Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉबी जासूस पाहिला विद्या
बॉबी जासूस पाहिला विद्या बालनचा . केबलवाल्याच्या कृपेने.
विद्या बालनचा सिनेमा म्हणजे काही वेगळी ट्रीटमेंट असेल हा अंदाज चुकला . एकदम सपक चित्रपट आहे. पहिला भाग ठीक आहे .दुसरा भाग अगदीच ढेपाळलाय.
पहिल्या भागात निर्माण झालेली उत्सुकता दुसर्या भागात पार नाहीशी होते. खरतर त्या रहस्याचा उपयोग छान करून घेता आला असता थोड डोक लढवून . पण दिग्दर्शकच गोंधळला आहे अस वाटत राहत .
विद्याचा अभिनय ठीक आहे.. काम चांगल केलेले आहे. पण तरीही काही कमी आहे अस वाटत राहत .
त्या वेगवेगळ्या गेट अप , मेक अपच्या नादात कथा बाँधणिकड़े दुर्लक्ष झाले आहे असे वाटत राहते ..
पोश्टर बॉईज - धमाल सिनेमा.
पोश्टर बॉईज - धमाल सिनेमा. अवश्य बघा.
निखळ विनोद. साधासुधा, प्रामाणिक, सुंदर अभिनय. आचरटपणाला भरपूर वाव असूनही अजिबात आचरटपणा केलेला नाही.
स्टोरीलाईन तर धमाल आहेच...कथानकाच्या ओघात पडद्यावर अधेमधे येणारे मोमेण्टस पण एक नंबर आहेत. ते नसते तर कथानकाला काहीही फरक पडला नसता, पण ते आहेत त्यामुळे निखळ विनोदात दमदार भर पडली आहे.
अनिकेत विश्वासराव प्रथमच मला आवडला. हृषिकेश जोशी आणि दिलीप प्रभावळकर हे तर काय आवडीचेच कलाकार आहेत.
ब्रोकन सिटी - रसेल क्रो आणि
ब्रोकन सिटी - रसेल क्रो आणि मार्क वाह्ल्बर्ग. चांगला आहे एकदा बघायला.
व्हाईट हाउस डाउन - थ्रिलर म्हणून चांगला आहे. डिस्ने ने अॅक्शन थ्रिलर बनवला तर जसा होईल तसा आहे. प्रेसिडेण्ट, व्हाईट हाउस संबंधित प्रोटोकॉल वगैरे बरोबर घेतल्यासारखा वाटत नाही. वेस्ट विंग सारख्या सिरीज मधे जसे सगळे वातावरण "प्रेसिडेन्शियल" वाटते तेवढे येथे वाटत नाही. पण तेवढे दुर्लक्ष केले तर पाहण्यासारखा आहे.
ब्रोकन अॅरो देखील चांगला
ब्रोकन अॅरो देखील चांगला आहे... खास करुन त्याचे बॅकग्राउंड संगीत मस्त आहे... केवळ गिटारचा एक पीस आहे पण योग्य ठिकाणी वाजवल्याने परिणामकारक झालेला आहे
उदयन, ब्रोकन अॅरो म्हण जे
उदयन, ब्रोकन अॅरो म्हण जे जॉन ट्र्वोल्टा व्हिलन आहे तोच का? तो माझ्या ऑल्टाइम फेवरिट पैकी आहे.
मस्त अॅक्षन. चक्क एक न्युक्लीअर एक्ष्प्लोजन दाखिवला आहे व त्या नंतर हिरो हिर विणीला जसे समजावू न सांगतो तो ऑटाफे फिल्मी रोमांटिक मोमेन्ट आहे.
अत्ताच टॉप गन परत बघितला. तो ही ऑटाफे! टॉम्या म्हातारा झाला आता पण काय दिसायचा. १९८७ सीम्स लाइक अनदर लाइफ्टाइम! पण ह्यातली हिरवीण मजला आव्डत नाही. उग्र दिसते.
ब्रोकन अॅरो मधला रेल्वेचा
ब्रोकन अॅरो मधला रेल्वेचा सीन पडद्यावर छान वाटतो पण त्याचे चित्रिकरणाच्या वेळची क्लीप बघितली तर !!
सिंडी क्रॉफर्ड पण आहे का त्यात ? बहुतेक दुसरा असणार तो.
