संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377

२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479

३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering

१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923

१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design

१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645

१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221

१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy

२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633

२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731

२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation

३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis

३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906

४०. किंकर - Management - Banking and Finance

४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)

४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels

चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी PhD Food Engineering मध्ये आहे. Post -doc - Bio-fuels. मलाही लिहायला आवडेल....वेळ मिळाला की नक्की लिहीन.

मस्त धागा...... यादीत नाव असणारया सर्व बुद्धिमान व्यक्तिमत्वांना व त्यांच्या कार्याला खुप सारया शुभेच्छा Happy

कॅन्सर, मधुमेह इ. रोगांवर वर संशोधन करणारे कुणी मायबोलीकर नाहीत का? तसेच फार्मसी, औषधे या विषयात?
आयुर्वेद, शिक्षणक्षेत्र, शेती?

वरची यादी तीनदा वाचूनहि मला काही आढळले नाही (समजले नाही) म्हणून विचारले.
धन्यवाद.

झक्कीजी,
आम्ही आहोत रोमात !!
औषधविज्ञान शास्त्र - संशोधन क्षेत्र : Neurophysiology & Neuropharmacology
मधुमेह संशोधनावर काम केल्याचा थोडा अनुभव आहे ! काही प्रश्न असल्यास जरूर विचारा..
धन्यवाद.

धन्यवाद.
तुमच्या व इतर सर्वांच्या संशोधनात उत्तरोत्तर प्रगति होऊन तुम्हाला सुयश प्राप्त होवो ही सदिच्छा.

वरची यादी पाहून एक क्षण न्यूनगंड आला होता, आपण फारच लवकर दमलो म्हणून! जर जिथे-तिथे गणित नसते तर मास्टर्सवर गाडी थांबवली नसती कदाचित. पण असो.

एक मात्र नक्की - इतक्या विविध क्षेत्रात मायबोलीकर संशोधन करतात याचा खूप आनंद वाटतोय आणि अभिमानही. वरदा - तुम्ही हे संकलनाचं काम केलं नसतंत तर यातल्या किती जणांनी आपणहून स्वतःबद्दल काही लिहिले असते माहीत नाही. तुमचे तुमच्या संशोधनकार्याबद्दल आणि हा प्रकल्प सुरु केल्याबद्दल आभार आणि मनापासून कौतुक!

नुकतीच महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली बातमी कोणी वाचली का? एका लघुग्रहाला 'महाबळ' असे 'अस्चिग' म्हणजेच डॉ. आशीष महाबळ यांचे नाव देण्यात आले. आशीषने स्वत: याबद्दल सांगितलेली माहिती अशी -

It is a main belt asteroid that takes about 3.87 Earth years to orbit Sol. If I were living there, I would not even be a teenager yet. And probably dead. The alternate names for the object are the less glamorous 90472 and 2004 CT99. Attached is a link to the ephemeris generator should you care to glance in that direction over the next few days. At a V magnitude of ~22 it is slightly beyond most amateur telescopes,

म.टा. मधल्या बातमीत लिहिल्याप्रमाणे -
१५ फेब्रुवारी २००४ रोजी एक लघुग्रह दिसला. मात्र त्याच्याविषयीची अधिक माहिती उपलब्ध नव्हती. डॉ. महाबळ यांनी या लघुग्रहाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा सखोल अभ्यास केला. त्याची कक्षा आणि गती जाणून घेतली. ही माहिती मायनर प्लॅनेट सेंटर (एमपीसी) या आंतरराष्ट्रीय संस्थेला मिळाली. ही संस्था अंतराळातील विविध लघुग्रहांचे नामकरण करते. संस्थेने डॉ. महाबळ यांची या लघुग्रहाच्या शोधातील महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेत त्यांचेच नाव देण्याचा निर्णय घेतला. त्या लघुग्रहाला 'महाबळ' हे नाव दिले. हा लघुग्रह सध्या सूर्याच्या पश्चिमेला ~३० अंश आहे. या लघुग्रहाला सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करायला ३.८७ वर्षे लागतात. '९०४७२' आणि २००४सीटी९९' अशी पर्यायी नावेही या लघुग्रहाला देण्यात आली आहेत.

सध्या हा ग्रुप वर आला आहे म्हणून हा बाफ वर काढतो आहे..
वरच्या यादीतले बाकीचे लोकं त्यांच्या प्रवासाबद्दल कधी लिहीणार ?

नमस्कार, मी सध्या 'fluid dynamics' या क्षेत्रात पीएच.डी. करतो आहे. चिलटांच्या पंखांचे aerodynamics, अर्थात चिलटे कशी उडतात आणि कुठल्या घटकांचा त्यांच्या उडण्याला उपयोग होतो यावर संशोधन करतो.

मी plant pathology मध्ये मास्टर्स करतेय...माझं काम कलिंगड आणि टरबूजावर पडणार्‍या रोगावर आहे आणि माझे मिस्टर plant science मध्ये post doc करत आहेत. टोमॅटो, बटाटा इ (solanaceae family) मधे तयार होणार्‍या secondary metabolites वर ते काम करत आहेत. (आम्ही दोघेही इस्राईल मध्ये)

नमस्कार. मी प्रोग्राम अ‍ॅनालिसिस अ‍ॅन्ड कॉम्प्रेहेन्शन मध्ये पीएचडी करतोय, मुख्य फोकस व्हल्नरेबिलिटी अ‍ॅनालिसिस वर. सध्या मी लिनक्स कर्नलच्या मेमरी मॅनेजमेंट वर काम करतो, ती बरोबर काम करते ना, कुठे मेमरी लीक होत नाहीये ना इ.

अरे हा धागा आहे की इथे. मी सध्या ट्रान्स्पोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स विषयात पिएचडी करतो आहे. कृषी मालाच्या ट्रान्स्पोर्टेशन वर फोकस आहे. शेतापासून फर्स्ट युजर पर्यंतची प्रोसेस ऑप्टिमायझेशन करतोय. त्यात फोरकास्टींग पण येतंच.

तू पिएचडी आणि जॉब दोन्ही करतोस का? >> हो रे ! संपेपर्यंत दोन्ही. तसे फक्त थोडा रिसर्च आणि मग थिसीस लिहिणे बाकी आहे.

> वा! किती वेगवेगळ्या विषयात संशोधन चालू आहे मायबोलीकराMकडून!

किती संशोधन करणारे इथे येऊन वेळ घालवतात असं म्हणायचं आहे का?

धनिने म्हंटलच आहे की इथे (म्हणजे मायबोलीवर) खूप काम असल्यानी थेसिसची शिप मागे पडली म्हणून ...

धनि, मिडलमेनना गाळून हे ऑप्टिमयझेशन करायचं की त्यांचंपण मॉडेलिंग करायचं?

वा वा, मस्त. एकदम नव्या दमाची फळी आली!
लोकहो, आपापल्या संशोधनाविषयी इथे लिहा अशी आवर्जून विनंती, आग्रहाचं आमंत्रण, इ.

मला वेळ मिळेल तशी वरची यादी अपडेट मारेन आणि प्रत्येकाला परत एकदा वैयक्तिक स्मरणविपू लिहेनच. Happy

> वा! किती वेगवेगळ्या विषयात संशोधन चालू आहे मायबोलीकराMकडून!

किती संशोधन करणारे इथे येऊन वेळ घालवतात असं म्हणायचं आहे का?

नाही Happy
उपहासाने नाही, कौतुकानेच लिहिल आहे.

Pages