचाही यात हातभार होताच. प्रत्येकाला कुठेतरी " आपलं" माणुस हवं असतं त्यामुळे तिने लग्नाचा वगैरे निर्णय घेतला असु शकतो.

बेफी, फायनली कथा वाचली
काही मुद्दे मांडते आहे- ते निव्वळ एका वाचकाचे म्हणून गृहित धरा.
कथा खरी वा खोटी ह्याच्याशी मला घेणं नाही, पण असा विषय आपण मांडल्यामुळे साधारण अशा टाईप्स च्या पर्सनालिटीज ज्या अवती-भोवती आहेत त्यांच्या बद्दल मत प्रदर्शन करायला आवडेल (तुम्ही गगोवर ही अपे़क्षा बोलून दाखवली होती, की ह्या बाबतीतील माझी मतं आवडतील तुम्हाला जाणायला, म्हणून हा सायास!), इथे सर्वांत उत्तम उतरलंय नायकचा तिच्यासोबत असणारा कम्फर्ट- समसमधून, इतर चर्चेमधून!

१) सीमा गैलाड- एक स्ट्राँग आणि आऊटगोईंग व्यक्तिमत्त्व, लहाणपणापासूनच बंडखोरीचे बाळकडू प्यायलेली- शेवटी आयुष्याशीही बंडखोरी करणारी!- बरीचशी इंड्युविजीलास्टीक! आधी "मी" मग जग!
"मी अशी आहे" पटलं तर पहा- दॅट्स इट! सुशिक्षीत- वाचनात वगैरे इंटरेस्ट असणारी, पण चाकोरीबद्ध जीवन नकोच्च म्हणणारी!

किती स्त्रियांना "आखून दिलेले- चौकटीतले" जिणे आवडत असावे?- मर्यादाशील जीवन जगण्यासाठी स्त्रीची जडणघडण पूर्णतः कारणीभूत असते, जी हिला इथे धड मिळालीच नाही.

शिवाय

२) अशी स्त्री- किती पुरूष "बायको" म्हणून स्वीकारतील?? "मैत्रीण असावी तर अशी" इथेच हिशोब संपतोय- तुम्हीच कुठल्यातरी प्रतिसादात म्हणाला आहात, स्त्रियांनी मला असच व्हायला हवय वगैरे- प्रत्यक्षात- बायको म्हणून अशी स्त्री चालते? होणार्‍या बाळाची आई म्हणून अशी स्त्री चालते? ?

घरी बायको आहे- टिप्पीकल, हवी तशी! म्हणून "अशी" मैत्रिण बरी.. कारण ती "लायाबिलीटी" नाही. तिच्यासमोर हवं तसं मो़कळं होता येतं म्हणून नायकही तिची कंपनी एन्जॉय करणार- त्याची "भावनिक" गरज जी घरी "सो कॉल्ड 'परक्या' बायकोकडे" पूर्ण होत नाही ती पूर्ण करणार- त्याबियाँड नाही जरी सीमेची तशी इच्छा असेल तरीही!!

बायकांनी धीट असावं- त्यांनाही स्वतःची मतं असावीत, निर्णय घेण्याची क्षमता असावी- गरज पडल्यास एकट्याने आयुष्य काढायची धमक असावी- पण असा असंस्कृतिकपणा? गम्मत म्हणजे पुरुष कितीही कि ती ही "असा" असला- त्याला त्याची स्त्री मर्यादाशील हवी असते- हा दोष पुरूषांच्या जडणघडण आणि मनोवृत्तीपेक्षा निसर्गाचाही तेव्हढाच आहे! हाच बॅलेन्स आहे- हीच फॅक्ट आहे!

ती म्हणते मला आनंद हवा- पण एकाचकडून नको, ठरवून दिलेल्या फ्रेममधे नको- वाह!!!??
आणि वर कौतुक म्हणाला तसं, शेवटी चाकोरीबद्ध आयुष्याला सामोरी गेलीच- आयुष्यावर सुड उगवून झाला असावा किंवा फॉर अ चेंज कुणा एकाशी प्रामाणिक रहावं वाटलं असावं- व्हॉटेव्हर!