मला, टॉम क्रूझच्या अनेक हिरवीणी आवडल्या नाहीत... व्हॅनिला स्काय मधल्या दोघी आवडत्या पण त्यात त्याचा गेटप नाही आवडला.. निकोल आवडायची पण तिच्याबरोबर तो नाही आवडायचा !
टाँम बहूतेक स्वत: वरच लक्ष
टाँम बहूतेक स्वत: वरच लक्ष प्रेक्षकांचे रहावे म्हणून असल्या हिरविनी घेत असावा
बहुचर्चित 'रमा माधव' पाहिला.
बहुचर्चित 'रमा माधव' पाहिला. उच्च निर्मितीमूल्यं, उत्तम सेट्स-वेशभूषा-संगीत, चांगली कथा-पटकथा, समजायला सोपे तरी त्या काळाशी सुसंगत वाटणारे संवाद आणि सुरेख अभिनय ह्यामुळे पेशवाईचा काळ पडद्यावर जिवंत करण्यात 'रमा माधव' अत्यंत यशस्वी झाला आहे. मृणाल कुलकर्णीचं मनःपूर्वक अभिनंदन
पेशवाईच्या पटाचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी बाजूला सारुन फक्त रमा-माधवावर फोकस करणे मात्र शक्य झालेले नाही.
मुख्य म्हणजे रमा-माधवाला अपत्य झालं नव्हतं, माधवराव बराच काळ आजारी होते ह्यामुळे नक्की दोघांमधलं नातं तितकंसं उत्कट असेल की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडू नये असे काही प्रसंग गुंफून ,चित्रपटाच्या चौकटीत ही प्रेमकहाणी 'बिलिव्हेबल' करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे जाणवते.
रमा-माधवातल्या प्रसंगांपेक्षा कदाचित जास्तच फुटेज इतर घडामोडींना आहे.
पण रमा-माधवामधील प्रसंग अतिशय गोड लिहिले आहेत
लहानगी रमा श्रुती कार्लेकर, तरुण रमा पर्ण पेठे आणि माधवराव-आलोक राजवाडे ह्या तिघांचंही काम चोख झालेलं आहे. खूप सुंदर अभिनय केलाय ह्या तिघांनी. बाकी सगळ्यांनीही उत्तम अभिनय केला आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या पात्रापासून सगळे आपापल्या जागी परफेक्ट ! पण रमा-माधवापेक्षाही थोडा जास्तच लक्षात राहतो तो राघोबादादा-प्रसाद ओक ! रमा-माधवाइतकेच महत्त्व राघोबादादाला मिळाले आहे म्हणूनही असेल कदाचित.
मात्र चित्रपट संपल्यावर रमा-माधवाची प्रेमकहाणी ह्यापेक्षा परिस्थितीपुढे हतबल झालेले दोन दुर्दैवी जीव असे वाटून मन खिन्न झाले. पण पर्वती,शनिवारवाडा, पेठा आणि इतर वास्तुंमुळे आजही खूप रिलेट करता येणारा तो काळाचा तुकडा थिएटरबाहेर पडल्यावरही मनात, दृष्टीसमोर रेंगाळत राहिला हे निश्चित.
* पेशव्यांची वंशावळ आणि त्या काळातील महत्त्वाच्या घटना ह्याबद्दल जुजबी वाचून गेल्यास बरे. तसे न केल्यास चित्रपट बघताना कदाचित थोडा गोंधळ उडू शकेल.
अगो .. छान लिहलयसं .. ट्रेलर
अगो .. छान लिहलयसं .. ट्रेलर ग्लॅमरस वाटलेत मला .. आता देशात आल्यावरच बघता येईल ..
किरण यज्ञोपवित दिग्दर्शित
किरण यज्ञोपवित दिग्दर्शित 'सलाम' हा (मराठी) चित्रपट पाहिला. अगदी आवर्जून मुलांना सोबत घेऊन पाहण्याजोगा वाटला. साधा आणि सुंदर. निरागस आणि अस्सल. कलाकार लहानग्यांची नावे माहित नाही पण संपूर्ण संच उत्कृष्ट आहे. जाताना कसल्याही अपेक्षा नव्हत्या. चित्रपट पाहून सुखद धक्का बसला.
