ववि२०१४-(बस मार्ग)

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2014 - 02:30

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस मार्ग आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस मार्ग:-

१) बोरिवली नॅशनल पार्क- ५.४५ am (ह्या स्टॉपकरता वल्लरी चवाथे 9833108548 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

२) आरे सिग्नल,गोरेगाव (पूर्व) - ६.१० am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

३) जोगेश्वरी हायवे लिंक रोड कॉर्नर-६.२५ am (ह्या स्टॉपकरता जाई 9833459858 ह्यांच्याशी संपर्क साधावा )

४) दीनदयाळ नगर, मुलूंड (पूर्व) -७.०० am (ह्या स्टॉपकरता श्री. घारुआण्णा/ मुग्धानंद 9819993634/ 9371636309 ह्यांच्याशी संपर्क साधावा

५) सानपाडा jt ब्रीजखाली -८.०० am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

६) खारघर ब्रीजखाली- ८.१५ am (राजू 9820584083 ह्यांच्याशी संपर्क साधावा)

पनवेल बायपास मार्गे एसपी फार्म्स......

पुणे अंतीम बस मार्गः-

बस- (३२ सिटर)
बस क्रमांकः-MH-12HB8757

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

१)राजाराम पूल,सिंहगड रोड- (6.00 am)

२)शिवाजी पुतळा,कोथरुड - (6.15 am)

३) आशिष गार्डन,डि पी रोड - (6.25 am)

४)किनारा हॉटेल,पौड रोड - (6.35 am)

५) डेक्कन कॉर्नर- (6.45am)

६) गुडलक चौक,डेक्क्न- (6.50am)

७) दापोडी कॉर्नर - (7. 10 am)

८) नाशिक फाटा - (7. 15 am)

९)पिंपरी चौक - (7.20am)

१०)खंडोबा मंदिर,आकुर्डी- (7.25am)

खोपोलीमार्गे एस पी फार्म्स....

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-मुग्धा कुलकर्णी (मो. नं.-9371636309)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)


वविकरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना:-

१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२)ज्या ज्या मायबोलीकरांनी नावनोंदणी फॉर्ममध्ये आपल्या लहान मुलांसाठी स्वतंत्र सीट सांगितलेली नाही त्यांनी त्यांच्या लहान मुलांना मांडीवर घेऊन सर्व सीटधारकांना जागा मिळवुन देण्यास संयोजकांना सहकार्य करावं

३) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

४) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषधं या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर पुण्याच्या बसवाल्यांनो मला एक सांगा गाणी भरुन पेड्रा कोण आणणारेय?...>>> तुच आण की रिया... एकसे एक ढॅण चिक गाणी पाहिजे बघ सगळी.. Proud

देवकाका बोरीवली स्टाॅपला आला असतात तर वल्लीला मदत झाली असती. ती नवीन वविकर आहे तुम्ही जुने जाणते आहात. त्यादिवशी फोनवर बोरीवली जमेल म्हणालेलात तर आम्हा संयोजकांना आधार वाटलेला. बघा प्लीज मतय का बोरीवली

कविता, मी मघाशीच वल्लरीशी बोललो...तिच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही काही बोरिवलीकर लोक आहेत तिच्यासोबत...म्हणून मी मालाडहून चढलो तर तिची हरकत नाहीये.
तरीही तिला मदतीची आवश्यकता असेल तर मी जाईन बोरिवलीला...त्यासाठी पुन्हा एकदा आदल्या दिवशी बोलीन तिच्याशी. Happy

mayuresh, Ok I will see!
But sagali dhinchyak gani asatil han!

honey singh bingh pan
nav thevayachi nahit Proud

व्होडकाचे गाणे तर पाहिजेच पाहिजे.. गटारी लगेचच आहे. आणि जमलंच तर जय मल्हारचे टायटल साँग पण आण.. म्हणजे माझं पिल्लू फारच शांत बसेल..

हिम्या...
गटारी लगेचच आहे...>>>... शनिवारी 'गटारी' आहे, आणि रविवारी 'ववि' आहे... शनिवारचा 'हँग-ओव्हर' कायम राखण्यासाठी 'गाणी' हवियत का?... Proud

अतृप्त आत्मा तुमच्या शुभेच्छा फळाला आल्या. काल खूपच मस्त साथ होती पावसाची.....>>>> त्यामुळे आमचा आत्मा मात्र तृप्त झाला. Proud

Pages