३) माझ्या ऑफिसमधे एक मुलगी अशीच आहे- बराच त्रास सहन करून आता जीवनावर सूड उगवणारी- संसाराचा काडीमोड झालेला, नंतरही प्रेमभंग झालेला- अनेक अनेक गोष्टी- म्हणून तोंडी नेहमी शिवीगाळ 'म-भ' आवडीचे शब्द! तिचासाठी स्त्री-सुलभ गोष्टी म्हणजे मूर्खपणा! कारण त्या स्त्रीत्त्वाने तिला "हे" सारं भोगायला लावलेलं, म्हणून ती पुरुष मित्र बरेच जवळ यायला देते सूड उगवून पुढे जाते आणि त्याचे रसाळ वर्णनही सांगते- पण एकांतात अश्रू गाळते- का? तेच स्त्री मन- जे तिला विनवतं- हे तुझं आयुष्य नाही- अशी जगू नकोस तुला स्थिरता हवीये- ती मिळवं! (हे तीच सांगते- कधीतरी हळूवर क्षणी)

निसर्गाने बहाल केलेलं स्त्रीत्त्व्/पुरूषत्त्व ओव्हरकम करायचा अनैसर्गिक प्रयत्न केला की विचित्र पर्सनॅलिटीज घडतात, त्याचेच उदाहरण!

४) पुन्हा सीमाबद्दल- गर्भ राहिला तेव्हाचं "फिलींग" तीने व्यक्त केलय ती निव्वळ 'हाईट ऑफ इन्सेसिटीव्हीटी' वाटली
आणि
आवडलं ते तिने नायकाशी तोडलेला कॉन्टॅक्ट!!!!!!! अ पर्फेक्ट डिसीजन!
वर फ्लॅटवर जाण्याआधी ती रडली- कारण ती एक निखळ फ्रेंडशीप गमावणार होती- जिथे तिचा (तिला सर्वोत्तम ओळखणारा मित्र) तिला सांगत होता, तू लग्न कर- स्थैर्य लाभेल- ती जीवनाची गरज आहे! ते "नायक" म्हणाला म्हणून तिला पटलं होतं कारण तिचा त्याच्यावर विश्वास होता- पूर्ण! आणि लग्नानंतर ओघाने येणारे बंधनं (केवळ स्त्रीवर?) ती स्विकारणार होती- नायकापासून आपसूक दुरावणार होती!

पण
ज्याक्षणी नायकाला कळतं "कोणत्या" लेव्हल वर तिने त्याच्यावर प्रेम केलय, तो स्वार्थीपणे "आता तू लग्न करू नकोस, माझही तुझ्यावर अपार प्रेम आहे" म्हणतोय- कारण त्याची भावनिक गरज पूर्ण होऊ शकण्याचा सोर्स बंद होणार होता... आणि तिथेच ती अलर्ट झली- "हा" ही गरजूच निघाला- निस्वार्थ नाही म्हणत तिने नात्याला विराम दिला.

फायनली,
येस लाईफ इज अ लॉन्ग ड्रईव्ह विथ "अल्टीमेट डेस्टीनेशन"- पण, एक कॉन्संट स्पीड (स्थैर्य) विथ सेफ्टी अटेन करणं ही मानवी गरज आहे- स्वाभाविक, नैसर्गिक!!

(फार डिटेल झालाय अभिप्राय :फिदी:)

बेफिकीरः पटली..भावली..आणि मनापासून आवडली!

आणि प्रतिक्रिया लिहावी म्हटलं, तर सुचलंच नाही नक्की काय म्हणायचं होतं ते!

@ कौतूक आणि इतरही बरेच जणं:
सीमा गैलाड असतात..खरंच असतात..
समा़ज त्यांना जोखताना चुकतो..
चौकटी पुरुष ठरवतात..स्त्रीयांसाठी..त्या पाळल्या, की स्त्रीया शालीन होतात.. स्त्रीयांनी त्या मोडल्या की त्या चवचाल ठरतात..

आणि ज्या बायका इतक्या भस्सकन असतात ना, त्यांनाच मनातलं बोलणं महाकठीण असतं..
जे जे अप्राप्य असेल, ते मिळवण्यात त्यांना नशा चढते..अन ते मिळणारं नाही, हे एकदा कळलं ना, की जगण्यतलं अव्हान संपतं..मग चारचौघींसारखं असेल किंवा आणखिन हजार जणींसारखं, जगण्यातला स्पार्क, मजा, सगळंच संपलेलं असतं!

