संशोधनक्षेत्रातील मायबोलीकरांची यादी

Submitted by वरदा on 11 November, 2011 - 02:19

आत्तापर्यंत जेवढ्यांचे उल्लेख झालेत त्या त्या माबोकरांची नावं आणि कार्यक्षेत्र याची यादी करतेय. बाकीच्यांनी भर घालावी. जसजसे लेख लिहिले जातील तसे त्यांचे दुवे इथे टाकत राहीनच!
सगळ्या माबोकरांना यादीत भर टाकण्यासाठी आणि संशोधनाविषयी लेख लिहिण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं बोलावणं करतेय, अ‍ॅडमिनच्या वतीने Happy

ज्यांची डॉक्टरेट अजून पूर्ण व्हायची आहे त्यांना इथे फार विस्ताराने/ निष्कर्षांसकट लिहिता येणार नाही याची जाणीव आहे. तरीपण निदान काय काम चालू आहे याचा गोषवारा देऊ शकलात तर फार छान होईल!

१. चारुलता - Experimental Condensed Matter Physics
http://www.maayboli.com/node/30377

२. वरदा - Archaeology
http://www.maayboli.com/node/30478
http://www.maayboli.com/node/30479

३.रूनी - Meteorology/ Atmospheric Physics
४. भाग्या - ??
५. अनिता - ??
६. नलिनी - Chemoinformatics
७. लाजो - environmental design
८. संपदा - Medical Informatics
९. अस्चिग - Astrophysics
१०. चिनूक्स - nanotechnology
११. निवांत पाटिल - Chemical Engineering

१२. पेशवा - Electrical/Computer Engineering
http://www.maayboli.com/node/30923

१३. सखिप्रिया - Electrical/Computer Engineering/Chip Design

१४. सई केसकर - Biofuels
http://www.maayboli.com/node/30645

१५. भास्कराचार्य - mathematics
http://www.maayboli.com/node/41358
http://www.maayboli.com/node/45632
http://www.maayboli.com/node/45918
http://www.maayboli.com/node/46221

१६. रार - Medical/ Stem cell Research
१७. रार चा नवरा - material science
१८. रार ची आई - हिंदी साहित्य
१९. वैशाली अरुण - Solar energy

२०. राजकाशाना - Physics - Probe Microscopy
http://www.maayboli.com/node/30614
http://www.maayboli.com/node/30616
http://www.maayboli.com/node/30633

२१. विजय देशमुख - Photonics
http://www.maayboli.com/node/44626
http://www.maayboli.com/node/44731

२२. अवल - History
२३. ज्ञाती - Neuro-Bio Chemistry
२४. ज्ञातीचा नवरा - thermal/mechanical engineering/nanotechnology research
२५. कानडा - information security by combining biometrics with cryptography
२६. पळस - Spin Physics/ Structural Biology/ Chemistry (का आणखी काहीतरी?? :फिदी:)
२७. निलेश - Environmental Engg
२८. ऋचा - Environmental Engg
२९. अरभाट - Physics
३०. ganeshbehere - Insect Molecular Biology, Evolutionary Biology and Population Genetics of Insects
३१. नलिनीचा नवरा - organic chemistry
३२. चारुलताचा नवरा - Theoretical condensed matter physics
३३. मृदुला - उत्तराची वाट पहात आहे
३४. मृण्मयी - Agrobacterium mediated plant transformation

३५. चंपक - Organic chemistry - Asymmetric synthesis
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301

३६. ललिता-प्रीतिचा नवरा - Chemical Reaction Engineering - Microemulsion Systems and Micellar Catalysis
३७. Bagz - Computer Science - Compilers
३८. कल्पु - Organic Chemisty-New Methods in Asymmetric Synthesis

३९. उदय - Physics
http://www.maayboli.com/node/30906

४०. किंकर - Management - Banking and Finance

४१. शांतीसुधा - Education Technology (Mathematics Education)

४२. अंबरीष फडणवीस - Metabolic Engineering and Biofuels

चूक भूल देणे घेणे, गाळलेल्या जागा भरणे आणि यादी वाढवणे Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या नाही पण पूर्वी neuro-biochemistry मध्ये काम करत होते.
माबोकरांचे कुटुंबिय पण चालणार आहेत का? असेल तर नवर्‍याला सांगेन. तो thermal/mechanical engineering/nanotechnology research मध्ये आहे.

माझी लिहायची खूप इच्छा आहे. पण मला असं 'लिही' म्हणलं की लिहायला जमेलच असं नाही. कदाचित कोणाचा पटकन विश्वास बसणार नाही, पण मला major writing block आहे. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही माझ्याकडून लिखाण होत नाही. लिखाणाची वेळ यावी लागते आणि तशी ती वेळ आली की एकटाकी, एकही शब्द न बदलता मी त्या विषयावर लिहून मोकळी होते.
वरदाला मला लिखाणासाठी खो द्यायचा होता. पण माझं लगेच लिहून होईल की नाही याची मलाच खात्री नाही. Sorry वरदा !
माझ्याकडुन लिखाण घडलंच या विषयावर तर नक्की पोस्ट करीन Happy

तुम्हाला लिखाणासाठी शुभेच्छा ... खूप वेगवेगळ्या विषयावर काम करताहेत लोकं... हे वाचून 'आपण अजून काहीच केलं नाही, करण्यासारखं काम खूप आहे... ' असं वाटायला लागलंय. Very inspiring Happy

माझा इषय बायोफ्युएल्स. >>> गावठी संशोधक Proud
अ‍ॅडमीन आतापर्यंतच्या धाग्यांची लिंक इथे वर देता येईल का ? सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा !

