एगलेस ब्रेड पुडिंग

Submitted by गायू on 6 August, 2014 - 07:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्रेड - हवा तेवढा
दूध/साय- ब्रेड च्या प्रमाणानुसार
साखर- वरीलप्रमाणे
लोणी/बटर
इसेन्स-हवा तो
ड्राय फ्रूट्स/टूटी फ्रूटी- अधिक चवीसाठी

क्रमवार पाककृती: 

शिल्लक राहिलेल्या ब्रेडचं काय करायचं हा प्रश्न मागे एकदा मीच युसायुसू वर विचारला होता! ह्या वेळेस पुन्हा उरल्यावर ब्रेड पुडिंग करायचं ठरवलं आणि माबो वर शोध घेतला पण बेपा किंवा एगलेस दोन्ही पाकृ न मिळाल्याने माझ्या आईची अगदी बेसिक' रेसिपीच वापरायची ठरवली. ती इथे शेयर करतीये.
मी इथे १० स्लाईस नुसार प्रमाण देते पण ब्रेड साखर आणि दूध/साय ह्या अंदाजाने घ्यायच्याच गोष्टी आहेत. कारण १० ब्रेड स्लाईस चं पुडिंग साधारण पाव किलो च्या केक एवढं होतं
प्रथम ब्रेड चे हाताने छोटे तुकडे करा आणि १० चमचे साखर घालून मिक्सर मधून चुरा करून घ्या. नंतर त्यात ४ कप कोमट दूध/साय घालून एकत्र करा.आणि त्यात ४ चमचे लोणी/बटर घाला म्हणजे कोमट दुधात नीट मिक्स होईल. साय घालणार असाल तर मिक्सर मध्ये वेगळी काढा. ब्रेड बरोबर नको.
हवा तो इसेन्स घाला. ड्रायफ्रूट/टूटी फ्रूटी घाला.
ह्याची साधारण कन्सीस्टन्सी हि घट्टसर असते.खूप सरसरीत नाही कारण हे पुडिंग केक इतकं फ्लफी नसतं.
कन्व्हेक्शन मावे मध्ये करणार असाल तर १८० डिग्री ला प्रीहिट करून घ्या आणि केक पात्राला ग्रीसिंग करून ३०-३५ मि बेक करा.
आणि कुकर मध्ये करणार असाल तर भांड्याला ग्रीसिंग करा आणि भांड्यावर दुधाची जाळी ठेवा करून कुकर मध्ये छोट्या तिवईवर ठेवा आणि ४० मिनिटे शिट्टी शिवाय वाफवून घ्या. कुकरमध्ये पाण्याचे प्रमाण ४० मि वाफ येत राहील एवढे ठेवा.
साधारण वेळ झाली कि मावे मधून/कुकर मधून काढून नेहमीप्रमाणे टूथपिक टेस्ट करा आणि गार झाल्यावर मनाप्रमाणे गार्निश करून एन्जॉय करा!
10532760_10152220068046262_6832605854924394697_n_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

१. ह्यात तुम्ही तळाला कॅरामेल चा थर दिलात तर अजून चविष्ट लागेल
२. गार्निशिंग मनाप्रमाणे.
३. मिक्स ड्रायफ्रूट्स असतील तर कुठलाही इसेन्स चालतो. नसेल तर vanilla/chocolate पळेल.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलेय.
( मावे मधे प्रिहिटींग नसते.. ते जरा दुरुस्त करणार का ? मावेचे सेटींग वेगळे राहील )

<मावे मध्ये करणार असाल तर १८० डिग्री ला प्रीहिट करून घ्या>
१८० डिग्री म्हटलंय म्हणजे कन्व्हेक्शनवाला मायक्रोवेव्ह हवा. त्या बेक करण्यासाठी प्रिहीट करता येतं/करायला लागतं.
I may be wrong.

१८० डिग्री म्हटलंय म्हणजे कन्व्हेक्शनवाला मायक्रोवेव्ह हवा. त्या बेक करण्यासाठी प्रिहीट करता येतं/करायला लागतं.<< +१.

सोप्पं कॅरेमल पुडिंग आठवलं. शहारा आला!

पुडींग हे खरवसासारखे थुलथुलीत असते ना? (म्हणजे मी तरी आत्तापर्यंत तसेच खाल्ले आहे). हा प्रकार केकसारखा दिसतोय. नक्की कसे होणे अपेक्षीत आहे?

केक/ पुडिंग जे काही आहे ते नक्की करून बघणार.

एक शंका: ब्रेडच्या चुर्‍यात दूध घातल्यावर परत मिक्सरमधून फिरवायचं ना?

धन्यवाद प्राची आनंदिता नंदिनी srd मंजूडी सायली!
दिनेशदा चूक सुधारली. मी १० वर्षं कन्व्हेक्शन मावे वापरतीये म्हणून ते लिहिलं गेलं Happy
भरत मयेकर अगदी बरोबर!
माधव- कस्टर्ड पुडिंग थुलथुलीत खाल्लंय. ब्रेड पुडिंग मी असंच खाल्लंय म्हणून घट्ट मिश्रण ठेवलं.
मंजूडी- चुऱ्यात दूध घालून हाताने/चमच्यानेच मिक्स करायचं. मिक्सर मध्ये चिकट होईल कदाचित. एकदम केक च्या मिश्रणासारखं एकजीव नाही होत.पण बेक केल्यावर मिळून येतं पुडिंग.
पेरू- ब्राऊन ब्रेड पण चालतो!

नविन वर्ष स्वागतासाठी केलं होतं.. टूटी फ्रूटी पण आत च घातली होती Happy फोटो मधे पण दिसतेय मधे मधे टूटी फ्रूटी.
घरी फार आवडलं सगळ्यांना Happy

1.jpg

वाह! आनंदिता खुपच छान दिसतर पुडिंग. तुम्ही वापरलेले प्रमाण पण द्या ना.
तुम्ही ब्रेडच्या कडा घेतल्या नाहीत का? पांढरा दिसतोय.

@निल्सन - मी मूळ रेसिपीत दिलेलं प्रमाणच घेतलंय.. आणि ब्रेड च्या कडा पण घेतल्या आहेत.. मधे मधे जे ब्राउन ठिपके दिसत आहेत ते कडा च आहेत. पांढरा रंग असला तरी नीट वाफवलं गेलं होत, अनावश्यक चिकट नव्हतं झालं पुडिंग. Happy