हे असं "असणं" जगल्याशिवाय पटणं कठीणच असतं..!

Happy

this is my humble try to say what i wanted to..no offense is meant! none should be taken!

भानु

बागे, प्रथमत: तुझ्या पोष्टीचे कौतुक Happy

बायकांनी धीट असावं- त्यांनाही स्वतःची मतं असावीत, निर्णय घेण्याची क्षमता असावी- गरज पडल्यास एकट्याने आयुष्य काढायची धमक असावी- पण असा असंस्कृतिकपणा? गम्मत म्हणजे पुरुष कितीही कि ती ही "असा" असला- त्याला त्याची स्त्री मर्यादाशील हवी असते- हा दोष पुरूषांच्या जडणघडण आणि मनोवृत्तीपेक्षा निसर्गाचाही तेव्हढाच आहे! हाच बॅलेन्स आहे- हीच फॅक्ट आहे!....................अनुमोदन
.बहुदा ,स्त्री ही मर्यादेशीलच असते....

लिहिणार नव्हते पण चर्चा बघून रहावलं नाही.. Happy माझेही काही मुद्दे...

कोणत्याही लिखाणातल्या कोणत्याही व्यक्तिरेखेविषयी,
१) ती व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहिल अशा प्रकारे लिखाण करणे आणि वाचकाला तशी अनुभूती येणं ही लेखकाच्या प्रतिभेची गोष्ट झाली.
२) ती व्यक्तीरेखा जशी मांडली आहे ती आपल्याला समजणं (लेखकाला जे म्हणायचंय ते समजणं) ही आपल्या ग्रास्पिंग कॅपॅसिटीची गोष्ट झाली. (I am responsible for what I say and not for what you understand असं म्हटलय कोणीतरी)
३) ती आपल्याला पटणं/ न पटणं ही आपल्या स्वभावाची/वैयक्तिक मतांची गोष्ट झाली.

आता, सीमा ही एक व्यक्तिरेखा आहे (असं मानू)
पहिली गोष्ट झाली.
आता दुसरी गोष्ट ज्याला जशी समजली त्यावरुन तिसरं अनुमान निघालं.

एकंदरीत चर्चा झालेले मुद्दे:
१) विरोधाभासः माणून म्हणजे मूर्तीमंत विरोधाभास आहे. त्यामुळे माणसाच्या वागण्यात विरोधाभास दिसला तर त्यात वेगळं/ इंसेन्सिटीव्ह काही वाटत नाही मला. प्रत्येक क्षणी आपण एक वेगळा निर्णय घेत असतो. आणि त्यात विरोधाभास असू शकतो हे सत्य आहे. माणसाचे वंशज म्हणून ही गोष्ट सगळ्यांना लागू होते. स्त्री-पुरुष भेद नाही.

२) खरा मुद्दा स्त्री/पुरुष नसून एका स्वभावपद्धतीचा आहे. सीमा जशी होती/आहे तसाच एखादा पुरुष वागला असता तर ते चाललं असतं का.? बहुतेकांचं "नाही" असंच उत्तर येईल. पण समजा तो असा वागलाच तरी एखादे वेळेस चालून जातं वगैरे उत्तर येईल. पण शक्यतो असं कोणीही वागायला एका स्टेबल समाजरचनेत बंदी घातलेली असते आणि बहुधा सगळे ती मान्य करतात. आता मान्य केलेल्या सगळ्यांपैकी सगळेच खुष असतात असं नाही. मानसिक पातळीवर द्वंद चालू असूही शकतं. फक्त प्रेमभावनेविषयीच नाही तर सगळ्याच अभिव्यक्तींविषयी. काही लोकं हे द्वंद्व दमन करतात काही पराभव मानतात आणि काही बंड करतात. त्यात काही प्रतिभावान यशस्वी होतात आणि मग समाज म्हणतो "कलाकार असेच असतात" आणि जे अयशस्वी होतात त्यांचं हसं होतं. मुळात समाज चालायला एक रचना आवश्यक असते आणि त्यात कोणाची ना कोणाची भावनिक्/शारिरीक्/सांस्कृतिक पिळवणूक कोणत्या ना कोणत्या पातळीवर होणं अपरिहार्य असतं. पण समाज चालणं आणि समाज म्हणून प्रगत होणं यासाठी ते आवश्यक असतं. but individual is reality, society is the concept. त्यामुळे प्रत्येक माणसाचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करताना समाजाची बंधनं पार गळून पडतात. त्याचं एक स्वतंत्र जग, स्वतंत्र विश्व, त्यात आलेले अनुभव यापासून पूर्णतः अनभिज्ञ असलेल्या आपल्याला त्याच्यावर कोणतेही शिक्के मारयचा काही अधिकार नसतो.