Totally worth watching. ज्या काही मोजक्या कलाकृती पाहुन त्या बराच काळ आपल्यासोबत राहतात त्यातली एक.
'काही निवळ, काही गलबला, ऐसा कंठित जावा काळ.'. त्यातील 'निवळ' लेव्हलची कलाकृती. 'तरल' हे विशेषण मराठीत इतकं बकाल झालं आहे की वापरायची भीती वाटते, नाहीतर वापरले असते.
'On the way to school' या चित्रपटाबाबत मला कोणीतरी सांगीतले. आमचा हुकला. कोणी पाहिला असेल तर त्याबाबत नक्की लिहा.
http://en.unifrance.org/movie/33991/on-the-way-to-school
Flight of the butterflies
Flight of the butterflies
http://www.lcsd.gov.hk/ce/Museum/Space/Programs/Omnimax/FlightoftheButte...
मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराच्या शोधमोहिमेची ही गोष्ट स्तिमित करणारी आहे. फुलपाखरांच्या पंखांवर हाताने लेबलं चिकटवून त्यांचा स्थलांतर मार्ग शोधायला आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार्या शास्त्रज्ञद्वयीची असाधारण कहाणी. ४४ मिनिटांचा माहितीपट आहे. ५ वर्षांवरील मुलांसाठी highly recommended. इतक्या रंजक पद्धतीने चित्रीत केले आहे की पूर्ण समजले नाही तरी काहीतरी पदरी पडतेच मुलांच्या. माहितीपट पाहण्याआधी मलाही याबाबत ठेंगा माहिती होती . काय अफलातून काम आहे या शास्त्रज्ञांचे. घुमटाकार पडद्यावर पाहिल्याने अविस्मरणीय अनुभव ठरला.
http://en.wikipedia.org/wiki/Fred_Urquhart
आभार रैना.. दोन्ही चित्रपट
आभार रैना.. दोन्ही चित्रपट बघावेच लागतील.
The Queen (2006) पाहिला.
The Queen (2006) पाहिला. डायनाच्या अपघाताच्या बातमीपासून तिच्या फ्युनरलपर्यंतच्या काळातल्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. कथानकाचा जीव लहानच आहे पण चित्रपट पहावा तो Helen Mirren या अभिनेत्रीने साकारलेल्या एलिझाबेथ राणीच्या भूमिकेसाठी. तिचं काम फारच उच्च दर्जाचं झालंय. याच भूमिकेसाठी तिला त्या वर्षीचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा Oscar पुरस्कार मिळाला होता.
रैना, सलाम कुठे पाहिला?
रैना, सलाम कुठे पाहिला?
जिज्ञासा, मी हाँगकाँग मध्ये
जिज्ञासा, मी हाँगकाँग मध्ये पाहिला (एका मित्राच्या आणि हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाच्या कृपेने).
रैना, धन्यवाद! माझ्या
रैना, धन्यवाद! माझ्या मैत्रिणीने काम केलंय यात म्हणून पाहायची उत्सुकता आहे. आता आपली मराठी वर आला की पाहिन.
रेगे बघितला. सिनेमाच्या
रेगे बघितला.
सिनेमाच्या माध्यमातून कथा कशी मांडावी, सादर करावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा सिनेमा. पटकथा ही या सिनेमाची जान आहे. पटकथेत बर्याच पुढे-मागे उड्या आहेत. (काळाच्या दृष्टीने). त्यामुळे सिनेमा खूप लक्षपूर्वक पहावा लागतो आणि आपण त्यात अगदी गुंगून जातो.
आणि महेश लिमयेचं कॅमेरावर्क पण बेस्ट आहे!
सर्वांचा अभिनय मस्तच. महेश मांजरेकरनं घेतलेलं बेअरिंग खूप आवडलं.
वास्तविक कथानक म्हणावं तर फारसं नाही, त्यात नाविन्यही नाही. पण तरी ती ज्या प्रकारे सादर झाली आहे, ते झकास आहे एकदम! ही एक पोलीस स्टोरी आहे, पण त्याचबरोबर त्याची टॅगलाईन (तुमच्या मुलाकडे तुमचं 'नीट' लक्ष आहे का?) पण एकदम चपखल आहे.
