चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवधूत गुप्ते दिग्दर्शित जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा शिनेमा पहिला . आज्जीबात नाही आवडला . मध्ये मध्ये इनोदी दाखवलं पाहिजे म्हणून काहीही . त्या प्रियदर्शन जाधवचा गेटप /मेकप आई ग बघवत नाही . बाकी काही ठिकाणची हिरवी शेते आणि निसर्ग मस्त वाटल बघायला . (यश चोप्रा इष्टायील सिन्स आहेत काही काही )

सतिश राजवाडे चा 'पोपट' हा मुव्ही पाहिला, सगळ्या.न्चिच उत्तम अ‍ॅक्टी.न्ग आहे, अतुल कुलकर्णी नेहमिप्रंमाणे छान्च!

लागोपाठ Forrest Gump आणि 12 years a Slave बघितले ...
आणि आज Captian Phillips ...
अशक्य आहे ... FG आणि CP दोन्ही मधे Tom Hanks ने अप्रतिम काम केलय ...

FG मधे जेनी त्या जिप्सि (boyfriend) सोबत परत निघाली असते तेव्हा फॉरेस्ट चे तिच्याकडे बघून हसणे आणि मग त्या जिप्सि ला दिलेला लूक ... जबरदस्त ...

कॅप्टन फिलिप्स मधे तो शेवटी त्यान्च्या तावडितुन सुटल्यावर त्याची मानसिक स्थिती ... क्लास ..

12 years a slave मधे सर्वन्चिच कामे अफलातून ...

तिनही चित्रपट मस्ट watch कॅटेगिरी मधले ... strongly recommended ..

X-Men series आणि Iron Man series दोनीबी मोश्ट फेवरीट ...

जॅकमन ची मी पन्खा आहे ... Days of Future Past बघितला ... त्यात तो नेहमीप्रमाणमाने अ‍ॅक्शन हिरो नाही दाख्वलाय सो जरा डाऊन झाली पन त्याला मोठ्या स्क्रीन वर बघूनच पैसे वसूल झाले ...

मध्यन्तरी बॅन्डेट क्वीन बघीतला होता .. आवडला ..
काही काही द्रुश्ये अन्गावर येतात . 'य' लोकान्नी तिच्यावर केलेला बलात्कार . त्यानन्तर गावातून काढलेली तिची नागडी धिन्ड .. पण सर्वान्चा अभिनय उत्तम .. सीमा बिस्वास ने भूमिका छान वठवली आहे ... आश्चर्य वाटते कि हीला इतके बिनकामी रोल का मिळावे समोर .. निर्मल पान्डे , मनोज बाजपई त्यान्च्या कॅरेक्टर मधे फीट ..

शादी के साईड इफेक्ट्स - कल्पना चांगली पण कल्पनाविस्तार बेकार.अख्तर आणि बालन फुकट घालवल्यासारखे वाटले.>> हे कास्टिंगच बेकार आहे. विद्या बालन बाईला फरहानचा क्लास नाही. त्याची बायको नाही शोभत. अजागळ आहे निव्वळ. प्यारके साइड इफेक्ट्स मध्ये स्क्रिप्ट मस्त गाणी सुप्पर. सर्व अल्बम मस्त आहे. मल्लिका शेरावत मला आव्ड्त नाही. बट हर फेस वाट्ते पण ह्या सिनेमात मस्त काम केले आहे. ह्यातला मेल लीड पण खास आहे. नाव आठवत नाही आत्ता. ऐसे पिच्चरां देकनाइच नै बाबू. पैसे क्या पेड्पे उगते क्या. मुफत में मिला तोबी वो बालन को नै देकतूं मै.

व्ह्य की दक्षा बेन. मला लै आवडतय तें राहुल बोस. चांगले इंग्रजी बोलतय जोक करतंय प्रेमळ वाटतंय.
बेकार मसलम्यान नाहीतर सल्लु टाइप लोकांपरीस असले हिरू यावेत. कधी भेटलंतर चार शब्द बोलता
येतय. सिक्ष्प्याक अन्नाशी काय बोलणार?