सई केसकर | 15 November, 2011 - 16:38 नवीन
माझा इषय बायोफ्युएल्स.
आपला या विषयावरचा लेख मायबोलीवर /अन्य ठिकाणी कधी प्रकाशीत झालाय का ?

रार, तुझ्या सारखाच प्रॉब्लेम माझाही आहे. मलाही मेजर ब्लॉक आहे पण आत्तापासून सुरुवात केलीस तर होईल १-२ आठवड्यात Happy
ज्ञाती, तू आत्ता काम करत नसलीस तरी काय झालं? पूर्वी जे करत होतीस त्याबद्दल लिही ना. आपण डॉक्युमेंटेशन करतोय कुणी काय संशोधन केलंय त्याचं. तुझ्या नवर्‍यालाही वरच्या यादीत अ‍ॅड केलंय. त्यालाही माबोचा सदस्य व्हायला सांग ना.

अरे वा !! वेगळा धागा. हे सगळे वाचायला आवडेल. ( नाही तरी दुसर्‍यान्च्या पैशाची काळजी करण्याचा आमचा व्यवसाय. सायन्स ह्या विषयाशी आता मुलीचा अभ्यास घेण्या पुरता सम्बन्ध. पण ह्या विषयी वाचायला अतिशय आवडेल.)

माझे वडिल इन्जीनीअर होते. त्यान्ची इत्छ्छा होती की मी प्युअर सायन्स कडे जाव. पण माझी वाट वेगळीच झाली.

आर्थात आमच्या ( म्हणजे कॉमर्स, बॅन्किन्ग, आर्थिक, फायनान्स ह्या) क्षेत्रात सुध्धा चिक्कर
संशोधन चाललेले असते. त्या बद्द्ल ही कोणी लिहा.

छान धागा. Happy सर्वांचा प्रवास वाचायला आवडेल. मुलीला सुट्टीत वाचायला देईन, किती inspiring वाटेल तिला, शिवाय दिशादर्शन सुध्दा होईल असे वाटते.

बरेच जण आहेत की... लिव्हा लिव्हा पटापटा लिव्हा.. वाचून ज्ञानात नक्कीच नवीन भर पडेल...

माझा संशोधनाचा विषय आहे माहिती सुरक्षा ( information security by combining biometrics with cryptography). गेल्या वर्षी मला या विषयात PhD मिळाली. लिहिण्यासारखे भरपुर आहे. शक्य तितक्या लवकर मी यावर लिहितो. तोपर्यंत बाकी विषय वाचतोय.

---
कानडा

@नितीन,
नाही बा! तुम्ही वाचलाय का कुठे?
@नीधप, कळायला काहीच अवघड नाहीये. आणि मी सोपा लिहायचा प्रयत्न करतेच आहे. होईल १-२ दिवसांत.

चला. छान आहे हा धागा.

मी देखील लवकरच टाकतो "माझे जिवशास्त्रातले प्रयोग"......

पण खरचं मी जिवशास्त्रात काम करतो का? का spin physics मध्ये, का structural biology मध्ये, का chemistry, का अजुन कश्यात. कदाचीत मलाच ठावुक नाही.

तर मंडळी, लेख वाचुन तुम्हीच ठरवा.

spin physics, structural biology <<<
म्हणजे? तेही लिहा लेखात. अडाण्यांना उपयोग होईल समजून घेताना.

.

वरदा,
माझं नाव 'पळस' करशील का?
माबो च्या idचे देवनागरीकरण झाले तेंव्हा मला काही जमले नाही आणि मी नेहमी रोमात असल्यामुळे (आळस, आळस, आळस!!!), ते भिजत घोंगडंच आहे अजुन.

नीधप,
spin physics म्हणजे nuclear spin चा अभ्यास. आणि त्याचा वापर करुन atomic/molecular structuresची माहिती मिळवणे. मी Nuclear Magnetic Resonance चा वापर करुन proteins, nucleic acids इ. इ. इ. चा अभ्यास करतो. हेच structural biology.

हो, करते तसा बदल पळस.
आयुष्यात पहिल्यांदाच बहुदा थोडंफार फिजिक्स, केमिस्ट्री, इ. इ. गोष्टी समजतील अशी आशा वाटायला लागली आहे.
सर्व शास्त्रज्ञ मंडळीहो, माझ्या सारख्या (इतरही असतील असे बहुदा..) अडाण्यांना शास्त्र, गणित यातलं ढिम्म काहीही कळत नाही हे लक्षात घेऊन तुमचे लेख लिहा अशी कळकळीची विनंती. नाहीतर शाळेच्या पाठ्यपुस्तकांसारखे हे पण डोक्यावरून जातील Uhoh

माझा पीएचडीचा विषय Meteorology/Atmospheric Physics. सध्या या क्षेत्रात काम करत नाही त्यामुळे लिहायला थोडा वेळ लागेल आणि रार म्हणते तसा मोठ्ठा ब्लॉक आहे डोक्यात सध्या. तेव्हा इतरांनी लिहायला सुरूवात करा मी आलेच तुमच्या मागे.

चंपक, नलिनी यांनी बहुदा रसायनशास्त्रात पी एच डी केलय. फचिन रीसर्च फिल्ड मध्ये नसला तरी त्याचे काम बरचसे त्या स्वरूपाचे आहे. तो बहुदा fluid dynamics मध्ये काम करतो.
नंद्या पण चिप्सवर (खायच्या नव्हे काँप्युटरच्या) काम करतो.
परागकण पण संशोधन क्षेत्रात आहे ना.

Pages