अवांतर -
एक-दीड वर्षांपूर्वी ठाण्यातल्या राम मारूती रोडवर खांबांवर ठिकठिकाणी लटकणारी एक जाहिरात पाहिली होती - "नव्या मोठ्या बॅनरच्या मराठी चित्रपटासाठी १८-२५ वयोगटातली मुले-मुली पाहिजेत" साध्या पुठ्ठ्यावर कागद चिकटवून त्यावर हातानं लिहिलेल्या जाहिराती होत्या. त्या याच सिनेमासाठी होत्या की काय असं वाटलं काल पाहताना. कारण सिनेमाचं बरंचसं शूटिंग ठाण्यातलं आहे.
मी "क्वीन" सिडीवर बघितला.
मी "क्वीन" सिडीवर बघितला. तितकासा आवडला नाही. ती नेमकी किती बावळट आहे याचा नीट उलगडा होत नाही. स्वतःच्या मेहंदीच्या वेळी एवढी साधी का असते ?
नोकरी करत नाही, तर तिच्या खात्यात एवढे पैसे का असतात ? केवळ पॅरीस ला जायचे म्हणून बँक अकाऊंट बंद का करावे लागते ? शेंगेन व्हीसासाठी बँक स्टेटमेंट लागते ना ?
अॅमस्टरडॅम मधली " गलत जगह" तिला कळते, मग " गलत दुकान" का नाही कळत ?
ज्या दुकानात हिंग मिळत नाही, तिथे पाणीपुरीचे सगळे सामान मिळाले ? चणे भिजवले कधी आणि उकडले कधी ? त्यापेक्षा सामोसा करायचा ना. सगळे घटकही मिळाले असते ( ओवा सोडून ) शिवाय खायला / खपवायला सोपा !
अॅमस्टरडॅम मधली मुलगी म्हणजे टिपीकल जून्या हिंदी सिनेमातली. ( भाई कि पढाई और बहेन कि शादी के लिये ) मला पॉकेटमनी हवा म्हणून आपल्या मर्जीने या धंद्यात आलेय, असे म्हणाली तर सहानुभूती कशी मिळणार ?
तिच्यापेक्षा तिचे आईवडील मला आवडले. संंवाद मस्त होते. राजकुमारची भुमिका कठीण होती, ती त्याने चांगली
निभावलीय.. कंगना यापेक्षा क्रिश ३ मधे आवडली होती.
>>>अॅमस्टरडॅम मधली " गलत
>>>अॅमस्टरडॅम मधली " गलत जगह" तिला कळते, मग " गलत दुकान" का नाही कळत ?<<
हो काही काही सीन्स एकदमच गंडलेत.
----------------------------------------------------------
गूगल काळातली मुलीला ते दुकानातली वस्तु कळू नये.
कहाणी २००३ च्या आधी दाखवली असेल तर माहीत नाही. मी मूवी पाहिला पण तो नक्की किती अलिकडचाय हे समजलेय नाही. कारण अलीकडच्या काळात कोणी इतके बावळट असेल वाटते नाही(कमीत कमी 'माहीती' बाबतीत).
लग्नाच्या अश्या अपेक्षा करून असणार्या मुली पाहिल्यात. असो.
एकंदर ज्यास्त डोक्याला शॉट न देता काही मजेशीर सीन्स बघायला मजा आली. ओवरऑल बोरींग न्हवता.
वेल सेड दिनेशदा !
वेल सेड दिनेशदा !
झंपी, तिच्या पहिल्याच संवादात
झंपी, तिच्या पहिल्याच संवादात तिला फेसबूकवर फोटो अपडेट करायचे आहेत असे ती ( मनात ) म्हणते.. म्हणजे अगदी बावळटही नाही आणि कहाणी फार जुनीही नाही.
मी मुद्दाम जुने मराठी चित्रपट
मी मुद्दाम जुने मराठी चित्रपट सिडीवर मिळाले तर घेऊन येतो. सांगत्ये ऐका, रंगल्या रात्री अशा.. बघून झाले.
रंगपंचमी पण कालच बघितला.
जयश्री गडकर, सुर्यकांत, चंद्रकांत, हंसा वाडकर, रत्नमाला अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रत्येकाचा अभिनय खणखणीत नाण्यासारखा.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे आशा भोसलेंनी गायलेली एकसे एक गाणी..