३) आता राहता राहिला प्रश्न अशी माणसं घडण्याचा. समाजहित आणि वैतक्तिक सुख याचे नियम बहुतेकदा एकमेकांच्या विरोधात गेलेले आढळतील. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यायचा या गोष्टीचा एक स्वतंत्र माणूस म्हणून आणि समाजाचा भाग असलेला माणूस म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर विचार व्हायला हवा. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगला मार्ग हाच आहे की "माणूस घडवणे." मूल वाढत असताना समाजात जे संस्कार होतात त्यांची फेररचना करणे आणि जास्तीत जास्त सुंदर माणून घडवणे हे करणंच योग्य आहे. पण हे करतानाही आपण असं काही घडेलच याची खात्री देवु शकत नाही कारण माणसाचं आपलं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं. ते कधी ना कधी प्रकत होतंच. (त्यामुळेच अनेक शतकं "घडवणे" या क्रियेपेक्षा " धाकात ठेवणे" या मार्गाला जास्त पसंती मिळाली असावी.)

४) राहता राहिला प्रश्न स्त्रीत्व पुरुषत्व वगैरे. मुळात असं काही नसतं. every generalization is false, including this one Wink तर मुद्दा हा की दोघेही घडवले गेलेत. पुरुष घडवायला लहानपणापासून रडू नकोस, घाबरतोस कार, जबाबदारी घे वगैरे वगैरे शिकवले जाते. स्त्रियांना तर काय काय शिकवतात. हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सांगत नाही. तर मुद्दा हा की असं काही फारसं नसतं. (पहायला गेलं तर स्त्रिया जास्त चंचल असतात ही वस्तुस्थिती आहे (generalization again and I am giving proof of being paradox :-D)आणि थोडा विचार करणार्‍या कोणालाही ती पटेल.)

तर ही गोष्ट आहे सीमाची. कोणत्याही स्त्री/पुरुषाची किंवा कॅटेगिरीची नाही..

(एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद! जय महाराष्ट्र!!)

मुक्ते,
तर ही गोष्ट आहे सीमाची. कोणत्याही स्त्री/पुरुषाची किंवा कॅटेगिरीची नाही.. >> मी आधी याच साठी नमूद केलं होतं, ती (अतिरेकी) इंड्युविज्युलास्टिक आहे! आणि रेखलेली व्यक्तिरेखा स्त्री ची आहे, म्हणून "स्त्री" मध्यवर्ती ठेवून अभिप्राय दिलाय! स्त्री- पुरूष फरकांत जाण्याचा काही एक मानस नाही. पण; येस, निसर्गाने ठेवलेल्या स्त्री-पुरुष फरकांत आणि त्यानुसार असणार्‍या मनोरचनेला कुणी कुणीही ओव्हरकम करु शकत नाही- हा मुद्दा आहे, शेवटी सीमा संसारी लागून लेखकाने स्त्री आणि तिच्या स्वभावाचा पैलू (अ सिक्युर्ड लाईफ) पुढे आणलाय!

असो.

निसर्गाने ठेवलेल्या स्त्री-पुरुष फरकांत आणि त्यानुसार असणार्‍या मनोरचनेला कुणी कुणीही ओव्हरकम करु शकत नाही>> एक्झॅक्टली हाच मुद्दा आहे की निसर्गाने ठेवलेली रचना कितपत आहे आणि माणसाने इन्ड्युस केलेली कितपत आहे.....

अ सिक्युर्ड लाईफ>> वन्स अगेन, या गरजेला स्त्रीची किंवा पुरुषाची गरज नाही म्हणता येणार. ते व्यक्तिसापेक्ष आहे.

