पालक आणि रिकोटा चीज घातलेले गोळे, (कचोर्‍या) :)

Submitted by मृण्मयी on 18 November, 2008 - 14:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक पाकीट फ्रोझन पालक किंवा एक मोठी जुडी ताजा पालक
एक वाटी रिकोटा चीज किंवा ताजं पनीर
२ ब्रेडच्य स्लाइसेस
अर्धा चमचा गार्लिक सॉल्ट
पाव चमचा मीरपुड
१ लहान चमचा इटालियन मिक्स हर्ब पावडर
एक अंड
चमचाभर ऑलिव्ह ऑइल
चवीनुसार मीठ
ब्रेड्क्रम्स

क्रमवार पाककृती: 

*ताजा असल्यास पालक धुवून, चिरून तेलावर मिनिटभर परतून घ्यावा. फ्रोझन वापरत असाल तर थॉ करून त्यातलं पाणी काढून टाकावं. हलका तेलावर परतून घ्यावा.
*डब्यातलं आयतं रिकोटा चीज गाळणीत घेऊन त्यावर थोडं पाणी घालून नीट निथळून घ्यावं. (विकतच्या गोळेदार रिकोटाचीजला एक बुळबुळीतपणा आणि वास असतो, तो काढून टाकण्यासाठी.) ताजं पनीर वापरत असाल तर कुस्करुन घ्यावं.
*आता चीजमधे गार्लिक सॉल्ट (ते किती घातलंय ह्यावर मीठ किती घालायचं ते ठरवा), हर्ब पावडर, मिरपूड घालून नीट एकत्र करावं.
*ब्रेडचे स्लाइसेस (कडा काढून) कुस्करून ह्यात घालावे.
*पालक घालून मिसळून घ्यावं.
*सगळ्यात शेवटी अंड फेटून घालावं.
*साधारण 'तयार' गुलाबजामच्या आकाराचे गोळे करावेत.
*ब्रेडक्रम्स मधे घोळून, वर ऑलिव्ह ऑइल चोपडून ३५० वर १५-२० मिनिटं बेक करावेत. (आकारानं चपटे करून शॅलो फ्राय करता येतील.)

वाढणी/प्रमाण: 
आता नक्की आठवत नाही पण साधारण ८-१० गोळे होतात.
अधिक टिपा: 

*मिश्रणात बारिक चिरलेला कांदा आणि लसूण घालता येतो.
*मिश्रण सैल वाटल्यास एखादी स्लाइस ब्रेड घालता येईल.
* पारमेजान चीझ (मोठा चमचाभर) किसून मिश्रणात मिसळता येईल.
*आवडत असेल तर ३-४ पानं ताज्या पुदिन्याची घालावी.

माहितीचा स्रोत: 
वेबवर कुठेतरी वाचलेली, जराशी बदलून.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks ग, मृ. अंड बायडिंगसाठी घातल आहेस न? मग त्या ऐवजी कॉर्नफ्लावर चालेल न? सगळे अगदी पूर्ण शाकाहारी आहेत म्हणून विचारते.

सही! ते पुलिहोरा बटाटे पण छानच.
धन्यवाद.

धन्यवाद!

काळाच्या उदरात गडप झालेली ही पाकृ अचानक वर येईल असं वाटलं नव्हतं. Proud सुनिधीनं कुठून खणली तिलाच माहिती! Happy

हे गोळे मी फरतर दोनदा केले असतील. दोन्हीवेळा अंड घातलं असावं असं वही सांगते. Happy अंड नको असेल तर आर्च म्हणतेय तसं कॉर्नफ्लावर घालून करून बघा. कसे होतात ते मलाही सांगा. Happy

अगं 'बेत काय करावा भाग १' ची सुरुवातीची पाने वाचताना सापडले. Happy
चिन्नु पण तिथुनच आली असणार कारण इथे संबंध नसताना वर तिने 'पुलीहोरा बटाटा'चा उल्लेख केलाय जो तिथे बेकाक१ मधे आहे. Proud

ही रेसिपी खरच पोरांच्या बड्डे ला करायला मस्त वाटते आहे.

वर तिने 'पुलीहोरा बटाटा'चा उल्लेख केलाय जो तिथे बेकाक१ मधे आहे>> मी पण तो उल्लेख वाचून लगेच मृ च्या लेखनात ते बटाटे शोधून आले पण नो लक Happy

मी परवाच रविवारी स्पिनॅच रिकोटा राविओली खाल्ली. लै भारी!!! अन लगेच ही रेसिपी आली. हे फिलिन्ग करून राविओली करून बघायचा प्लान आहे. कधीतरी. त्यापेक्षा वरळीला जाउन हादडणे सोप्पे . आवडीचे कॉम्बो आहे.

भारी पाकृ आहे. गार्लिक सॉल्ट ऐवजी साधे मिठ आणि लसूण वापरून चालेल का?

अमा, मामीच्या प्रश्णाचे उत्तर द्याच कृपया Happy

आज पार्टीमध्ये केले. अर्धी जुडी पालक + ३०० ग्रॅम पनीर + ४ ब्राउन ब्रेडचे स्लाइस + एक उकडलेला बटाटा + लसूण + साधं मीठ + पिझ्झा सिझनींगअसं वापरलं. बेक करत बसायला वेळ नव्हता. ऐनवेळी लाइट नी दगा दिला. मग आम्ही आप्पेपात्रामध्ये थोड्याश्या तेलावर केले हे गोळे.

आलेल्या सगळ्यांनी रेसेपी विचारली. Happy

वरळीला कुठे खाल्ली अमा?>> स्मोक हाउस डेली. हाय स्ट्रीट फिनीक्स. ऑरेंज जिंजर व्होडका, ते राविओली, मुलीने चिकन बर्गर. आणि एक यम्मी चिकन स्टार्टर. तिरामिसू. तुफान मील. एकदम! सर्विस अफलातून छान आहे. तिथे एक बरणीत केक चॉकोलेट आणि कायकाय भरून ठेवलेले आहे असे डेझ र्ट पन मिळते १२५० रु ला आहे. परत तिथे गेले की घेणार आहे. मजा आया. भिजत तिथे जाण्याच्या वर्थ आहे. डेविड रोको मुळे इटालिअन खाणे फार आव्ड्ते. Happy

हाय स्ट्रीट फिनीक्स. <<< हे लोअर परेल ना?

(ता.क. मामी यालाच बिग बझार म्हणते!!!)

मृ, रेसिपी छान आहे. ताजा पालक मिळायला लागला की एकदा करून बघेन.