झटपट कटलेट

Submitted by शैलजा on 17 May, 2014 - 10:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ ते दीड वाटी भिजवलेले पोहे
२ लहान बटाटे उकडून
१ ते दीड लहान चमचा तिखट, गरम मसाला प्रत्येकी किंवा आलं,लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट १ टीस्पून
चवीपुरतं मीट आणि साखर
थोडी कोथिंबीर बारीक कापून
१ टेस्पू बेसन पीठ
२-३ टीस्पू दही

क्रमवार पाककृती: 

कधी नव्हे ते जरा नेहमीपेक्षा अधिक पोहे भिजवले गेल्याने १ मोठी वाटीभर उरले होते. आता त्यांचे काय करायचे? तेह्वा ही कटलेट्स करुन पाहिली.

१. आदल्या दिवशी राहिलेले पोहे फ्रीजमध्ये ठेवले असल्याने थोडा वेळ बाहेर काढून ठेवले आणि त्यांच्यावर किंचितसे पाणी शिंपडून घेतले. ताजेच पोहे असतील तर नेहमीप्रमाणे धुवून, भिजवून घ्यावेत.

२. उकडलेले बटाटे, तिखट, गरम मसाला पूड, बेसन पीठ, दही, साखर व मीठ घालून चांगले मळून घ्यावे. तिखट व गरम मसाल्याऐवजी आलं,लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्यांची १ टीस्पून पेस्ट घालता येईल.

३.कलटलेटस शॅलो फ्राय करावीत.

हाताशी जे जिन्नस होते ते वापरुन बनवलेली कटलेट्स. ह्यात हवी तशी व्हेरीएशन्स करु शकाल. ८-९ कटलेट्स बनली.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
आयत्या वेळची खाऊची गरज!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं ब्रेड क्रम्ब्ज वगैरे घातले तर अधिक क्रिस्पी होतील. ते हाताशी नव्हते, तेह्वा त्याशिवायच बनवले.