निलिमा, कौतुक,

आपल्या चर्चेबद्दल आभारी आहे. Happy

माझे मतः

सीमाला माझ्याबद्दल काय वाटायचे ते ती कृतीतून दाखवत राहायची. भाऊ आणि वहिनींना भेटायलाही ती मला वर बोलवत होती. शर्टही आणला. हे सर्व मैत्रीतही होऊ शकते. इव्हन ढाब्यावर दारू पिणेही होऊ शकते. पण मी आहे तसा तरी तिला हवा होतो. मला काही स्पष्टपणे विचारले आणि मी नातेच तोडले तर ही भीती तिला वाटू शकायची. वागण्यातील साहसीपणा व प्रत्यक्ष निर्णयाच्या वेळेस खोलवर विचार करून वागणे हे स्वीकारार्ह असायला हरकत नसावी. मला तिने काही स्पष्ट विचारले नाही कारण माझे उत्तर नाही असणार हे तिला माहीत होते. पण मन्याबरोबर जाऊन मी आधी जितका उपलब्ध असायचो तितकाही नसणार म्हणून तिने मन्याबरोबर जायचा निर्णय अमान्य केला. पण तिच्या जेव्हा लक्षात आले की मन्याबरोबर न जाऊन दुर्दैवाने तिला तिची जी आयडेन्टिटी तयार करायची आहे ती तयारच करता येणार नाही तेव्हा विवश होऊन तिने हा निर्णय घेतला. थोडक्यात, सीमा गैलाड हारली. एकटे राहून तिला चालले असते. पण मग मन्या हक्काने व आयुष्यभर मिळत राहिला नसता. मन्याचे होऊन मी मिळत राहिलो नसतो. शक्य तितक्या विविध व्यक्तींकडून आनंद मिळवण्याच्या तिच्या वृत्तीवर निर्बंध आले असते. आता एकच पर्याय स्वीकारायची वेळ आली होती. मन्याने काही अल्टिमेटम दिलेले नव्हते. पण मुळात स्वभावाने चांगल्या आलेल्या सीमा गैलाडला मन्याबाबत तिने केलेल्या कृत्याचाही पश्चात्ताप वाटतच होता. थोडक्यात, तिची अधिक गरज कोणाला आहे आणि कोण ती समाजमान्य पद्धतीने पुरवू शकणार आहे याचा विचार करण्याच्या 'वाय' आकाराच्या रस्त्यावर ती आली. कदाचित माझ्या मूळ लेखनात त्या बाबीला स्पर्शच झाला नसेल, पण सांगावेसे वाटते की सीमा गैलाड केवळ पाश्चात्य संस्कृतीत नसल्याने हारली. कदाचित तेथे असे निर्णय घ्यायला काहीच अडचण नसावी. आपल्या समाजरचनेचा हा ठळक दोषही नाही का? Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार! बागेश्री व मुक्ता यांची पोस्ट पूर्ण वाचल्यावर त्यांनाही प्रतिसाद देतो.

टीप - शिवराळ भाषा न वापरताही मला सीमा गैलाड व्यक्त करता आली असती. पण सीमा तशी नाही. तसेच, ती हिंस्त्र आहे. ट्रॅप झालेल्या मांजरीसारखी! मनात येते की मला माझी किंमत कळावी म्हणूनही तिने तो निर्णय घेतला असेल. किंवा पश्चात्तापामुळेही! पण माणूस असहाय्यच असतो हे खरे! Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

राहता राहिला प्रश्न स्त्रीत्व पुरुषत्व वगैरे. मुळात असं काही नसतं.
कसलं कन्फुझिंग स्टेटमेंट आहे हे!!! आता चर्चा नक्की भरकटणार!!!


तर ही गोष्ट आहे सीमाची. कोणत्याही स्त्री/पुरुषाची किंवा कॅटेगिरीची नाही..

huhhh????
सबंध कथेभर लेखक "का? मी एक स्त्री आहे म्हणून?" अशा अर्थाची वाक्ये टाकतोय आणि तरी तुम्ही म्हणताय की असं काही नसतं!!!

एकंदरीतच मांडलेले मुद्दे आणि काढलेली कन्क्लुजन्स गोंधळलेली आहेत! (आता हे generalization असलं तर खोटंच असणार तुमच्या मते! दिवे.)

लोकहो नक्की चर्चा कशावर करायची आहे ते ठरवा एकदा...
आडम आणि इव्ह ही नव्हते असं कन्क्लुजन निघेल नाहीतर!!!
Proud
जगदंब!