मारिते गं पिचकार्या भरभरून, बाई मला ठेच लागली ठेच, राम पुसे जानकीला, आले रे आले रंगवाले, नाचुनी तूझ्यापुढे मागिते मुशाईरा, गेला हटकुनी बाई भरल्या बाजारात..अशी कितीतरी गाणी आहेत.. सादरीकरण पण सुंदरच.
जयश्री गडकरच्या मागे नाचायला चक्क आशा काळे आहे.
सेन्सॉर सर्टिफिकेट वर पार्टली कलर्ड असे लिहिलेय पण सिडीत तरी कुठलाच भाग रंगीत नाही.
दिनेश क्विन सिनेमा अगदीच
दिनेश क्विन सिनेमा अगदीच फालतू आहे, असह्य झाला. काही संवाद उगिचच लाऊड केले आहेत.
आज डॉ. प्रकाश बाबा आमटे या
आज डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाचे ट्रेलर बघितले टिव्हीवर ... असे वाटले वृत्तपत्रांच्या रकान्यातील एखाद्या बातमीपलीकडे आपल्याला काहीच ठाऊक नाहीये त्यांच्याबद्दल... पाणी काढले नानाने डोळ्यातून .. चित्रपट बघायला जाताना मनाची फार तयारी करावी लागणार असे दिसतेय.. १० ऑक्टोबर, तारखेची डायरीत नोंद !
http://www.youtube.com/watch?v=YnqioO1v8fs
पाहिले नसेल तर नक्की बघा ..
क्वीन बद्दल: स्वतःच्या
क्वीन बद्दल:
स्वतःच्या मेहंदीच्या वेळी एवढी साधी का असते ? >> कारण प्रोड्युसर करण जोहर नाही. चांगला बादला वर्कचा ड्रेस घालते पण दागिने काहीच नसतात. असले तरी कायतरी अतरंगी फुलांचे असतात. बहुदा नंतर ती कशी वेल ग्रूम होते ते दाखवण्यासाठी सुरुवात साधी.
नोकरी करत नाही, तर तिच्या खात्यात एवढे पैसे का असतात ? केवळ पॅरीस ला जायचे म्हणून बँक अकाऊंट बंद का करावे लागते ? शेंगेन व्हीसासाठी बँक स्टेटमेंट लागते ना ? >> ती वडिलांचे दुकान सांभाळते. दुकान सांभाळताना मिळालेले पैसे. हनिमून नंतर ती लंडनला (का कुठेतरी) स्थायिक होणार असते. आता अकौंटचा काय उपयोग म्हणून ती ते बंद करते. हा वेडेपणा आहे हे बरोबर पण तिच्यावर पडलेली लग्नाची "जादू" दाखवण्याच्या दृष्टीने एकदम करेक्ट वाटत ते. विसा अप्लाय झालेला असतो (आधी एका सीन मध्ये कुणीतरी काकू/मामी तिचा पासपोर्ट घेऊन येते.)
अॅमस्टरडॅम मधली " गलत जगह" तिला कळते, मग " गलत दुकान" का नाही कळत ? >> हे गंडलेला सीन. बरोबर पकडलात.
ज्या दुकानात हिंग मिळत नाही, तिथे पाणीपुरीचे सगळे सामान मिळाले ? चणे भिजवले कधी आणि उकडले कधी ? त्यापेक्षा सामोसा करायचा ना. सगळे घटकही मिळाले असते ( ओवा सोडून ) शिवाय खायला / खपवायला सोपा ! >> उकडलेले चणे कॅन मध्ये मिळतात. आधी पण ती सिनेमात पाणीपुरी खाताना दाखवलेली आहे. तो भेटल्यावर नाही. इथे तिचे पाककौशल्य पेक्षा एकूण ती तिचे स्वतःचे पॅशंस (त्याच्या विरहीत आयुष्य, स्वतःच्या आवडी निवडी इ ) कसे एक्स्प्लोर करते हा मुद्दा दाखवलेला/दाखवण्याचा प्रयत्न आहे.
