ववि२०१४-(बस मार्ग)

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2014 - 02:30

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस मार्ग आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस मार्ग:-

१) बोरिवली नॅशनल पार्क- ५.४५ am (ह्या स्टॉपकरता वल्लरी चवाथे 9833108548 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

२) आरे सिग्नल,गोरेगाव (पूर्व) - ६.१० am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

३) जोगेश्वरी हायवे लिंक रोड कॉर्नर-६.२५ am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा )

४) दीनदयाळ नगर, मुलूंड (पूर्व) -७.०० am (ह्या स्टॉपकरता श्री. घारुआण्णा/ मुग्धानंद 9819993634/ 9371636309 ह्यांच्याशी संपर्क साधावा

५) सानपाडा jt ब्रीजखाली -८.०० am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

६) खारघर ब्रीजखाली- ८.१५ am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

पनवेल बायपास मार्गे एसपी फार्म्स......

पुणे अंतीम बस मार्गः-

बस- (३२ सिटर)
बस क्रमांकः-MH-12HB8757

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

१)राजाराम पूल,सिंहगड रोड- (6.00 am)

२)शिवाजी पुतळा,कोथरुड - (6.15 am)

३) आशिष गार्डन,डि पी रोड - (6.25 am)

४)किनारा हॉटेल,पौड रोड - (6.35 am)

५) डेक्कन कॉर्नर- (6.45am)

६) गुडलक चौक,डेक्क्न- (6.50am)

७) दापोडी कॉर्नर - (7. 10 am)

८) नाशिक फाटा - (7. 15 am)

९)पिंपरी चौक - (7.20am)

१०)खंडोबा मंदिर,आकुर्डी- (7.25am)

खोपोलीमार्गे एस पी फार्म्स....

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-मुग्धा कुलकर्णी (मो. नं.-9371636309)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)


वविकरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:-

१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२)ज्या ज्या मायबोलीकरांनी नावनोंदणी फॉर्ममध्ये आपल्या लहान मुलांसाठी स्वतंत्र सीट सांगितलेली नाही त्यांनी त्यांच्या लहान मुलांना मांडीवर घेऊन सर्व सीटधारकांना जागा मिळवुन देण्यास संयोजकांना सहकार्य करावं

३) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

४) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषधं या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानपाडा jt ब्रीजखाली

खारघर ब्रीजखाली>>>

मी नेरुळ वरुन येणार असल्याने नेरुळ हाय्वे ला पिक होईल का? [माझ्या बरोबर माझे पिल्लु पण आसणार आहे म्हणुन

प्रिभु जरा जमवा की ह्या दोन स्टॉप्स पैकी एखादा. अशाने मुंबै बाहेर बस जायलाच दर दोन मिनीटाने थांबवावी लागेल. परत येताना तुम्ही जिथे हत दाखवून थांबायला सांगाल तिथेच बस थांबवायची व्यवस्था होईल. प्लीज संयोजकांची अडचण तुम्ही नाही समजून घेणार तर मग कोण घेणार? Happy

कांचन, तुमच्या आधीच्या स्टॉपला राजु७६ चढतील. त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे वर. त्यांना कॉल करायचा त्या दिवशी

१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.
>>>
Rofl

हे खरय का? Proud

मी बसमधे सगळ्यात शेवटी चढणार आहे तेंव्हा मी चढे पर्यंत गाण्यांच्या भेंड्या बिंड्या खेळून घेऊ नका Proud

हो ग ताई.. आता बरी आहे. कल्ला करायला रेडी !!!!!
मी बसमधे सगळ्यात शेवटी चढणार आहे तेंव्हा मी चढे पर्यंत गाण्यांच्या भेंड्या बिंड्या खेळून घेऊ नका >>++१००

सकाळी ६ वाजता? Uhoh
त्यासाठी मला (रात्रभर झोप लागली तर) पहाटे चार ला उठावं लागेल.
नको बाबा Proud

तुम्ही तोपर्यंत जरा झोप बिप काढुन घ्या. Proud

क्रिमरोल, बाकरवडी वगैरे माझ्याशिवाय एकट्याने खाऊ नका Proud

मल्या , नको बोलवूस तू as boluu nako smiley.gif

मुग्धा, Proud मुंबई नक्को गं बाई Wink

बर पुण्याच्या बसवाल्यांनो मला एक सांगा गाणी भरुन पेड्रा कोण आणणारेय?

तुम्हां सगळ्यांचा उत्साह पाहूनच मस्तं वाटतयं Happy

कल्ला करा लोको... असा कल्ला करा की मायबोलीच्या नावाने तिथलं छप्पर दणाणू दे Proud

मी , मालाड पूर्वेला, महामार्गावरच्या पुष्पापार्क ह्या बसथांब्यावर उभा राहीन...सकाळी सहाच्या सुमारास.

Pages