बागेश्री, विश्लेषण खूप आवडले. फक्त एक दुरुस्ती! मी 'माझी बायको मात्र अशी नसावी' हे कोणत्याही प्रतिसादात म्हणालेलो नसून मूळ लेखातच म्हणालेलो आहे. Happy

तुम्ही उलगडलेले मुद्दे खूप वास्तव वाटले. मला एक असे म्हणायचे आहे. बघा याबद्दल काय वाटते.

'एक स्त्री, जिला पुरुषांचा किंवा समाजाचा राग आलेला आहे. तो राग येण्यापुर्वी ती पूर्णपणे समाजाच्या चौकटीत व स्त्रीसाठी असलेल्या अलिखित नियमांना पाळून जगत होती. मात्र आलेल्या अनुभवांनी पोळली जाऊन ती आता सूड घेऊ इच्छीत आहे. अशी स्त्री एकांतात रडते' - ही झालि आपण उल्लेख केलेली 'बहुधा' आपली एक सहकारी!

'सीमा गैलाड! स्त्रीत्वाची शिकवणच नाही. समाजाचे नियम किंवा स्त्रीसाठी असलेले वागणुकीचे अलिखित व तथाकथित चांगले नियम माहीत नाहीत असे नसले तरी कोणी जडणघडणीच्या काळात बिंबवलेले नाहीत. फायदे शिकवलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व मान्यच नाहीत. अशा परिस्थितीत तिच्यातील एक पांगळी स्त्री, जी पांगळ्या स्त्रीत्वाहा आत्यंतिक तिटकारा करते, अचानक अनुभवते की तिला आयडेंटिटीसाठी 'वाय' आकाराच्या रस्त्यावर एक निर्णय घ्यावा लागेल. अशा वेळेस ती रडते. तिला जाणवते की तिच्याजागी एखादा पुरुष जरी असता तरी रडलाच असता विवश होऊन! त्यामुळे शेवटी ती असा निर्णय घेते ज्यात तिला एकाच व्यक्तीकडून दोन सुखे मिळणार आहेत. ती व्यक्ती म्हणजे मन्या! शरीरसुखही आणि कदाचित मैत्रीही! पण माझ्याकडून काहीच मिळणार नाही! आणि जर मन्याला नाकारले तर फक्त माझी मैत्री, ज्यावर ती हक्क सांगू शकत नाही. हे जाणवल्याने ती समाजाला शरण जाते. '

या दोन स्त्रियांमध्ये माझ्यामते किंचित फरक आहे. सीमाला माहीतच नव्हते की असे वळण निर्णय घ्यायला भाग पाडेल. तिला वेश्या व्हायचे नाही किंवा एकटे राहून मला व मन्याला दोघांनाही मिस करायचेही नाही. तिला दोघेही हवे आहोत. आपल्याला दोन व्यक्तींमध्ये असा असा फरक आहे असे जाणवते की नाही ते कृपया नमूद करावेत. Happy

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मुक्ताजींना असं वाटतं भुषणरावांनी 'स्त्रि' आणि 'स्त्रित्व' या विषयांवर काही लिहलंय Uhoh

तर ही गोष्ट आहे सीमाची. कोणत्याही स्त्री/पुरुषाची किंवा कॅटेगिरीची नाही.. >> ओ... मुक्ताजी हे 'विबासं' प्रकरण आहे....दोन्ही कॅटगरीत मोडतं /लागु होतं हे Wink

सरबताचा पेला समजून घोट घ्यावा आणि कोरड्या व्हिस्कीने घसा जाळत जावं, असं वाटलं हा लेख वाचताना. लेख जबरदस्त जमलायं, सीमाची व्यक्तीरेखा पण सशक्तपणे समोर येते. [आयला, केव्हापासून मी असं वाक्य लिहायला chance बघत होतो, मिळाला एकदाचा Happy ]

शेवटाबद्दल मात्र मी कौतुकशी सहमत आहे. [अर्थात, माझं वैयक्तिक मत.]

रच्याकने, "टेबलवर नाईन्टी येऊन पडली. " >> हे मी "टेबलवर नाईन्टी चक्कर येऊन पडली. " असं वाचलं Happy

टॉम बॉय आणि व्यसनी बायका असतात . शिव्या वगैरे देताना पाहील्या आहेत पण इतकी रफ भाषा बोलत असतील देव जाणे.