राहुल बोस च ... एक नम्बर आहे तो ...

त्याचा आणि कोन्कना सेन चा मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अय्यर चित्रपट पन झकास आहे एकदम ...

कुछ लव्ह जैसा नावाचा आणखी एक चित्रपट - राहुल बोस , शेफाली शाह आणि सुमित राघवन .. कहानी तशी रुटीनच पण केमिस्ट्रि मस्त दाखविली आहे ... हलका फुलका मस्त मुव्ही ...

ललिता-प्रीति >> फॉरेस्ट गम्प नका चुकवू ...

अमा... लांबलचक फ्लाईटमधे वेळ घालवायला बघावेच लागतात. ( बाहेर अंधार असतो.. ! )
सुंदर कथा... म्हणावी असे चित्रपटच फार थोडे येतात आता.

लले, फॉरेस्ट गम्प नक्की बघ गं! माझा प्रचंड आवडता मु ही.. इकडे बब्बा गम्प रेस्टॉरंटची चेन आहे. मजा येते तिथे जायला. मुव्हीचे क्विझ वगैरे असतात. Happy

रमा माधव येतोय ८ तारखेला.. बघून इकडे नक्की लिहा लोकंहो.. घरचे कार्य असल्यासारखेच आहे, आलोकचा मुव्ही म्हणजे.. खुप्प उत्सुकता आहे मला मुव्ही बघायची. ( पण नाही बघता येणार)

पोश्टर बॉईज चुकूनही चुकवू नका! निव्वळ महान करमणूक!
एकाच वेळी अश्लिल/द्वयर्थी किंवा प्रचारकी आणि ढोंगी होण्यापासून हा सिनेमा वाचला आहे, पट्कथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय सर्वच क्षेत्रात धमाल आहे.
मी तर एकट्या हृषिकेश जोशीसाठी परत बघायला तयार आहे, असे अफलातून केलेय काम की अनेक जागा, बारकावे पहिल्या वेळी सुटले असावेत.

लेडीज व रिकी बेहलचा अमेरीकन व्हर्जन - द अदर वुमन बघितला काल .. त्यात मुली जिंकतात नि हिरो अगदी रस्त्यावर येतो .. वर एकीच्या बापाकडुन ठोसा पण खातो .. Happy

पोश्टर बॉईज बघायचा आहे .. पण सध्या शक्य नाही

गेल्या काही दिवसात पाहिलेले सिनेमे:
किक, सम्राट अँड को., द एक्स्पोज, मेरे ब्रदर कि दुल्हन, २ स्टेट्स, बॉबी जासूस, पुणे ५२, लूट

येत्या काही दिवसात हे पहायचेतः
हीरोपंती, एक विलन, डेढ इष्किया, यन्गिस्तान

आणि

हमशकल्स
(हम पागल नही है भैय्या, हमारा दिमाग खराब है)

अँकी बर्‍याच दिवसांनी? पुणे-५२ मला झेपला नाही. योग्य बाफ शोधून लिहीतो माझे मत.

लोकहो 'हीट' बघाच. सॅण्ड्रा बुलक व मेलिसा मॅकार्थी. धमाल पिक्चर. दोघींचीही कामे जबरी. संवाद अक्षरशः 'फटाका' आहेत आणि मे.मॅ ला वाव जास्त असला, आणि तिने पिक्चर खतरनाक करून टाकला असला तरी सॅ.बु. चे ही काम चांगले झाले आहे. प्रत्येक शॉट मधे स्वतःचा पोपट करणारा रोल करणे सोपे नाही.

मलाही ती आधी आवडली नव्हती कधी. येथे तिने काम चांगले केले आहे.

हे ष्टोरी हिन्दीत्/मराठीत करायला हवी कोणीतरी. एक पांढरपेशी व एक ब्लू कॉलर हीरॉइन घेऊन. मात्र आपल्याकडे एक हीरो घुसडून वाट लावतील. रिकी बेहल प्रमाणे.

