मिश्र भाज्यांचे सूप

Submitted by स्नू on 24 July, 2014 - 05:39

लागणारा वेळ:

२५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

पालकाची पाने - १०-१५
टोमॅटो १ मध्यम आकाराचा
कांदा १ मध्यम आकाराचा
फरसबी - १०-१५
बीट १ मध्यम आकाराचे
गाजर २ मध्यम आकाराचे
आले तुकडा २ इंच
तूप १ चमचा
मीठ चवीनुसार
मिरीपुड १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती:

१. सर्व भाज्यांचे स्वच्छ धुवून तुकडे करावेत. खूप बारीक तुकडे करण्याची आवश्यकता नाही.

1_1.jpg

२. वर नमूद केलेले सगळे साहित्य कूकर मध्ये टाकावे.

2_0.jpg

३. साधारण २ ग्लास पाणी टाकावे
४. २० मिनिटे मध्यम गॅसवर शिजू द्यावे.
५. कूकर थंड झाल्यावर हँड ब्लेंडर ने मिश्रण बारीक करावे.
६. हे मिश्रण गाळून घ्यावे.

3_0.jpg

७. गरमागरम वाढावे

वाढणी/प्रमाण:

२ जणांसाठी

अधिक टिपा:

रोज रात्री जेवणाच्या ऐवजी हे सूप घेतल्याने माझ्या सासरेबुवांनी १ महिन्यात ५ किलो वजन कमी केले होते.

बदल म्हणून स्वीट कॉर्न / ब्रोकोली टाकता येईल. मुळा किंवा वांगी अजिबात टाकू नयेत भयंकर उग्र वास येतो आणि चव पुर्णपणे बिघडते.

माहितीचा स्रोत:

सासरेबुवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी.

रोज करत बसण्याऐवजी २-३ दिवसांचे करून फ्रिजमध्ये ठेवून वापरले तर चालते का?

थँक्स स्नू. छान झालं सूप.
गीता, उसगावात असतांना २ दिवसाचं वेगवेगळ्या डब्यांमध्ये घालून फ्रीज करायचे. ऑफिसला जातांना एक डबा रोज न्यायचे. ही नो कटकट सोपी रेस्पी आहे. शक्यतो फ्रेश बरे. भाज्या कापून ठेवता येतील.

भाज्यांचा फारच किस पाडलात बुवा तुम्ही << अग हेल्दी आणि वजन कमी करण्यासाठी म्हणुन किस पाडला गेला. भाज्या जास्त शिजवणही चांगल नाही, बारीक किसुन जेमतेम शिजवुन खाल्ल तर चांगल.

लगो, तुम्ही पौष्टिक म्हणून सूप बनवता तर त्यात कॉर्नफ्लार घालण्याची गरज नाही. अधिकचा 'स्टार्च' कशासाठी?

Pages