हो बेफी, फरक आहे, नक्कीच आहे.
आणि साम्य- स्त्री मन! नैसर्गिक अविष्कार दाखविणारं! सीमेने घेतलेला सिक्युर्ड लाईफसाठीचा निर्णय आणि सिक्युर्ड लाईफ मिळव म्हणून सांगणारं माझ्या सहकारी मैत्रिणीच मन!!

आणि बेफी, बियाँड ऑल, ही समाज-बंधनं वगैरे सब झुठ! तुम्ही स्वतःला किती जाणता, तुम्हाला किती मर्यादेत जगायचे आहे (अप्लीकेबल टू ऑल जेंडर्स) हे "आपण" ठरवत असतो.. जगतांना मिळवलेलं ते शहाणपण असतं... आणि आय स्टाँगली बिलीव्ह "लिमीट्स्-मर्यादा" जगताना मॅटर करतात.... बाय ऑल मिन्स.

बापरे हुशश !!!! काय भयानक बाई आहे !! आणि भन्नाट प्रतिक्रिया.

लेख फार प्रामणिक होता. पण हे जे शिव्या आणि दारु, सिगरेट चे ग्लोरिफिकेशन होत ते मला पटत नाही. एस्पेशली जी लोक शिव्या देत देत बोलतात त्यान्च्या बद्दल तर मला कीव येते. कारण ती स्वता खुप कुठले तरी फ्रस्ट्रेशन आपल्या बोलण्यातुन काढत असतात.

जे लोक दारु आणि सिगरेट पीतात त्यान्ना आपण काहीतरी ग्रेट करतो आहोत असे वाटते. सीमा अशीच वाटली. लहान पणा पासुनचा अन्याय म्हणा किन्वा एकटे पणा म्हणा तीने असा शिव्या आणि इतर व्यसनात घालवण्याचा प्रयत्न केला असे वाटते. तिला कुठेतरी तडजोड करायलाच लागली. माणुस सतत नकारात्मक विचार ठेवुन नाही जगु शकत. लहान मुल आपल्याला खेळणे नाही मिळाले तर सगळे घर डोक्यावर घेत. तसाच तिचा स्वभाव वाटला. मन्या ने शेपुट घातले..ठिक आहे मी त्याच्या घरात आणि सन्सारात राडा करीन... त्याच मन्या बरोबर झक मारत तिला लग्न करायला लागले. कारण काहीही असो.

एक दिशा हीन आयुष्य वाटते. नक्कि आपलिच ओळख नसलेला जीव वाटला. तिला जर तिची ओळख असती तर तिने कधिच लग्न केले नसते, आणि छाती ठोक पणे ती तिच्या मनातल्या सख्या बरोबर राहीली असती.

बाकी सगळे बोलायची, करायची, अगदी प्रेग्नन्ट होवुन अबोरशन करण्याची हिम्मत आहे, पण आवडलेल्या पुरुषाला सान्गायची हिम्मत नाही!!! चार चौघात बसुन शर्टाचे बटण उघडे ठेवुन आपले शरीर फलतु माणसाला दाखवत ,दारु सिगरेट पिण्याची ताकद आहे. राडा करायची हिम्मत आहे. पण आयुष्याच काय करायच हे ओळखु न आल्याने भरकटलेली ही बाई आहे. प्रवाह प्रतित व्यक्तिच हे चित्रण आहे.

मध्यन्तरी एक पुस्तक वाचले होते "बारबाला" लेखिका "वैशाली हळदणकर". ते पण असेच व्यक्तिमत्व होते. प्रवाह प्रतित. त्या पुस्तकाची आठवण झाली. ती कथा तर "आत्मकथा" आहे.

