मिश्र भाज्यांचे सूप

Submitted by स्नू on 24 July, 2014 - 05:39

लागणारा वेळ:

२५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

पालकाची पाने - १०-१५
टोमॅटो १ मध्यम आकाराचा
कांदा १ मध्यम आकाराचा
फरसबी - १०-१५
बीट १ मध्यम आकाराचे
गाजर २ मध्यम आकाराचे
आले तुकडा २ इंच
तूप १ चमचा
मीठ चवीनुसार
मिरीपुड १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती:

१. सर्व भाज्यांचे स्वच्छ धुवून तुकडे करावेत. खूप बारीक तुकडे करण्याची आवश्यकता नाही.

1_1.jpg

२. वर नमूद केलेले सगळे साहित्य कूकर मध्ये टाकावे.

2_0.jpg

३. साधारण २ ग्लास पाणी टाकावे
४. २० मिनिटे मध्यम गॅसवर शिजू द्यावे.
५. कूकर थंड झाल्यावर हँड ब्लेंडर ने मिश्रण बारीक करावे.
६. हे मिश्रण गाळून घ्यावे.

3_0.jpg

७. गरमागरम वाढावे

वाढणी/प्रमाण:

२ जणांसाठी

अधिक टिपा:

रोज रात्री जेवणाच्या ऐवजी हे सूप घेतल्याने माझ्या सासरेबुवांनी १ महिन्यात ५ किलो वजन कमी केले होते.

बदल म्हणून स्वीट कॉर्न / ब्रोकोली टाकता येईल. मुळा किंवा वांगी अजिबात टाकू नयेत भयंकर उग्र वास येतो आणि चव पुर्णपणे बिघडते.

माहितीचा स्रोत:

सासरेबुवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ह्यात कलर्ड पेपर्स (भोपळी मिरच्या) ही घालते. तसंच झुकिनी, भोपळा, स्वीट कॉर्न, छोटा कॉलीफ्लॉवरचा तुकडाही. परवा भिजवलेले मसूर होते म्हणून ते ही घातले मूठभर. फक्त तेल, तूप अजिबात नाही. पोटभरीचं सूप होतं. तरीही भूक लागल्यास बरोबर सॅलड किंवा उकडलेली ब्रोकोली.

स्नू, चवदार दिसतं आहे सूप. मस्त सोप्या आणि छान पाकृ शेअर करतेयस Happy फोटोही मस्त असतात.

सायो, अगदी सहमत. मी पण करते. दुध्या आणि मोड आलेले मुगही घालते मी त्यात. कधीतरी लसणाच्याही एक-दोन पाकळ्या. लेकाला देताना मोठा चमचा अमुल बटर घालून देते, आम्ही प्लेन पितो. पोटभर आणि पौष्टिक विना कटकट.

सायो, सई धन्यवाद.

थोडसं तूप टाकलं ना की consistancy मस्त येते आणि डॉ. ने सांगितलं आहे की पचना साठी थोड तूप/ तेल टाकाच..

मस्त रेसीपी. फोटो ही छान.
वजन कमी करण्यासाठीच पाहीजे असेल तर कोबी आणि सेलेरी टाकायला पाहीजे का? अजुन पौष्टीक करण्यासाठी गाळुन घेण्यापेक्श्या सगळ किसुनही घेता येईल.

लगो, मी गाळत नाही. ब्लेंड करून तशीच उकळी काढते. फक्त टोमॅटोचं साल काढून टाकून ब्लेंड केल्यास तोंडात लागत रहणार नाही.

सर्व भाज्या अगदी किंचित तूप आणि जिर्‍याच्या फोडणीवर परतून मग शिजवल्या तर सूप अजून मस्त लागते. मग वरून वेगळे तूप घालायची जरूर नाही.

अर्र्र्र .. किसुन करायचं झालं तर त्या पालकाचं काय करायचं? बारीक तुकडे करुन घातले तर चालेल का ?

अर्र्र्र .. किसुन करायचं झालं तर त्या पालकाचं काय करायचं? बारीक तुकडे करुन घातले तर चालेल का ?

खरंतर सगळं शिजवणार असल्याने किसत बसायची गरज नाही. ते खूप वेळखाऊ होईल विनाकारण.
त्यापेक्षा शिजल्यानंतर हॅण्ड ब्लेण्डरने मॅश करून गाळलेच नाही तरी चालेल जर पौष्टिक म्हणून चोथा ठेवायचा असेल तर.

नीधप +१

...खर तर गाळायला नकोच...चोथा पोटात जाणे गरजेचा असतो..पण काय करणार आम्ही आपले चवीचे पुजारी... Happy

स्नू, चवदार दिसतं आहे सूप. मस्त सोप्या आणि छान पाकृ शेअर करतेयस स्मित फोटोही मस्त असतात. >>++११

खुपच पौष्टिक आहे..

सोपी, चविष्ट आणि पौष्टिक पाककृती. फोटो पाहून आताच सुप गट्ट्म करावसं वाटतयं, खुपच छान.

मला एक प्रश्न पडला आहे, कुकरमध्ये साधारण वीस मिनिटे शिजवायच आहे दोन ग्लास पाणी पुरेसे आहे का?

भाज्यांचा फारच किस पाडलात बुवा तुम्ही... Happy

वेळ असल्यास किसा. किसा नाहीतर कापा शेवटी शिजल्यावर ब्लेंडर फिरवल्यावर सगळं एकजीव होणारच आहे....

Pages