‘महाराष्ट सोशल ऑलिम्पियाड’

Submitted by हर्पेन on 13 August, 2014 - 02:17

‘महाराष्ट सोशल ऑलिम्पियाड’ हा एक अभिनव कार्यक्रम आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांच्या सामाजिक बुद्धिमत्ता, नेतृत्वगूण व इतर सामाजिक कौशल्यांचा विकास होईल.

या उपक्रमाकरता, मुलांनी गटाद्वारे सहभाग नोंदवायचा आहे. तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक दृष्ट्या सजग नागरिकांची आवश्यकता आहे. आपल्या ज्ञान, अनुभव व कौशल्याच्या सहाय्याने मुलांचा विकास व त्यांच्यातील भविष्यातील नेतृत्व घडवण्याची तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील विविध समस्या, प्रश्न मुलांसोबत सोडवण्याची, मुलांना तसेच जनतेला त्या प्रश्नांप्रती जागरूक करण्याची ‘महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड’ हि एक अभिनव संधी आहे. तसेच आपल्या परिसरातील शालेय मुलांबरोबर काम करण्याचा अनोखा आनंद गट-मार्गदर्शकांना मिळू शकेल.

आपण आपल्या परिसरात ‘महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड’ अंतर्गत शालेय मुलांचा गट सुरु करू शकता अथवा अशा इतर सजग नागरिकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोचवू शकता.

या वर्षीसाठी गटनोंदणीची तारीख २५ ऑगस्ट आहे.

कार्यक्रमाबद्दल माहितीपत्रक व इतर माहिती सोबत जोडली आहे.

तसेच या संदर्भात अधिक माहीती करता आपण प्रफुल्ल शशिकांत यांना ९४२०६५०४८४ या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Cover.jpgPage 2.jpgPage  3.jpgPage 4.jpgPage 5.jpgPage 6.jpgPage  7.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल, काहीच हरकत नाही. किंबहुना जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहीती पोचेल हे बघावे हाच हेतू आहे.

अश्विनी डोंगरे, मला प्रत्यक्ष अनुभव नाहीये पण माझ्या माहीती प्रमाणे याकरता काटेकोर वेळापत्रक असे नसते.

अजूनही काही माहीती हवी असल्यास / प्रश्न असल्यास इथे जरूर मांडा, मी संस्थेत विचारून उद्यापर्यंत उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

वरील उपक्रमबद्दल उत्सुकता नोंदविल्याबद्दल धन्यवाद.
मी या उपक्रमासाठी काम करत असून प्रफुल्ल हा या उपक्रमाचा प्रमुख आहे.
सविस्तर माहिती साठी आपण त्याला

या इमेल वर संपर्क साधू शकता.

शिवाय https://www.facebook.com/SocialOlympiad
या फेसबुक पेज वरही भेट देऊ शकता.

निवांत पाटील सर,
या उपक्रमासाठी आपण रजिस्टर करताना एक गाईड म्हणून रजिस्टर करू शकता.
त्यासाठी आपणास ५वी ते १०वी या वयोगटातील मुलामुलींचा गट बनवून एम एस ओ मधे नाव नोन्दवावे लगेल.
आधिक माहिती साठी मी वर दिलेल्या लिंक वर इमेल/मेसेज करू शकता.
धन्यवाद.

जास्त लोकांसमोर यावे म्हणून Happy

वाचलेत तर प्रतिसाद देत रहा धागा वर राहील आणि जास्त वाचकांच्या निदर्शनास येईल.