बेफिकीर,

व्यक्तिरेखा छान रंगवली आहे. मात्र तिचं आयुष्य मोहन की मीरा म्हणते तसं प्रवाहपतित वाटतं. शेवटी तिने स्वत:च्या आंतरिक जाणीवेला साजेसाच निर्णय घेतला. हेच तिच्या स्त्रीत्वाचं लक्षण आहे. तिचं लेखकाच्या सरळपणावर प्रेम होतं, बरोबर? मग तोच सरळपणा सोडून लेखक तिला 'तू लग्न करू नकोस' असं सांगू लागला, ते तिला सहन झालं नसावं. त्याकरिता लेखकाशी असलेली मैत्री तोडावी लागली तरी चालेल असा काहीसा विचार तिने केला असावा. कधी नव्हे तो एक (पुरुष) आदर्श सापडला होता तिला, आता त्याचेही धिंडवडे बघत बसावं का काय तिनं?

मर्यादा सांभाळण्यात एक आंतरिक सौंदर्य असतं. हे सीमाला कोणी सांगितलंच नाही. तिला ते कळलं ते जगाचे अनेक अवांछित अनुभव घेतल्यावरच! याअर्थी तो एक दुर्दैवी जीव आहे. लेखकाने तिला बर्‍यापैकी हाताळलंय. मात्र त्याचं तिच्यात भावनिकदृष्ट्या गुंतत जाणं अयोग्य वाटतं. ती केवळ आपल्यासारखी आहे म्हणून तिच्यात गुंतावं? अर्थात हे मी पश्चातबुद्धीने म्हणत आहे. शिवाय हा लेखकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

असो.

एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं.

>पण सांगावेसे वाटते की सीमा गैलाड केवळ पाश्चात्य संस्कृतीत नसल्याने हारली. कदाचित तेथे असे निर्णय
>घ्यायला काहीच अडचण नसावी. आपल्या समाजरचनेचा हा ठळक दोषही नाही का?

पाश्चात्य संस्कृती हे एक सरसकट नामाभिधान आहे. इथली माझ्या डोळ्यासमोर असलेली इंग्लंडमधली परिस्थिती विशद करतो. इथे सीमा गैलाड हे एका पिढीचं नाव आहे. आणि आख्खी पिढीच बरबाद झाली आहे. याचं कारण म्हणजे १९६० साली सुरु झालेली सेक्शुअल रेव्होल्युशन. यामुळे कुटुंबसंस्थेवर अक्षरश: कुठाराघात झाले. घटस्फोटांचे प्रमाण तर वाढलेच, वर लग्न करण्याचे प्रमाणही घटले. एकपालकी कुटुंब हा अपवादाऐवजी जणू नियमच झाला. १९६० ते १९८० या वीस वर्षात जन्मलेली एक आख्खी पिढी एकपालकी कुटुंबात वाढली. अश्या कुटुंबांत मुलांकडे लक्ष देता येत नाही. भारतात प्रचंड मोठी सपोर्ट सिस्टीम असते. एकपालकी कुटुंब असले तरी पालकाला मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा, शेजार्‍यापाजार्‍यांचा आधार असतो. तसा इथे नाही. मुले एकलकोंडी होतात. टीव्हीला चिकटतात. सीमा गैलाड जर इंग्लंडमध्ये जन्मलेला मुलगा असता, तर निश्चितपणे आउटलायनीला लागला असता. जेव्हा आपण कुटुंबसंस्थेच्या विरोधात बोलतो तेव्हा पुढील पिढीस गुन्हेगारीच्या नरकात ढकलत असतो.

कुटुंबाला धरून ठेवणारी शक्ती स्त्री आहे. पुरुष कधीच नव्हता. त्यामुळे त्याग हा स्त्रीलाच करावा लागतो. मर्यादा तिलाच पाळाव्या लागतात. हे कुणाला अन्यायकारक वाटेल, पण सीमाच्या आणि बागेश्रींच्या सहकारिणीच्या उदाहरणावरून कळतं की मर्यादा न पाळल्याने काय लायकीचं सुख मिळतं ते.

बेफिकीर, अहो, सीमा गैलाड विचारी स्त्री आहे. इथल्या मुली/बायका एव्हढा विचार करीत नाहीत. सरळ पाय फाकवतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ज्याला आपल्या समाजरचनेचा ठळक दोष म्हणता तो खरतर एक भक्कम पाया आहे.

बघा पटतंय का ते.

अमेरिकेतल्या, युरोपातल्या आणि ऑस्ट्रेलियातल्या मायबोलीकरांकडून तिथल्या परिस्थितीबद्दल विवेचन ऐकावयास आवडेल.

आपला नम्र,
-गामा पैलवान

Pages