अॅमस्टरडॅम मधली मुलगी म्हणजे टिपीकल जून्या हिंदी सिनेमातली. ( भाई कि पढाई और बहेन कि शादी के लिये ) मला पॉकेटमनी हवा म्हणून आपल्या मर्जीने या धंद्यात आलेय, असे म्हणाली तर सहानुभूती कशी मिळणार ?>> ती रुक्साना असते - पाकिस्तानी. रेसेशन असल्याने नोकरी मिळाली नाही हे पण सांगते. हे अगदी बिलीव्हेबल आहे आणि सहानुभूती (माझी तरी) मिळाली.
तुम्हाला आवडला नाही हे मान्य. पण आता मला किती आवडला हे पण लक्षात घ्या
दिनेशदा, गलत दुकान नाही कळलं
दिनेशदा, गलत दुकान नाही कळलं असं होऊ शकतं!!
पाणीपुरीची गोष्ट मलाही पाहताना खटकली होती.
गलत जगह असु शकतात हे ज्ञान
गलत जगह असु शकतात हे ज्ञान भारतातही मिळते पण गलत दुकाने असतात हे ज्ञान तिच्यासारख्या कॉन्सेर्वेटीव व्वातावरणातल्या मुलीला नसणार आणि त्यामुळे त्या दुकानातला मालही गलत आहे हे तिला ओळखता येत नाही .
भारतात कुठे आहेत अशी दुकाने?
ती पानी पुरी बनवायला घेते तेव्हा आता ही कशी काय बनवणार पापु हा प्रश्न मलाही पडलेला.
पण हा प्रसंग - तिला संधी मिळाली तर तीही काहीतरी करुन दाखवु शकते - हे दाखवण्यासाठी आला आहे.
मला वाटते या प्रसंगाआधीच तिला तिच्या चांगल्या मार्कांमुळे एक ओळखीमध्ये नोकरीची ऑफर येते पण आधी तिचे वडील 'नव-याला विचार' म्हणुन टाळतात आणि नंतर होणारा नवरा 'तुला काय गरज, मी कमावतोय ना' म्हणुन टाळतो हा प्रसंग आहे. तेव्हाचा तिचा अभिनय खुप सुरेख आहे.
गला बादला वर्कचा ड्रेस घालते
गला बादला वर्कचा ड्रेस घालते पण दागिने काहीच नसतात. असले तरी कायतरी अतरंगी फुलांचे असतात. बहुदा नंतर ती कशी वेल ग्रूम होते ते दाखवण्यासाठी सुरुवात साधी.<<< बहुतेक पंजाबी लोकांमध्ये मेहंदीच्या कार्यक्रमाला फुलांचे दागिने घातलेले असतात. एका मित्राच्या लग्नाच्य सीडीमध्ये पाहिलं होतं.
मलाही आवडला क्वीन! थोडीफार
मलाही आवडला क्वीन! थोडीफार गडबड झाली आहे पण एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे. सध्या ज्या दर्जाचे हिंदी चित्रपट बनतात त्यामानाने खूपच छान. आणि तिचा तो इटालियन दोस्त तर फारच भारी
'फाईंडींग फॅनी' खूप आवडला,
'फाईंडींग फॅनी' खूप आवडला, अगदी त्याच्या 'parts of the story are true and those are the ones which are the strangest' या डिसक्लेमर पासून सगळेच!
कामं सगळ्यांचीच उत्तम आहेत. नासिर, पंकज कपूर आणि डिंपल नेहमीप्रामाणेच क्लास. पण मला सगळ्यात अर्जुन कपूरने आश्चर्यचकित केले. इशकजादे नंतरचा हा त्याचा सगळ्यात सहज परफॉरमन्स.
दिपीकाचा उल्लेख वेगळा करावा लागेल. तिचा लूक, वावर, बॉडी लँग्वेज सगळेच आता एकदम उच्च प्रतीचे झाले आहे.
नुसतेच 'क्विर्की' पात्रे गोळा करुन वेगळा सिनेमा बनत नाही तर त्यांची काही कथा असावी लागते याचे भान सतत ठेवलेले आहे. त्यामुळे इडीओसिंक्रसिजच्या पलिकडे जाऊन त्यांच्या बद्दल जिव्हाळा निर्माण होतो.
मस्ट वॉच.
एक सूचना - हा सिनेमा विनोदी म्हणून पाहणे हे 'द डार्क नाईट' अॅक्शन थ्रिलर म्हणून पाहण्यासारखे आहे!
Pages