गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती

Submitted by गजानन on 8 May, 2013 - 13:19

'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्‍या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्‍या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं. मग त्यांनी रवींद्र साठ्यांच्या आवाजातलं रेकॉर्डींग लावायला सांगितलं आणि एकाग्रतेने ऐकलं. ऐकताना कागदावरच्या ओळींवर खुणा केल्या. ते गाणे संपल्यावर रेकॉर्डींगला सुरुवात करण्यास सांगितले. एकाच टेकमध्ये गाणं ओके. पंधरामिनिटांपूर्वी पहिल्यांदा ऐकलेले गाणे एका फटक्यात उच्चार आणि स्वरांचे चढउतार, वाद्यांचा मेळ हे सगळं अचूक साधत इतक्या चांगल्या दर्जात केवळ लतासारखी महान माणसंच देऊ जाणं!

हा किस्सा परवा लोकसत्तेत वाचला आणि मला जुन्या मायबोलीवरच्या बीबीची आठवण आली - http://www.maayboli.com/hitguj/messages/34/45568.html

तो धागा इथं 'पुढे चालू....' ठेवू...

एखाद्या गाण्याच्या निर्मितीदरम्यान / निर्मितीनंतरचा किंवा त्या एखाद्या गाण्याच्या चालीशी संबंधित असलेला किंवा त्या गाण्याच्या अनुषंगाने त्याच्या संगीतकारांचा/गायकांचा/गीतकारांचा आपण वाचलेला/ऐकलेला असे किस्से लिहिण्यासाठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल, आहे ना.
त्यांना तीन सप्तकांत (मंद्र, मध्य आणि तार) सहज फिरणारा आवाज असं म्हणायचं असावं.
मंद्रालाच खर्जही म्हणतात. चुभूदेघे.
त्या गाण्यात (दर्याचा दरारा मोठा) बराच टिपेचा सूर लावावा लागतो हे खरं आहे.

अ‍ॅक्च्युअल नोटेशन नाही सांगता येणार - ते इथली शास्त्रीय मंडळी सांगू शकतील - पण त्याच गाण्यातल्या 'आमी पाण्यामंदी रापण टाकतो जाली' आणि 'आभाल झुकतं हे खाली' या ओळींत सुरांची बरीच मोठी रेन्ज कव्हर होते. ती झेपली नाही तर खालचा सूर स्पष्ट लागला तर वरच्यात आवाज चिरकतो किंवा चोरटा काढला जातो आणि उलटपक्षी वरचा नीट लावता आला तर खालचा ऐकूच येत नाही इतका घशात जातो. तर असं होणार नाही असा आवाज हवा होता - असं.

जर मला बरोबर आठवत असेल तर मंद्राचा मध्यम ते तारसप्तकाचा पंचम इतकी रेन्ज सहज लावता यावी असा प्रयत्न असतो रियाज करताना. बाकी दैवदत्त आवाज आणि गाढा रियाज यांनी त्यापलीकडे जाता येतं काहींना(च).

खर्जाचं उदाहरण 'अनारकली'तल्या 'जाग दर्दे इश्क जाग'चं देता येईल.

Hmm ..

आय गेस, मला समहाऊ खर्ज म्हणजे खालच्या पट्टीतला खरखरीत आवाज वाटायचं बहुतेक .. Lol

स्मूथ (?) आवाजाला ही खर्ज असू शकतो .. Happy

सशल,
खर्ज म्हणजे मंद्र सप्तकातला षड्ज (सा).
वर स्वाती-आंबोळे यांनी सांगितल्याप्रमाणे, (रियाज नसेल तर) मंद्रसप्तकात आवाज टिकत नाही. स्वर परफेक्ट लागेलच याची खात्री देता येत नाही. मंद्र सप्तकालाच खर्ज सप्तकही म्हणतात काही जण.
त्यामुळे फक्त मंद्र सप्तकातला षड्जच नव्हे तर इतर स्वरही व्यवस्थित लावायला खूप रियाज लागतो.
सारेगमप किंवा तत्सम स्पर्धांतून परीक्षकांची ठराविक कमेंटही तुम्ही ऐकली असेल 'खालचे स्वर नीट लागले नाहीत' याचाच अर्थ पक्के लागले नाहीत, सूर हालत होते.

खर्जाची फ्रिक्वेन्सीही कमी असते त्यामुळे तो स्मूथ वाटत नाही आणि म्हणून खर्ज=खरखरीत आवाज असा समज होऊ शकतो.

मंद्रसप्तक ते तार अशी रेंज असलेलं हे अजून एक गाणं. रूपास भाळलो मी.
अर्थात यात मंद्रात पंचमापर्यंतच येतात. (' रूपास' या शब्दात 'पास'मध्ये मध्यसप्तकातल्या षड्जापासून मंद्रादल्या पंचमापर्यंत येतात.)

http://www.youtube.com/watch?v=Z2bJi3Fc-AM
इथे रूपास भाळलो मी हे गाणं तीन जोड्यांवर चित्रित झालेलं दाखवलंय.
१) राजा गोसावी- जयश्री गडकर,
२) पद्मा चव्हाण- ????
३) रमेश देव- ???
तीनही जोड्यांवर चित्रित झालंय ते एकाच सिनेमात की वेगवेगळ्या? ह्याची काही ष्टोरी कुणास ठाऊक आहे काय?

एबीपी माझा चॅनेलवर दर रविवारी (रात्री ९ ते १० च्या दरम्यान) "गोष्ट गाण्याची" नावाचा एक कार्यक्रम प्रदर्शित होत असतो. गाजलेल्या मराठी गाण्यांच्या निर्मितीची गोष्ट त्यात (गीतकार, संगीतकार, गायक इ.इ.) सांगतात. यावेळेस "जैत रे जैत" चित्रटातील "जांभूळ पिकल्या झाडाखाली...." या गाण्याची गोष्ट दाखवली/ऐकवली.

हि लिंकः
सशक्त कथानक आणि सुरेल गाणी तसंच संगीतामुळे 'जैत रे जैत' हा चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे. स्मिता पाटील यांच्या दमदार अभिनयाने चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेलंच आणि ना धों महानोरांच्या गीतांमुळे सिनेमातील गाणी अजरामर झाली. यातील प्रचंड गाजलेलं आणि आजही रसिकांच्या ओठांवर कायम असलेलं गाणं म्हणजे 'जांभूळ पिकल्या झाडाखाली...' या गाण्याची गोष्टही अतिशय रंजक आहे.

"खरंतर रानात इतकी रसाळ फळं असताना महानोरांनी जांभळीलाच का निवडलं याचीही वेगळी गंमत आहे. कवींना त्या वक्ताला जांभळीचं नाव सुचलं आन त्यांनी असं एक एक शब्द गाण्यात वापरलं की आशाबाई पण दंग राहिल्या."

कहाणी 'जांभूळ पिकल्या झाडाखाली'ची

संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी/पाहण्यासाठी "व्हिडियो" आवर्जुन बघा. Happy

छान माहितीपूर्ण धागा आहे हा. "जांभूळ पिकल्या झाडाखाली...." असे शब्द महानोरांनी का लिहिले ते गुगलत असताना हा धागा सापडला. पण ती वरची ABP Majha ची "कहाणी 'जांभूळ पिकल्या झाडाखाली"ची लिंक आता तुटलेली आहे. कोणास माहिती असल्यास सांगणे.

Pages