गेल्या काही दिवसात पाहिलेले सिनेमे:
किक, सम्राट अँड को., द एक्स्पोज, मेरे ब्रदर कि दुल्हन, २ स्टेट्स, बॉबी जासूस, पुणे ५२, लूट

येत्या काही दिवसात हे पहायचेतः
हीरोपंती, एक विलन, डेढ इष्किया, यन्गिस्तान>>

कुणी लिहिली आहे हे न पाहता , नुसती पोस्ट वाचली तरी ही अ‍ॅन्कीनेच लिहिली आहे ह्याचा संशय येतोच. Happy

किक......सिर्फ स्क्रीन पे आती है.....समझ मे नही.......
पथेटिक मुव्ही....सलमानलाच बघायचय तर नेट वर त्याचे फोटो बघा नाहीतर वॉन्टेड बघा १०० वेळ...पण किक नकोच....

किक पाहिला. चांगलं कॅरेक्टर आनी उत्तम हीरो असताना पिक्चरची वाट लावून ठेवली आहे.

बाकी, सलमानला अभिनय येत्नाही म्हणणार्‍यांनी किक बघायला हवा. खास करून तो देवीलाल-डेव्हील-देवीलाल अशी रूपं एकाच शॉटमध्ये पलटत जातो तेव्हा त्याचे डोळे क्लास बदलतात.!!! सलमाननं एकदातरी कंप्लीट निगेटीव्ह भूमिका करायला हवी आहे...

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांचा 'अस्तु' पाहिला. अल्झायमर ह्या विकाराने ग्रस्त असलेल्या, एका वृद्ध आणि विद्वान संस्कृतच्या प्राध्यापकाभोवती गुंफलेली ही कथा आहे. भूत,वर्तमान आणि भविष्यकाळाला जोडणारी स्मरणसाखळीच निखळली तर त्या माणसाचं अस्तित्व अर्थहीन होऊन जातं. अर्थात त्याची स्मृती गेलेली असली तरी त्याच्या आजूबाजूंच्या माणसांचं, मुलाबाळांचं स्मरण, नात्यांचे पीळ, गंड सगळंच शाबूत असतं. आपल्या माणसाच्या मनाची दारं बंद झालेली आहेत हे सत्य पेलण्याचा संघर्ष आणि त्या सत्याला सामोरं जाण्याचा एक सुंदर दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे.

स्मरणशक्ती आणि कुटुंबवत्सलतेचं प्रतीक असलेल्या हत्तीमागे प्राध्यापकांनी एका अनामिक ओढीने भरकटत जाणे आणि हत्ती, माहुताची बायको ( अमृता सुभाष ) ह्यांच्याबरोबरचे सगळे प्रसंग हे अत्यंत symbolic आहेत. सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे पण प्राध्यापकांच्या भूमिकेतील डॉ. मोहन आगाशे ह्यांच्या अभिनयाबद्दल लिहिण्यासाठी शब्द नाहीत. अविस्मरणीय अनुभव ! ... त्यांचा अभिनय प्रत्यक्षच पाहावा आणि थक्क व्हावं !

अमृता सुभाष ची फॅन नाही पण अस्तु मधे फार सुरेख काम ़केलय !
डॉ अगाशेंबद्दल काय बोलणार ... उच्च .. सिनेमा ओके टाइप वाटला .
त्यांच्या लॉसँजलिस च्या स्क्रीनिंग शो ला त्यांच्या उपस्थितीत पहायचा योग आला चक्क आणि गप्पा गोष्टी परिसंवाद .

हमशकल्स ४० मिनिटां पुढे झेपेना.

नुसते एकापाठोपाठ एक सीन्स, एकमेकांशी सुतराम संबंध नसलेले.
सैफ़ अन रीतेशमुळे ४० मिनिटं तरी सहन झाला.

बाकी फ़ारेन्ड, अरे सध्या कामासाठी सिंगापूर ला आलोय, सो रोज रात्री एका सिनेमाचा रतीब घालतोय.

अमृता सुभाषबद्दल अनुमोदन डीज्जे :). डॉ. मोहन आगाशेंकडून सिनेमातील प्रतिकांबद्दल ऐकण्याचा अनुभव अवर्णनीय होता!

Pages